Category: मुंबई

Mumbai news

पुरुष, महिला आणि व्यावसायिक गटातील विजेतेपदासाठी आज निर्णायक लढती

मुंबई महापौर चषक खो-खो स्पर्धा – २०२६ मुंबई : मुंबई खो-खो संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी उद्यान, दादर (प.), मुंबई येथे सुरू असलेल्या मुंबई महापौर चषक खो-खो स्पर्धा – २०२६ मध्ये…

Heading – विकसित राष्ट्र बनवण्यासाठी संवेदनशील राष्ट्र बनवावे लागेल- राज्यपाल जिष्णु देव वर्मा

चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दिव्यांगांना स्मार्ट चष्मे, व्हीलचेअर, शिलाई मशीन व लॅपटॉप वाटप अशोक गायकवाड मुंबई : विकसित भारत म्हणजे आर्थिक दृष्ट्या संपन्न भारत घडवणे इतकेच अभिप्रेत नाही. तर विकसित भारत घडवण्यासाठी दिव्यांग लोकांना देखील विकास कार्यात समान भागीदार बनवावे लागेल. विकसित राष्ट्र घडविण्यासाठी संवेदनशील राष्ट्र बनवावे लागेल, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज येथे केले. हेतू चॅरिटेबल ट्रस्ट व डिस्ट्रिक्ट लीगल सर्विसेस ऑथॉरिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिव्यांग सक्षमीकरण परिषदेचे उद्घाटन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत मालाड मुंबई येथे संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते दिव्यांग महिलांना शिलाई मशीन, दृष्टिहीन व्यक्तींना एआय – स्मार्ट चष्मे, व्हिलचेयर व दिव्यांग स्नातक युवकांना लॅपटॉप वितरित करण्यात आले. शासन व सामाजिक संस्था एकत्र येऊन कार्य करतात तेंव्हा दिव्यांग सक्षमीकरणाचे कार्य यशस्वी होते असे सांगून राज्यपालांनी हेतू चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्याचे कौतुक केले. या कार्यक्रमात १०० दिव्यांग व्यक्तींना व्हीलचेअर, ५० महिलांना शिलाई मशीन, १०० दृष्टिहीन व्यक्तींना एआय स्मार्ट चष्मे व ३ दिव्यांग युवकांना लॅपटॉप देण्यात आले. कार्यक्रमाला कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती न्या. श्याम चांडक व न्या. मकरंद कर्णिक, न्या. ( सेवानिवृत्त) के के तातेड, हेतु चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव रिखबचंद जैन, उद्योजक प्रवीण कोठारी, देवेंद्र जैन, नरेंद्र राठी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पी.जी. तापडिया आदी उपस्थित होते.

– १७ वर्षांखालील गटामध्ये हर्षल राणा, देवश्री अरोराची बाजी

अवाडा-ऑटर्स क्लब अखिल भारतीय स्क्वॉश स्पर्धा २०२६ मुंबई, ३० मे: हरियाणाच्या हर्षल राणा आणि दिल्लीच्या देवश्री अरोराने अवाडा-ऑटर्स क्लब अखिल भारतीय स्क्वॉश स्पर्धेत अनुक्रमे १७ वर्षांखालील मुले आणि मुली गटाचे…

जुन्या वैमनस्यातून राडा

घराची तोडफोड, जीवघेणा हल्ला दोन आरोपी अटकेत कल्याण : म्हारळ गावातील एका कुटुंबाच्या घरात घुसून तोडफोड, महिलेशी गैरवर्तन आणि जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी टिटवाळा पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात एकूण नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी सात आरोपी अद्याप फरार आहेत. टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, डिसेंबर २०२५ मध्ये झालेल्या मारहाणीच्या घटनेचा राग आरोपींनी मनात धरला होता. याच जुन्या वादातून २९ मे रोजी सायंकाळी सुमारे ७.२५ वाजता आरोपी आपल्या साथीदारांसह फिर्यादीच्या घरी पोहोचले. आरोपींनी जबरदस्तीने घरात प्रवेश करून लोखंडी रॉडच्या साहाय्याने घरातील वस्तूंची तोडफोड केली. यावेळी फिर्यादीच्या बहिणीसोबत गैरवर्तन करत तिचा  विनयभंग करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे. याला विरोध केल्यानंतर आरोपींनी फिर्यादीवर हल्ला चढविला. पोलिसांनी सांगितले की, मुख्य आरोपी हरेश प्रधान उर्फ दैत्या आणि त्याच्या साथीदारांनी लोखंडी रॉड व चाकूच्या सहाय्याने आशिष खांडेकर यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. फिर्यादीने बचाव करण्याचा प्रयत्न केला असता त्याच्या दोन्ही हातांना गंभीर दुखापत झाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन टिटवाळा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुख्य आरोपी हरेश प्रधान उर्फ दैत्या आणि करण अमर राजपूत यांना अटक केली. दोन्ही आरोपींना ३० मे रोजी पहाटे ताब्यात घेण्यात आले. पोलिस तपासात मुख्य आरोपी हरेश प्रधान याच्याविरुद्ध यापूर्वीही विविध गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. सध्या फरार असलेल्या सात आरोपींचा शोध सुरू असून प्रकरणाचा पुढील तपास टिटवाळा पोलीस करत आहेत. या घटनेमुळे म्हारळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, गुन्ह्यातील सर्व आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

