दुसऱ्या महाकाय गर्डरची आज जोडणी
अंबाला-न्हावा-वरळी प्रवास होणार जलद मुंबई :मुंबई किनारी (कोस्टल) मार्गावरून वांद्रे- रळी सागरी सेतूकडे जाणाऱ्या मार्गाची दुसरी महाकाय तुळई (गर्डर) अंबाला (हरयाणा) येथून मुंबईत दाखल झाली आहे. ही तुळई मंगळवारी पहाटे…
Mumbai news
अंबाला-न्हावा-वरळी प्रवास होणार जलद मुंबई :मुंबई किनारी (कोस्टल) मार्गावरून वांद्रे- रळी सागरी सेतूकडे जाणाऱ्या मार्गाची दुसरी महाकाय तुळई (गर्डर) अंबाला (हरयाणा) येथून मुंबईत दाखल झाली आहे. ही तुळई मंगळवारी पहाटे…
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातलं वातावरण तापलं आहे. निवडणुकीच्या वातावरणात राजकीय नेते विविध मुलाखतींमधून विरोधकांवर हल्लाबोल करत आहेत. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंबाबत मोठा गौप्यस्फोट केलाय. २०१९ साली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर…
मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन झालं आहे. रंगभूमीवरच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. रंगभूमीवर प्रेम करणाऱ्या या कलाकाराने स्टेजवरुनच…
जरांगे पाटलांनी उडवली खिल्ली मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेकडे राज्यातील कोट्यवधी मराठा बांधवांचे लक्ष लागले आहे. राज्यात लोकसभा निवडणुकांचे तीन टप्प्यातील मतदान पूर्ण झाले…
मुंबई : राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, त्यांनी यापूर्वीही आम्हाला पाठिंबा दिला आहे. आम्ही देशासाठी चांगले काम केले आहे, यावर त्यांचा विश्वास आहे. आमच्या विचारांना तसेच आमच्या द्रष्टेपणाला ते पाठिंबा देतात. महाराष्ट्राच्या विकासातही ते हातभार लावू शकतील, असे…
मुंबई: लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी उद्या सोमवारी १३ मे रोजी देशभरातली ९६ लोकसभेच्या जागांसाठी मतदान होणार असून त्यात महाराष्ट्रातील ११ जागांचा समावेश आहे. रावसाहेब दानवे, अमोल कोल्हे, आढळराव पाटील, पंकजा मुंढे, चंद्रकांत…
मुंबई : गर्दीमुक्त प्रवास केव्हा नशिबी येणार, लोकलमधील प्रवाशी मृत्यू केव्हा थांबणार, लोकल वेळेवर केव्हा धावणार, असे सवाल सर्वसामान्य प्रवाशांतून राजकीय पक्षांना विचारले जात आहेत. तसेच निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या उमेदवारांनी अगोदर लोकलच्या गर्दीतून प्रवास करून दाखवावा, त्यानंतर मते मागावीत, अशा प्रतिक्रिया मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशी व्यक्त करत आहेत. ‘सकाळ’च्या प्रतिनिधीने सीएसटीएम ते अंबरनाथ प्रवास केला. या प्रवासातून रेल्वे प्रवाशांच्या भावना जाणून घेतल्या. लोकल सेवा ही मुंबई शहराची जीवनवाहिनी आहे. हीच लोकल दिवसाला सरासरी ८ ते १० जणांचे जीवही घेत आहे. दररोज १० ते १२ प्रवाशी जखमी होतात. गेल्या काही वर्षांत ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले. त्या तुलनेत लोकल सेवेत फारशा सुधारणा झाल्या नाहीत. वाढत्या गर्दीमुळे अनेक प्रवाशांना लोकलच्या दरवाजाला लटकून प्रवास करावा लागतो. परिणामी, प्रवासी धावत्या लोकलच्या दरवाजातून पडणे, बाहेरील खांबाचा जोरदार फटका बसण्याच्या घटना घडत आहेत. मुंबईत २०२३ या वर्षात विविध रेल्वे अपघातांत २, ५९० प्रवाशांचा मृत्यू; तर २,४४१ प्रवासी जखमी झाले. याकडे कुणाचेच लक्ष नाही. सध्या दररोज मध्य रेल्वेवर १,८१० लोकल फेऱ्या आणि पश्चिम रेल्वेवर १,३९४ लोकल फेऱ्या धावतात. दोन्ही मार्गांवर ६० ते ७० लाख प्रवासी