सचिन अहिर यांनी जिल्हा नियोजन समितीत ठणकावले शासनाला!

‌‌मुंबई   : ‘गिरणी कामगार घराच्या प्रश्नावर तांतडीची बैठक बोला वण्याचे आपण आश्वासन दिले होते. मुंबईतील केंद्र सरकारच्या एनटीसी किंवा खासगी गिरण्यातील कामगारांना मुंबईतच घरे मिळणे अशक्य नाही,फक्त सरकारची मानसिकता असावयास हवी,’ असे उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते आमदार सचिन अहिर यांनी मुंबईत‌ पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सरकारला ठणकावून सांगितले आहे.
उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई जिल्हा नियोजन समितीची नुकतीच मुंबईत बैठक पार पडली.त्यावेळी‌ गिरणी कामगार घरांच्या प्रश्नावर कालव्याप सुरू आहे,त्याची माहिती देऊन,गिरणी कामगारांना मुंबईतच घरे मिळाली पाहिजेत,या वाढत्या मागणीकडे आमदार सचिन अहिर यांनी मुंबईचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष वेधले आहे. मुंबई जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अन्य ठाकरे गटाच्या आमदारांनी,गिरणी कामगारांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्याग करूनही त्यांना मुंबईत का घरे मिळत‌ नाहीत?असा सरकारला जाब विचारला आहे. बैठकीत मुंबई शहरात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला.त्याच प्रमाणे बैठकीत स्थानिक समस्येवर चर्चा करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *