Category: मुंबई

Mumbai news

डॉ ज्ञानदेव म्हस्के यांची कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

अशोक गायकवाड मुंबई:राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी आज डॉ ज्ञानदेव कुंडलिक म्हस्के यांची सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती केली आहे.* सातारा येथील डॉ धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय येथे प्राचार्य असलेल्या डॉ ज्ञानदेव म्हस्के यांची नियुक्ती ते पदभार स्वीकारतील त्या दिवसापासून पाच वर्षांच्या कालावधीकरिता किंवा ते वयाची ६५ वर्षे पूर्ण करतील, या पैकी जे अगोदर त्या दिवसापर्यंत केली आहे. सातारा येथे नव्याने स्थापन झालेल्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे प्रथम कुलगुरु म्हणून शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु प्रो. डी टी शिर्के यांची २१ ऑक्टोंबर २०२२ च्या शासन आदेशान्वये नियुक्ती केली होती. त्यानंतर दिनांक ११ ऑक्टोबर २०२३ व १३ एप्रिल २०२४ च्या मा. राज्यपालांच्या आदेशान्वये पुढील सहा-सहा महिन्यांकरिता त्यांचेकडे पदाचा कार्यभार सोपविण्यात आला होता. डॉ ज्ञानदेव म्हस्के यांनी प्राणिशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी व पीएच डी प्राप्त केली असून गेल्या १९ वर्षांहून अधिक काळापासून ते प्राचार्य पदावर कार्यरत आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या कुलगुरू नियुक्तीसाठी राज्यपालांनी अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ एस. एस. मंथा यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत केली होती. सातारा येथील रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिल आप्पासाहेब पाटील, पुणे येथील भारती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ शिवाजीराव कदम, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी तसेच त्रिपुरा विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. गंगा प्रसाद प्रसाई (युजीसी प्रतिनिधी) हे ‘कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या कुलगुरु निवड समितीचे अन्य सदस्य होते. समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांची निवड जाहीर केली.

एमसीएफ बोरिवली येथे राज्य कॅरम स्पर्धेचे आयोजन

मुंबई : महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आणि मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटनेच्या मान्यतेने २२ ते २४ जून २०२४ दरम्यान रोटरी क्लब ऑफ बोरिवलीच्या सहकार्याने ९ वी एम सी एफ राज्य मानांकन…

अनूसूचित व नवबौध्द प्रवर्गातील विदयार्थ्यांनी परदेशी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करा – वंदना कोचुरे

अशोक गायकवाड नवी मुंबई : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रती वर्षी अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील ७५ विद्यार्थ्यांना (मुले-मुली) परदेशांमध्ये अध्ययन करण्यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी परदेश शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी दि. १२ जुलै २०२४ सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन वंदना कोचुरे प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण मुंबई विभाग यांनी केले आहे. सामाजिक न्याय विभागाची परदेशी शिष्यवृत्ती योजना अत्यंत महत्वाची योजना आहे. अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील मुला-मुलींना परदेशात पदव्युत्तर पदवी आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाचे (पी.एच.डी.) विशेष अध्ययन करण्यासाठी आर्थिक मदत देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेंतर्गत राज्यातील अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील पदव्युत्तर पदवी आणि पी.एच.डी.साठी अद्ययावत परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या ७५ विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते. या योजनेसाठी विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्यतील असावा व त्यांचे वार्षिक उत्पन्न ८ लाखापेक्षा जास्त नसावे इत्यादी या योजनेच्या अटी आहेत. विद्यार्थ्यांनी अर्जाचा नमुना व अधिक सविस्तर माहितीसाठी www.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरील ‘ताज्या घडमोडी’ या लिंकवरुन डाऊनलोड करुन घ्यावी व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.

निधी वाटपात महाराष्ट्रावर अन्याय

मुंबई : महाराष्ट्रातून जीएसटीसह सर्व प्रकारच्या कर संकलनातून सर्वात जास्त निधी केंद्र सरकारकडे जमा होतो पण राज्याला निधी देताना मात्र हात आखडता घेतला जातो. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे नवीन सरकार स्थापन…

शरद पवारांच्या राष्ट्रवादीत धुसफूस

मुंबई : राष्ट्रवादीतील फुटीनंतर पहिला वर्धापन साजरा करणाऱ्या शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीतील धुसफूस एन कार्यक्रमात पहावयास मिळाली. काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापनदिन सोहळा नुकतेच अहमदनगरमध्ये पाडला. या सोहळ्यात स्टेजवर बसलेल्या नेत्यांकडून एकमेकांवर खोचक टीका…

