Category: मुंबई

Mumbai news

कलियुगात अजूनही माणुसकी जिवंत आहे…

रमेश औताडे मुंबई : आज एक रुपया कोणी कुणाला सोडत नसल्याच्या कलियुगात एका रुग्णाची १२ हजार रुपयाची बॅग त्याला शोधून परत करणाऱ्या सुरक्षा रक्षकाचा कामगार दिनी सत्कार झाल्याने अजूनही माणुसकी…

परवीनकुमार थिंड यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती

मुंबई उत्तर मध्य मतदारसंघासाठी झाली निवड मुंबई : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 29- मुंबई उत्तर मध्य मतदारसंघासाठी भारत निवडणूक आयोगाने भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी परवीनकुमार थिंड यांची नियुक्ती केली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी सोनाली मुळे यांनी ही माहिती दिली. निवडणूक निरीक्षक श्री. थिंड यांचा पत्ता : निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय,  29-मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ, जिल्हाधिकारी कार्यालय, पाचवा मजला, प्रशासकीय इमारत, सरकारी वसाहत, वांद्रे (पूर्व), मुंबई – 400051. त्यांचा संपर्कासाठी  मोबाईल क्रमांक (+)९१ ८९२८५७१२५३ असा आहे. दरम्यान, निवडणूक निरीक्षक श्री. थिंड यांनी आज दुपारी आढावा बैठक घेतली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती मुळे यांच्यासह पोलिस अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, खर्च पथक प्रमुख  आदी उपस्थित होते.  या बैठकीत निवडणूक निरीक्षक श्री. थिंड यांनी नामनिर्देशन व्यवस्था, ETPBMS वेळापत्रक, घरपोच मतदान, पोस्टल बॅलेट मतदान, मतदानाच्या तयारी आदी बाबतचा आढावा घेतला. खर्चाच्या दृष्टिकोनातून आदर्श आचारसंहिता आणि संवेदनशील भागात सतर्कता बाळगावी, अशा सूचना देत त्यांनी मुक्त आणि नि:पक्ष मतदान घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवतानाच उमेदवारांकडून समाजमाध्यमांवर होणाऱ्या प्रचारावर बारकाईने लक्ष ठेवावे, अशा सूचना 29- मुंबई उत्तर मध्य मतदारसंघासाठी नियुक्त निरीक्षक परवीनकुमार थिंड यांनी दिले. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यान्वित करण्यात आलेल्या माध्यम व सनियंत्रण कक्षास 29- मुंबई उत्तर मध्य मतदारसंघासाठी नियुक्त सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक श्री. थिंड यांनी आज दुपारी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी मनोज गोहाड उपस्थित होते. यावेळी निवडणूक निरीक्षक श्री. थिंड माध्यम कक्षाचे कामकाज, दैनंदिन पाठविले जाणारे अहवाल, समाजमाध्यम, वर्तमानपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे यांचे सनियंत्रण कशा प्रकारे केले जात आहे, याची माहिती घेतली. सध्या वर्तमानपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांपेक्षा समाजमाध्यमांचा अधिकाधिक प्रचार उमेदवार करताना दिसतात. त्यामुळे या माध्यमाद्वारे उमेदवारांच्या प्रचाराकडे आणि त्यावर केल्या जाणाऱ्या खर्चावर बारकाईने लक्ष देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. या भेटीत श्री. थिंड यांनी माध्यम कक्षांच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.

