Category: मुंबई

Mumbai news

घाटकोपर जॉली जिमखान्याच्या वतीने राज्य कॅरम स्पर्धेचे आयोजन

मुंबई : महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटनेच्या मान्यतेने दिनांक ११ ते १३ जानेवारी २०२५ दरम्यान घाटकोपर जॉली जिमखाना, वातानुकूलित हॉल, फातिमा शाळे समोर, विद्याविहार ( पश्चिम…

पणन मंत्री जयकुमार रावल यांनी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या सुविधांना दिली भेट

ठाणे : राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे अध्यक्ष श्री.जयकुमार रावल यांनी  30 डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वाशी येथील सुविधांना भेट दिली. या भेटीवेळी पणन व राजशिष्टाचार मंत्री श्री.रावल यांनी सुविधेवर सुरू असलेले कामकाज याबाबतीत अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली. यावेळी कृषी पणन मंडळाचे सरव्यवस्थापक विनायक कोकरे व सुविधेवर काम करीत असलेले अधिकारी उपस्थित होते. कृषी पणन मंडळाच्या अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युरोपियन देश, जपान, न्यूझीलंड, मलेशिया, दक्षिण कोरिया इ. देशांना कृषीमाल निर्यात करण्याकरिता आवश्यक असलेल्या वाशी येथील विकिरण सुविधा केंद्र, उष्ण बाष्प प्रक्रिया केंद्र व भाजीपाला प्रक्रिया केंद्र याबाबतीतील संपूर्ण माहिती सादर करण्यात आली. मंत्री तथा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ रावल यांनी याबाबतीत सुरू असलेल्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. या कामकाजाच्या चर्चेवेळी मंत्री .रावल यांनी विकसित देशांची निर्यात कशा पद्धतीने वाढविता येईल याबाबत देखील चर्चा केली. भारत सध्या जगातील पाचवी अर्थव्यवस्था म्हणून कार्यरत आहे. त्यामुळे आपल्याला आपल्यापेक्षा विकसित अमेरिका व चीन या देशांमध्ये कृषीमालाचे मार्केटिंग कशा पद्धतीने केल्या जाते, याबाबतची माहिती प्राप्त करून घेण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचित केले. चीनमधील कृषीमालाच्या लागवडीखालील क्षेत्र हे भारताच्या लागवडीखाली क्षेत्राच्या तीन पट असून तेथे उत्पादित कृषीमालाचे मार्केटिंग कशा पद्धतीत केले जाते, याबाबत देखील अभ्यास करावा अशा सूचना केल्या. अतिदूरवरच्या देशांना समुद्रमार्गे कृषीमाल निर्यात करण्यासंदर्भात प्रोटोकॉल विकसित करण्यात आला असून रशिया येथे केळीची चाचणी कन्साईनमेंट पाठवण्यात आली व ही कन्साईनमेंट यशस्वीरित्या रशिया येथे पोहोचली आहे, अशी माहिती कृषी पणन मंडळाचे सरव्यवस्थापक विनायक कोकरे यांनी दिली. आपल्याला यापेक्षा देखील चांगल्या पद्धतीने कामकाज पुढे नेता येईल, याबाबत विचार विनिमय करण्याबाबत सूचित केले. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, कृषी उत्पन्न बाजार समिती, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने फेब्रुवारी 2025 च्या सुमारास विविध कृषीमालाचे निर्यातदार व संबंधित घटकांची एकदिवशीय कार्यशाळा मुंबई येथे आयोजित करण्याबाबत पणन व राजशिष्टाचार मंत्री रावल यांनी सूचित केले आहे. या बैठकीवेळी विधानपरिषद सदस्य तथा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री.शशिकांत शिंदे, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक आणि मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ.पी.एल.खंडागळे व इतर अधिकारी उपस्थित होते. 000000

‘युपीएससी’ परीक्षेच्या मुलाखतीसाठी मोफत प्रशिक्षण

मुंबई : ‘युपीएससी’ तर्फे घेतल्या गेलेल्या नागरी सेवा मुख्य परीक्षा 2024 या परीक्षेचे निकाल घोषित झाले आहेत. मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी राज्य प्रशासकीय व्यवसाय…

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 च्या प्रकल्पास गती द्यावी-  देवेंद्र फडणवीस

मुंबई : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी हा राज्य शासनाचा ‘फ्लॅगशीप’ कार्यक्रम आहे. या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून विकासकांना काम करताना येत असणाऱ्या अडचणींचा जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांनी नियमित आढावा…

