Category: मुंबई

Mumbai news

  दादरमध्ये पुन्हा घुमणार ‘समर्थ’चा जयघोष!

३० वे समर्थ खो-खो शिबीर दादरमध्ये पुन्हा घुमणार ‘समर्थ’चा जयघोष! मुंबई: दादरच्या क्रीडांगणावर पुन्हा एकदा जोश, जिद्द आणि जाज्वल्य परंपरेचा संगम रंगणार आहे! भारतातील अग्रगण्य क्रीडा संस्था असलेल्या श्री समर्थ व्यायाम मंदिर, दादरने शतकोत्तर वर्षात पदार्पण करताना क्रीडाप्रेमींसाठी आणली आहे खास मेजवानी, ३० वे समर्थ खो-खो शिबीर! खो-खोच्या मैदानावर शिस्त, चपळता आणि संघभावनेचा अनोखा संगम अनुभवण्याची सुवर्णसंधी यंदाही खेळाडूंना मिळणार आहे. परंपरेचा वारसा आणि गौरवशाली कामगिरी श्री समर्थ व्यायाम मंदिर ही केवळ संस्था नसून भारतीय क्रीडा क्षेत्रातील एक प्रेरणादायी पर्व आहे. खो-खो क्षेत्रातील नामांकित संघ म्हणून समर्थची देशभरात ओळख आहे.  संस्थेतील खेळाडू व प्रशिक्षकांनी पद्मश्री पुरस्कार, क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, क्रीडा संघटक शिवछत्रपती पुरस्कार, एकलव्य पुरस्कार, वीर अभिमन्यू पुरस्कार अशा मानाच्या सन्मानांनी गौरव प्राप्त केला आहे. या तेजस्वी परंपरेचा वारसा पुढे नेण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. खो-खो शिबिराचे आयोजन व वेळापत्रक ३० वे समर्थ खो-खो शिबीर हे मंगळवार १७ ते गुरुवार २६ फेब्रुवारी या कालावधीत पार पडणार आहे. समर्थ क्रीडा भवन पटांगण, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, दादर (पश्चिम), मुंबई येथे हे शिबीर सायंकाळी ७ ते ८ या कालावधीत शिबिरार्थ्यांना संस्थेचे राष्ट्रीय व राज्य पातळीवरील खेळाडू मार्गदर्शन करणार आहेत. शिबिरार्थींना प्रामुख्याने खो खो, लंगडी, शरीरतापन, सूर्यनमस्कार, आसन इत्यादी शिकवले जाणार आहे. या कालावधीत राष्ट्रीय व राज्य स्तरावरील समर्थचे अनुभवी खेळाडू शिबिरार्थींना थेट मार्गदर्शन करणार आहेत. तसेच खो खो सह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर या शिबिरास भेट देऊन मार्गदर्शन करणार आहेत.

आरोग्य सेवांचे खाजगीकरण थांबवा, शुल्क आकारणीचा निर्णय रद्द करा – सीटू

आरोग्य सेवांचे खाजगीकरण थांबवा, शुल्क आकारणीचा निर्णय रद्द करा – सीटू अनिल ठाणेकर मुंबई – राज्यातील शासकीय रुग्णालयांतील सेवांवर शुल्क आकारण्याबाबत जारी करण्यात आलेला शासन निर्णय (जी.आर.) तात्काळ रद्द करावा आणि…

मुंबईला जागतिक दर्जाचे फिनटेक केंद्र बनवणार – एकनाथ शिंदे

मुंबईला जागतिक दर्जाचे फिनटेक केंद्र बनवणार – एकनाथ शिंदे अनिल ठाणेकर मुंबई: वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त बाळासाहेबांची स्वप्नं पूर्ण करण्याबरोबर मुंबईला जागतिक दर्जाचं फिनटेक केंद्र बनवणार, अशी ग्वाही शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुंबई महापालिकेत महायुतीचे महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मागील २५ वर्ष मुंबईकर विकासापासून वंचित होते, मात्र महायुतीचे सरकार आल्यानंतर मागील साडेतीन वर्षात मुंबईच्या विकासाला चालना दिली. महायुतीच्या आश्वासनांवर, वचनांवर मुंबईकरांनी विश्वास ठेवला. महायुतीला कौल देऊन मुंबईकरांनी विकासाला स्वीकारलं, असे ते म्हणाले. महायुतीच्या महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी दोघेही अनुभवी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईला जागतिक दर्जाचे फिनटेक हब बनवण्याचा स्वप्न पाहिले आहे. या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी जे जे आवश्यक असेल ते ते देण्याचे काम सरकार करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त बाळासाहेबांची स्वप्नं पूर्ण करण्याचे काम महायुती सरकार करेल. झोपडपट्टीमुक्त मुंबई, एसआरए, क्लस्टरच्या माध्यमातून ४० लाख मुंबईकरांना हक्काची घरं याची सुरुवात यापूर्वीच झाली आहे, असे ते म्हणाले. खड्डेमुक्त मुंबई, प्रदूषणमुक्त मुंबई, भ्रष्टाचारमुक्त तसेच ड्रग्ज मुक्त मुंबई, मुंबईकरांना शुद्ध पिण्याचे पाणी देण्याबाबत महायुती कटिबद्ध आहे, असे ते म्हणाले.

  राज्यभर अजितदादा पवार मागासवर्गीय सक्षमीकरण अभियान राबविण्याचा एकमताने निर्धार..

राज्यभर अजितदादा पवार मागासवर्गीय सक्षमीकरण अभियान राबविण्याचा एकमताने निर्धार.. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाची बैठक संपन्न… मुंबई :    स्व. अजितदादा पवार यांची शिव,शाहू,फुले,आंबेडकर विचारधारा पुढे नेण्यासाठी राज्यभर “अजितदादा पवार मागासवर्गीय सक्षमीकरण अभियान”  राबविण्या एकमताने निर्धार करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभाग सेलकडुन विधानभवन येथे पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली  विधानभवन कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीत “समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवणे हे अजितदादा पवार यांचे ध्येय पुढे नेण्यासाठी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, कोकण अशी राज्यात सहा विभागांची आखाणी करण्यात येणार आहे. यासाठी सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची आहे.या नव्या अभियानामुळे पक्षाला मजबूती देण्यास मदत होईल असा विश्वास यावेळी उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभाग सेल शहर व ग्रामीण जिल्हाध्यक्षांच्या या बैठकीत सामाजिक न्यायाशी संबंधित विविध प्रश्न, आगामी पक्ष संघटनात्मक कार्यक्रम तसेच वंचित, दुर्बल घटकांपर्यंत पक्षाची भूमिका प्रभावीपणे पोहोचवण्याबाबत चर्चा करण्यात आली.  पुढील वाटचाल सुरू ठेवण्यासाठी एकजूट ठेवत सामाजिक न्याय विभागाची भूमिका अधिक सक्रिय व जनतेशी जोडलेली असावी हीच खरी अजितदादा पवार यांना श्रद्धांजली ठरेल असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभाग प्रदेश अध्यक्ष सुनील मगर म्हणाले. मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्र,उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, कोकण अशी राज्यात सहा विभागांची आखाणी करत पक्ष बांधणी करण्यात येणार आहे. शहर व ग्रामीण कार्यक्षेत्रातील समस्या, उपक्रम व संघटनात्मक कामाचा आढावा घेत “अजितदादा पवार मागासवर्गीय सक्षमीकरण अभियान” सुरू करण्यात येणार आहे. सामाजिक न्याय विषयक शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी पक्ष पातळीवर समन्वय वाढवण्यावर भर देण्यात येईल असा विश्वास विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी कार्यकर्त्यांना दिला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभाग प्रदेश अध्यक्ष सुनील मगरे,कार्याध्यक्ष बाळासाहेब करडक,शहर तसेच ग्रामीण जिल्हाध्यक्ष,कार्याध्यक्ष व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

भारतात हृदयविकाराच्या मृत्यूत झपाट्याने वाढ

भारतात हृदयविकाराच्या मृत्यूत झपाट्याने वाढ  रमेश औताडे मुंबई : जागतिक आरोग्य संघटनेनुसार  दरवर्षी सुमारे १ कोटी ८० लाख मृत्यू हृदयरोगामुळे होतात. बदलती जीवनशैली, ताणतणाव, मधुमेह, उच्च रक्तदाब, धूम्रपान आणि चुकीची माहिती यांमुळे भारतातही हृदयविकाराचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत डॉ . कौशल छत्रपती यांनी याबाबत माहिती दिली. जगभरात हृदयरोग हे मृत्यूचे प्रमुख कारण ठरत असताना, प्रसिद्ध इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. कौशल छत्रपती यांनी “ हार्टस्ट्राँग ” हे मार्गदर्शक पुस्तक प्रकाशित केले आहे. ३१ वर्षीय एका तरुणाला हृदयविकाराचा झटका आला होता. तो दिसायला फिट असतानाही हा प्रकार घडला. “फिट दिसणे म्हणजे आरोग्यदायी असणे नव्हे,” असा महत्त्वाचा संदेश ते देतात. रुथ अँड सोशल पब्लिकेशनतर्फे प्रकाशित झालेले हे पुस्तक पहिल्या आवृत्तीत हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी प्रत्येक कुटुंबासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

