दरडींच्या ठिकाणी पालिका बांधणार संरक्षक भिंती
११५ कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय मुंबई : भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, चेंबूर, कुर्ला पूर्व, साकीनाका, जोगेश्वरी, मालाड येथील २९१ ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका कायम आहे. याठिकाणी २२ हजारांहून अधिक रहिवासी वास्तव्य करत आहेत. रहिवाशांच्या सुरक्षेसाठी संरक्षक भिंत बांधण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्याचबरोबर रहिवाशांचे पुनर्वसन व स्थलांतर करण्यात येणार आहे. यासाठी ११५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. मुंबईत २९१ ठिकाणी दरडींचा धोका असून, त्यातील २०० हून अधिक ठिकाणे ही कुर्ला ते मुलुंड पश्चिम पर्यंतच्या भागात आहेत. विक्रोळी, भांडुपपर्यंत १३२, घाटकोपरमध्ये ३२ ठिकाणे धोकादायक आहेत. कुर्ला येथे १८ ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका आहे. मुलुंड येथील पाच ठिकाणे, देवनार परिसरात ११, मालाडमध्ये १८ आणि मलबार हिल, ताडदेव परिसरात १६ अशी धोकादायक ठिकाणे आहेत. ९,६०० झोपड्यांचे होणार स्थलांतर मुंबईतील २९१ ठिकाणे ही डोंगराळ भागातील धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. त्या ठिकाणी अजूनही २२ हजार ४८३ झोपड्यांपैकी नऊ हजार ६५७ झोपड्यांना इतरत्र स्थलांतरित करण्याची शिफारस मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाने यापूर्वी राज्य सरकारकडे केली आहे.
दीड दिवसांच्या 10672 श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन
इकोफ्रेंडली गणेशोत्सवाला प्रतिसाद देत 2175 शाडूच्या गणेशमूर्तींचे विसर्जन पर्यावरणपूरक दृष्टीकोन जपत 2766 गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन नवी मुंबई : श्रीगणेशोत्सव 2024 ‘इकोफ्रेंडली प्लास्टिकमुक्त’ साजरा करावा अशाप्रकारे महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केलेल्या आवाहनास पर्यावरणप्रेमी नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. 7 सप्टेंबर रोजीच्या श्रीगणेश चतुर्थीपासून प्रारंभ झालेल्या श्रीगणेशोत्सवात दीड दिवस कालावधीतील 10672 श्रीगणेशमूर्तीचे भक्तीमय वातावरणात विसर्जन संपन्न झाले. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 22 नैसर्गिक विसर्जन स्थळे तसेच 136 कृत्रिम विसर्जन स्थळे अशा 158 विसर्जन स्थळांवर दीड दिवसाच्या 10672 श्रीगणेशमूतींना भक्तीपूर्ण निरोप देण्यात आला. नवी मुंबई महानगरपालिकेने सर्व विसर्जन स्थळांवर नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, चोख व्यवस्था केली होती. आठही विभाग कार्यालयांमार्फत संबधित विभागाचे सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली त्या त्या विभागातील विसर्जन स्थळांवर श्रीमूर्ती विसर्जनासाठी संबधित अधिकारी, कर्मचारी व स्वयंसेवक तत्पर होते. ठिकठिकाणच्या नागरिकांनी उत्तम विसर्जन व्यवस्था ठेवल्याबद्दल समाधान व्यक्त करीत महानगरपालिकेची प्रशंसा केली. त्यास अनुसरुन 22 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 7895 घरगुती तसेच 11 सार्वजनिक मंडळांच्या 7906 श्रीमूर्तींचे विसर्जन संपन्न झाले. तसेच 136 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 2761 घरगुती तसेच 5 सार्वजनिक मंडळांच्या 2766 श्रीमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. अशाप्रकारे 10656 घरगुती व 16 सार्वजनिक मंडळांच्या एकूण 10672 श्रीमूर्तीचे विसर्जन सुरळीतपणे पार पडले. यामध्ये शाडूच्या 2174 मूर्तीचे पर्यावरणपूरक दृष्टीकोन जपत भावपूर्ण विसर्जन करण्यात आले. यामध्ये बेलापूर विभागात 5 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 2035 घरगुतीव 04 सार्वजनिक तसेच 19 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 374 घरगुती श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. नेरुळ विभागात 2 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 1119 घरगुती तसेच 26 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 372 घरगुती श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन संपन्नझाले. वाशी विभागात 2 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 745 घरगुती व 02 सार्वजनिक तसेच 16 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 433 घरगुती श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. तुर्भे विभागात 3 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 472 घरगुती व 01 सार्वजनिक तसेच 17 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 443 घरगुती व 3 सार्वजनिक श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन झाले. कोपरखैरणे विभागात 2 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 901 घरगुती तसेच 15 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 419 घरगुती श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन संपन्न झाले. घणसोली विभागात 4 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 1343 घरगुती व 01 सार्वजनिक तसेच 15 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 208 घरगुती श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. ऐरोली विभागात 3 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 1220 घरगुती व 03 सार्वजनिक तसेच 18 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 383 घरगुती व 1 सार्वजनिक श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन संपन्न झाले. दिघा विभागात 1 नैसर्गिक विसर्जन स्थळावर 59 घरगुती तसेच 11 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 129 घरगुती श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन संपन्न झाले.…
मुख्यमंत्री शिंदेनीच केला ‘दादां’चा करेक्ट कार्यक्रम !
मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून चक्क मुख्यमंत्र्यांनाच बगल देणाऱ्या राष्ट्रवादीच्या जाहीरातीमुळे दादा आणि भाईंचे (एकनाथ शिंदे) नेते आणि कार्यकर्ते आमने सामने ठाकले होते. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्याय नेत्यांनीही याबाबत जोरदार आक्षेप नोंदवूनही…
देशभर ७०० कोटी वृक्ष लावण्याचा पर्यावरण संकल्प
रमेश औताडे मुंबई : पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी वृक्ष लागवड व त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीयाने ५ वृक्ष जर लावले तर ७०० कोटी वृक्ष लागवड होऊ शकते. त्यामुळे या पर्यावरणीय जनजागृतीसाठी इको फ्रेंडली लाईफ या सामाजिक संस्थेने देशभर वृक्ष लागवड संकल्प केला असून स्वतः २६ हजार ७०० वृक्ष महाराष्ट्र व गोवा या राज्यात लाऊन पर्यावरण वाचविण्याचा संकल्प केला आहे. अशी माहिती पर्यावरण बचाओ आंदोलनाचे प्रणेते व इको फ्रेंडली लाईफ चे संस्थापक अध्यक्ष अशोक एन. जे. यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बोलताना अशोक एन जे म्हणाले, भारतात तरुण वर्ग जास्त प्रमाणात आहे. त्यांना सोबत घेत हि जनजागृती सुरू आहे. बेरोजगारी, गुन्हेगारी, व्यसनाधीनता, अंधश्रद्धा आणि फसवणूक अशा अनेक समस्यांमध्ये खितपत पडलेल्या समाजाला बाहेर काढायचे असेल तर तरुणांच्या हाती पर्यावरण रक्षणाची जवाबदारी दिली पाहिजे असे अशोक त्यांनी सांगितले. ७०० कोटी झाडे लावण्याचा महासंकल्पामध्ये तरूण वर्ग सहभाग घेत आहे. त्यांनी घेतलेला पर्यावरण रक्षणाचा वसा इतर तरूणांनीही घ्यावा म्हणून हा पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी हे पर्यावरण जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.
मुंबई उपनगर संघाची निवड
राज्यस्तरीय एरियल स्पोर्ट्स स्पर्धा मुंबई : येत्या १३ ते १५ सप्टेंबर रोजी आडगाव, नाशिक येथे एरीयल स्पोर्ट्स असोसिएशन- महाराष्ट्र यांच्यातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी मुंबई उपनगर जिल्हा संघाची निवड करण्यात आली आहे. या संघात बोरीवली (पश्चिम) येथील सुविद्या प्रसारक संघ आणि बीमा नगर एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या ८ खेळाडूंची निवड झाली आहे. या दोन्ही संस्थांमध्ये प्रमुख प्रशिक्षिका व राष्ट्रीय पंच सौ. संचिता देवल यांच्या मार्गदर्शनाखाली हे खेळाडू सराव करतात. सहाय्यक प्रशिक्षक आशिष देवल हे देखील कार्यरत आहेत. हे दोघेही “मल्लखांब लव” या संघाच्या माध्यमातून मल्लखांब, एरियल स्पोर्ट्स, जिमनॅस्टिक, योगा व भारतीय व्यायामाचे नियमित प्रशिक्षण वर्ग चालवतात. गेल्या राज्य स्पर्धेप्रमाणे या स्पर्धेत यंदा देखील मुंबई उपनगरचे खेळाडू चांगली कामगिरी करतील अशी खात्री आहे. या राज्य स्पर्धेतून झाशी येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ निवडण्यात येणार आहे. निवड झालेले खेळाडूं मुली :- नॅशनल डेव्हलपिंग ग्रुप ( ८ ते ११ वर्ष मुली ) १) जिआना रजक २) शिवाई पोवार मिनी ग्रुप (१२ ते १४ वर्ष मुली ) १) सान्वी सावंत २) आर्या जाधव ज्युनियर ग्रुप ( मुली ) १) अमोलिका श्रोत्री मुलांमध्ये :- मिनी ग्रुप (१२ ते १४ वर्ष मुले ) १) शौर्य नाईक सब ज्युनियर ग्रुप (१५ ते १७ वर्ष मुले ) १) निरंजन अमृते ज्युनियर ग्रुप (१८ ते २० वर्ष मुले ) १) द्वारकाधीश पाटील
वंचितचा विधानसभेसाठी नवा फंडा !