विधान परिषद आचारसंहितेमुळे केडीएमसी आयुक्तांचा लोकशाही दिन रद्द

००००००० कल्याण : सर्व सामान्य नागरिकांच्या समस्या, तक्रारी यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयातील  आयुक्त महोदयांच्या दालनात  लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. तथापि महाराष्ट्र विधान परिषदेद्वारे ठाणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची द्विवार्षिक निवडणूक -२०२६ चा कार्यक्रम जाहीर झाला असून १८ मेपासून कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे   सोमवार १ जून रोजी कल्याण महानगरपालिकेत संपन्न होणारा लोकशाही दिन, ठाणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची वार्षिक निवडणूक- २०२६ची आचारसंहिता शिथिल होईपर्यंत महापालिकेत होणार नाही. याची नागरिकांनी कृपया नोंद घ्यावी असे महानगरपालिका प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे.

ऑनलाइन करभरणा सुविधांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यातच नवी मुंबई महानगरपालिकेचा १०० कोटी मालमत्ता कर वसूल नवी मुंबई- नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागामार्फत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी सुरू असलेल्या मालमत्ता करवसूली…

H- दिवसाप्रमाणे रात्रीही उष्णतेचा कहर

 कल्याण-डोंबिवलीत रात्रीच्या सर्वाधिक ३०.४ सेल्सिअस तापमानाची नोंद कल्याण डोंबिवलीसह मुंबई एमएमआरमध्ये रात्रीचे १३ वर्षांतील विक्रमी तापमान कल्याण : एकीकडे दिवसा सूर्यदेव अक्षरशः आग ओकत असताना दिवसाप्रमाणेच आता रात्रीच्या तापमानावरही त्याचा मोठा परिणाम झालेला दिसत आहे. मुंबईसह संपूर्ण एमएमआर रिजनमध्ये गेल्या १३ वर्षांतील रात्रीचे सर्वाधिक तापमान २९ मे २०२६ म्हणजेच काल नोंद झाले असून कल्याण डोंबिवली हे रात्रीच्या तापमान वाढीचे हॉट स्पॉट ठरल्याची माहिती हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली आहे. विशेष म्हणजे हा उष्णतेचा प्रभाव केवळ मुंबईपुरता मर्यादित नसून संपूर्ण मुंबई महानगर प्रदेश  आणि उत्तर कोकण पट्ट्यात जाणवला. ठाणे, कल्याण-डोंबिवली, पनवेल, अंबरनाथ, विरार, कर्जत आणि कर्जत परिसरात गेल्या अनेक वर्षांतील सर्वाधिक उष्ण रात्रींपैकी काही रात्रींची यावर्षी नोंद झाली आहे. हवामान तज्ज्ञ अभिजीत मोडक यांच्या मते वातावरणातील वाढलेला आर्द्रतेचा स्तर, ढगाळ वातावरण आणि रात्रीच्या वेळी वाहणारे वारे यामुळे दिवसभर साचलेली उष्णता वातावरणात सहजपणे विरून जात नाही. परिणामी रात्रीचे तापमान अपेक्षेप्रमाणे खाली येत नसल्याने नागरिकांना दिवसाप्रमाणे रात्रीही प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. उत्तर कोकणातील अनेक शहरांमध्ये किमान तापमान हे २९ अंशांच्या वर राहिले. कल्याण-डोंबिवली येथे सर्वाधिक ३०.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. त्याखालोखाल पनवेल-पलावा ३०.३ अंश, बिरवाडी ३०.२ अंश, अंबरनाथ-विरार ३०.१ अंश आणि ठाणे-नवी मुंबईमध्ये ३० अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. हवामानाच्या अंदाजानुसार, नैऋत्य मोसमी वारे  सक्रिय होईपर्यंत अशाच प्रकारच्या उष्ण आणि दमट रात्रींचा अनुभव नागरिकांना येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी उष्माघात टाळण्यासाठी पुरेसे पाणी पिणे, आवश्यक तेवढाच बाहेरचा प्रवास करणे आणि आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असल्याचेही अभिजीत मोडक यांनी सांगितले आहे. ०००००००

