Category: मुंबई

Mumbai news

सरकता जिना उलटा फिरला, दिवा स्टेशनवर उडाला गोंधळ

मुंबईः ठाण्यातल्या दिवा स्टेशनवर एक अजबच प्रकार घडला आहे. वरच्या दिशेला जाणारा सरकता जिना अचानक खालच्या दिशेला सरकू लागला. त्यामुळे प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला…

विधानपरिषद निवडणूकीसंदर्भात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीसमवेत विभागीय आयुक्त पी.वेलरासू यांची बैठक

अशोक गायकवाड नवी मुंबई :भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण विभाग पदवीधर विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणूकी संदर्भात माहिती व सूचना देण्याकरिता विविध पक्षाच्या प्रतिनिधींची…

कोकण रेल्वेचा विस्टाडोम डबाही प्रतीक्षा यादीत

मुंबई : निसर्ग सौंदर्याने नटलेल्या कोकणातील रेल्वे प्रवासही भूरळ घालणारा आहे. मुंबई-गोवा रेल्वे प्रवासात नयनरम्य हिरवळ, धबधबे, नद्या आदी दृष्य ‘याचि देही याचि डोळा’ पाहण्याची संधी देणारा विस्टाडोम डबा मुंबई – मडगाव जनशताब्दी आणि तेजस एक्स्प्रेसला जोडण्यात आला आहे. इतर सर्व डब्यांच्या तुलनेत जवळपास दुप्पट भाडे असलेला हा डबा गणेशोत्सव काळात पूर्णपणे आरक्षित झाला आहे. विस्टाडोम डब्यातील तिकिटासाठी प्रतीक्षा यादी सुरू झाली आहे. तर ६ सप्टेंबर रोजी जनशताब्दी एक्स्प्रेसच्या विस्टाडोम डब्याच्या प्रतीक्षा यादीची मर्यादा संपली आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने सर्वात प्रथम मुंबई – मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसला काचेचे छत आणि रुंद खिडक्या असलेला विस्टाडोम डबा २०१८ साली जोडण्यात आला. या डब्याला वाढणारा प्रतिसाद पाहून मुंबई – मडगाव मार्गावरील तेजस एक्स्प्रेसला २०२२ मध्ये दुसरा विस्टाडोम डबा जोडण्यात आला. तेजस एक्स्प्रेसला विस्टाडोमचे दोन डबे आहेत. त्यामुळे गणेशोत्सव काळात विस्टाडोम डब्यातून प्रवास करण्यासाठी अनेकांची धडपड सुरू आहे. नोकरीनिमित्त कोकणातील मूळगावापासून बाहेर गेलेला कोकणी माणूस गणेशोत्सवानिमित्त कोकणाची वाट धरतो. यंदा ७ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव आहे. त्यापूर्वीच अनेक कोकणवासीयांनी गावी जाण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी मंगळवारपासून तिकीट काढण्यासाठी दगदग सुरू आहे. मात्र, कोकणात जाणाऱ्या बहुतांश सर्वच रेल्वेगाड्यांच्या प्रतीक्षा यादीची मर्यादा संपल्याचे संदेश दिसत आहेत. आता कोकणात जाणाऱ्या जनशताब्दी, तेजस एक्स्प्रेसचा विस्टाडोम डबाही प्रतीक्षा यादीत आहे. जनशताब्दी एक्स्प्रेसच्या ४, ५, ६ सप्टेंबर रोजीच्या द्वितीय आसन श्रेणीची आणि ५,६ सप्टेंबरची वातानुकूलित आसन श्रेणीची प्रतीक्षा यादी ‘रिग्रेट’ दाखवित आहे. तर, विस्टाडोम डब्याची ४ आणि ५ सप्टेंबरची प्रतीक्षा यादी अनुक्रमे ३२, ४९ वर होती. तर, ६ सप्टेंबर रोजीचे तिकीट आरक्षण ९ मेपासून सुरू झाले. या विस्टाडोम डब्याची  प्रतीक्षा यादी ६ सप्टेंबर रोजी सकाळी ८ नंतर ‘रिग्रेट’ दाखवित होती. तेजस एक्स्प्रेसच्या दोन विस्टाडोम डब्याचे आरक्षण सुरू झाले असून ५ सप्टेंबर रोजीची प्रतीक्षा यादी २३ झाली होती.

