Category: मुंबई

Mumbai news

सिनियर मुंबई जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेचे आयोजन

मुंबई : डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्यावतीने व लोकमान्य मंडळ माटुंगा यांच्या सहयोगाने २४ ते २७ जानेवारी २०२५ दरम्यान ओ. एन. जी. सी., भारतीय आयुर्विमा महामंडळ व इंडियन ऑईल पुरस्कृत ३२ व्या…

नवी मुंबई महानगरपालिकेचा अभिजात मराठी भाषा जागर

नवी मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने जारी केलेल्या 31 डिसेंबर 2024 रोजीच्या परिपत्रकानुसार 14 ते 28 जानेवारी या कालावधीत सर्वत्र ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा करण्यात येत आहे.…

श्री रामकृष्ण सेवा ट्रस्ट कल्याण द्वारा गरजूंना धान्यकीट व चिक्की वितरण

कल्याण : श्री रामकृष्ण सेवा ट्रस्ट कल्याणच्या वतीने मंगळवारी अन्न क्षेत्रात सालाबादप्रमाणे मकरसंक्रांत  निमित्ताने यंदाही संस्था संचालक व मान्यवरांच्या हस्ते गरजू लोकांना धान्यकीट व चिक्की वितरण करण्यात आले. कल्याण पश्चिमेतील आधार वाडी जवळ येथे असलेल्या अन्न क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून दररोज गरजू लोकांना भोजन व दरमहा धान्यकीटचे वितरण करण्यात येत आहे. या संस्थाचे सेवा कार्य मानव सेवा ही प्रभु सेवा ह्या पू. डोंगरे महाराज ह्यांनी दिलेल्या सुत्रांच्या प्रेरणेने होत आहे. यासाठी रामकृष्ण सेवा संस्थाचे संचालक जसु चंदाराणा,  विनु तन्ना मेहेनत घेत  आहे. याकामी छबिल कारीया, मितुल देसाई,  वंश चंदाराणा, सुभाष रायचूरा, राजिव चंदाराणा, भिखू कारीया, विष्णूकुमार चौधरी, अवधूत शेट्टे, रश्मी चंदाराणा, मोनीश चंदाराणा आदी लोकं सहभागी होत आहेत.

शाळेची बस आल्याने विद्यार्थ्यांची प्रवासाची चिंता दूर

कल्याण : कल्याण पश्चिमेतील नूतन विद्यालय या शाळेसाठी प्रवासी बस आल्याने विद्यार्थ्यांच्या प्रवासाची चिंता दूर झाली आहे. सद्यस्थितीत मराठी शाळांना लागलेल्या विद्यार्थ्यांच्या गळतीला अनेक शाळा  सामो-या जात असताना शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी…

भांडुप परिमंडलात पाच महिन्यात ८५३ वीज चोरट्यांना महावितरणचा दणका

५ कोटी ८५ लाखांची वीजचोरी उघड   भांडुप : महावितरणच्या भांडुप परिमंडलात अधिक हानी असलेल्या वीजवाहिन्यांवर गेल्या पाच महिन्यांमध्ये व्यापक शोध मोहीम राबवून तब्बल ८५३ वीज चोरट्यांना कारवाईचा दणका देण्यात आला. त्यांच्याकडील ५ कोटी ८५ लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आणण्यात महावितरणच्या पथकाला यश आले आहे. अधिक हानी असलेल्या ६० वीजवाहिन्यांवरील सदोष मीटर बदलणे, नवीन वीजजोडणी, कमकुवत वीजतारा बदलणे आदीं विविध उपाययोजनांमुळे महसुलात ४० लाख १४ हजार ५४१ युनिट विजेची भर पडली आहे. ऑगस्ट ते डिसेंबर २०२४ दरम्यान आखण्यात आलेल्या उपाययोजनांमध्ये ठाणे मंडल कार्यालयांतर्गत २५८ वीज चोरट्यांविरुद्ध कारवाई करून १ कोटी ७९ लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आणण्यात आली. वाशी मंडल कार्यालयातील ४०२ जणांकडे ३ कोटी ४७ लाख रुपयांची वीजचोरी सापडली. तर पेण मंडल कार्यालयातंर्गत १९३ जणांकडे ५९ लाख रुपयांची वीजचोरी आढळली. तर अधिक वीज हानी असलेल्या ६० वाहिन्यांवरील ४ हजार ६५२ सदोष वीजमीटर बदलण्यात आले. ४ हजार ३४५ जणांनी नवीन वीजजोडणी देण्यात आली. कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या १२४ ग्राहकांना पुनर्रजोडणी देण्यात आली. १३.४ किलोमीटर कमकुवत वीजतारा बदलण्यात आल्या व जवळपास १० किलोमीटर एरिएल बंच (इन्सुलेशन असलेली वाहिनी) बसवण्यात आली. परिणामी ठाणे मंडलात १० लाख २७ हजार ६७ युनिट, वाशी मंडलात सर्वाधिक २१ लाख ७९ हजार ४६१ आणि पेण मंडलात ८ लाख ८ हजार १३ युनिट विजेची वाढ नोंदवण्यात आली आहे. मुख्य अभियंता सुनिल काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी मंडलाचे अधीक्षक अभियंता संजय पाटील, ठाणे मंडलाचे अधीक्षक अभियंता युवराज मेश्राम आणि पेण मंडलाचे अधीक्षक अभियंता राजाराम माने यांच्या नेतृत्वाखाली अभियंते, अधिकारी, जनमित्रांच्या चमुने ही कामगिरी केली. 00000

