Category: मुंबई

Mumbai news

एमजेएससी ट्रॉफी कॅरम स्पर्धेत शालेय ४० खेळाडूंमध्ये रविवारी चुरस

एमजेएससी ट्रॉफी कॅरम स्पर्धेत शालेय ४० खेळाडूंमध्ये रविवारी चुरस मुंबई : माहीम ज्युवेनाइल स्पोर्ट्स क्लब-एमजेएससी व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित शालेय मुलामुलींच्या विनाशुल्क कॅरम स्पर्धेत एमजेएससी ट्रॉफीसाठी १ फेब्रुवारी रोजी…

ग्राहकांची ऑनलाईन तक्रार प्रक्रिया ठप्प

ग्राहकांची ऑनलाईन तक्रार प्रक्रिया ठप्प रमेश औताडे मुंबई : कंझ्युमर गाइडन्स सोसायटी ऑफ इंडिया या नामांकित स्वयंसेवी संस्थेची ग्राहकांसाठी हेल्पलाईन सेवा सध्या खंडित झाल्याने नागरिकांना ऑनलाईन तक्रार नोंदवता येत नाही.…

सीटीसीच्या शताब्दी समिटला मुंबईत प्रारंभ

सीटीसीच्या शताब्दी समिटला मुंबईत प्रारंभ रमेश औताडे मुंबई : चेंबर ऑफ टॅक्स कन्सल्टंट्स या अग्रगण्य व्यावसायिक संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त ‘द शताब्दी समिट सेंटेनरी कॉन्फरन्स’ या दोन दिवसाच्या भव्य परिषदेला शुक्रवारी प्रारंभ झाला. परिषदेचे प्रमुख पाहुणे व मुख्य वक्ते इंडसइंड बँकेचे नॉन-एक्झिक्युटिव्ह चेअरमन डिझिग्नेट अरिजित बसू यांनी  भारताच्या आर्थिक प्रवासात लवचिक वित्तव्यवस्था व जबाबदार विकास या विषयावर बोलताना त्यांनी नैतिकता, दीर्घकालीन दृष्टिकोन आणि व्यावसायिकांच्या जबाबदारीवर भर दिला. बदलत्या आर्थिक व व्यावसायिक वातावरणात कर, कायदा व लेखा क्षेत्रातील तज्ज्ञांनी तंत्रज्ञान, प्रशासन आणि उत्तरदायित्वाशी सुसंगत राहणे आवश्यक आहे. शताब्दी समिट हे या दृष्टीने मार्गदर्शक ठरेल असे सीटीसीचे अध्यक्ष सीए जयंत गोखले यांनी सांगितले. उपाध्यक्ष सीए नेहा राजेन गडा, संयुक्त मानद सचिव सीए मेहुल शेट्टी व सीए अंकित संघवी तसेच मानद खजिनदार सीए वितांग शाह उपस्थित होते. शताब्दी वर्ष समितीचे अध्यक्ष सीए विपुल चोक्सी यांनी सांगितले की, परिषदेत भांडवली बाजार, स्टार्टअप्स, जीएसटी, संबंधित पक्ष व्यवहार, कर नियोजन तसेच व्यावसायिक सेवांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या प्रभावावर सखोल चर्चा झाली.