अक्षय तृतीयेनिमित्त घरांची विक्री तेजीत

मे महिन्यात केवळ दहा दिवसांत तीन हजारांहून अधिक घरांची विक्री मुंबई : घर खरेदीसाठी महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर मालमत्ता बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण असून बाजारपेठेतील सर्व व्यवहारांना तेजी आल्याचे चित्र आहे. घरांची चौकशी, नोंदणी, घरांचा ताबा, गृहप्रवेश आणि नवीन प्रकल्पांचा आरंभ असे व्यवहार आज तेजीत आहेत. तर दुसरीकडे मे महिन्याच्या केवळ पहिल्या दहा दिवसांत मुंबईत तीन हजारांहून अधिक घरांची विक्री झाली आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेला घर, सोने, वाहन खरेदीचा मुहूर्त साधला जातो. त्यामुळे सहाजिकच या दिवशी मालमत्ता बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण असते. या दिवशी घर खरेदी करण्याकडे वा नवीन घरात प्रवेश करण्याकडे ग्राहकांचा कल असतो. त्यामुळे या दिवशी मालमत्ता बाजारपेठेतील सर्वच व्यवहार तेजीत असतात. परिणामी, मे महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांतच तीन हजार २८० घरांची विक्री झाली आहे. घरांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून मुद्रांक शुल्कापोटी राज्य सरकारला २९२ कोटी रुपये महसूल मिळाला आहे. अक्षय तृतीयेला घरविक्रीत वाढ होते. या संधीचा फायदा घेण्यासाठी विकासक अक्षय तृतीयेला अनेक सवलती देतात. यंदाही विकासकांनी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर अनेक सवलती दिल्या आहेत. काहींनी घर खरेदीवर सवलत जाहीर केली आहे, तर काहींनी मुद्रांक शुल्क वा इतर शुल्क माफी वा शुल्कात सवलत देऊ केली आहे. त्याचवेळी काही विकासकांनी विविध भेटवस्तू देऊ केल्या आहेत. सोन्या-चांदीच्या नाण्यांपासून अगदी मोड्युलर किचन, फर्निचर आदी भेटवस्तूंचा यात समावेश आहे. अक्षय तृतीयेचा मुहूर्त ग्राहक आणि विकासकांसाठी महत्त्वाचा असतो. विकासक या दिवशी नवीन प्रकल्पांना सरुवात करतात. त्यानुसार आज मुंबईत अनेक ठिकाणी नवीन गृहप्रकल्पांना सुरुवात होत असल्याची माहिती बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली.

उद्धव ठाकरेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज: देवेंद्र फडणवीस

मुंबई : उद्धव ठाकरे यांचा तोल सुटलेला आहे. त्यांना वैद्यकीय उपचारांची आवश्यकता आहे. त्यांनी एखाद्या मानसोपचार तज्ज्ञांना दाखवावे. त्यांची मदत घ्यावी, असा पलटवार प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.  या स्तराला जाऊन एखाद्या पक्षाचा प्रमुख बोलतो, त्यावेळी निश्चितपणे…

वीजग्राहकांसाठी महावितरणचे ‘ऊर्जा’ चॅट बॉट

मुंबई:  महावितरणने राज्यातील ३ कोटी वीजग्राहकांसाठी ऑनलाइनद्वारे घरबसल्या एका क्लिकवर सर्व सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून वीजग्राहकांच्या संवादपर मदतीसाठी ‘ऊर्जा’ चॅट बॉट २४x७ महावितरणच्या संकेतस्थळ व मोबाईल ॲपवर…

ड्रग्सवरील कारवाई कोणत्या मंत्र्यांच्या सांगण्यावरून रोखली?