अजित पवारांचा घातच झालाय

अजित पवारांचा घातच झालाय एअर हॉस्टेस पिंकी माळीच्या वडिलांचा आरोप  वैमानिकाला उशीर व्हायला मुंबईत सकाळी ६ वाजता कुठे ट्राफिक असतं?”  शेवटच्या क्षणी वैमानिकच नव्हेतर विमानही बदलले मुंबई : अजित पवार यांचा विमान अपघात हा घातच होता असा आरोप आमदार आणि अजित…

खुशखबर ! जमिनीसाठी ‘एन.ए.’ गरज नाही

खुशखबर ! जमिनीसाठी ‘एन.ए.’ गरज नाही मुंबई : शेतजमिनीवरील बांधकामासाठी ती बिगरकृषी म्हणजेच एन.ए ( नॉन अग्रीकल्चर) करून घेण्याची आता गरज नाही. राज्याच्या जमीन महसूल कायद्यात मोठं बदल करण्यात आलाय. आता बिगर कृषी वापरासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वतंत्र…

मुंबई, ठाण्यात महिला राज

मुंबई, ठाण्यात महिला राज स्लग- मुंबई महानगरपालिकेत रितू तावडे भाजपाच्या पहिल्या महापौर तर शिंदेंच्या शिवसेनेचे संजय घाडी उपमहापौर ० ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेच्या  शर्मिला पिंपळोलकर महापौर तर भाजपाचे कृष्णा पाटील उपमहापौर ० मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महापौर-उपमहापौरांना दिल्या…

– इन्शुरन्स शील्ड क्रिकेट स्पर्धा

– इन्शुरन्स शील्ड क्रिकेट स्पर्धा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा १४ धावांनी विजय मुंबई: ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी आयोजित इन्शुरन्स शील्ड क्रिकेट स्पर्धेत (२०२५-२६) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने इंडिया फर्स्ट लाइफ इन्शुरन्सवर…

शिवाजी पार्क जिमखाना कॅरम स्पर्धेत मिताली – घुफ्रान जेते

शिवाजी पार्क जिमखाना कॅरम स्पर्धेत मिताली – घुफ्रान जेते मुंबई : शिवाजी पार्क जिमखाना आयोजित महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने तसेच सारस्वत बँक पुरस्कृत १७ व्या शिवाजी पार्क जिमखाना राज्य मानांकन कॅरम स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या गटाच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या महम्मद घुफ्रानने पुण्याच्या अभिजित त्रिपनकरला २५-१४, २५-० असे सरळ आणि सहज दोन सेटमध्ये हरवून विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीच्या या सामन्यात घुफ्रानने सुरुवातीपासूनच सामन्यावर आपली पकड ठेवली होती. तर महिला एकेरीच्या अंतिम लढतीत मुंबईच्या मिताली पाठकने मुंबईच्या रिंकी कुमारीला २५-१२, २१-९ असे सहज पराभूत करून विजयावर आपले नाव कोरले. पुरुषांच्या तिसऱ्या क्रमांकासाठीच्या लढतीत ठाण्याच्या झैद अहमद फारुकीने पुण्याच्या सागर वाघमारेला २५-०, २३-७ असे हरवले. तर महिलांच्या तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत ठाण्याच्या समृद्धी घाडिगावकरने बाजी मारली. तिने ठाण्याच्याच चैताली सुवारेला १७-१५, २५-११ असे सहज चीत केले. प्रमुख अतिथी लोकमतचे संपादक अतुल कुलकर्णी यांच्या शुभहस्ते विजेत्या खेळाडूंना चषक, प्रमाणपत्र व रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी शिवाजी पार्क जिमखान्याचे विश्वस्थ श्रीमती लता देसाई, प्रकाश नायक, महेंद्र ठाकूर, दीपक विश्वासराव, व्हाईस चेअरमन विश्वास नेरुरकर, सरचिटणीस संजीव खानोलकर, सह चिटणीस सुनील रामचंद्रन, इनडोअर खेळ सचिव सनिल समेळ, खजिनदार सी ए विलास सोमण, कार्ड सचिव अजय पाटणकर, कॅन्टीन सचिव आशुतोष जोगळेकर व महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद सचिव अरुण केदार आणि सहसचिव केतन चिखले व डॉ अनिल नेरुरकर उपस्थित होते. पुरुष एकेरी उपांत्य फेरीचे निकाल पुढील प्रमाणे. महम्मद घुफ्रान ( मुंबई ) वि वि सागर वाघमारे ( पुणे ) २५-१७, २५-२ अभिजित त्रिपनकर ( पुणे ) वि वि झैद अहमद फारुकी ( ठाणे ) २३-१९, २५-० महिला एकेरी उपांत्य फेरीचे निकाल पुढील प्रमाणे. रिंकी कुमारी ( मुंबई ) वि वि चैताली सुवारे ( ठाणे ) २५-२, २५-३ मिताली पाठक ( मुंबई ) वि वि समृद्धी घाडीगावकर ( ठाणे ) २५-१०, ५-२५, २१-८