बांधकाम कामगारांची सुरक्षा ही सर्वांची सामूहिक जबाबदारी – आयुक्त डॉ. कैलास शिंदे

नवी मुंबई महापालिका व क्रेडाई-बीएएनएमतर्फे विशेष जागरूकता शिबिर नवी मुंबई : विकासकामांसोबत पर्यावरण संवर्धन आणि कामगार सुरक्षा यांनाही समान महत्त्व दिले पाहिजे. मजबूत बांधकाम, ग्रीन बिल्डिंग, जलसुरक्षा आणि ऊर्जा बचत यांच्याबरोबरच बांधकाम क्षेत्रातील…

मुंबईत रंगणार पहिले अखिल भारतीय युवा गझल संमेलन

मुंबई : येत्या ७ जून रोजी गझल मंथन साहित्य संस्थेद्वारा आयोजित ‘पहिले अखिल भारतीय युवा गझल संमेलन’ संपन्न होणार असून संमेलनाध्यक्ष म्हणून बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध युवा गझलकार गोपाल मापारी यांची…

भाटाळे तलावावरील अतिक्रमणे हटवून तलावाचे संवर्धन करण्याची भाजपची मागणी

 केडीएमसी सभागृह नेते वरुण पाटील यांचे केडीएमसी आयुक्तांना पत्र कल्याण : कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी किल्ल्यालगत असलेल्या ऐतिहासिक भाटाळे तलावावरील अतिक्रमणे हटवून तलावाचे संवर्धन करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली असून याबाबत केडीएमसीचे सभागृह नेते वरुण पाटील यांनी केडीएमसी आयुक्तांना पत्र दिले आहे. त्याचप्रमाणे वरुण पाटील यांनी याबाबत भाजपा नेते किरीट सोमय्या यांना देखील पत्र देऊन या तलावाच्या संवर्धनासाठी प्रशासनाला निर्देश देण्याची मागणी केली आहे. कल्याण शहर हे महाराष्ट्रातील ऐतिहासिक वारसा लाभलेले प्राचीन शहर असून, येथील दुर्गाडी किल्ला व परिसर हा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. दुर्गाडी किल्ल्यालगत असलेला भाटाळे तलाव हा देखील शहराच्या ऐतिहासिक वारशाचा अविभाज्य भाग आहे. या तलावाच्या परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली, असून तलावाचे मूळ क्षेत्र कमी होत चालले आहे. तलावाच्या काठावर अनधिकृत बांधकामे, भराव टाकणे, कचरा टाकणे व इतर बेकायदेशीर उपक्रमांमुळे तलावाचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे. त्यामुळे शहराच्या ऐतिहासिक वारशाचे नुकसान होत आहे. त्यामुळे भाटाळे तलावाची अधिकृत हद्द व क्षेत्रफळ अभिलेखांनुसार निश्चित करण्यात यावे. तलाव परिसराचे संयुक्त मोजमाप करून सर्व अतिक्रमणांची यादी तयार करण्यात यावी. तलावावरील सर्व अनधिकृत अतिक्रमणे तातडीने हटविण्याची कार्यवाही करण्यात यावी. तलावाभोवती संरक्षक भिंत/कंपाऊंड उभारण्यात यावे. तलावाचे सुशोभीकरण, संवर्धन व पुनरुज्जीवन करण्यासाठी स्वतंत्र आराखडा तयार करण्यात यावा. भविष्यात कोणतेही नवीन अतिक्रमण होऊ नये यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात यावे. तलावाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन त्याचा “वारसा स्थळ” म्हणून विकास करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात यावा. भाटाळे तलाव हा केवळ जलस्त्रोत नसून कल्याण शहराच्या इतिहासाचा साक्षीदार आहे. त्यामुळे त्याचे संरक्षण करणे ही महानगरपालिकेची कायदेशीर व नैतिक जबाबदारी आहे. या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केडीएमसीचे सभागृह नेते वरुण पाटील यांनी केली आहे.