Category: मुंबई

Mumbai news

सुशिक्षित बेरोजगार सोसायटी यांना सक्षम करणार- शेखर निकम

केतन खेडेकर मुंबई : संपूर्ण राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांच्या सेवा सोसायट्यांचे गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेले प्रश्न लवकरच मार्गी लाऊन त्याना अधिक सक्षम करून त्यांचे माध्यमातून राज्यातील बेरोजगारीचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे प्रतिपादन चिपळूण संगमेश्वरचे लोकप्रिय आमदार शेखर निकम यांनी केले. राज्य बेरोजगार व स्वयंरोजगार फेडरेशन तसेच बृहन्मुंबई व मुंबई फेडरेशन यांचे वतीने नुकताच त्यांचा मुंबईत नरिमन पॉइंट येथील साखर भवन येथे मुंबई जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक आणि बृहन्मुंबई बेरोजगार सेवा संस्थांचे मार्गदर्शक नंदकुमार काटकर यांचे हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. आज सातत्याने सरकार दरबारी या बेरोजगार संस्थांचे प्रश्न ते मांडत आहेत. नुकतेच त्यांनी राज्यातील या सेवा सोसायट्याना विना निविदा १० लाख रुपयांची कामे सरकार कडून देण्याचे आदेश ही मंजूर करून घेतले असून येणाऱ्या अधिवेशनात ही उर्वरित प्रश्नांबाबत आवाज उठविणार असल्याचे आश्वासन दिले आहे. सातत्याने सर्व खात्याच्या मंत्र्यांकडेही सदरच्या सेवा संस्थाना कामे उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करत असल्याने राज्यातील सर्व फेडरेशन च्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या  नेतृत्वाखाली राज्यातील पंजीकृत स्वयंरोजगार बेरोजगार सेवा सहकारी संस्थांच्या प्रलंबित मागण्यांबाबत या बैठकीत चर्चा होऊन सेवा संस्थांचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याबाबत मंत्री महोदयानी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. या बैठकीस आमदार प्रसाद लाड, सचिव कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, सहकार आयुक्त, उपसचिव सार्वजनिक बांधकाम विभाग,  सिकंदर पटेल लातूर, शरद देवरे नाशिक, जनार्दन चांदणे ठाणे, सचिन कोल्हापुरे रत्नागिरी, समीर रजपूत औरंगाबाद, जयंत शिरीषकर, संजय कांबळे, श्रीनिवास देवरूखकर, विजय केदारे, स्मिता अंजर्लेकर मुंबई, स्वप्नील फाटक तसेच राज्यांतील जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष व संचालक यावेळी बहुसंखेने उपस्थित होते.

महाराष्ट्र गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४  परीक्षा पारदर्शकपणे घेण्यास आयोग सज्ज – डॉ. सुवर्णा खरात

अशोक गायकवाड मुंबई : येत्या २ फेब्रुवारी २०२५ रोजी घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट- ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ही परीक्षा पारदर्शकपणे घेण्यास आयोग सज्ज असून उमेदवारांनी अफवांवर विश्वास न ठेवता अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी केले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या बेलापूर, नवी मुंबई येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.डॉ. खरात म्हणाल्या की, २ फेब्रुवारी २०२५ रोजी होणाऱ्या ‘महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४’ या परीक्षेच्या पूर्वीच प्रश्नपत्रिकांची उपलब्धता करुन देण्यासंदर्भात वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या चुकीच्या आहेत. सर्व प्रश्नपत्रिका अत्यंत कडेकोट बंदोबस्तात सुरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत आणि अशा कोणत्याही माहितीमध्ये तथ्य नाही. काही भ्रमणध्वनी क्रमांकांवरून उमेदवारांना प्रश्नपत्रिका मिळवण्याचे आमिष दाखवून पैशाची मागणी करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पुणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि पोलीस आयुक्त, पुणे यांच्या तर्फे या प्रकरणी योग्य ती कारवाई केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. उमेदवारांना अशा प्रकारचे दूरध्वनी आल्यास, त्यांनी contact-secretary@mpsc.gov.in या ईमेलवर तक्रार नोंदवावी. महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ही परीक्षा राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये होणार आहे. या परीक्षेसाठी २ लाख ८६ हजार उमेदवार परीक्षा देणार आहेत. सर्व परीक्षा केंद्रावर चोख बंदोबस्त आणि व्यवस्था ठेवण्यात आली असल्याचेही डॉ खरात यांनी यावेळी सांगितले.

