Category: मुंबई

Mumbai news

बेवारस वाहनांच्या मालकी हक्काबाबत पोलिसांकडून आव्हान

नवी मुंबई, :- एन आरआय सागरी पोलीस ठाणे, नवी मुंबई यांच्या पोलीस ठाण्याच्या आवारातील बेवारस पडून असलेल्या  मोटार  दुचाकी, स्कुटर, ऑटो रिक्षा,फोर व्हिलर  या वाहनांच्या मालकी हक्काबाबत एन आरआय सागरी पोलीस ठाणे, नवी मुंबई यांच्याशी संपर्क साधण्यात यावा. अशी माहिती एन आरआय सागरी पोलीस पोलीस ठाणे नवी मुंबईचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश कदम यांनी दिली आहे. एन आर आय सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध कारणास्तव प्राप्त झालेली 55 दुचाकी वाहने, 4- चारचाकी वाहन, 1 थ्री व्हीलर एकूण 60 बेवारस वाहने एन आर आय सागरी पोलीस ठाण्याच्या आवारात एकत्र करुन ठेवण्यात आली आहेत. वर्षानुवर्षे या वाहनांचे मूळ मालक सदर वाहने घेऊन जाण्यास आलेले नसल्याने एन आर आय सागरी पोलीस ठाण्यामार्फत सदर वाहनांच्या मूळ मालकांनी सात दिवसांच्या आत आपली वाहने कागदपत्रे दाखवून या बातमी सोबत दिलेल्या यादीतील आपल्या वाहनांची ओळख पटवून ती घेऊन जावी असे आवाहन एन आरआय सागरी पोलीस पोलीस ठाणे नवी मुंबईचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश कदम यानी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

पंतप्रधान मोदींचे बाळासाहेब ठाकरेंबद्लचे विधान हे ‘पुतणा मावशीचे प्रेम’

वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल मुंबई : पराभवाच्या भितीने घाबरलेल्या भारतीय जनता पक्षाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. दारूण पराभव होणार असल्याची जाणीव झाल्यानेच पंतप्रधान नरेंद्र मोदी बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरेंबद्दल आपुलकी व प्रेम व्यक्त करत आहेत. एवढेच जर प्रेम असते तर बाळासाहेबांची शिवसेना कटकारस्थान करून फोडली नसती. मोदींनी व्यक्त केलेले बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरेंबद्दलचे प्रेम व आदर हे ‘पुतणा मावशीचे प्रेम’ आहे, असा हल्लाबोल मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष व उत्तर मध्य मुंबईच्या काँग्रेस इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रा. वर्षा गायकवाड यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाचा समाचार घेत प्रा. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना व शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडले, महाविकास आघाडीचे सरकार पाडले. बाळासाहेबांबदद्ल प्रेम, आदर व आपुलकी असती तर भाजपाने असे उद्योग केलेच नसते. शिवसेना व काँग्रेस यांची विचारधारा वेगळी आहे, असे असले तरी उद्धव ठाकरे संकटात असताना काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनियाजी गांधी यांनी फोन करून सोबत असल्याचा शब्द दिला, उद्धवजी आजारी असतानाही त्यांची विचारपूस केली पण जाहीरपणे वक्तव्य करून त्याचे राजकीय भांडवले केले नाही, हा शिष्टाचाराचा व राजकीय संस्क़ृतीचा भाग आहे आणि उध्दव ठाकरे आजारी असताना कटकारस्थान करून शिवसेना पक्ष फोडणे याला विकृती म्हणतात. “वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे ऋण मी विसरु शकत नाही, ज्या दिवशी कौटुंबिकदृष्ट्या श्रीमान उध्दव ठाकरे अडचणीत असतील तेव्हा पहिला मदतीला धावून मी जाईन’’ ही नरेंद्र मोदी यांचे विधान स्पष्ट, स्वच्छ आणि निर्मळ भूमिका असणारे नाही तर वातावरण निवळण्यासाठी चालवलेला खटाटोप आहे. नरेंद्र मोदी आज काहीही बोलले तर शिवसैनिक व महाराष्ट्रातील जनता त्यांना माप करणार नाही. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रा. वर्षा गायकवाड यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. सकाळी लोकमान्य टिळक नगर, येथील गोल मैदान येथे मार्निंग वॉक करत स्थानिक लोकांशी संवाद साधला. वाकोला मार्केट येथे विविध समाजाच्या प्रमुख नेत्यांबरोबर बैठक घेऊन चर्चा केली. वांद्रे-कुर्ला कॉमप्लेक्समधील मोहमद इस्टेट येथील स्थानिकांशी संवाद साधला. तसेच टिळक नगर, कुर्ला, कलिना भागातील शिवसेना शाखांना भेटी दिल्या.

