Category: मुंबई

Mumbai news

मानव सेवा प्रतिष्ठानची आंतर शालेय कबड्डी स्पर्धा

  मुंबई : मानव सेवा प्रतिष्ठान, कुर्ला शाखा यांच्यावतीने यंदा प्रथमच येत्या १८ जानेवारी रोजी कुर्ला (पश्चिम) येथील हनुमान मंदिराजवळील गांधी मैदानात १४ वर्षाखालील मुलांच्या मोफत आंतर शालेय कबड्डी स्पर्धेचे…

मिळणाऱ्या संधीचा अधिकाधिक लाभ उठवा – वेंगसरकर

मुंबई : ड्रीम ११ कप क्रिकेट स्पर्धेत खेळण्याची संधी मिळणे म्हणजे तुम्हाला आपल्यातील गुणवत्ता सिद्ध करण्याची सुवर्ण संधी आहे. अशा संधी आयुष्यात फार कमी वेळा मिळतात कारण या स्पर्धेमुळे तुम्हाला…

स्वयंपुनर्विकास प्रकल्पाचे शुक्रवारी उद्‌घाटन

नंददीप को- ऑप. हौसिंग सोसायटीच्या राजेंद्र साळसकर मुंबई- मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सहकार्याने नंददीप को-ऑप हौसिंग सोसायटीच्या स्वयंपुनर्विकास प्रकल्पाचे उद्‌घाटन येत्या शुक्रवारी, १० जानेवारीला भाजपा विधानपरिषद गटनेते व मुंबई…

केईएम रुग्णालयातील वाचनालय हटविण्यास सर्वच युनियनच्या संघटनांचा प्रखर विरोध

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या वाचनालयाची वास्तू केईएम रुग्णालय प्रशासन शतक महोत्सवी वर्षाच्या नुतनीकरणाचे कारण सांगत, अचानकपणे वाचनालयाची वास्तू हटविण्यासाठी सांगण्यात आले. वाचनालयाचे सर्व साहित्य तात्पुरत्या स्वरूपात जिमखान्यात…

…तर नक्कीच सु-प्रशासन व्हायला वेळ लागणार नाही – अपर पोलीस आयुक्त संजय जाधव

कल्याण : समाजातील विविध प्रश्न प्रशासनाच्या लक्षात आणून देण्याचे महत्वपूर्ण काम पत्रकार करत असतात. चौथा स्तंभ म्हणून कार्य करणारा पत्रकार हा उर्वरित तीन स्तंभांवर अंकुश ठेवण्याचे कार्य नेहमीच करत आला…

– दुर्गाडी किल्ला आणि सभोवतालचा परिसर सुशोभित करण्याची विजय साळवी यांची मागणी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते विजय साळवी यांचे केडीएमसी आयुक्तांना पत्र कल्याण : कल्याण मधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ला आणि सभोवतालचा परिसर सुशोभित करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षाचे…

मुलांचा भाव विश्वास जाणून ‘वासाची किंमत’ या लघुपटाची निर्मिती – डाएट प्राचार्य संजय वाघ

कल्याण : “इयत्ता तिसरीच्या वर्गातील मराठी विषयातील “वासाची किंमत” या चित्रकथेवर आधारित अजय पाटील यांनी पटकथा, संवाद, कॅमेरा, एडिटिंग, दिग्दर्शन असे पंचरंगी भूमिका सादर करून अत्यंत सुंदर पद्धतीचा लघुपट शाळेतील…

मुंबई महानगर क्षेत्रात केबल कार प्रकल्पासाठी नितीन गडकरींची तत्वतः मान्यता – प्रताप सरनाईक

