भागोजी शेठ कीर यांचा जयंती सोहळा उत्साहात
भागोजी शेठ कीर यांचा जयंती सोहळा उत्साहात उरण येथे जनजागृती १५ तारखेला रथयात्रेचे आयोजन मुंबई : अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे अध्यक्ष नविनचंद्र बांदिवडेकर सचिव प्रकाश कांबळी, खजिनदार शलाका पांजरी…
Mumbai news
भागोजी शेठ कीर यांचा जयंती सोहळा उत्साहात उरण येथे जनजागृती १५ तारखेला रथयात्रेचे आयोजन मुंबई : अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे अध्यक्ष नविनचंद्र बांदिवडेकर सचिव प्रकाश कांबळी, खजिनदार शलाका पांजरी…
अजितदादांच्या ३ महत्वपूर्ण निर्णयांवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब मुंबई: अजित पवारांच्या निधनानंतर झालेल्या आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांनी घेतलेल्या ३ महत्वपुर्ण निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली. मंत्रिमंडळ बैठकीत…
मुलाच्या लग्नाला यायचं हं ! नवी दिल्ली : भारत रत्न मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनी सहकुटुंब देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत आपला मुलगा अर्जुन तेंडुलकर आणि त्याची होणारी पत्नी सानिया चांढोक यांच्या लग्नाचे औपचारिक निमंत्रण…
मोहनराव, जे चूक ते चूकच ! राज ठाकरे ८ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबईतल्या एका कार्यक्रमात सरसंघचालक श्री. मोहन भागवत यांनी, भाषेबद्दल आग्रही राहणे, त्यासाठी वेळेस आंदोलन करणे हा एक आजार आहे अशा आशयाचं…
डब्ल्यूआयजीए बीपीजीसी महिला खुली हौशी गोल्फ स्पर्धा पारोमिता मुखर्जी पहिल्या दिवशी आघाडीवर मुंबई: बीपीजीसी लेडीज सेक्शन्स आयोजित सीपीपीच्या सह-प्रायोजित१४व्या डब्ल्यूआयजीए बीपीजीसी महिला खुल्या हौशी गोल्फ स्पर्धेच्या पहिल्या दिवशी मंगळवारी एव्हीटी…
दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्राचे राधिका जोशी यांचे गायन मुंंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने रविवार १५ फेब्रुवारीला सायंकाळी पाच वाजता राधिका जोशी यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. उस्ताद खादिम हुसैन खाँ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा कार्यक्रम होईल. यावेळी तबल्यावर प्रणव गुरव तर संवादिनीवर सौमित्र क्षीरसागर हे साथ देतील. अधिकाधिक रसिकांनी यावेळी सहभागी व्हावे, असे आवाहन दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क – ०२२-२४३०४१५०. राधिका जोशी ही जयपूर अत्रौली घराण्याची भारतीय शास्त्रीय गायिका आहे. ती गानसरस्वती श्रीमती किशोरी आमोणकर यांच्या वरिष्ठ शिष्या पंडित रघुनंदन पणशीकर यांच्या शिष्या आहेत. तिने कोलकाता येथील संगीत संशोधन अकादमीमध्ये पद्मविभूषण श्रीमती गिरिजा देवी जी यांच्याकडून अर्धशास्त्रीय संगीताचाही अभ्यास केला आहे. राधिका ही एक बहुमुखी गायिका आहे आणि ऑल इंडिया रेडिओने शास्त्रीय तसेच हलक्या शास्त्रीय (ठुमरी, दादरा, काजरी, होरी, इत्यादी) संगीतात ग्रेड मिळवलेल्या काही गायिकांपैकी ती एक आहे.
मालाडमध्ये शरीरसौष्ठवाचा २२ फेब्रुवारीला महासंग्राम ज्युनियर मुंबई श्रीसह दिव्यांग आणि मास्टर्स स्पर्धेचाही पिळदार थरार जय भवानी व्यायाम मंदिर ट्रस्टच्या वतीने ज्युनिअर मुंबई श्री चे मालाड येथे आयोजन मुंबई : जिद्द, शिस्त आणि मेहनतीच्या जोरावर शरीर घडवणाऱ्या तरुणाईला मोठ्या व्यासपीठावर स्वतःला सिद्ध करण्याची संधी देणारी ‘दिव्यांग / मास्टर्स / ज्युनियर मुंबई श्री २०२६’ तसेच ‘ज्युनियर मुंबई मेन्स फिजीक’ ही बहुप्रतिक्षित शरीरसौष्ठव स्पर्धा रविवार, २२ फेब्रुवारी सायंकाळी ५ वाजता जय भवानी व्यायाम मंदिर ट्रस्ट यांच्या विद्यमाने मालाड (पूर्व) येथील पंडित दिनदयाल उपाध्याय उद्यान, कासम बाग येथे रंगणार आहे. स्पर्धेपूर्वी दुपारी १ ते ४ या वेळेत वजन व उंची तपासणी होणार असून, ही तपासणीच अनेक खेळाडूंसाठी अंतिम कसोटी ठरणार आहे. अशी माहिती संघटनेचे सरचिटणीस राजेश सावंत यांनी दिली. या स्पर्धेत ज्युनियर मुंबई श्री अंतर्गत ५५ किलोपासून ७५ किलोवरील असे एकंदर सहा वजनी गट, मास्टर्स मुंबई श्रीमध्ये ४० ते ५०, ५० ते ६० आणि ६० वर्षांवरील गट, तर दिव्यांग मुंबई श्री व ज्युनियर मुंबई मेन्स फिजीकसाठी स्वतंत्र खुले गट ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे नवख्या ज्युनियर खेळाडूंना अनुभवी शरीरसौष्ठवपटूंसोबत एकाच व्यासपीठावर चमक दाखवण्याची प्रेरणादायी संधी मिळणार आहे. या स्पर्धेचे आकर्षण केवळ रंगतदार सादरीकरणापुरते मर्यादित नसून पारितोषिकांमध्येही मोठा दम आहे. ज्युनियर मुंबई श्री व ज्युनियर मुंबई मेन्स फिजीकच्या प्रत्येक वजनी गटात पहिल्या पाच क्रमांकांना अनुक्रमे ३,०००, २,५००, २,०००, १,५०० व १,००० रुपये रोख पारितोषिके व प्रशस्तीपत्रे, तसेच पहिल्या तीन विजेत्यांना सुवर्ण, रौप्य व कांस्य पदके दिली जाणार आहेत. सहा गटांतील किताब विजेत्यास १५ हजार रुपये रोख व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. दिव्यांग मुंबई श्री गटातही पहिल्या पाच विजेत्यांना रोख बक्षिसे व प्रशस्तीपत्रे, तर मास्टर्स मुंबई श्री गटात पहिल्या तीन विजेत्यांना पदके आणि पहिल्या पाच विजेत्यांना प्रशस्तीपत्रे दिली जातील.…
अमर हिंद मंडळात रंगणार जपान विरुद्ध कबड्डीचा थरार! दादरच्या मॅटवर घुमणार आंतरराष्ट्रीय कबड्डीचा जयघोष कबड्डीच्या इतिहासात नवा अध्याय लिहिण्यास सज्ज झालेल्या दादरच्या अमर हिंद मंडळाच्या प्रांगणात आंतरराष्ट्रीय रंगत उतरतेय! मुंबई कबड्डी असोसिएशनच्या विद्यमाने जपान कबड्डी असोसिएशनचा आंतरराष्ट्रीय मुलींचा संघ आणि अमर हिंद मंडळाचा मुलींचा संघ यांच्यात ११ फेब्रुवारी सायंकाळी ठीक ७ वाजता मैत्रीपूर्ण सामना रंगणार असून, कबड्डीप्रेमींना जागतिक दर्जाचा थरार अनुभवता येणार आहे. आंतरराष्ट्रीय उपस्थिती : जपानकडून मान्यवरांची हजेरी या सामन्यासाठी जपान कबड्डी असोसिएशनचे सेक्रेटरी जनरल कवाई स्वतः उपस्थित राहणार असून, त्यांच्या सोबत १६ महिला खेळाडूंचा संघ तसेच महिला प्रशिक्षक अओकी यांचीही विशेष उपस्थिती लाभणार आहे. ही भेट भारतीय कबड्डीच्या आंतरराष्ट्रीय विस्ताराच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. कबड्डीला जागतिक पातळीवर नवे बळ कबड्डी या खेळाला आंतरराष्ट्रीय महत्त्व निर्माण करणे आणि जागतिक स्तरावर समृद्ध करणे हा या मैत्रीपूर्ण सामन्यामागील प्रमुख उद्देश आहे. दोन्ही संघांचा सामना मॅटवर होणार असून, तांत्रिक कौशल्य, वेग आणि डावपेच यांचा सुरेख संगम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रवेश विनामूल्य : कबड्डी प्रेमींसाठी खुलं आमंत्रण हा सामना सर्वांसाठी प्रवेश विनामूल्य असून, कबड्डीप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण सामन्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन अमर हिंद मंडळ, दादरच्या प्रमुख कार्यवाह सीमा कोल्हटकर यांनी केले आहे. दादरच्या क्रीडा भूमीत जागतिक कबड्डीचा उत्सव जपान आणि भारतातील मैत्रीला क्रीडामाध्यमातून नवी उंची देणारा हा सामना दादरच्या क्रीडा संस्कृतीसाठी अभिमानाचा क्षण ठरणार असून, अमर हिंद मंडळ पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रीडामंचावर आपली ठसा उमटवणार आहे.
“घुसखोर पंडित” वेबसिरीज विरोधात महाराष्ट्र करणी सेनेची पोलिसांत धाव रमेश औताडे मुंबई : ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रसारित होत असलेल्या ‘घुसखोर पंडित’ या वेब सिरीजमुळे ब्राह्मण समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करत महाराष्ट्र करणी सेनेने खांदेश्वर पोलिस ठाणे, नवी मुंबई येथे तक्रार दाखल केली आहे. या वेब सिरीजचे शीर्षक व कथानक समाजात द्वेष आणि तेढ निर्माण करणारे असल्याचा दावा संघटनेने केला आहे. महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख अजयसिंह सेंगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, “ घुसखोर पंडित ” हे नाव ब्राह्मण समाजाचा अपमान करणारे असून हिंदू धर्मासाठी पूज्य मानल्या जाणाऱ्या ब्राह्मण समुदायाची अवहेलना करण्याचा प्रयत्न यातून होत आहे. हिंदू धर्मातील प्रत्येक धार्मिक विधी ब्राह्मणांद्वारे पार पाडले जातात आणि त्यामुळे ब्राह्मण जातीचा अपमान म्हणजे संपूर्ण हिंदू धर्माचा अपमान असल्याचे त्यांनी सांगितले. या वेब सिरीजमुळे ब्राह्मण समाजासह विविध हिंदू संघटनांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून, सामाजिक शांतता बिघडण्याची शक्यता निर्माण झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. संबंधित वेब सिरीज समाजात द्वेष, असंतोष आणि धार्मिक तेढ वाढवण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला असल्याचे सेंगर यांनी सांगितले. या प्रकरणी वेब सिरीजचे दिग्दर्शक मनोज बाजपेयी तसेच संबंधित निर्मात्यांविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १९६, २९९, ३५२, ३५३ तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र करणी सेनेने केली आहे. पोलिसांनी तक्रार स्वीकारून पुढील तपास सुरू करावा, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.