ऐन उन्हाळ्यात कलिंगड विक्री थंड

नवी मुंबई : उन्हाळा सुरू होताच थंडगार शीतपेय, रसाळ फळांना अधिक मागणी असते. यंदा तर अधिक उष्मा आहे. मात्र असे असताना देखील सध्या बाजारात आंब्याचा हंगाम सुरू असल्याने कलिंगडची मागणी रोडावली आहे. उन्हाळ्याची चाहूल लागताच एपीएमसी फळ बाजारात थंडगार, रसाळ फळांच्या हंगामाला सुरुवात होत असते. आंब्यापाठोपाठ फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात फळ बाजारात कलिंगड दाखल होण्यास सुरुवात होते तर मार्च-एप्रिलपासून मागणीत वाढत होते. सध्या बाजारात लाल रंगाच्या रसरशीत शरीराला थंडावा देणारी कलिंगड बाजारात मुबलक उपलब्ध झाली असून, तिची चव चाखण्यासाठी ग्राहकांनी मात्र पाठ फिरवली आहे, असे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे. एपीएमसीत सध्या महाराष्ट्रसह तमिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक येथून आवक होते. सध्या बाजारात कलिंगडच्या १०० ते १३० गाड्या दाखल होत आहेत. घाऊक बाजारात प्रतिकिलोला ११ते १२ रुपये दर आहेत. तेच एप्रिल मध्ये १५ ते १६ रुपये बाजारभाव होते. एपीएमसीत आता आंब्याची आवक जास्त होत असून इतर फळांची मागणी कमी आहे. बहुतांशी ग्राहक आंबा खरेदीकडे वळला आहे. त्यामुळे बाजारात कलिंगडला म्हणावी तशी मागणी नाही. कोट एपीएमसी घाऊक बाजारात सध्या आंब्यांची आवक वाढली आहे. त्यामुळे ग्राहक आंबा खरेदीला पसंती देत असून कडक उन्हाळा असूनही रसाळ कलिंगडाची मागणी कमी आहे. मुर्तीझा खान, कलिंगड व्यापारी, एपीएमसी

गणेशोत्सवासाठीचे रेल्वे आरक्षण शनिवारपासून

मुंबई : मुंबई महानगरात राहणाऱ्या कोकणवासियांना आता गणेशोत्सवाची चाहूल लागली असून गणेशोत्सवाच्या कालावधीत कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांचे आरक्षण शनिवारपासून (४ मे) सुरू होणार आहे. यंदाच्यावर्षी ७ सप्टेंबरला गणेशचतुर्थी आहे. त्यामुळे आता अनेक कोकणवासीयांचे गावी जाण्याचे नियोजन सुरू…

पवार अस्वस्थ असते तर 84 वर्षे जगले नसते

नारायण राणेंचा तोल सुटला मुंबई :  लोकसभेच्या प्रचार भाषणात आज माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा शरद पवारांवर टीका करताना तोल ढळाला. चार वेळा मुख्यमंत्री, 12 वर्षे केंद्रीय मंत्री आणि दोन वर्षे संरक्षणमंत्री असूनही…

घणसोलीत मृतदेहांना ‘मरणयातना’ !

रमेश औताडे मुंबई- जगण्याने छळले होते, मरणाने सुटका केली ही सुरेश भटांची गाजलेली गजल… पण भटांच्या गझलेत मरणानंतर सुटका होत होती, येथे घणसोलीत मेल्यानंतरही मृतदेहाच्या वाट्याला मरणयातना येत असल्याबद्दल नागरिकांत संताप…

एप्रिल महिन्यातील १० सेवानिवृत्तांचा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते सन्मान

नवी मुंबई : बदलत्या काळात आता निवृत्ती शब्दाचा अर्थही बदललेला असून आज निवृत्ती म्हणजे केवळ एका टप्प्यातून आपले दुस-या टप्प्यात स्थलांतर आहे. त्यामुळे जीवनाच्या या पुढच्या टप्प्यातही आपण कृतीशील राहून…

 रेल्वेची सेवा ही प्रवाशांची की कंत्राटदार व रेल्वे अधिकाऱ्यांची !

