अनिल ठाणेकर

ठाणे, सहा महिन्यांच्या थकीत वेतन फरकाच्या रकमेच्या दुप्पट दंडासहित एकूण ५८ लाख रुपये ४५ दिवसांत ठेकेदार यांनी अदा करावे. ठेकेदार यांनी सदरील रक्कम अदा केली नाही तर पुढील ६० दिवसांत मूळ मालक रूग्णालय प्रशासनाने सदर रक्कम अदा करावी; असे आदेश पारित केले होते यानुसार ठाणे प्रादेशिक मनोरूग्णालयातील सर्व ६८ सफाई कामगारांना, सहा महिन्यांची वेतन फरकाची रक्कम दुप्पट दंडासहित रूग्णालय प्रशासनाने कामगारांच्या बॅंक खात्यात सोमवारी ७ सप्टेंबरला जमा केली असून, कामगारांसाठीच्या श्रमिक जनता संघ युनियनच्या लढ्यास अखेरीस यश प्राप्त झाले आहे.

रूग्णालयातील कर्मचारी व श्रमिक जनता संघ युनियनचे युनियनचे संघटक दीनानाथ देसले, अनिता कुंभावत, शर्मिला लोगडे, संजय सेंदाणे, सोनी चौहान आदी कार्यकर्त्यांनी या लढ्यात सातत्याने विशेष परिश्रम घेतले. कामगारांच्या साखळी उपोषण काळात श्रमिक जनता संघ युनियनची ठाणे, कल्याण, मुंबई येथिल इतर युनिट्स तसेच ठाण्यातील अन्य कामगार युनियन्स व संघटनांनी लढ्यास पाठींबा दिल्याबद्दल, युनियनचे सचिव सुनील दिवेकर व सुनिल कंद यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *