Category: मुंबई

Mumbai news

मुंबई महापालिकेतील माजी नगरसेविका राजूल पटेल शिवसेनेत

मुंबईसह नाशिक,कोल्हापूर, सांगली, जळगावमध्ये उबाठा गटाला खिंडार अनिल ठाणेकर मुंबई : मुंबई महापालिकेतील उबाठा गटाच्या माजी नगरसेविका आणि महिला संघटक राजूल पटेल यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. याचबरोबर राज्यभरातील उबाठा गटाच्या शेकडो पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्त्यांनी  धर्मवीर आनंद दिघे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ठाण्यातील स्वर्गीय आनंद दिघे यांचे समाधीस्थान असलेल्या शक्तीस्थळावर शिवसेना मुख्यनेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. मुंबई महापालिकेच्या माजी नगरसेविका आणि उबाठा गटाच्या महिला संघटक राजूल पटेल, विलेपार्लेचे शाखाप्रमुख सुनील भागडे, वरळीतील सुरेश कोठेकर आणि रोशन पावसकर यांच्यासह ४० पदाधिकारी आणि ५० कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवाजी नगर, मानखुर्द येथील कार्यकर्ते तसेच उत्तर मध्य मुंबईमधील अशोक लोखंडे यांच्यासह २० पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. त्याचबरोबर मीरा भाईंदर महापालिकाचे माजी उपमहापौर प्रवीण पाटील, जयंती पाटील, अरविंद ठाकूर, शिवशंकर तिवारी यांच्यासह माजी नगरसेवकांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाने मुंबई आणि उपनगरात शिवसेनेचे पक्ष संघटन आणखी मजबूत झाली आहे. कोल्हापूर जिल्हातील प्रदेश जनरल सेक्रेटरी सुजीत समुद्रे, प्रमोध धनावडे, शीतल कांबळे, उल्हास वाघमारे, किरण कांबळे, यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला. सांगली जिल्ह्यातील प्रदेश जनरल सेक्रेटरी प्रशांत कांबळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते तसेच नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, मालेगाव शहापूरमधील २०० कार्यकर्ते, उबाठाचे माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनी आज शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेते पक्ष प्रवेश केला. याशिवाय नाशिक शिक्षक सेना, जळगाव शिक्षक सेनेतील शेकडो सदस्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. चौकट राजुल पटेल या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या आहेत. त्या विधानसभेच्या महिला संघटक आणि माजी नगरसेविका आहेत. पक्षातील जुन्या महिला शिवसैनिक म्हणून राजुल पटेल यांची ओळख आहे. राजुल पटेल यांनी वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती. मात्र त्यांना तिकिट नाकारण्यात आले. यापूर्वी त्यांनी विधानसभा २०१९ ची विधानसभा निवडणूक लढवली होती.

अशा सैनिकांच्या बलिदानामुळेच देश सुरक्षित आहे

 रमेश औताडे मुंबई : शौर्य चक्र पदक विजेते कमांडो मधुसूदन सुर्वे यांची अतिरेक्यांबरोबर झालेली लढाईची कथा प्रेरणादायी होती. अशा सैनिकांच्या बलिदानामुळेच आमचा देश सुरक्षित आहे. यांच्या ऋणातून आम्ही कधीच मुक्त…

एल आय सी  म्युच्युअल फंडाच्या बहुपर्यायी योजनेचा शुभारंभ

 रमेश औताडे मुंबई : भारतातील प्रतिष्ठित फंड घराण्यांपैकी एक असलेल्या एलआयसी म्युच्युअल फंडाने ” एलआयसी एमएफ मल्टी एसेट एलोकेशन फंड” ची घोषणा केली आहे. ही एक गुंतवणुकीस कायम खुली असणारी…

अमरहिंद मंडळ आयोजित महिला व किशोर गट जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा – २०२५.

यंग प्रभादेवी, विजय क्लब, आकांक्षा मंडळ, शिवनेरी सेवा यांनी किशोर गटाची उपांत्यपूर्व फेरी गाठली. शिवशक्ती महिला संघ उपांत्य फेरीत दाखल. मुंबई:- यंग प्रभादेवी, विजय क्लब, आकांक्षा मंडळ, शिवनेरी सेवा, यांनी…

आंतर सहकारी बँक कॅरम व बुध्दिबळ स्पर्धेत १५६ खेळाडूंमध्ये आजपासून  चुरस

मुंबई : माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांच्या अध्यक्षतेखालील को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन, मुंबई तर्फे ६५ व्या वर्धापन दिनानिमित्त २५ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या आंतर सहकारी बँक कॅरम व बुध्दिबळ…

विद्यार्थी क्रीडा केंद्र आयोजित

४ फुट ११ इंच व व्यावसायिक पुरुष व महिला खो-खो स्पर्धा ओम साईश्वर, रचना नोटरी, महावितरण, पश्चिम रेल्वे व महाराष्ट्र पोष्टाची विजयी घोडदौड मुंबई : खो-खो संघटनेच्या मान्यतेने विद्यार्थी क्रीडा…

मुंबई जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेला प्रारंभ

मुंबई : लोकमान्य बँक्वेट हॉल, माटुंगा येथे आयोजित केलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळ, इंडियन ऑईल व ओ. एन. जी. सी पुरस्कृत ३२ व्या सिनियर मुंबई जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेचे उदघाटन मुंबई…

विद्यार्थी क्रीडा केंद्र आयोजित खो खो स्पर्धा

४ फुट ११ इंच व व्यावसायिक पुरुष व महिला खो-खो स्पर्धा विद्यार्थी क्रीडा केंद्र आयोजित आणि मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने किशोर गट (४ फुट ११ इंच) तसेच व्यावसायिक पुरुष व…

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत राज्यात लाखाचा टप्पा ओलांडला

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिना तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळावे यासाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीत महावितरणने बुधवारी एक लाख घरांचा टप्पा ओलांडला, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वसामान्य ग्राहकांना थेट लाभ मिळवून देणाऱ्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीवर भर दिला आहे. या योजनेत घराच्या छतावर सौर ऊर्जानिर्मिती पॅनेल्स बसवून वीज निर्माण केली जाते. घरगुती वापरापेक्षा जास्त वीज तयार झाल्यामुळे वीजबिल शून्य होते तसेच अतिरिक्त वीज महावितरणच्या जाळ्यात पाठवून उत्पन्नही मिळते. छतावर सौर ऊर्जा पॅनेल्स बसविण्यासाठी केंद्र सरकारकडून तीन किलोवॅटला 78 हजार रुपयांपर्यंत थेट अनुदान मिळते. घरगुती ग्राहकांच्या मदतीसाठी पंतप्रधान मोदी यांनी गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात ही योजना सुरू केली होती. राज्यात 21 जानेवारी अखेर या योजनेत एकूण 1,00,700 घरांवर सौर ऊर्जा प्रकल्प बसविले गेले. त्यामध्ये 392 मेगावॅटची क्षमता निर्माण झाली व ग्राहकांना 783 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले.  21 जानेवारीला एका दिवसात 1195 घरांवर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविले. राज्यात नागपूर जिल्ह्याने सर्वाधिक 16,949 घरांवर सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प बसवून प्रथम क्रमांक मिळविला आहे. पुणे (7931 घरे), जळगाव (7514 घरे), छत्रपती संभाजीनगर (7008 घरे), नाशिक (6626 घरे), अमरावती (5795 घरे) आणि कोल्हापूर (5024 घरे) हे जिल्हे योजनेचा लाभ घेण्यात आघाडीवर आहेत. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महावितरणकडे आहे. या योजनेतील ग्राहकांना मोफत नेट मीटर देण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना…

जिल्हाधिकारी कार्यालयातही आता ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष’