  पालिकेच्या जागेच्या बदल्यात फेरीवाल्यांकडून हप्ता वसूली

पालिकेच्या जागेच्या बदल्यात फेरीवाल्यांकडून हप्ता वसूली मुलुंड म्हाडा कॉलनीत फेरीवाल्यांमुळे नागरीक त्रस्त पालिका अधिका-यांच्या संपत्तीची चौकशीची मागणी मुंबई: निष्पाप लोकांचा जीव गेल्याशिवाय प्रशासकीय यंत्रणेला जाग येत नाही. हे सर्व श्रुत आहे. भांडुपची दुर्घटना असो वा कुर्ल्यातील मारहाण प्रकरणानंतर फेरीवाल्यांवर युध्द स्तरावर कारवाई करण्यात आली. आता दोन्ही प्रकरण शांत झाल्यानंतर पुन्हा एकदा फेरीवाल्यांनी ठाण मांडायला सुरवात केली आहे. याचा सर्वाधीक त्रास मुलुंडकरांना होत असून केवळ फुटपाथच नव्हे तर रस्त्यांवरही त्यांनी आपले बस्तान मांडुन ठेवले आहे. दिखाऊ पणाची कारवाई करणारी पालिका प्रशासन वारंवार कायदा मोडणा-या फेरावाल्यांवर कायमस्वरुपी कारवाई का करीत नाही असा प्रश्न नागरीक करीत आहेत. मुलुंड पश्चिम येथील महात्मा गांधी मार्गावरील फेरीवाल्यांच्या अतिक्रमनाबाबत नागरीकांनी केलेल्या तक्रारी नंतर फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. मात्र दुस-याच दिवशी फेरीवाल्यांनी या ठिकाणी अतिक्रमण केले. दिखाऊ पणाची कारवाई करणारे पालिका प्रशासन अशा फेरीवाल्यांवर गुन्हे दाखल का करीत नाहीत. असा प्रश्न नागरीकांना पडला आहे. एम.जी. मार्गावर दुकानदार व फेरीवाल्यांनी फुटपाथ अडवून ठेवली आहे तर रस्तांवर बेकायदेशीर पार्किग मुळे पादचा-यांना रस्त्यावरुन चालावे लागते. त्यामुळे स्टेशनकडे येणा-या बेस्ट बसेसमुळे भांडुप सारखी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अत्यंत अरुंद रस्त्यातून बेस्ट बसला मार्गक्रमण करावे लागते. रस्त्याच्या दुतर्फा भागात फेरीवाल्यांनी व बेकायदेशीर पार्किंगवाल्यांनी अतिक्रमण केल्याने नागरीकांना या भागातून चालणे अवघड होऊन गेले आहे. अशीच परिस्थिती मुलुंड पश्चिम येथील रामरतन त्रीवेदी मार्ग, एस.एल.मार्ग या ठिकाणी दिसून येते. मुलुंड पुर्व पश्चिम येथे तर अनेक ठिकाणी ना फेरीवाला क्षेत्र अशी पाटी लावण्यात आली आहे. विनोदाची गोष्ट म्हणजे फेरीवाले याच पाटीखाली आपला ठेला (दुकान) लावतात. त्यांना आता पालिकेच्या कारवाईची भीती राहिली नसून पालिका व फेरीवाल्यांमधील आर्थिक व्यवहारामुळे त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचे फेरीवाले व नागरीक सांगतात. मुलुंड पुर्व येथील म्हाडा कॉलनी रिध्दी सिद्धी इमारती मधील दुकानदारांनी त्यांचे विक्रीचे सामान शटर बाहेर काढल्याने नागरीकांना या ठिकाणी चालता येत नाही. त्यातच फेरीवाल्यांचे अतिक्रमण व बेकायदेशीर पार्किंगमुळे शाळेत जाणा-या लहान मुलांना व पालकांना जीव धोक्यात घालून रस्तांवरुन चालावे लागते. दुकानदारांमुळे बेकायदेशीर पार्किंग ही येथील नागरीकांची डोकेदुखी ठरली असून अशाच पार्किंगमुळे म्हाडा कॉलनीत एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर फेरीवाल्यांकडून हप्ते वसुली केली जात असल्याचे नागरीक उघडपणे बोलतात. अनेकांनी तर पालिकेची जागा फेरीवाल्यांना चालविण्यासाठी दिली असून त्याबदल्यात महिना ठराविक रक्कम त्यांच्याकडून वसूल केली जाते. हा सर्व प्रकार म्हाडा कॉलनीत राजरोसपणे चालतो.  पालिका व पोलीस प्रशासनाच्या नाकाखाली चालणा-या या हप्ते वसुलीवर कारवाई मात्र शुन्य असल्याचे नागरीक सांगतात. चाईनीस, पानीपुरी, नारीयळ पाणी व वडापावच्या फेरीवाल्यांकडून ही हप्ते वसूली केली जात असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे पालिका व फेरीवाल्यांच्या आर्थिक उलाढाली पाहता पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांपासून ते सर्व वरिष्ठ अधिका-यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी आता नागरीक करीत आहेत.

आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा काढून अनपेक्षित सत्कार

आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा काढून अनपेक्षित सत्कार रमेश औताडे मुंबई: कसारा रेल्वे स्थानकावर आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष अध्यक्ष नारायण बागडे यांचा कार्यकर्त्यांनी अनपेक्षित व उत्स्फूर्त सत्कार केल्याचा प्रसंग घडला. विशेष म्हणजे, कोणतीही पूर्वसूचना नसताना स्थानिक कार्यकर्त्यांना त्यांच्या उपस्थितीची माहिती कशी मिळाली, याचेच सर्वांना आश्चर्य वाटले. बागडे स्थानकावर आले असल्याची खबर लागताच कार्यकर्त्यांची फोनाफोनी सुरू झाली. काही क्षणांतच हार आणि शाल घेऊन कार्यकर्ते स्थानकावर दाखल झाले.  त्यानंतर  यांच्या गळ्यात पुष्पहार घालून व शाल देऊन त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. अचानक घडलेल्या या प्रसंगाने स्थानकावरील प्रवासीही क्षणभर थबकले. कार्यकर्त्यांचे प्रेम, आपुलकी आणि संघटनेप्रती असलेली निष्ठा या क्षणातून स्पष्टपणे दिसून आली, असे बागडे यांनी यावेळी भावना व्यक्त करताना सांगितले. हा संपूर्ण प्रसंग उपस्थितांनी पाहिलेला एक अविस्मरणीय क्षण ठरला.

 प्रसाद लाड यांनी बारामतीत अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली

प्रसाद लाड यांनी बारामतीत अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली तुम्हाला अशा प्रकारे श्रद्धांजली अर्पण करावी लागेल, असे वाटले नव्हते— प्रसाद लाड मुंबई: ‘अशाप्रकारे बारामतीत येऊन, तुम्हाला श्रद्धांजली अर्पण करावी लागेल, अशी अजूनही कल्पना करवत नाही’ म्हणत आमदार प्रसाद लाड यांनी अजित पवार यांना बारामती येथे वाहिली श्रद्धांजली. यावेळी प्रसाद लाड यांनी शरद पवार, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, पार्थ पवार, जय पवार यांच्यासह पवार कुटुंबातील सदस्यांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी सोबत आमदार चित्राताई वाघ, आशिष कुलकर्णी उपस्थित होते.

राष्ट्रीय मिल मजदूर संघाची स्व.अजितदादांना भावपूर्ण श्रध्दांजली

जनकल्याणाचा ध्यास असलेले नेते हरपले! राष्ट्रीय मिल मजदूर संघाची स्व.अजितदादांना भावपूर्ण श्रध्दांजली मुंबई: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने एक धैर्यशील,प्रगती आणि जनकल्याणाचा ध्यास असलेले नेते हरपले, महाराष्ट्राची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे,अशा भावपूर्ण शब्दात राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर, सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी काल दुर्दैवी विमान अपघातात निधन पावलेले महाराष्ट्राचे लोकनेते अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली आहे. राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आज शो व्यक्त ठरावाद्वारे लोकप्रिय नेते अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.रा.मि.म.संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ आहिर यानी बारामतीला जाऊन स्व.अजितददाच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

अजित पवारांच्या  विमान अपघाताची चौकशी सुरू

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी आता केंद्रीय संस्थेकडून होणार आहे. विमान अपघात तपास ब्युरो या संस्थेने अपघाताची चौकशी सुरू केली असून त्याचा अहवाल आल्यानतंर तो राज्य सरकारलाही पाठवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या अपघाताची चौकशी करावी असे पत्र केंद्रीय उड्डाण मंत्री किंजरापु राममोहन नायडू यांना लिहिलं होतं. त्यानंतर केंद्रीय मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात ही माहिती दिली. विमान अपघात तपास ब्युरो यांनी तपास सुरु केला आहे. विमानातील ब्लॅकबॉक्स ताब्यात घेण्यात आला आहे. विमान अपघात आणि घटना नियमांनुसार, तपास सुरु केला आहे. तो पारदर्शी आणि कालबद्ध पद्धतीने होईल. या अपघातातील सर्व टेक्निकल रेकॉर्डस, ऑपरेशनल तपशील, घटनास्थळावरील तथ्य याचा तपास केला जात आहे. भविष्यात अशा घटना होऊ नयेत, या आपल्या विनंतीची मंत्रालयाने दखल घेतली असून, चौकशी अहवाल येताच त्यादृष्टीने उपाययोजना करण्यात येतील. या चौकशीत महाराष्ट्र सरकारचेही सहकार्य आम्हाला मौल्यवान असेल. स्थानिक प्रशासनाची यात मदत लागेल. हा संपूर्ण चौकशी अहवाल राज्य सरकारलाही आम्ही देऊ.

राष्ट्रवादीचे नेतृत्व सुनेत्रा पवारांकडे ?

स्वाती घोसाळकर मुंबई – उपमुख्यमंत्री अजितदादा पवार याच्या निधनानंतर राष्ट्रवादी पक्षाचे नेतृत्व त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी करावे यासाठी जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत.  अजितदादांच्या अकाली जाण्याने उपमुख्यमंत्रीपद रिक्त झाले आहे. राष्ट्रवादीत छगन भुजबळ हे माजी उपमुख्यमंत्री होते. त्यानंतर सुनील तटकरे,…

जिल्हा परिषद- पंचायत समिती  निवडणुका आता ७ फेब्रुवारीला

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहिर करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका दोन दिवसांनी पुढे ढकलल्या आहेत. त्यानुसार ५ फेब्रुवार रोजी होणारे मतदान आता ७ फेब्रुवारी रोजी होणार आहे. तर मतमोजणीची तारीखही आता ९ फेब्रुवारी करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकांसाठी १३ जानेवारी २०२६ रोजी सविस्तर निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्या कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्र दाखल करणे, नामनिर्देशनपत्र मागे घेणे, निवडणूक चिन्ह वाटप तसेच अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र मतदान, मतमोजणी आणि निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करणे हे टप्पे अद्याप शिल्लक आहेत. या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत  सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२६ नंतर फक्त दोन आठवड्यांची मुदतवाढ दिली होती. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया १४ फेब्रुवारीच्या आत पूर्ण करणे आवश्यक होते. या सर्व बाबी लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने मतदान आणि मतमोजणीच्या तारखा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.