दररोज प्रवास करतात. मात्र, मेल-एक्स्प्रेसला महत्त्व देण्यात येत असल्याने सकाळी बदलापूर, टिटवाळा, अंबरनाथ, कसारा आणि कर्जतवरून येणाऱ्या लोकल सेवा विलंबाने धावत असल्याने प्रवाशांना दररोज लेटमार्क लागतो. लोकलचे वेळापत्रक विस्कळित होणे नित्याचीच बाब झाली असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. मुंबईतील लोकलमधील गर्दी कमी करण्याकडे कुणाचेही लक्ष नाही. प्रवाशाचा मृत्यू होणे ही नित्याचीच बाब झाली आहे. निवडणुका संपल्यानंतर एकही खासदार लोकसभेत लोकल प्रवाशांच्या समस्या मांडताना दिसत नाही. – अन्ना सावंत, प्रवाशी लोकल विलंबाने धावत असल्यामुळे लोकलमधील गर्दी वाढते. त्यामुळे काही प्रवासी लोकलच्या दरवाजाला लटकून प्रवास करतात. त्यात अनेकांचा खाली पडून मृत्यू होतो. लोकल वक्तशीरपणे चालल्या पाहिजेत. – रोशन लिखार, प्रवासी प्रवासी सोयी-सुविधा केव्हा ? मुंबईतील असंख्य रेल्वेस्थानकांवर पिण्याचे शुद्ध पाणी, सरकते जिने, स्वच्छतागृहे, लिफ्ट यांसारख्या प्रवाशी सोयी-सुविधांची कमतरता आहे. यासोबत लोकलमध्ये गर्दुल्ले, मोबाईल, पर्स चोरांचा सुळसुळाट झाला आहे. रात्री महिला प्रवाशांचा प्रवास सुरक्षित करण्यात अजूनही रेल्वेला पाहिजे तेवढे यश मिळताना दिसत नाही. त्यामुळे प्रवासी सुविधायुक्त रेल्वेस्थानके केव्हा आकाराला येणार, असा सवाल मुंबईकरांचा आहे.
मुंबई: प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून ‘आरटीई’ प्रवेशाची नव्याने प्रवेश प्रक्रिया ही मंगळवार (१४ मे) पासून सुरू केली जाणार आहे. यासाठी नव्याने आदेश जारी केले जाणार असून यासाठीची तयारी शिक्षण विभागाकडून करण्यात येत आहेत. या प्रवेश प्रक्रियेत सरकारी, अनुदानितच्या सर्व शाळांना वगळले जाणार असून केवळ खासगी शाळांमध्येच प्रवेश केले जाणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकारी सूत्रांकडून देण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाने ६ मे रोजी शालेय शिक्षण विभागाने सुरू केलेल्या नवीन प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देत पूर्वीप्रमाणे खासगी शाळांमध्ये ‘आरटीई’चे प्रवेश करण्याचे निर्देश दिले. त्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाकडून ही प्रवेश प्रक्रिया पूर्वीप्रमाणे राबवली जाणार आहे. यामुळे मुंबईसह राज्यातील शेकडो पालकांना खासगी शाळांचे पर्याय उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाने केलेल्या या बदलाचे अखिल भारतीय समाजवादी शिक्षक सभा, मूव्हमेंट फॉर पीस जस्टिस अँड सोशल वेल्फेअर, आम आदमी पार्टीसह अनेक संघटनांनी स्वागत केले. १४ मे नंतर प्रवेश प्रक्रिया १४ मे पुढील १५ दिवसांत प्रवेश प्रकिया आटोपून घेतली जाईल. शाळा सुरू होण्यापूर्वीच आरटीईचे प्रवेश पूर्ण करून संबंधित विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशीच आरटीईतून प्रवेश मिळून ते शाळेत दाखल होतील, यासाठीचे नियोजन केले जाणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली. असे असतील नवीन प्रवेश आरटीईच्या नवीन प्रवेश प्रक्रियेत सर्वच पालकांना नव्याने ऑनलाईन अर्ज करावे लागतील. मागील वर्षी ज्या शाळांची नोंदणी ही आरटीई प्रवेशासाठी करण्यात आली होती, त्या शाळांमध्ये हे प्रवेश केले जातील. सरकारी, अनुदानित शाळा वगळल्याने प्रवेशासाठी राज्यभरात उपलब्ध असलेल्या ९ लाख ५६ हजारांपैकी केवळ खासगी शाळांतील १ लाखांच्या दरम्यान जागा उपलब्ध असतील. एक किमीची अटही शिथिल शालेय शिक्षण