अनिल ठाणेकर मुंबई महानगर क्षेत्रामध्ये भविष्यात रोप वे च्या माध्यमातून केबल कार प्रकल्प राबवण्यास केंद्रीय वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी तत्वतः मान्यता दिली असून लवकरच या प्रकल्पाचे सर्वेक्षण करून विकास आराखडा (D.P.R.) तयार करण्यात येईल. तसे निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते, वाहतूक मंत्रालयाचे सचिव  वी. उमाशंकर यांना दिले आहेत, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. नवी दिल्ली येथे  केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सर्व राज्यांच्या परिवहन मंत्र्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकी दरम्यान   परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी  मंत्री गडकरी यांची विशेष भेट घेऊन मुंबई महानगर क्षेत्रामध्ये ” केबल कार ” प्रकल्प राबवण्यासाठी केंद्र सरकार द्वारे.  “ पर्वतमाला परियोजना ” अंतर्गत *सार्वजनिक खाजगी भागीदारी (PPP) अथवा केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त आर्थिक भागिदारीने* रोप वे विकसित करण्याच्या प्रकल्पाचे सादरीकरण केले. *यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईच्या एकूणच वाहतुकी संदर्भात प्रकल्प अहवाल सादर करताना विमानतळापासून उपनगरांमध्ये कोणत्याही ठिकाणी जाण्यासाठी कमीत कमी वेळ लागावा, अशा पद्धतीची एकत्रित वाहतूक व्यवस्था विकसित करण्याचा प्रकल्पाचे देखील सर्वेक्षण करावे अशी  सूचना मांडली* याला परिवहन मंत्री, सरनाईक यांनी वेगवेगळ्या उपनगरांमधून कमीत कमी वेळात मुंबई विमानतळाला पोहोचता येईल असा *एकत्रित वाहतूक आराखडा* लवकरच सादर केला जाईल असे आश्वासन दिले.दरम्यान मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या दृष्टीने या प्रकल्पाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पालघर पासून रायगड जिल्ह्यातील उरण-पेण पर्यंत पसरलेल्या एकूण क्षेत्रामध्ये नागरिकरणाचा वेग वाढत आहे. रस्ते वाहतूक, रेल्वे, मेट्रो यासारख्या सार्वजनिक वाहतूक सेवेवर दिवसेंदिवस पडणार ताण लक्षात घेता भविष्यात ” केबल कार ” सारखी हवाई सेवा विकसित होणे आवश्यक आहे. त्यासाठी या प्रकल्पाचे सर्वेक्षण करून विकास आराखडा (DPR) तयार करणे गरजेचे असून त्याला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री  म्हणून नितीन गडकरी यांनी विशेष परवानगी देणे आवश्यक होते.या भेटी दरम्यान  केंद्रीय मंत्री गडकरी यांना या प्रकल्पाचे सादरीकरण करुन मुंबई क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या दृष्टीने या प्रकल्पाचे महत्त्व विशद केले. या प्रकल्पास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री म्हणून नितीन गडकरी यांनी तत्वतः मान्यता दिली आहे.अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मुंबई महानगर क्षेत्रातील वाढते नागरीकरण, वाहनांची वाढती संख्या, त्या तुलनेत अपुरी रस्ते व रेल्वे सेवा, वाढते प्रदूषण या कारणामुळे काही धोरणात्मक निर्णय घेऊन आधुनिक तंत्रज्ञान व पाश्च्यात देशात यशस्वीपणे राबवलेल्या प्रकल्पाचा अभ्यास करून नाविन्यपूर्ण योजनेच्या माध्यमातून  भविष्यात वाहतुक कोंडी चा प्रश्न सोडवण्यासाठी ठोस प्रयत्न केला जाईल. त्यासाठी “केबल कार ” प्रकल्पाचे महत्त्व केंद्रीय रस्ते  वाहतूक व महामार्ग मंत्री, नितीन गडकरी यांना पटवून देऊन या प्रकल्पाचे सर्वेक्षण करून विकास आराखडा तयार करण्याची तत्वतः मान्यता घेण्यात आली आहे.अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