महाडच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी शासकीय जमीन देण्याचा नवा जीआर काढा

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचना राजेंद्र साळसकर मुंबई : रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील मौजे केंबूर्ली येथे दोनशे खाटांचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यासाठी शासनाने मंजुरी दिली होती. त्यानुसार शासकीय जमीन हॉस्पिटलला देण्यासाठी शासन निर्णयही जारी करण्यात आला. मात्र ज्या जमिनीवर हे रुग्णालय उभारायचे होते त्या जमिनीऐवजी डोंगरावरील जमीन हॉस्पिटलसाठी देण्याचा निर्णय झाला. यावर पोलादपूरचे सुपुत्र भाजपा गटनेते प्रविण दरेकर यांनी आक्षेप घेत हा निर्णय रद्द करून नवीन निर्णय जारी करावा अशी मागणी केली होती. त्यानुसार आज मंत्रालयात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात बैठक पार पडली. बैठकीत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी जी शासकीय जमीन ठरली होती त्याचा नवीन शासन निर्णय काढावा, अशा सूचना महसूल मंत्र्यांनी संबंधित विभागाला दिल्या. महसूल मंत्र्यांच्या या निर्णयाने प्रविण दरेकर यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. मुंबई-गोवा महामार्गांवर महाड हे मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे महाड उपजिल्हा रुग्णालय व ट्रामा केअर सेंटर या रुग्णालयांना महत्व आहे. महाड तालुक्यातील ग्रामीण भागातील लोकांना उपचारासाठी या रुग्णालयांत यावे लागते. परंतु येथे सोयी-सुविधांची वाणवा असल्याने येथील रुग्णांना मुंबई व अन्य ठिकाणी न्यावे लागते. याची दखल घेत भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी महाडला २०० खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय व्हावे अशी मागणी अधिवेशनादरम्यान सभागृहात केली होती. तसेच तत्कालीन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे याबाबत पत्र व्यवहारही केला होता. त्यानुसार ५ सप्टेंबर २०२३ रोजी केंबुर्ली येथे सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यास शासनाने मंजुरी दिली व २८ नोव्हेंबरला शासन निर्णय जारी केला. तसेच १४७ कोटींच्या या कामास प्रशासकीय मंजुरीही मिळाली होती. केंबुर्ली येथील स. नं. ५२/२ व ५३/२ अ मधील १५ एकर जमिनीचा ताबा देण्याची मागणी कोकण विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली. मात्र या जमिनीऐवजी स. नं. ४८/२ ही शासकीय जमीन रुग्णालयासाठी देण्याचा शासन निर्णय काढण्यात आला. यावर दरेकर यांनी आक्षेप घेत महाड उपविभागीय अधिकारी व रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी जमीन रुग्णालयाला देण्याचा प्रस्ताव कोकण विभागीय आयुक्तांना पाठवला होता. असे असताना स. नं. ४८/२ ही शासकीय जमीन रुग्णालयाला देण्याबाबत निर्णय का काढला? असा सवाल करत महसूल मंत्र्यांकडे बैठकीची मागणी केली. त्यानुसार आज याबाबत मंत्रालयात बैठक पार पडली व महसूल मंत्र्यांनी सुपर स्पेशालिटी रुग्णालयाला शासकीय जमीन देण्याबाबतचा नवीन शासन निर्णय काढावा, असा सूचना संबंधित विभागाला दिल्या. या बैठकीला प्रविण दरेकर, महाड १९४ भाजपा विधानसभा प्रमुख बिपीन म्हामुणकर आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

भांडुप येथिल शिवाई विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंम्मेलन संपन्न

मुंबई :‘तुम्ही जिथे बसला आहात,  तिथे मी १८ वर्षांपूर्वी बसले होते. तेथूनच माझा प्रवास सुरू झाला. तो आज जर्मनीत जाऊन कार्यरत झाले. मी शिवाई विद्यामंदिर शाळेची विद्यार्थिनी असल्याचा मला अभिमान आहे,’  असे…

सफाई कामगार जनाबाई बाळू नरवडे  यांचा ॲड. एस. के. शेट्ये  यांच्या हस्ते सत्कार

मुंबई : मुंबई  पोर्ट प्राधिकरणाच्या वैद्यकीय खात्यातील सॅनिटरी विभागाच्या सफाई कामगार जनाबाई बाळू नरवडे  यांचा ३१ जानेवारी २०२५ रोजी  सेवानिवृत्तीबद्दल  वडाळा येथील कायाकल्पमधील  सॅनिटरी कार्यालयामध्ये  ॲड. एस. के. शेट्ये  यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन…

प्रकाश पुराणिक स्मृती महिला क्रिकेट स्पर्धा ४ फेब्रुवारीपासून

मुंबई : माहीम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लब व शिवाजी पार्क जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने क्रिकेटपटू स्व. प्रकाश पुराणिक स्मृती चषक महिला टी-२० क्रिकेट स्पर्धा ४ ते ७ फेब्रुवारी दरम्यान शिवाजी पार्क…

