Category: पालघर

palghar news

शिंदे सरकारच्या कार्यकर्त्याचा आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थित भाजपात प्रवेश

मुरबाड प्रतिनिधी (राजीव चंदने ) मुरबाड विधानसभेचे बिगूल वाजताच काही दिवस शिल्लक असल्याने राजकीय पक्षात कार्यकर्त्यांची  इनकमिंग, आणि आऊट गोईंग  सुरु झाली असून . मुरबाड विधानसभा क्षेत्राचे कार्यसम्राट आमदार किसन कथोरे यांच्या विकास कामांवर प्रभावित होऊन मागच्या आठवड्यातच टोकावडे व परिसरातील एक मोठा गट कथोरेंच्या उपस्थितीत भाजपात दाखल झाला आहे. त्यानंतर आज कथोरे यांच्या मुरबाड येथील निवास स्थानी तालुक्यातील मौजै मानिवली (गों) व मुरबाड शेजारील देवलार वाडी येथिल  ग्रामस्थांनी आमदार किसन कथोरेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. यावेळी प्रवेश घेतलेल्या कार्यकर्तांचे आमदार कथोरे यांनी स्वागत करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. देवलार वाडीच्या कार्यकर्ताना आणण्यासाठी सुरज कोळेकर , मनोज कोळेकर यांनी मेहनत घेतली तर मानिवली येथिल संतोष पवार यांचे याकामी योगदान लाभले.

 गणेशोत्सवात गावी जाणाऱ्या नागरिकांसाठी मोफत बससेवा

डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या वतीने यंदाही डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्वासाठी गावी जाणाऱ्या भाविकांसाठी मोफत बससेवेचे आयोजन करण्यात आले होते.…

कल्याण-डोंबिवलीत गणेशोत्सव मंडळांच्या मनमानीने प्रवासी हैराण

डोंबिवली : कल्याण, डोंबिवलीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे संध्याकाळी नोकरदार वर्ग घरी परतण्याच्या वेळी गणपती आगमन मिरवणुका ढोल ताशांच्या गजरात काढत असल्याने या संथगती मिरवणुकांमुळे काही दिवसांपासून कल्याण, डोंबिवली शहरे सकाळ,…

ठाकरे गटाचा मुरबाड तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा

राजीव चंदने मुरबाड :  तालुक्यातील शासकीय कार्यालयांमध्ये जनतेची कामे होत नसल्याने मुरबाडच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तालुका संपर्क प्रमुख संतोष जाधव यांच्या संकल्पनेतून तालुका प्रशासकीय प्रमुख म्हणून मुरबाड तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हा संपर्क प्रमुखरुपेश म्हात्रे, उपनेत्या ज्योती ठाकरे, उपनेते अल्ताफ शेख,हे मोर्चाच्या अग्रस्थानी होते. महिला व मुलींबाबतच्या प्रश्नांसह मुरबाड तालुक्यातील कृषी विभाग, महसूल विभाग, पंचायत समिती,आरोग्य, सार्वजनिक बांधकाम विभाग,फॉरेस्ट, विद्युत कंपनी, औद्योगिक महामंडळ, भूमी अभिलेख, दुय्यम निबंधक, नगरपंचायत इ. कार्यालया संदर्भातील विविध जनहितार्थ मुरबाडच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे, सेनेकडून शुक्रवारी जनआक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी रुपेश म्हात्रे यांनी घोषणाबाजी करत तहसील कार्यालयावर धडक दिली.

बोगस शिल्पकार जयदीप आपटेवर  देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

काँग्रेस तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार यांची मागणी राजीव चंदने   मुरबाड : मुरबाड कॉँग्रेस कमिटीच्यावतीने   राज्यपाल यांना मुरबाड  तहसिलदार यांच्या मार्फत शिवद्रोही सरकार मधील भ्रष्ट्राचाराचे शिरोमणीं व खोटा शिल्पकार जयदीप आपटे वर देशद्रोहाची कार्यवाही करावी अश्या आशयाचे निवेदन मुरबाड कॉंग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार यांच्या नेतृत्वात व किसान कॉंग्रेसचे प्रदेश सचिव तुकाराम ठाकरे, युवक तालुकाध्यक्ष धनाजी बांगर, महिला तालुकाध्यक्ष संध्या कदम, तालुका सचिव भगवान तारमळे, विभागप्रमुख खोपिवली वसंत कराळे, ओबीसी तालुकाउपाध्यक्ष प्रकाश पवार,  युवक तालुकाउपाध्यक्ष अमोल चोरघे, तालुका पदाधिकारी दिलीप ठाकरे, समीर कराळे आदीं पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थित दिले.  राज्यातल्या महाभ्रष्ट युती सरकारने राज्याला काळीमा फासण्याचा विडाच उचलला आहे त्याचा परिपाक म्हणजे राज्यात सुरु असलेला प्रचंड भ्रष्टाचार  आहे. त्याअनुषंगाणे कमिशन द्या आणि टेंडर घ्या हे एकच धोरण राज्यात सुरु असुन शिवद्रोही युती सरकारच्या कमीशनखोरीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला ही सोडले नाही असे प्रतिपादन तुकाराम ठाकरे यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करून प्रत्येक निवडणुकीत मते मागणा-या शिवद्रोही भाजपा शिंदे सरकारने त्यांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार करून महाराजांचा मोठा अवमान केला आहे,या विरोधात राज्यभरातील जनतेच्या मनामध्ये प्रचंड संताप त्याचा निषेध म्हणुन शिवद्रोही सरकार मधील भ्रष्ट्राचाराचे शिरोमणीं व बोगस शिल्पकार जयदीप आपटे वर देशद्रोहाची कार्यवाही तात्काळ करावी ही मागणी तमाम मुरबाडवासींयाच्या वतीने चेतनसिंह पवार यांनी केली. 000