 आदिवासी समाजाच्या सदस्यांना विस्थापित करण्याचा भूमाफियांचा घाट

संबंधितांवर कारवाई करण्याची परहित चॅरिटेबल सोसायटीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी   कल्याण : कल्याण तालुक्यातील कांबा येथील एकूण ४६० एकर क्षेत्र असलेल्या आणि अंदाजे रूपये दोन हजार  करोड किंमतीच्या एका जमिनीवरील कब्जेदार आणि वहिवाटदार आदिवासी समाजाच्या सदस्यांना स्थानिक भूमाफिया पैशाच्या, बळाच्या, दहशतीच्या जोरावर विस्थापित करून सामाजिक अन्याय आणि शोषण करीत असून या आदिवासी समाजाच्या सदस्यांना विस्थापित करण्याचा भूमाफियांनी घाट घातला आहे. त्यामुळे आदिवासी समाजाच्या विनंतीनुसार  सबंधितांवर कारवाई करण्याची मागणी परहित चॅरिटेबल सोसायटीचे अध्यक्ष विशालकुमार गुप्ता यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. स्वतः शेतकरी नसणाऱ्या शहा कुटुंबीयांनी बेकायदेशीररित्या कांबा येथे जमिनी विकत घेतल्या. या जमिनीच्या काही भूभागावर पूर्वापार पासून आदिवासी समाजाच्या सदस्यांचा कब्जा, वहिवाट आणि कुळ आहे. आदिवासी समाजाचे सदस्य मुळातच दुर्बल, अशिक्षीत, गरीब आणि त्यांच्या अधिकारांची जाणीव नसणारे असल्यामुळे ते न्यायालयीन संघर्ष करण्यास कमी पडत आहेत.  याचा फायदा घेऊन पैशाच्या जोरावर न्याय खेचून आणत असून आदिवासी कटुंबाचे न्याय हक्क मारून त्यांच्यावर अन्याय करत आहेत. आदिवासी सदस्यांवर दहशत निर्माण करण्यासाठी या भूमाफियांनी स्थानिक गुंड टोळीची मदत घेतली असून, त्या गुडांच्या भितीने आदिवासी सदस्य प्रचंड दहशतीखाली असून जिव मुठीत घेवून जिवन जगत आहेत. त्यासाठी आदिवासी कब्जेदार वहिवाटदार यांना पोलीस संरक्षण प्रदान करावे आणि शहा कुटुंबिय आणि त्यांचे स्थानिक गुड यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई आणि उचित पोलीस कारवाई करावी. विषयांकीत वाद जमिनीबाबत दावे उच्च न्यायालयात आणि उपविभागीय अधिकारी कल्याण यांच्या न्यायालयात प्रलंबीत असल्यामुळे मालमत्ता हस्तांतरण अधिनियम कलम ५२ अन्वये शहा कुटुंबियांना मालमत्ता हस्तांतरणास अथवा जमिन खरेदी विक्रीस परवानगी देऊ नये. जमिनीवरील गैर व्यवहाराबाबत चर्चा करण्यासाठी आणि वस्तुस्थिती आणि कागदपत्रे आपणाकडे सादर करण्यासाठी आदिवासी सदस्यांना भेटीची वेळ मिळावी. आदिवासींवरील अन्याय दूर करण्यासाठी त्यांची बाजू आपणाकडून न ऐकली गेल्यास, आदिवासी समाजास आमरण उपोषण, आंदोलन करण्याशिवाय आणि न्यायासाठी राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग, नवी दिल्ली यांच्याकडे दाद मागण्याशिवाय पर्याय शिल्लक राहणार नाही. त्यामुळे आदिवासी समाजाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून या प्रकरणात तात्काळ न्यायोचित कारवाई करण्याची मागणी परहित चॅरिटेबल सोसायटीचे अध्यक्ष विशालकुमार गुप्ता यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. 0000

 सदस्य नोंदणीसाठी भाजपाचे १० जानेवारी रोजी ‘घर चलो अभियान’

 भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती दीड कोटी प्राथमिक सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा विश्वास मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या सुरु असलेल्या संघटन पर्वा अंतर्गत 10  जानेवारी रोजी प्राथमिक सदस्य नोंदणीसाठी  घर चलो अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानात पक्षाचे सर्व मंत्री, पंचायती पासून पार्लमेंट पर्यंतचे सर्व लोकप्रतिनिधी, सर्व पदाधिकारी या अभियानात सहभागी होणार आहेत, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बावनकुळे बोलत होते. यावेळी संघटन पर्व प्रभारी आ. रवींद्र चव्हाण, आ. शिवाजी कर्डिले, प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन उपस्थित होते. पक्षाचे दीड कोटी प्राथमिक सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट निश्चितच पूर्ण होईल, असा विश्वासही श्री. बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केला. बावनकुळे यांनी सांगितले की, पक्षाच्या संघटन पर्व अंतर्गत सदस्य नोंदणी अभियानाला राज्यात प्रारंभ झाला आहे. 5 जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व प्रमुख नेत्यांनी, लोकप्रतिनिधींनी, पदाधिकाऱ्यांनी बूथ पातळीवर जाऊन या अभियानात सहभाग घेतला.10 जानेवारी रोजी पक्षाचे सर्व प्रमुख नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी प्रत्येक बुथवर किमान 40 -50 घरी जाऊन प्राथमिक सदस्य नोंदणी करणार आहेत. पक्षाने राज्यात दीड कोटी प्राथमिक सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट ठेवले आहे. प्राथमिक सदस्य नोंदणीनंतर सक्रीय सदस्य नोंदणी अभियान सुरु होईल. एका बुथवर 5 सक्रीय सदस्य नोंदवून राज्यात 5 लाख सक्रीय सदस्य नोंदविले जातील, असेही बावनकुळे यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकसित भारताचा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विकसित महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण करण्यासाठी राज्यातील जनता सदस्य नोंदणी अभियानाला प्रतिसाद देईल, असा विश्वासही श्री. बावनकुळे यांनी व्यक्त केला. ०००००