Category: मुंबई

Mumbai news

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी  केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतले गणरायाचे दर्शन

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट देत गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री शाह यांचे स्वागत केले. गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते केंद्रीय गृहमंत्री शाह यांचे शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना ‘शासन आपल्या दारी’ पुस्तकाची प्रत आणि गणपतीची मूर्ती भेट म्हणून देण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या स्नुषा वृषाली शिंदे यांनी गृहमंत्री शाह यांचे औक्षण करीत स्वागत केले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री दीपक केसरकर, मंगल प्रभात लोढा, माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार चंद्रशेखर बावनकुळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी गृहमंत्री शाह यांनी मुख्यमंत्री शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, स्नुषा वृषाली यांच्याशी संवाद साधला.

लाडक्या बहि‍णींमुळे होमगार्ड ‘नावडते’

मुंबई : राज्यात धुमधडाक्यात सुरु असलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीणी’ योजनेचा फटका राज्यातील होमगार्डना बसल्याचे समोर आले आहे. लाडक्या बहीणी योजनेला पैसै वळवल्यामुळे निधीअभावी राज्यातील होमगार्डच्या भत्तावाढीला स्थगिती मिळाली आहे. तशा आशयाचं पत्रही सोशल मीडियावर व्हायरल…

ख्रिस्ती बांधवांचे श्रद्धास्थान असणाऱ्या  माउंट मेरीच्या जत्रेला आज मुंबईतील वांद्रे येथे सुरूवात झाली . येत्या १५ सप्टेंबर पर्यंत ही जत्रा सुरु राहणार आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आज मुंबईत आगमन झाले. मुंबईत त्यांच्या  स्वागताला करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

अमित शहांची ‘पाठशाळा’

मुख्यमंत्री शिंदेनी बोलावली सेनेच्या मंत्र्याची तातडीची बैठक स्वाती घोसाळकर मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांच्या भेटीसाठी मुंबईत दाखल झाले आहेत. आगामी विधानसभेच्या पार्श्वभुमीवर व्युव्हरचना करण्यासाठी आणि महायुतीतील बेबनाव…

गणेश चतुर्थी दिवशी मुलुंडमध्ये दुर्दैवी घटना

2 गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना BMW ने उडवले, एकाचा मृत्यू मंुबई : मुलुंडमध्ये पहाटे चार वाजता एका बीएमडबल्यू कारने रस्त्यावर बॅनर लावणाऱ्या दोन गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना जोरदार धडक दिली आहे. त्यानंतर…

गणेशोत्सवादरम्यान पोलिसांना नाचण्यापासून मनाई, पोलीस आयुक्तांनी काढला महत्त्वाचा आदेश

मुंबई: गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचा सण आहे, ज्यात भक्त मोठ्या उत्साहाने बाप्पाची स्थापना आणि विसर्जन करतात. ढोल-ताशांच्या गजरात आणि उत्सवाच्या जल्लोषात नागरिक सहभागी होतात. मात्र, याच पार्श्वभूमीवर पोलिसांना देखील…

कॅन्सरशी लढा देणाऱ्यांसाठी क्रांतिकारी उपक्रम मुख्यमंत्री आरोग्यनिधी प्रमुख मंगेश चिवटे यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई :कॅन्सरशी लढा देणाऱ्यांसाठी क्रांतिकारी उपक्रम म्हणून, नवी मुंबईतील खारघर येथे मेडिकोव्हर हॉस्पिटल्सने केमोथेरपी घेत असलेल्या रुग्णांसाठी सुरक्षित सुविधा देण्यासाठी डिझाइन केलेला एक केमो डे केअर वॉर्ड सुरू केला आहे.…

‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत कौपरखैरणे येथील निसर्गोद्यानात 100 हून अधिक देशी वृक्षरोपांची लागवड

नवी मुंबई: केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ‘स्वच्छता ही सेवा अभियान’ राबविले जात असून ‘स्वभाव स्वच्छता – संस्कार स्वच्छता’ हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून विविध उपक्रम राबविले जात आहेत. यामधील…