ब्राह्मण शिक्षण मंडळाच्या `ज्ञानानंद’ शाळेतल्या विद्यार्थ्यांनी घेतली विशेष मुलांची भेट

ठाणे : विशेष मुलांना सामान्यांच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध संस्था, शाळा प्रयत्न करीत आहेत. या मुलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम देखील राबवले जात आहे. याचबरोबर सामान्य मुलांबरोबर या मुलांचा…

कोपरखैरणे व ऐरोली विभागात अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई

नवी मुंबई : महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे त्या अनधिकृत बांधकामांविरोधात नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त (2) डॉ. राहुल…

अटलजींच्या द्रष्टेपणामुळेच भारतात आर्थिक ई क्रांती – सारंग दर्शने

अनिल ठाणेकर ठाणे : भारताचे पंतप्रधानपद तीन वेळा भुषविणाऱ्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये आर्थिक आघाडीवर मोठे काम केले, किंबहुना अटलजींच्या द्रष्टेपणामुळेच भारतात कम्युनिकेशनची आर्थिक ई क्रांती झाली. असे प्रतिपादन सुप्रसिद्ध पत्रकार आणि लेखक सारंग दर्शने यांनी केले. ठाण्याच्या सरस्वती क्रीडा संकुल पटांगणात आमदार संजय केळकर यांच्या माध्यमातुन सुरू असलेल्या ३९ व्या कै. रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेत सारंग दर्शने यांनी सोमवारी (ता.१३ जाने.) रोजी ‘अटलजींचा वसा आणि वारसा’ हे सहावे पुष्प गुंफले. यावेळी व्यासपीठावर या सत्राचे अध्यक्ष शरद गांगल, अध्यक्ष ठाणे जनता सहकारी बँक, सुहास जावडेकर उपस्थित होते. लेखक दर्शने यांनी, अटलजींच्या चरित्राचे पैलु उलगडताना संघाचे प्रचारक, जनसंघ ते पंतप्रधान पदापर्यतचा प्रवास श्रोत्यांसमोर मांडला. १९५० चे दशक ते १९७७ पर्यतचा काळ बिकट होता. समाजात उद्योजकतेला स्थान मिळत नव्हते. जागतीक अर्थव्यवस्थाही दोलायमान स्थितीत होती. जनसंघाचे संस्थापक सदस्य, भारतीय जनसंघाचे अध्यक्ष ते भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष बनलेल्या अटलजींनी त्याही वातावरणात देशाची प्रतिमा उंचावण्याचे कार्य केले. १९८५ – ८६ नंतर भारतीय जनता पक्षामध्ये गांधीवादी समाजवाद मागे पडत गेल्याचे सांगुन दर्शने यांनी, अटलजींच्या प्रतिभाशाली राजकिय कारकिर्दीवर प्रकाश टाकला. १९९६, १९९८ आणि १९९९ असे तीन वेळा अटलजींनी पंतप्रधान पद भुषविले. त्यांच्या कारकिर्दीमध्येच भारताने आर्थिक आघाडीवर मोठे काम केले. कम्युनिकेशनचे खाते स्वतःकडे घेत अटलजींनी कम्युनिकेशनचे ब्रिटीशकालीन कायदे बदलुन दुरसंचार धोरणात आमुलाग्र बदल केले. अटलजींच्या या द्रष्टेपणामुळेच भारतात कम्युनिकेशनची आर्थिक ई क्रांती झाली. ज्यामुळे देशातील १०० कोटी जनता आज ई पेमेंटचा वापर करीत असुन त्याचा पदोपदी प्रत्यय येत असल्याचे दर्शने यांनी सांगितले. नेतृत्वाचा कस लागणारे अनेक निर्णय अटलजींनी घेतले. ज्यात “बुद्ध पुन्हा हसला” या अणुस्फोटाच्या धाडसी निर्णयाचा समावेश आहे. अणुचाचण्यांपासून ते अंतराळ मोहिम आणि शैक्षणिक सुधारणांपर्यंतचे अनेक निर्णय घेतल्याने भारताची महासत्ता बनण्याकडे वाटचालीचा पाया रचला गेला. किमान समान कार्यक्रम राबवताना अटलजींनी पक्षाच्या धोरणांचा कधीच विसर पडु दिला नाही. अटलजींकडे पूर्ण बहुमत असते तर देशात समान नागरी कायदा कधीच पारित झाला असता, असे स्पष्ट करताना दर्शने यांनी अटलजींच्या नेतृत्वावर प्रकाश टाकणाऱ्या अनेक गोष्टी विषद केल्या. राजकारणापेक्षा कवी म्हणून चांगली कारकिर्द केली असती, डॉक्टरेट करायची राहुन गेली आणि अध्यापन क्षेत्रात काम करणे राहुन गेल्याची खंत देखील अटलजींनी व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले. अशा कवी, राजकारणी आणि दूरदृष्टी असलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांचा भारतीय जनता पक्षाच्याच नव्हे तर भारताच्या वाटचालीवर पुढील किमान ५० वर्षे प्रभाव राहिल. असेही दर्शने यांनी सांगितले. ००००