मुंबई : गंभीर आजारांवरील उपचारांसाठी गरजू नागरिकांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या माध्यमातून अत्यावश्यक आर्थिक मदत पुरवली जाते. त्यामुळे या कक्षाकडे अर्ज सादर करण्याबरोबरच त्याचा पाठपुरावा करण्यासाठी रुग्ण व त्यांचे नातेवाईकांना मंत्रालयात यावे लागते. त्यामुळे त्यांना होणारा त्रास लक्षात घेता ही सेवा सहजपणे उपलब्ध व्हावी यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ व पैशाचा अपव्यय टाळेल. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडून अनेक दुर्धर आजारांवरील उपचारांसाठी येणाऱ्या खर्चाकरीता रुग्णांना संबंधित रुग्णालयामार्फत आर्थिक सहाय्य देण्यात येते. तसेच आपत्ती प्रसंगीही आर्थिक मदत देण्यात येते. या अनुषंगाने मदत मिळविण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामध्ये असंख्य अर्ज प्राप्त होतात. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षामार्फत दुर्धर आणि महागड्या आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक साहाय्य मिळाल्याने अनेक कुटुंबांना आधार मिळाला आहे. ही मदत मिळविण्यासाठी नागरिकांना राज्याच्या कानाकोपऱ्यातून मंत्रालयात यावे लागते. त्यामुळे नागरिकांचा होणारा त्रास कमी करण्यासाठी आता जिल्हाधिकारी कार्यालयातच ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष’ सुरू करण्यात येणार आहे. रुग्णांना त्यांच्या जिल्ह्यातच ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षा’कडे मदतीचा अर्ज करण्याबरोबर, मदतीसाठी पाठपुरावा करणे सोपे होणार आहे. यामुळे नागरिकांचा वेळ व पैशाचा अपव्यय टाळता येईल, अशी माहिती ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षा’चे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली. तज्ज्ञ डॉक्टरांची समिती स्थापन जिल्ह्यातील ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षा’स प्राप्त अर्जांची सद्यस्थिती नागरिकांना उपलब्ध करून देणे व समस्यांचे निराकरण करणे, अर्ज भरण्यास सहाय्य करणे, आर्थिक मदत झालेल्या रुग्णांची रुग्णालयात जाऊन भेट घेणे, जनजागृती आणि प्रसिद्धी करणे, जिल्ह्यातील आपत्तीच्या ठिकाणी भेटी देणे, तसेच अर्थसहाय्य देण्यासाठी आजारांचे पुनर्विलोकन करणे व अर्थसहाय्याची रक्कम नव्याने निर्धारित करणे यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची समिती स्थापन करण्यात आली आहे. उपचारांचा खर्च दिवसेंदिवस वाढत असून अर्थसहाय्याच्या रकमेचा समितीमार्फत आढावा घेण्यात येणार आहे. कारभार कागदविरहित होणार गरजू रूग्णांना अत्यावश्यक आरोग्यसेवा पुरविण्यासाठी, आर्थिक सहाय्य देण्यासाठी सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षा’चा कारभार कागदविरहित होणार आहे. त्यामुळे हा निधी मिळविण्याच्या प्रक्रियेसाठी रुग्णांना मंत्रालयात येण्याची आवश्यकता भासणार नाही. यासाठी लवकरच स्वतंत्र ऑनलाइन प्रणाली विकसित करण्यात येणार आहे. धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाला जोडणार रुग्णांना अधिक सोयीस्कर सेवा उपलब्ध करून देण्यासाठी धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष ऑनलाईन प्रणाली आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष ऑनलाईन प्रणाली (सीएमआरएफ पोर्टल) जोडण्यात येणार आहे. सध्याच्या प्रचलित कार्यपद्धतीप्रमाणे रुग्णाला दिला जाणारा एओ क्रमांक आणि एम क्रमांक एकत्र करण्यात येणार आहे.