चार सहा महिने थांबा, राज्य सरकारच बदलतो- शरद पवार

मुंबई : “सरकारला अनुदान द्यावेच लागेल, नाही दिले तर रस्त्यावर उतरायला लागेल. चार सहा महिने थांबा मला राज्य सरकार बदलायचं आहे. निर्णय घेण्याचा अधिकार तुमच्या हातात द्यायचा आहे. त्यासाठी तुमची साथ हवी आहे. लोकसभेला साथ दिली…

महायुतीचा पुन्हा मविआशी मुकाबला

विधानपरिषदेसाठी उमेदवार ठरले; मुंबई : शिक्षक आणि पदवीधर मतदार संघातील राज्यातील विधानपरिषदेच्या चार जागांसाठी उमेदवार आज फायनल झाले. अर्ज मागे घेण्याच्या आजच्या अंतिमदिवशी मुंबई शिक्षक मतदार संघ वगळता उर्वरीत तीन जागांवर भाजपाप्रणित…

५० हजाराहून अधिक कोयी जमा करत नागरिकांचा पर्यावरणशील सहभाग

आंब्याच्या कोयी संकलन उपक्रम नवी मुंबई : वेगवेगळ्या प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून शहर स्वच्छतेत तसेच पर्यावरण रक्षण – संवर्धनात नवी मुंबई महानगरपालिका नेहमीच आघाडीवर राहिली असून याच धर्तीवर जागतिक पर्यावरण…

वस्ताद वसंतराव पाटील यांना ‘राष्ट्रीय गरुड झेप’ पुरस्कार प्रदान

मुंबई : मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या सौजन्याने व मीरा-भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाडा भाईंदरचे सर्वेसर्वा वस्ताद गुरुवर्य वसंतराव पाटील यांनी कुस्ती क्षेत्रात तीन दशकांपेक्षा जास्त काळ दिलेल्या भरीव योगदानाबद्दलसांगली…

छत्रपती शंभूराजे यांची पुण्यतिथी ‘बलिदान दिवस’ म्हणून फाल्गुन अमावस्येला पाळण्यात यावा

शिवभक्त श्री राजू देसाई यांचे कळकळीचे आवाहन मुंबई : गुढीपाडव्याच्या सणासाठी श्रीखंड त्याच दिवशी आणा आदल्या दिवशी म्हणजे फाल्गुन अमावस्येला नको. कारण तो दिवस छत्रपती शंभूराजे यांची पुण्यतिथी असून तमाम हिंदूंनी हा दिवस बलिदान दिवस म्हणून पाळला पाहिजे, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक आणि शिवभक्त श्री राजेश उर्फ राजू देसाई यांनी कळकळीचे आवाहन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५१ व्या शिवराजाभिषेक दिनानिमित्त जय महाराष्ट्र नगर, बोरीवली पूर्व येथील मागाठाणे मित्र मंडळाच्या प्रबोधनकार ठाकरे ग्रंथालयात शिवचरित्राचे गाढे अभ्यासक आणि शिवभक्त श्री राजेश शांताराम उर्फ राजू देसाई यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, त्यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजाभिषेकसह अनेक घटना खड्या आवाजात कथन केल्या तसेच औरंगजेबाने छत्रपती शंभूराजे यांचा तब्बल चाळीस दिवस अतोनात छळ केला. शंभूराजे यांचे हात तोडण्यात आले. डोळे काढण्यात आले, शीर धडापासून वेगळे केले पण छत्रपती शंभूराजांची ना नजर झुकली, ना मान झुकली‌. हमने हमारी फौजमें कैसे कैसे सूरमा पालके रखे हैं, शाहिस्तेखान गया तो शिवाने उसकी उंगलियाॅं काटके भेज दिया, अफझलखान को शिवाने वहीं दफना दिया. हमको दुष्मन भी मिला तो शिवा जैसा और शंभू जैसा. अगले जनम में हमें शंभू जैसा शूरवीर बेटा मिले, असे औरंगजेबाने म्हटले असल्याचे खफीखान या औरंगजेबाच्या इतिहासकाराने लिहून ठेवले आहे, असे जेंव्हा राजू देसाई यांनी सांगितले तेंव्हा उपस्थित शिवभक्तांच्या अंगावर काटा उभा राहिला. साहित्यिक विजय मडव, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी, मनोहर देसाई, वसंत सावंत, दिनेश विचारे, अभिलाष कोंडविलकर, दिलीप चव्हाण, संजना वारंग, सुभाष देसाई, हेमंत पाटकर, कांचन सार्दळ, रोहिणी चौगुले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.