ठाकरे गटाचा मुरबाड तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा

राजीव चंदने मुरबाड :  तालुक्यातील शासकीय कार्यालयांमध्ये जनतेची कामे होत नसल्याने मुरबाडच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तालुका संपर्क प्रमुख संतोष जाधव यांच्या संकल्पनेतून तालुका प्रशासकीय प्रमुख म्हणून मुरबाड तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हा संपर्क प्रमुखरुपेश म्हात्रे, उपनेत्या ज्योती ठाकरे, उपनेते अल्ताफ शेख,हे मोर्चाच्या अग्रस्थानी होते. महिला व मुलींबाबतच्या प्रश्नांसह मुरबाड तालुक्यातील कृषी विभाग, महसूल विभाग, पंचायत समिती,आरोग्य, सार्वजनिक बांधकाम विभाग,फॉरेस्ट, विद्युत कंपनी, औद्योगिक महामंडळ, भूमी अभिलेख, दुय्यम निबंधक, नगरपंचायत इ. कार्यालया संदर्भातील विविध जनहितार्थ मुरबाडच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे, सेनेकडून शुक्रवारी जनआक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी रुपेश म्हात्रे यांनी घोषणाबाजी करत तहसील कार्यालयावर धडक दिली. 00000

मुरबाड तहसील कार्यालयावर शिवसेनेचा जनआक्रोश मोर्चा

मुरबाड: तालुक्यातील शासकीय कार्यालयांमध्ये सामान्य जनतेची कामे होत नसल्याने मुरबाडच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मुरबाड तालुका संपर्क प्रमुख संतोष जाधव यांच्या नेतृत्वाखाली तालुका प्रशासकीय प्रमुख म्हणून मुरबाड तहसील…

जळगावच्या १४ भाविकांचा नेपाळमधिल अपघातात मृत्यू

जळगाव : जळगावच्या १४ भाविकांचा नेपाळमध्ये झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील ४० पर्यटकांसह निघालेली प्रवासी बस नदीपात्रात कोसळून नेपाळमध्ये ही भीषण दुर्घटना घडली आहे. हे सर्व भाविक भुसावळचे आहे. यामध्ये ३१ जण जखमी…

अल्पवयीन शालेय विध्यार्थीनींच्या लैंगिक अत्याचारा निषेधार्थ मुरबाडमध्ये आक्रोश मोर्चा

राजीव चंदने   मुरबाड : बदलापूर शहरातील आदर्श विदयालयातील विध्यार्थीनींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ मुरबाड मध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आले होते. बदलापूर येथील तीन वर्षाच्या अल्पवयीन विध्यार्थीनींवर त्याच शाळेतील सफाई कर्मचारी अक्षय शिंदे या नराधमाने लैंगिक शोषण करून अत्याचार केल्याची घटना 13 ऑगस्ट रोजी घडली होती. ह्या घटनेच्या निषेधार्थ मुरबाड शहरातील विदयालय महाविद्यालय जि. प. शाळेतील विध्यार्थी, शिक्षक, व पालक नागरिकांनी माजी नगराध्यक्ष रामचंद्र दुधाळे यांच्या नेतृत्वाखाली तीन हात नाका ते छ. शिवाजी महाराज चौकापर्यंत जनआक्रोश आंदोलन करून निषेध व्यक्त केला. या क्रूर घटनेचा संताप व्यक्त करत मुरबाड मधून विविध सामाजिक, राजकीय, संघटना व तालुक्यातील पत्रकार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी  मुरबाड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांची भेट घेऊन निवेदने दिले. या अत्याचार घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे,दरम्यान या घटनेचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या महिला पत्रकारा सोबत बदलापूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी गलिच्छ व अपशब्दाचा वापर केल्याचा हि निषेध व्यक्त केला आहे. तसेच मुरबाड शहरातील खासगी व मोठ्या शाळांमधील सफाई कर्मचारी, स्कुल बस, वाहन चालक, त्यांचे मदतनीस, वॉचमन यांची ओळखपत्रे संबंधित शाळांकडून मागवून तथा अशा दुर्दैवी घटना टाळण्याकरिता संबंधित शाळांना भेट देण्याबाबत नमूद केले आहे.

महिलांना मोफत हेल्मेट वाटप

मुरबाड : मुरबाड नगर पंचायतीचे नगराध्यक्ष मुकेश विशे यांच्यातर्फे स्वातंत्र्यदिनी १३० महिलांना मोफत हेल्मेट वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मुरबाडचे आमदार किसन कथोरे उपस्थित होते. मुरबाड शहरातील…