पार्ले महोत्सव २०२४ ची सांगता

मुंबई : कला-क्रीडा आणि सांस्कृतिक चळवळीचा भाग ठरलेल्या आमदार पराग अळवणी यांच्या नेतृत्वाखाली पार्ले महोत्सव २०२४ ची सांगता झाली असून गत वर्षाला निरोप देत आता नव्या वर्षी रौप्यमहोत्सवी वर्षात हा महोत्सव साजरा होणार आहे. महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी आमदार पराग अळवणी आणि माजी नगरसेविका ज्योती अळवणी यांच्या हस्ते अंतिम स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. या महोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण पार्ले महोत्सवमय झाले होते. या महोत्सवात यंदा ६० हजारांहून अधिक खेळाडू आणि स्पर्धकांनी वेगवेगळ्या गटात भाग घेतला. त्याचबरोबर एकूण ३५०० जणांना पारितोषिके प्राप्त झाली. महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले तर समारोपाच्या आदल्या दिवशी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी उपस्थिती दाखवली. महोत्सवात पहिल्यांदाच दहीहंडी या साहसी क्रीडा प्रकाराचा समावेश करण्यात आला होता. महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे, पालिका आयुक्त भूषण गगरानी, सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य तसेच अनेक मान्यवरांनी या महोत्सवाला भेटी दिल्या. आगामी २०२५ हे वर्ष पार्ले महोत्सवाचे रौप्यमहोत्सवी वर्ष असल्यामुळे आतापासूनच कार्यकर्ते त्याचे नियोजन करून हा महोत्सव भव्यदिव्य करण्यावर भर देतील, या महोत्सवाची व्याप्ती अधिक वाढेल तसेच अधिक स्पर्धक, नवे खेळ यात समाविष्ट होईल, असे आयोजक आमदार पराग अळवणी यांनी याबाबत बोलताना सांगितले.

 सुपर ओव्हरमध्ये स्पोर्ट्स प्रमोशन ग्रुप विजयी

 ६६वी टी-२० बाळकृष्ण बापट स्मृती ढाल क्रिकेट स्पर्धा मुंबई : कुर्ला स्पोर्ट्स क्लब आयोजित ६६ व्या टी-२० बाळकृष्ण बापट स्मृती ढाल क्रिकेट स्पर्धेत उपउपांत्य फेरीच्या लढतीत सुपर ओव्हरपर्यंत लांबलेल्या सामन्यात…

महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी दिलीप जगदाळे

कल्याण :महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी दिलीप जगदाळे नुकतेच रुजू झाले. ते भारतीय प्रशासन सेवेतील (आयएएस) अधिकारी असून राज्याच्या विविध भागातील प्रशासकीय कामाचा तब्बल ३३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी…

सौर उर्जा क्षेत्रात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची भरीव कामगिरी

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ.इंदुराणी जाखड यांच्या नेतृत्वाखाली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विद्युत विभागाने सौर उर्जा क्षेत्रात भरीव कामगिरी केलेली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या 10 प्रभाग क्षेत्र कार्यालयासाठी एकूण…

 ‘गो ग्रीन’ सेवेचा पर्याय निवडा व वीजबिलात एकरकमी 120 रुपये सूट मिळवा

 नवीन वर्षात महावितरणची ग्राहकांना भेट मुंबई : नूतन वर्षांची भेट म्हणून गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडल्यानंतर तत्काळ वीज बिलात एकरकमी  120 रुपये सूट देण्याची घोषणा महावितरणने  केली आहे. महावितरणकडून ‘कागद वाचवा, पर्यावरण वाचवा’ या संकल्पनेनुसार गो-ग्रीन सेवा राबविण्यात येत आहे. त्यानुसार यापूर्वी या योजनेअंतर्गत ग्राहकांना मासिक वीज बिलात 10 रुपये सूट देण्यात येते. मात्र आता यापुढे पहिल्याच बिलात पुढील बारा महिन्यासाठी तत्काळ 120 रूपये एकरकमी सवलत मिळणार आहे. ‘गो ग्रीन’ सेवेचा पर्याय निवडणाऱ् या ग्राहकांना महावितरणकडून दरमहा छापील कागदी बिला ऐवजी ई – मेल द्वारे वीज बिल पाठविण्यात येते. शिवाय गो ग्रीन ग्राहकांना मासिक वीज बिलात 10 रुपये सूट देण्यात येते. महावितरणने गो ग्रीन ग्राहकांसाठी हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता यापुढे गो ग्रीन सेवा निवडणाऱ्या ग्राहकांना दरमहा ऐवजी पहिल्याच महिन्यातील वीज बिलात एकरकमी 120 रुपये सूट देण्यात येणार आहे. महावितरणच्या 3 कोटी लघुदाब ग्राहकांपैकी अद्यापपर्यंत 4 लाख 62 हजार म्हणजेच 1.15 टक्के ग्राहकांनी गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडला आहे. भविष्यात हे प्रमाण वाढावे, या हेतूने महावितरणने गो ग्रीन पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना वीजबिलात तत्काळपणे 120 रुपये  एकरकमी सुट देण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व नोंदणीकृत वीज ग्राहकांना महावितरणकडून गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडण्यासाठी एसएमएस पाठविण्यात येणार आहे. गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडल्यानंतर तत्काळ वीज बिलात एकरकमी 120 रुपये सूट देण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील वर्षभर व सेवेसाठी नोंदणी रद्द करेपर्यंत नोंदणीकृत ई-मेलवर वीज बिल पाठविण्यात येणार असून त्यापुढे दरमहा वीज बिलात 10 रुपये सूट देण्यात येणार आहे.  ग्राहकांनी या योजनेचा लाभ  घेण्याचे महावितरणने आवाहन केले आहे. गो ग्रीन सुविधेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळाला भेट द्या व गो ग्रीन चा पर्याय निवडा. 000000