परिचारिकेला मारहाण केल्याच्या निषेधार्थ भाभा रुग्णालयात आंदोलन

मुंबई : कुर्ला येथील मुंबई महानगरपालिकेच्या भाभा रुग्णालयात बुधवारी रात्री ११.३० वाजता महिला रुग्ण व तिच्या नातेवाईकांनी रुग्ण कक्षातील परिचारिकेला शिवीगाळ करीत मारहाण केली. यामुळे संतप्त झालेल्या परिचारिकांनी गुरुवारी सकाळी रुग्णाच्या नातेवाईकांना त्वरित अटक करावी आणि परिचारिकांच्या सुरक्षेसाठी रुग्ण कक्षात सुरक्षा रक्षक नेमावा अशी मागणी करत जोरदार आंदोलन केले. परिचारिकांच्या आंदोलनामुळे रुग्ण सेवेवर परिणाम झाला. कुर्ला येथील भाभा रुग्णालयात महिला रुग्ण कक्षात रात्रपाळीला असलेल्या परिचारिका मोहिनी मातेरे यांनी रात्री रुग्णांना औषध देण्याच्या वेळी रुग्णांच्या नातेवाईकांनी कक्षातून बाहेर जाण्यास सांगितले. त्यावेळी अल्पवयीन रुग्ण असलेल्या मुलीने तिच्या सोबतच्या मित्र व नातेवाईकांना बाहेर पाठविण्यास नकार दिला. मात्र रुग्णांना औषध देण्याबरोबरच कक्षाची सफाई करायची आहे, तसेच हा महिला कक्ष असल्याने रात्री उशिरा पुरुष थांबू शकत नसल्याचे त्यांनी रुग्ण व तिच्या नातेवाईकांना सांगितले. मात्र ती रुग्ण ऐकण्यास तयार नव्हती. तिने मला रुग्णालयात राहायचे नाही असे सांगत रुग्णालयातून सुट्टी (डिस्चार्ज) घेतली. त्यानंतर थोड्या वेळाने ती आपल्या काही नातेवाईकांसोबत पुन्हा रुग्णालयात आली आणि तिने मोहिनी मातेरे यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. हा प्रकार मातेरे यांनी परिचारिका प्रमुख आणि वैद्यकीय अधीक्षक यांना सांगितला आणि याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार केली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या परिचारिकांनी गुरुवारी सकाळी कामावर रुजू न होता आंदोलन केले. सबंधित रुग्णाच्या नातेवाईकांना अटक करवी. तसेच प्रत्येक कक्षामध्ये सुरक्षा रक्षक नियुक्त करावा, अशी मागणी परिचारिकांकडून करण्यात आली. दरम्यान या संदर्भात रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक पद्मश्री आहिरे यांच्यासोबत परिचारिकांच्या झालेल्या बैठकीत सुरक्षा रक्षक प्रमुखांनी पुरेसे सुरक्षा रक्षक नसल्याचा मुद्दा निदर्शनास आणला. यावर आहिरे यांनी वरिष्ठांशी चर्चा करून लवकरात लवकर सुरक्षा रक्षक नेमण्यात येतील, असे आश्वासन परिचारिकांना दिले. रुग्णाच्या नातेवाईकांनी परिचारिकेला मारहाण केल्यामुळे सर्व परिचारिकांनी आंदोलन केले. या घटनेमुळे परिचारिकांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. रुग्णाच्या नातेवाईकांना त्वरित अटक करून परिचारिकांना संरक्षण देण्याची व्यवस्था करावी. – ॲड. प्रकाश देवदास, अध्यक्ष, महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटना

निखिल पाटीलचे नाबाद दमदार शतक

ठाणे प्रीमियर लीग टी – २० क्रिकेट स्पर्धा ठाणे : सामनावीर ठरलेल्या निखिल पाटीलचे नाबाद दमदार शतक, साहिल गोडेच्या ९१ धावा आणि गोलंदाजांच्या एकत्रित चांगल्या कामगिरीच्या जोरावर एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबच्या ब संघाने ए.टी स्पोर्ट्सचा १९८ धावांनी दणदणीत पराभव करत महाराष्ट्र माझा सेवा संस्था आयोजित ठाणे प्रीमियर लीग टी – २० क्रिकेट स्पर्धेत पहिला विजय मिळवला. फलंदाजांच्या आक्रमक खेळामुळे २५८ धावांचा पर्वत उभा केल्यावर एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब ब संघाच्या गोलंदाजांनी ए,टी स्पोर्ट्सला ६० धावांवर गुंडाळत विजयावर शिक्कामोर्तब केले. दादोजी कोंडदेव स्टेडीयमवर सुरु असलेल्या स्पर्धेतील सामन्यात प्रथम फलंदाजी करताना निखिल पाटील आणि साहिल गोडेने ए.टी. स्पोर्ट्सच्या गोलंदाजांचा अक्षरशः फडशा पाडला. निखिलने नाबाद ११८ धावांची खेळी केली. ४८ चेंडूत शतक साकारणाऱ्या निखिलने ९ चौकार आणि तेवढेच षटकार ठोकले. साहिलने ३६ चेंडूत ९१ धावांची बहुमूल्य खेळी साकारताना १२ चौकार आणि पाच षटकार मारले. धृमील मटकरने नाबाद ३० धावा केल्या. या डावात योगेश सावंतने दोन, अश्विन यादव आणि सिद्धार्थ यादव यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला. त्यानंतर मोठ्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या ए टी स्पोर्ट्सच्या फलंदाजाना खेळपट्टीवर टिकू न देता गोलंदाजांनी विजयाचा मार्ग मोकळा केला. संक्षिप्त धावफलक : एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब ( ब संघ ) : २० षटकांत ४ बाद २५८ ( निखिल पाटील  नाबाद ११८, साहिल गोडे ९१, धृमील मटकर नाबाद ३०, योगेश सावंत ४-२५-२, अश्विन यादव ४-४९-१, सिद्धार्थ यादव ४-५२-१) विजयी विरुद्ध ए टी स्पोर्ट्स : १२.१ षटकात सर्वबाद ६० ( कौशिक शुक्ला १८, शिवम घोष १५ , हेमंत बुचडे २-४-२, अमित पांड्ये २-७-२,अर्जुन शेट्टी २-७-२, धृमील मटकर १.१ – २-१, अमन खान १-४-१,नंदन कामत३-१३-१.) सामनावीर – निखिल पाटील.