विभागाकडून यंदाच्या शैक्षणिक वर्षात आरटीईच्या प्रवेशासाठी सरकारी, अनुदानित शाळांच्या एक किमी परिसरातील खासगी शाळांना आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेतून वगळण्यात आले होते. यामुळे राज्यभरातील बहुतांश शहरांमध्ये आरटीईच्या प्रवेशासाठी खासगी शाळांचे पर्याय कमी झाले होते. त्यामुळे आता नवीन प्रवेश प्रक्रियेत एक किमीची अटही शिथिल केली जाणार आहे. ‘त्या’ पालकांना मिळणार मुभा आरटीई प्रवेशासाठी नव्या नियमानुसार सरकारी, अनुदानित आणि खासगी व्यवस्थापनाच्या ७६ हजार ५३ हून अधिक शाळांमधील ९ लाख ९६ हजारांहून अधिक जागांवर प्रवेश केले जाणार होते, यासाठी न्यायालयाने स्थगिती देईपर्यंत या प्रवेशासाठी केवळ ६९ हजार ३६१ पालकांनी आरटीई प्रवेशासाठी अर्ज केले होते. यातील सरकारी, अनुदानित शाळांसाठी ज्या पालकांनी पर्याय निवडला त्या पालकांना संबंधित शाळांमध्ये प्रवेश घेण्याची मुभा दिली जाणार असल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आले.
अनिल देसाई यांचे मत मुंबई : अल्पसंख्यांक याच मातीतील असून जीडीपीमध्ये त्यांचा वाटा मोलाचा आहे. मात्र अल्पसंख्यांकांना गेली दहा वर्षे सर्व क्षेत्रात डावलले जात असून त्यांचा आहार, पोषाख, चालीरीती यांबाबतही…
अशोक गायकवाड मुंबई : मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर १२ पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले असून त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदारांना मतदान करता येणार आहे, अशी माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजय यादव यांनी दिली आहे. मुंबई शहर जिल्ह्यात पाचव्या टप्प्यात सोमवार दि. २० मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. सर्व नोंदणीकृत मतदारांना मतदान केंद्र, यादी भाग क्रमांक, मतदानाची तारीख, वेळ आदी माहितीच्या वोटर स्लिप निवडणूक कार्यालयाकडून वितरित केल्या जात आहेत,असेही जिल्हाधिकारी यादव यांनी यावेळी सांगितले. छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र आहे असे मतदार मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्र सादर करतील. छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करू शकणार नाहीत अशा मतदारांची ओळख पटविण्यासाठी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या १२ पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे. पारपत्र (पासपोर्ट), वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), केंद्र अथवा राज्य शासन, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र, बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक, पॅन कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र, निवृत्तीवेतनाची दस्तावेज, संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, आधार कार्ड, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाच्यावतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र, कामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड हे १२ पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. मुंबई शहर जिल्ह्यात ३७३ अनिवासी भारतीय (एनआरआय) मतदार आहेत. या मतदारांचे नाव मतदान यादीत असल्याने त्यांना मूळ पास पोर्ट असेल तर मतदान करता येईल. प्रवासी भारतीयांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक असणार आहे,अशी ही माहिती जिल्हाधिकारी यादव यांनी यावेळी दिली.