Category: देश

National-News

इस्रायलमध्येही चालणार भारताचा युपीआय पेमेंट

नवी दिल्ली : भारताचा युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) इस्रायलमध्येही सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दोन दिवसीय इस्रायल दौऱ्यात हा करार करण्यात आला आहे. या दौऱ्यात भारत आणि इस्रायलदरम्यान अनेक महत्त्वाचे करार करण्यात आले. हा…

 महाराष्ट्र उप उपांत्य फेरीत दाखल

७२वी वरिष्ठ पुरुष गट कबड्डी स्पर्धा, बडोदरा, गुजरात – २०२६. महाराष्ट्र उप उपांत्य फेरीत दाखल वडोदरा:- महाराष्ट्राने “७२व्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत” उपउपांत्य फेरी गाठली. उपउपांत्य फेरीत महाराष्ट्राची…

इस्रायलच्या संसदेतही मोदी…मोदीच्या घोषणा

इस्रायलच्या संसदेतही मोदी…मोदीच्या घोषणा तेलअविव : इस्त्रालयच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी इस्रायलच्या संसदेतील (क्नेस्सेट) सभागृहाला संबोधित केले. आपल्या भाषणात त्यांनी भारत–इस्रायल संबंध अधिक दृढ करण्याचा विश्वास व्यक्त केला. “भारत आता आणि भविष्यातही…

ऑपरेशन सिंधुरमध्ये पाकचे पंतप्रधान ठार झाले असते ?

ऑपरेशन सिंधुरमध्ये पाकचे पंतप्रधान ठार झाले असते ? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्पचा दावा न्यूयॉर्क : मी नसतो, तर पाकिस्तान आणि भारत यांच्यात अणुयुद्ध झाले असते, जर मी हस्तक्षेप केला नसता तर ऑपरेशन सिंदुरदरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान मारले गेले…

अजित दादांच्या मृत्यूस कारणीभूत व्हिएसआरच्या विमानांस उड्डाण बंदी

अजित दादांच्या मृत्यूस कारणीभूत व्हिएसआरच्या विमानांस उड्डाण बंदी  रोहीत पवारांनी पहिली लढाई जिंकली.0 चार लिअरजेट विमानांच्या उड्डाणांना बंदी नवी दिल्ली : अजित पवार यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या व्हिएसआरच्या विमानांना केंद्र सरकाराने दणका दिला आहे.…

केरळ नव्हे आता केरळम म्हणा !

केरळ नव्हे आता केरळम म्हणा ! नवी दिल्ली : भारताच्या दक्षिणेकडील केरळ राज्याला आता यापुढे केरळम म्हणावे लागणार आहे. केळरचे नाव बदलून ‘केरळम्’ करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात…

५० टक्के आरक्षण ओलांडलेल्या झेडपीच्या निवडणूक लांबणीवर

नवी दिल्ली : राज्यातील ५० टक्के आरक्षण मर्यादा ओलंडलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घेण्यास सुप्रीम कोर्टानं मनाई केली आहे. राज्यात आता २२ जिल्हा परिषदा आणि त्यांअतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या निवडणुका प्रलंबित राहणार आहेत. महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य…

 नगरपालिका आणि महापालिकांना केंद्र शासन देत असलेल्या निधीचे सुक्ष्म निरीक्षण करा- नरेश म्हस्के