गणेश आखाड्याच्या कुस्तीपटूंची चमक

मुंबई : महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून गाव चिखले, जि. पालघर येथे मिरा भाईंदर महानगर पालिकेच्या सौजन्याने आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती मैदानात , मिरा भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाड्यातील पैलवानांनी भरघोस बक्षिसांची लयलूट केली. मनीषा शेलार हिने महिला गटातील फायनलची गदे वरील कुस्ती जिंकली. कोमल पटेल, मनस्वी राऊत, कविता राजभरने आपल्या लढती सहज जिंकून चषक पटकावले. सूरज माने, सूर्यकांत देसाई, आदर्श शिंदे, अभिषेक इंगळे यांनी देखील प्रतिस्पर्ध्यांना लिलया आस्मान दाखवून रोख रकमेची पारितोषिके आणि पदके मिळवली. या सर्व कुस्तीपटूंना वस्ताद वसंतराव पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.

बुजुर्ग क्रीडा प्रशिक्षक किसन कदम यांचे निधन

मुंबई : लोकमान्य शिक्षण संस्थेचे विश्वस्त, श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन शाळेचे माजी क्रीडा शिक्षक, बुजुर्ग क्रीडा प्रशिक्षक, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त किसन  सखाराम कदम यांचे १ मे रोजी सकाळी चेंबूर येथील कोळेकर हॉस्पिटलमध्ये अल्पशा आजाराने निधन झाले. निधना  समयी ते ८६ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात २ मुले, १ मुलगी असा परिवार आहे. चेंबूर हायस्कूल या चेंबूर च्या पहिल्या शाळेत काम करत असताना भ. मा. पंत यांच्या तालमीत कदमसर तयार झाले. बास्केटबॉल, खोखो, ॲथलेटिक्स अश्या विविध खेळांच्या स्पर्धांत राज्य व राष्ट्रीयस्तरावर कदमसर सहभागी झाले होते. त्यांनी या विविध खेळात अनेक खेळाडू तयार केले. त्यानंतर पंत सरांबरोबर जवाहर विद्याभवन व श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन शाळा  स्थापन करून गरीब मुलांना शिक्षण देण्यात सरांचा मोठा वाटा होता. कदम सरांच्या १ खेळाडूला अर्जुन पुरस्कार, १४ खेळाडूंना शिवछत्रपती पुरस्कार, २२ खेळाडूंना जिल्हा क्रीडा पुरस्कार मिळाले. सरांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या खेळाडूंनी  आशियाई स्पर्धेत देखील भरघोस पदकांची कमाई केलेली आहे. चेंबूर येथील चरई स्मशानभूमीत कदम सरांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

जय जय महाराष्ट्र माझा… गर्जा महाराष्ट्र माझा…

महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत १ मे हा महाराष्ट्र स्थापना दिवस जल्लोषात साजरा झाला. यावेळी राज्यपाल आणि मुख्यंत्र्यांनी राज्यातील सुरक्षा बलांची सलामी स्वीकारली… छाया –…

संजय निरुपम शिंदेंच्या सेनेत  

मुंबई : काँग्रेसमधून शिस्तभंगाच्या कारवाईसाठी निलंबित करण्यात आलेले संजय निरुपम आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. संजय निरुपम 3 मे रोजी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर संजय निरुपम यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्यावर शिक्कामोर्तब केला आहे. संजय निरुपम 20 वर्षांनंतर शिवसेनेत घरवापसी करणार…

मे महिना तापदायक !

मुंबई : यंदाच्या मे महिन्यात देशातील तापामानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्यामुळे एकुणच भारताला हा मे महिना अधिक तापदायक ठरणार आहे. मे महिन्यात देखील देशातील बहुतांश भागात तापमान सरासरीहून अधिक…

रक्तदानातून साजरा झाला महाराष्ट्र दिन

घाटकोपरच्या शिबिरात ५४३ रक्तदात्यांचे रक्‍तदान मुंबई-  महाराष्‍ट्र दिनाचे औचित्‍य साधून घाटकोपर पूर्वेतील शिवराज क्रीडा मंडळ, पंतनगर यांनी आयोजित केलेल्‍या रक्‍तदान शिबिरामध्ये ५४३ हून अधिक रक्तदात्यांनी रक्‍तदान केले. शिवराज क्रीडा मंडळाचे…