मुंबई : आगामी निवडणूकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी नवा फंडा लढविला आहे. सर्व आदीवासी संघटनांना एकत्र आणून आता केवळ राखीवच नाही तर खुल्या जागांवरही वंचित आघाडी उमेदवार उभे…
गणेशोत्सवानिमित्त मेट्रोच्या विशेष वाढीव फेऱ्या
पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या मागणीला यश मुंबई : गणेश उत्सवात नागरिकांचे प्रवासात हाल होऊ नयेत यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मेट्रोच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड आणि एमएमआरडीएला केली होती. त्या अनुषंगाने नागरिकांसाठी रात्रीच्या वेळेत अधिक फेऱ्या आणि विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. ११ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर, २०२४ या कालावधीत अंधेरी (पश्चिम) आणि गुंदवली या दोन्ही टर्मिनल्सवरून शेवटची मेट्रो ट्रेन रात्री ११ ऐवजी रात्री ११.३० वाजता सुटेल. गणेशोत्सवात रात्री उशीरापर्यंत सहभागी झालेल्या भाविकांना आपापल्या घरी पोहोचता यावे, हा या विस्तारित सेवेचा उद्देश आहे. याबद्दल बोलताना मंत्री लोढा म्हणाले “महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबात गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मुंबई शहरातील सार्वजनिक उत्सव मंडळांचे सुंदर देखावे पाहण्यासाठी भक्त रात्री उशिरापर्यंत बाहेर फिरतात. २४ तास सुरु असलेल्या मुंबईमध्ये भक्तांची घरी जाण्याची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही मेट्रो सेवेच्या वेळेत आणि फेऱ्यांमध्ये बदल केले आहेत. या वाढीव फेऱ्यांमुळे गर्दी विभागली जाण्यास मदत होईल, सुव्यवस्था राखली जाईल आणि प्रत्येकाला सणाचा आनंद घेता येईल. विस्तारित सेवांचा तपशील: अंधेरी (पश्चिम) आणि गुंदवली टर्मिनल्सवरून शेवटच्या ट्रेनची वेळ ३० मिनिटांनी वाढवण्यात येणार आहे. दोन्ही टर्मिनल्सवरून अतिरिक्त मेट्रो ट्रेन रात्री ११.१५ आणि ११.३० वाजता सुटतील. गुंदवली ते दहिसर (पूर्व) आणि अंधेरी (पश्चिम) ते दहिसर (पूर्व) या स्थानकांदरम्यान चार वाढीव फेऱ्या सुरु केल्या जातील. या विस्तारामुळे प्रमुख स्थानकांवर एकूण २० अतिरिक्त फेऱ्या चालवल्या जातील. या वाढीव फेऱ्यांचा तपशील खालीलप्रमाणे: १. गुंदवली ते अंधेरी (पश्चिम): रात्री १०:२०, १०:३९, १०:५० आणि ११ वाजता (४ सेवा) २. अंधेरी (पश्चिम) ते गुंदवली : रात्री १०:२०, १०:४०, १०:५० आणि ११ वाजता ( ४ सेवा) ३. गुंदवली ते दहिसर (पूर्व): रात्री ११:१५ आणि ११:३० वाजता (२ सेवा) ४. अंधेरी पश्चिम ते दहिसर (पूर्व): रात्री ११:१५ आणि ११:३० वाजता (२सेवा) ५. दहिसर (पूर्व) ते अंधेरी पश्चिम : रात्री १०:५३, ११:१२, ११:२२ आणि ११:३३ वाजता (४ सेवा) ६. दहिसर (पूर्व) ते गुंदवली : रात्री १०:५७, ११:१७, ११:२७ आणि ११:३६ वाजता (४स ेवा) 00000
वीज कर्मचाऱ्यांना घसघशीत वाढ; आता महाराष्ट्रात सर्वाधिक वेतन
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने राज्य सरकारने महाराष्ट्र महावितरण व महापारेषण या कंपन्यातील कर्मचाऱ्यांना घसघशीत पगारवाढ मिळाली आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात तब्बल १९ टक्क्याने वाढ केली जाणार आहे. तीन्ही…