 सचिन अहिर यांनी जिल्हा नियोजन समितीत ठणकावले शासनाला! ‌‌मुंबई   : ‘गिरणी कामगार घराच्या प्रश्नावर तांतडीची बैठक बोला वण्याचे आपण आश्वासन दिले होते. मुंबईतील केंद्र सरकारच्या एनटीसी किंवा खासगी गिरण्यातील कामगारांना…

ट्रॅकनाईट ॲथलेटिक्स स्पर्धा

युग पाटील 12 वर्षांखालील मुले वयोगटातील सर्वोत्कृष्ट खेळाडू मुंबई: एआयएम स्पोर्ट्स फाउंडेशनच्या युग पाटीलने युनिव्हर्सिटी पॅव्हेलियन मैदानावर खेळल्या गेलेल्या ट्रॅकनाईट ॲथलेटिक्स स्पर्धेच्या दुसऱ्या आवृत्तीत तीन सुवर्णपदक जिंकून 12 वर्षांखालील वयोगटातील सर्वोत्कृष्ट खेळाडू होण्याचा मान मिळविला. 60 मीटर धावणे प्रकारात अत्यंत चुरस पाहायला मिळाली. युग पाटीलने 8.465 सेकंद वेळेसह रेस पूर्ण करताना वर्चस्व गाजवले. त्याला डीएसएसएच्या दैविक नायडूकडून (8.620 सेकंद) चांगला प्रतिकार लाभला. त्याने रौप्यपदक मिळवले. चिल्ड्रन्स ॲकॅडमी ग्रुप ऑफ स्कूलच्या (अशोक नगर) जेसन जिमीने ९.०१५ सेकंद वेळेसह तिसरे स्थान मिळवले. त्यापूर्वी, युग पाटीलने 120 मीटर धावणे प्रकारात सातत्य राखताना उल्लेखनीय वेगाचे प्रात्यक्षिक करून 15.862 सेकंदात अंतिम रेषा पार केली. या प्रकारातही दैविक नायडूने 16.973 सेकंदाच्या वेळेसह दुसरे स्थान पटकावत पुन्हा एकदा आपले कौशल्य सिद्ध केले. जीएईटीमधील आरव कुलकर्णीने 17.740 सेकंद वेळेसह कांस्यपदक जिंकले. 300 मीटर धावण्याच्या प्रकारात युग पाटीलने 42.779 सेकंदांच्या उल्लेखनीय वेळेसह सुवर्णपदकाची हॅट्ट्रिक पूर्ण केली. तसेच दिवसातील निर्विवाद स्प्रिंट किंग म्हणून स्वत: ला सिद्ध केले. यश पालवीने 47.006 सेकंदात रेस पूर्ण करताना रौप्यपदक मिळवले. जीएईटीमधील  कांबळीचे (47.027 सेकंद) दूसरे स्थान थोडक्यात हुकले.

युनायडेट क्रिकेटर्स संघ हरला, पण आदित्य राणे जिंकला

 द यंग कॉम्रेड्स शील्ड स्पर्धेत पारसी जिमखान्याविरुद्ध घेतल्या 7 विकेट मुंबई: द यंग कॉम्रेड्स शिल्ड क्रिकेट स्पर्धेत युनायडेट क्रिकेटर्स संघाला पारसी जिमखान्याविरुद्ध 81 धावांनी पराभूत व्हावे लागले तरी मध्यमगती स्विंग गोलंदाज आदित्य राणेने 7 विकेट घेत सर्वांची मने जिंकली. जय जैनच्या (97 चेंडूंत 118 धावा) शानदार शतकामुळे पारसी जिमखान्याने प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभारली. सचिन यादवने 46 चेंडूत 50 धावा करताना इशान मुलचंदानीने 46 चेंडूत 35 धावांचे योगदान देत त्याला चांगली साथ दिली. आदित्य राणेने 22.3 षटकात 87 धावांत 7 विकेट्स घेत छाप पाडली. प्रतिस्पर्ध्यांचे मोठे आव्हान युनायटेड क्रिकेटर्सला पेलवले नाही. ओंकार रहाटेने 50, सुचित देवलीने 51 तसेच आदित्य सुळेने 32 धावा करताना थोडा प्रतिकार केला. आदित्य राणेनेही 28 चेंडूंत झटपट 30 धावा जोडताना फलंदाजीतही छाप पाडली. मात्र, अन्य सहकार्‍यांनी निराश केल्याने पराभव पाहावा लागला. सागर छाब्रियाने 3 तसेच नूतन गोयलने 4 महत्त्वपूर्ण विकेट घेत मोठा विजय सुकर केला.

नव्या वर्षात मिळाले त्याला दोन्ही हात

नव्या हाताने केली त्याने आनंदी जीवनाची सुरवात रमेश औताडे मुंबई : एका भीषण रेल्वे अपघातात दोन्ही हात गमावलेल्या २६ वर्षीय हृतिक ला नव्या वर्षात दोन नवीन हात मिळाल्याने त्याचे २०२५…