नगरपालिका आणि महापालिकांना केंद्र शासन देत असलेल्या निधीचे सुक्ष्म निरीक्षण करा- नरेश म्हस्के केंद्रीय स्थायी समितीच्या बैठकीत विविध विषयांवर खासदार नरेश म्हस्के यांच्या महत्वपूर्ण सूचना नवी दिल्ली – शहरांच्या सर्वांगिण विकासासाठी केंद्र शासन हे नगरपालिका आणि महापालिकांना विविध योजनांच्या माध्यमातून भरीव निधी देत आहे. या योजनांच्या निधीचा सुक्ष्म अभ्यास करुन त्याची योग्य अंमलबाजावणी करणे अत्यंत गरजेची असल्याची बाब आज खासदार नरेश म्हस्के यांनी शहरी नगरविकास आणि गृहनिर्माण विषयक स्थायी समितीच्या बैठकीत व्यक्त केली. तसेच पीएम स्वनिधी योजनेचे योग्य निरीक्षण, पंतप्रधान आवास योजनेला गती देणे, पीएम ई बसेसचे नियम शिथिल करणे, पर्यटन आणि गर्दीच्या ठिकाणी सार्वजनिक शौचालयांची निर्मिती करणे, समुद्र आणि नदीच्या ड्रेनेज यंत्रणेसाठी विशेष अनुदान देणे अशा महत्वपूर्ण विषयांवर खासदार नरेश म्हस्के यांनी बैठकीत सूचना करुन शिफारशी केल्या.  नवी दिल्लीतील संसद भवनात आज शहरी नगर विकास आणि गृहनिर्माण विषयक स्थायी समितीची बैठक चेअरमन उंगाठा श्रीनिवास रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.   या बैठकीत सन २०२६-२०२७ च्या अर्थसंकल्पातील अनुदानाचे परिक्षण, चर्चा करण्यात आली. यावेळी या समितीचे सदस्य म्हणून खासदार नरेश म्हस्के यांनी चर्चेत भाग घेतला. केंद्र शासन नगरपालिका आणि महानगरपालिकांसाठी करोडो रुपयांचा निधी देत आहे. पालिकांच्या माध्यामातून शहरांचा योग्य दिशेने विकास होणे गरजेचे आहे. याचसाठी दिलेल्या निधीवर केंद्राची देखरेख असणे आवश्यक असल्याचे बैठकीच्या प्रारंभी खासदार नरेश म्हस्के यांनी निदर्शनास आणून दिले. देशातील फेरीवाल्यांसाठी केंद्र शासनाने पीएम स्वनिधी योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यामातून करोडो रुपयांचा निधी केंद्र शासन खर्च करत आहे. मात्र देशांतील पालिका ही योजना सुक्ष्मपणे राबवत नसल्याने त्याचा काही जण गैरफायदा घेत आहेत. बांगलादेशी फेरीवाल्यांचा यात प्रामुख्याने भरणा असणे ही चिंतेची बाब आहे. या योजनेचा लाभ बांगला देशी फेरीवाल्यांना मिळणार नाही यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. पालिकांनी फक्त उद्देश पूर्ण करण्यासाठी ही योजना राबवू नये, पालिकेच्या अधिकाऱ्यांनी योग्य लाभार्थ्याला त्याचा लाभ कसा मिळेल यासाठी प्रयत्न करायला हवा, अशी सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी केली. खासदार हेमा मालिनी, खासदार रवींद्र वायकर, खासदार मेधा कुलकर्णा आणि देशातील सर्व पक्षीय खासदारांनी या सूचनेचे स्वागत करत पाठिंबा दिला. प्रदुषणमुक्त आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने पीएम ई बस योजना सुरु केली आहे. मात्र जाचक अटींमुळे काही पालिकांना या योजनेचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे या योजनेतील अटी शिथील करण्याची सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी केली.   सागरी, नदी आणि खाडी किनारी असलेल्या मुंबई व ठाणे व देशातील इतर शहरांतील ड्रेनेज व्यवस्था मजबुतीकरासाठी विशेष अनुदान देण्याची मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी बैठकीत केली. आज देशातील पर्यटन वाढत आहे. पर्यटन व गर्दीच्या ठिकाणी सार्वजनिक शौचालय सुविधा असणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी एक मॉडेल तयार करुन देशाअंतर्गत ती राबविण्याची सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी केली.  शहरांचा विकास झपाट्याने होत आहे. मात्र सार्वजनिक कामांसाठी जमिनी कमी पडत आहेत. या जमिनी अधिग्रहण करण्यासाठी राज्य शासन, नगरपालिका मागे पडत आहेत. या जमिनी अधिग्रहणासाठी पाठपुरावा आवश्यक असल्याचे खासदार नरेश म्हस्के म्हणाले. पंतप्रधान आवास योजने अंतर्गत आतापर्यंत देशात ९७.२० लाख घरांची निर्मिती झालेली आहे. मात्र अद्याप १८ लाख घरांची निर्मिती होणे बाकी असून ती पूर्ण करण्यासाठी तातडीने केंद्राने पावले उचलण्याची गरज आहे. तसेच कामगारांच्या रेटल हाऊसिंग योजनेची कामे गतीने सुरु करण्याची सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी केली.…

खळबळजनक : ब्रिटनचे राजपुत्र अँड्र्यूंना अटक

 जेफ्री एपस्टीन प्रकरणात केली अटक ० लहान मुलींच्या लैंगिक शोषणप्रकरणी अटक इंग्लंड : बाल लैंगिक शोषणाच्या विकृतीचा मास्टरमाईंड जेफ्री एपस्टीन याच्याशी कथित संबंधांच्या पार्श्वभूमीवर ब्रिटिश राजघराण्याचे सदस्य राजपुत्र अँड्र्यू यांना लंडनमध्ये ब्रिटिश पोलिस यांनी अटक केल्याने एकच खळबळ उडाली…

मेक इन इंडियाचा ‘कुत्रा’ अखेर चायनाचा निघाला !

नवी दिल्ली : जगभराला नादावलेल्या आर्टीफिशिएल टेक्नॉलॉजी म्हणजेच एआयच्या नवी दिल्लीत सुरू असलेल्या  समिटमध्ये आज एका कुत्र्यावरून वाद उद्भवला. मेक इन इंडियाचे प्रॉडक्टम्हणून या समिटमध्ये भारतीय युनिव्हर्सिटी नोएडाच्या गलगोटियाने दावा केलेला रोबॅटिक कुत्रा हा मुळ चायनिज बनावटीचा…