 प्रवासी समितीचा प्रशासनाला सवाल रमेश औताडे मुंबई : भारतीय सैन्य दलानंतर भारतीय रेल्वेला अर्थसंकल्पात सर्वात जास्त आर्थिक तरतूद केली जाते. मात्र रेल्वेची सेवा ही प्रवाशांची आहे की कंत्राटदार व रेल्वे अधिकाऱ्यांचे उखळ पांढरे करण्यासाठी आहे. ज्या ठिकाणी त्या कामाची दुरुस्ती करण्याची गरज नसताना ती कामे करोडो रुपयांची टेंडर काढून केली जात आहेत. पिण्याचे पाणी नसणे, अस्वच्छ प्रसाधनगृह, बंद पंखे, बसण्यास अपुरी बाकडी, अशी अनेक प्रकारची गैरसोय असल्याने  प्रवासी सेवा सुविधा पासून वंचित राहत आहेत. प्रवाशांची चूक काय ? ते मोफत प्रवास करतात का ? असे अनेक सवाल करत प्रवासी समिती चे अध्यक्ष व माहिती अधिकार कार्यकर्ते  अमोल मोरे यांनी रेल्वे प्रशासनाला धारेवर धरत पत्रव्यवहार करत आंदोलनाचा इशारा दिला आहे. रेल्वे डब्यातील स्वच्छता, बंद असलेले पंखे, दरवाजाच्या तुटलेल्या कड्या, जॅम झालेल्या खिडक्या, भिकारी, तृतीय पंथी यांनी डब्यात सुरू केलेला मनमानी व्यवसाय, मोबाईल चोर, अस्वच्छ मुतारी, रेल्वे स्थानकातील बंद असलेले पंखे, अर्धी अक्षरे गायब झालेली इंडिकेटर्स, बसायला अपुरी बाकडी, जी आहेत त्यावर भिकारी व गर्दुल्ले यांनी केलेले अतिक्रमण, पिण्याच्या पाण्याची पाणपोई बंद असल्यामुळे विकतचे पाणी घ्यावे लागते. अशा अनेक प्रकारे गैरसोईचा सामना करत मजबुरीने घामाच्या धारांनी ओलेचिंब झालेले प्रवासी संतप्त होत नाराजी व्यक्त करत आहेत. ज्या ठिकाणी गरज नसताना दुरुस्तीची कामे काढली जातात. जसे की , नवीन लाद्या मोठ्या ड्रिल मशीन ने काढणे, या लाद्या नवीन असताना कांत्रादराला या लाद्या चेंज करायला सांगण्यापेक्षा ज्या कंत्राटदाराने पंखे, पाणी, स्वच्छता याची टेंडर भरून सेवा देण्याचे मान्य केले असताना ते बडे कंत्राटदार रेल्वे अधिकाऱ्यांचे का ऐकत नाहीत ? प्रवाशी फुकट प्रवास करतात का ? असे अनेक सवाल प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अमोल मोरे यांनी पत्रव्यवहार करून रेल्वे प्रशासनाला विचारले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे ऐतिहासिक वास्तू म्हणून नोंद झालेले आहे. त्या ठिकाणी वारांगना, फेरीवाले, भिकारी, पान तंबाखू गुटखा विक्री होत आहे, अनधिकृत पणे बोगस फेरीवाल्यांनी मूळ रस्ता, फुटपाथ अडवले आहेत. स्थानिक पोलीस, रेल्वे पोलीस, होमगार्ड, सुरक्षा महामंडळ रक्षक, आरपीएफ जवान, पालिका विजिलांस डिपार्टमेंट, रेल्वे दक्षता पथक, इतर सर्व यंत्रणा यांना  वेतन भत्ते, वेतन आयोग, बोनस, पेन्शन इतर सेवा सुविधा कर्तव्य पार पाडत नसतानाही का दिल्या जातात? असे अनेक सवाल प्रवासी व प्रवासी संघटना करत आहेत.

‘इंजिन’ची दिशा बदलताच मनसेला टोलचा विसर

मुंबई: ठाणे- मुंबईच्या प्रवेशद्वारावरील पथकर (टोल)चा प्रश्न निकाली काढण्यासाठी पाचही नाक्यांवरून गोळा केलेली माहिती सहा महिन्यांनंतरही जाहीर करण्यात मनसेकडून टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या पंक्तीला बसताच ठाकरे आणि त्यांच्या…

‘सांग सांग भोलानाथ निवडून येणार काय?’

मुंबई : लोकसभा निवडणुकांचा खरा खेळ नव्या युगातील नव्या माध्यमांवर अधिक खेळला जात आहे. प्रत्येक पक्षाच्या तथाकथित ‘वॉर रुम’मध्ये मोबाइल, लॅपटॉप या आधुनिक शस्त्रांद्वारे सेकंदागणिक पोस्ट, रील्स, ट्विट, रिपोस्टच्या माध्यमातून…