कार्यवाही न केल्यामुळे जन माहिती अधिकारी धनंजय कांबळे, निवासी नायब तहसीलदार यांना २५ हजारांचा दंड

अशोक गायकवाड खालापुर :जन माहिती अधिकारी धनंजय कांबळे, निवासी नायब तहसीलदार पेण यांना रुपये २५ हजार एवढा दंड (शास्ती) ठोठावण्यात आलेला असुन माहिती मोफत देण्यासंदर्भात देखील आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे लोकशाहीला माहिती अधिकार अधिनियम २००५ हा कायदा बळकटी देत आहे हे पुनः एकदा सिद्ध झाले आहे. सदर शास्ती बाबतच्या नोंदी जन माहिती अधिकारी धनंजय कांबळे यांच्या सेवाबुकमध्ये नोंद करण्यासाठी पत्रव्यवहार करणार आहे असेही सुधीर पाटील यांनी सांगितले आहे. पेण येथील माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, महाराष्ट्र राज्य जिल्हा पदाधिकारी सुधीर राजाराम पाटील यांनी पेण तहसील कार्यालय येथे कार्यालयीन माहिती मिळवण्यासाठी अर्ज केला होता. त्यांच्या अर्जावर जन माहिती अधिकारी यांनी कोणतीही कार्यवाही न केल्यामुळे त्यांनी कायद्याप्रमाणे प्रथम अपिलीय अधिकारी यांच्याकडे प्रथम अपील केले होते.प्रथम अपिलीय अधिकारी यांनी आदेश देऊनही कार्यालयीन जन माहिती अधिकारी धनंजय कांबळे निवासी नायब तहसीलदार, तहसील कार्यालय पेण, यांनी माहिती पुरविली नाही. त्यामुळे कायद्याचे कलम १८/१ अनुसार मा. माहिती आयुक्त, कोकण विभाग यांच्याकडे पाटील यांनी तक्रार केली होती. (तक्रार क्रमांक ६३५/२०२१). त्या तक्रारीच्या अनुषंगाने जन माहिती अधिकारी धनंजय कांबळे, निवासी नायब तहसीलदार पेण यांना रुपये २५ हजार एवढा दंड (शास्ती) ठोठावण्यात आलेला असुन माहिती मोफत देण्यासंदर्भात देखील आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे लोकशाहीला माहिती अधिकार अधिनियम २००५ हा कायदा बळकटी देत आहे हे पुनः एकदा सिद्ध झाले आहे. 000000

जी.एस.वैद्य आदरणीय व्यक्तिमत्व : संजय गायतोंडे

मुंबई : १९४६ साली कुर्ला स्पोर्ट्स क्लबच्या स्थापनेत जी.एस.तथा गनाभाऊ  वैद्य यांचा मोलाचा वाट होता. बारीक चणीचा हा हाडाचा क्रिकेटप्रेमी भरतण्याची संधी म्हणजे गेली ६६ वर्षे सुरु असलेली बाळकृष्ण् बापट स्मृती…