ॲड. प्रकाश आंबेडकरांचा फडणवीसांना सवाल मुंबई : महाराष्ट्रातील युवकांना नशेबाज करणाराड्रग्सचा साठा नाशिक ते लोणावळा या दरम्यान आहे. परंतु, अजूनही तिथे छापा टाकला जात नाही. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेला सांगावं की, त्यांना केंद्रातील कोणत्या मंत्र्यांकडून सूचना…

रिया गायकवाडचा अटकेपार झेंडा

अमेरिकेच्या बफेलो विद्यापीठात ऑनर्स स्टुडेंट कॉन्सीलच्या अध्यक्षपदी मुंबई (प्रतिनिधी):- लातुरचे माजी खा. अ‍ॅड. सुनिल गायकवाड यांची पुतणी रिया विजयकुमार गायकवाड हिची अमेरिकेच्या बॅफेलो विद्यापीठाच्या ‘ऑनर्स स्टुडेंट’ कौन्सीलच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड झाली आहे. या निवडीबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. सन २०२४-२५ या वर्षासाठी तिची अध्यक्षपदी निवड झाली आहे. रिया ही बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग (बायोमेडिकल इंजिनिअरिंग) प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. सातसमुद्रापार तिने हे यश मिळविल्याबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत असून मा.खा. सुनिल गायकवाड, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक तथा उपाध्यक्ष अनिलकुमारजी बी. गायकवाड, विक्रांद टाइम्स व अग्रसेन टाइम्स परिवार, मुख्य संपादक अरुणकुमार एस. मुंदडा, लेखक मिलिंद काटे, ज्येष्ठ पत्रकार गुलाब भावसार, भागा वरखडे, राजीव मंडलिक, अण्णा सोमवंशी, चांद शेख, निलेश वाणी आदींनी तिचे अभिनंदन केले आहे. तिच्या या यशाने गायकवाड कुटुंबीयाच्या मानात आणखी एक तुरा रोवला गेला आहे.

नालेसफाईच्या कामांना नवी मुंबईत वेग

अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार व शहर अभियंता संजय देसाई यांची संयुक्त पाहणी नवी मुंबई : पावसाळापूर्व कामे विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश विशेष आढावा बैठक घेत नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी मागील आठवडयात दिले असून त्या अनुषंगाने सर्वच विभागांमार्फत सुरु असलेल्या कामांना वेग आलेला आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पूर्वेकडील डोंगररांगांपासून पश्चिमेकडील खाडीला मिळणारे नैसर्गिक नाले असून ते पावसाळी पाणी विनाअडथळा वाहून जाण्यासाठी साफ असावेत यादृष्टीने त्या नाल्यांसह शहराच्या अंतर्गत असलेल्या मोठया नाल्यांचीही पावसाळापूर्व सफाई सुरु आहे. नमुंमपा क्षेत्रात 77 लहान – मोठे नैसर्गिक नाले असून घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत त्यांच्या सुरु असलेल्या सफाई कामांची अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार आणि शहर अभियंता श्री. संजय देसाई यांनी संयुक्तपणे पाहणी करत या कामांना वेग देण्याच्या व खोल सफाई करण्याच्या सूचना केल्या. याशिवाय सायन-पनवेल महामार्गावर तीन नाल्यांची अभियांत्रिकी विभागामार्फत सफाई करण्यात येत आहे. नाल्यांमधून जेसीबीव्दारे काढला जाणारा गाळ तसेच काही नाल्यांच्या प्रवाहात व काठांवर असणारी मनुष्यबळ लावून साफ केली जाणारी झाडे झुडपे आणि कचरा काठांवर ठेवला जात असून हा गाळ काहीसा सुकून वाहतूक करण्यायोग्य झाल्यानंतर तत्परतेने त्या ठिकाणाहून हलविण्याची खबरदारी घ्यावी असे निर्देश देत याबाबत हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असे निर्देशित करण्यात आले. या पाहणीमध्ये वाशीतील से-17 नाला, से.12 नाला, से.29 नाला तसेच से.12 व से.8 येथील धारण तलाव त्याचप्रमाणे कोपरखैरणे येथील आलोक नाला, से.2 नाला, घणसोली-कोपरखैरणे नाला या नाले स्वच्छतेची पाहणी करण्यात आली. नाल्यांची साफसफाई, धारण तलावांचे फ्लॅप गेट्स, पंपिंग मशिनरी, स्ट्रेन्चेस अशा विविध कामांची त्यांनी बारकाईने पाहणी केली. आयुक्त महोदयांनी पावसाळापूर्व कामांसाठी 15 मे ही डेडलाईन दिली असून विहित वेळेत काम पूर्ण करण्याचे संबंधित विभागांनी नियोजन करावे व विशेषत्वाने नैसर्गिक नाले सफाईच्या कामांना वेग दयावा असे अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार व शहर अभियंता श्री. संजय देसाई यांनी निर्देशित केले आहे. या पाहणी प्रसंगी संबंधित विभागाचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी, कार्यकारी अभियंता, स्वच्छता अधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मतदानाच्या प्रचारासाठी नवी मुंबईत फिरताहेत लक्षवेधी ग्रीन मॅस्कॉट्स 

नवी मुंबई : 25 ठाणे लोकसभा निवडणूकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी या दृष्टीने स्वीप कार्यक्रमांतर्गत महापालिका  आयुक्त्‍ डॉ. कैलास शिेदे यांच्या मार्गदर्शनानुसार विविध प्रसार माध्यमांचा वापर केला जात आहे. यामध्ये मतदान यंत्राचे मुखवटे अर्थात शुभंकर (मॅस्कॉट्स) तयार करण्यात आले असून हे चार मॅस्कॉट्स संपूर्ण महापालिका क्षेत्रात फिरुन 20 मे रोजी होणाऱ्या ठाणे लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याविषयी जनजागृती करत आहेत. हिरव्या फ्लुरोसन्ट रंगात चटकन नजरेत भरणारे हे मोठया आकाराचे चार मॅस्कॉट्स लक्षवेधी असून या मॅस्कॉटच्या पुढील भागावर मतदान यंत्राची प्रतिकृती आहे. त्याचप्रमाणे पाठीवरील मागील भागात मतदान करण्याविषयी आवाहन करणारा फलक प्रदर्शित करण्यात आला असून त्यावर वोटर हेल्पलाईन ॲपचा क्यूआर कोड नमूद करण्यात आलेला आहे. हे मॅस्कॉट्स नागरिकांमध्ये व त्यातही मुलांमध्ये लोकप्रिय होत असून अनेकजण या मॅस्कॉटसोबत सेल्फी छायाचित्र काढून आपापल्या सोशल मिडीया अकाऊंटवरुन प्रदर्शित करीत आहेत. महापालिका निवडणुक विभागाचे उप आयुक्त्‍ श्री. शरद पवार यांच्या नियंत्रणाखाली या मॅस्कॉट्समार्फत मतदान जनजागृती प्रचार वेळापत्रक तयार करण्यात आले असून प्रत्येक मॅस्कॉटला विभाग नेमून देण्यात आलेला आहे. संबंधित विभागांचे सहा. आयुक्त्‍ तथा विभाग अधिकारी यांचे मॅस्कॉट्सव्दारे जनजागृती कार्यावर लक्ष असणार आहे. पथनाटयांप्रमाणेच लक्ष वेधून घेणाऱ्या मॅस्कॉट्सव्दारे लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन करणाऱ्या स्वीप उपक्रमास नागरिकांची पसंती मिळताना दिसत आहे.