Category: पालघर

palghar news

पालघर लोकसभेसाठी शेवटच्या दिवसापर्यंत १७ उमेदवारांचे २६ नामनिर्दशनपत्र दाखल – गोविंद बोडके

पालघर : २२- पालघर  लोकसभा मतदार संघासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण ९ उमेदवारांनी १३ नामनिर्देशन पत्र दाखल केले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद बोडके यांनी दिली.* ३ मे २०२४ रोजी बळीराम सुकर जाधव (बहुजन विकास आघाडी),यांनी १ अर्ज, परेश सुकर घाटाळ (बहुजन महापार्टी आणि अपक्ष ), यांनी २ अर्ज, हेमंत विष्णू सवरा (भारतीय जनता पक्ष) यांनी ३ अर्ज, कल्पेश बाळू भावर (अपक्ष), यांनी १ अर्ज, राजेश रघुनाथ पाटील (बहुजन विकास आघाडी), यांनी २ अर्ज, राजेश दत्तू उमतोल (अपक्ष), यांनी १ अर्ज,भरत सामजी वनगा(बहुजन समाज पार्टी), यांनी १ अर्ज,अमर किसन कवळे, (अपक्ष) १ अर्ज, भावना किसन पवार (अपक्ष) १ अर्ज उमेदवारांनी आज नामनिर्देशन पत्र दाखल केले. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसा पर्यंत एकूण १७ उमेदवारांनी २६ नामनिर्दशनपत्र दाखल केले.अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद बोडके यांनी दिली.

उष्णता वाढली आहे, नागरिकांनी काळजी घ्यावी जिल्हाधिकारी गोविंद बोडके

अशोक गायकवाड पालघर : उष्माघात आणि त्याच्यापासून स्वत:चा आणि आपल्या कुटुंबाचा बचाव करण्यासाठी काय काळजी घ्यावी याबाबत माहितीपत्रकाची प्रसिध्दी करण्यात आली. तसेच नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आरोग्य यंत्रणांना सज्ज ठेवण्याबाबत सुचित…

पाणी टंचाई मुळे फणसोली गावच्या महिला आक्रमक

लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा राजीव चंदने मुरबाड : मुरबाड तालुक्यात अनेक वाडया पाड्यामधे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहॆ, त्यामुळे महिलांना पाण्यासाठी वन वन करावी लागत असून त्यामुळे महिलांमधे…

जनसेवा रुग्णवाहिचे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते लोकार्पण

राजीव चंदने मुरबाड : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यंच्या 133 व्या जयंती दिनाचे औचित्य साधून अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस अण्णा साळवे यांनी गोर गरीब जनतेच्या सेवेसाठी  रुग्णवाहीका देऊन, त्या जनसेवा रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा आमदार किसन कथोरे यांच्या शुभहस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ करण्यात आला.यावेळी आमदार किसन कथोरे यांनी अण्णा साळवे यांचे विशेष कौतुक करत पाठीवर शाबासकीची थाप मारली. यावेळी आमदार कथोरे म्हणाले कि,मी अण्णाच्या मागे नाही तर अण्णा कायम सोबत आणि बरोबर आहे. या रुग्ण वाहिकेचा सर्व सामान्य गोर गरीब जनतेसाठी उपयोग झाला पहिजे असे बोलून अण्णा साळवे यांना आशीर्वाद देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या लोकार्पण सोहळ्यासाठी नगराध्यक्ष मुकेश विशे, सरचिटणीस नितीन मोहपे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुरेश बांगर, नगरपंचायत मुख्याधिकारी मनोज म्हसे, मोहन सासे,कांतीलाल कंटे,रवींद्र चंदने,रिपई प्रदेश उपाध्यक्ष महबूब पैठणकर, मुरबाड पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर,दीपक पवार, ऍड सचिन चौधरी, गुरुनाथ पवार, सुवर्णा देसले,दीपक खाटेघरे,कैलास देसले,शिवराम पवार, प्रकाश जाधव,नरेश देसले,नरेश मोरे, धनंजय थोरात, रवींद्र गायकवाड,यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.या शुभ प्रसंगी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांना समता सामाजिक फाऊंडेशनचे शंकर करडे, संजय बोरगे, लक्ष्मण पवार, दिलीप पवार, सुभाष जाधव यांच्या वतीने पेढे व पेन चे वाटप करण्यात आले.

जिजाऊ संघटनेचे कार्य शेवटच्या घटकांपर्यंत पोहचवा – निलेश सांबरे

वाडा : ठाणे, पालघर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण कोकणात गेल्या 15 वर्षात जिजाऊ या संघटनेने सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात केलेले उल्लेखनीय कार्य भिवंडी लोकसभा मतदारसंघातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचवा व या कामाला अधिक…

वाडा ग्रामीण रुग्णालयात फळवाटप

वाडा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती आज (ता. १४) वाडा तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भाजप वाडा तालुका शाखेच्या वतीने वाडा ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटण्यात आली. वाडा येथील भाजपच्या जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात डॉ.. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते बाबाजी काठोळे, विक्रमगड विधानसभा निवडणूकप्रमुख डॉ.. हेमंत सवरा, जिल्हा उपाध्यक्ष संदीप पवार, नरेश आक्रे, तालुकाध्यक्ष मंगेश पाटील, सरचिटणीस रोहन पाटील, कुणाल साळवी, हर्षल खांबेकर, प्रसाद सोनटक्के, राम भोईर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुडूस नाका येथेही जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. घोणसई ग्रामपंचायतीत सरपंच शैला जाबर, उपसरपंच दिलीप पाटील यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

बोगस डिग्री ते नकली शिवसेना

उद्धव ठाकरेंकडून मोदींचा हिशेब चुकता पालघर :  शिवसेनाला नकली म्हणता ती काय तुमची बोगस डिग्री आहे का? माझ्या मर्दमराठा मावळ्यांच्या घामातून उभी राहीलेली शंभरनंबरी असली शिवसेना आहे. नकलीचा सोस तुम्हाला , तुमची डीग्री…

पालघरमध्ये महायुतीत तिढा कायम

 मनधरणीसाठी नेत्यांची दमछाक पालघर : लोकसभा निवडणुका जाहीर होउ न वीस दिवसांचा कालावधी लोटला आहे. राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीचे जागा वाटप आणि उ मेदवार निश्चित करण्याच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात आहे. पालघर लोकसभेसाठी आघाडीने शिवसेना उ बाठाचे उ मेदवार घोषीत केले आहे. मात्र, महायुतीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या हट्टामुळे शिवसेनेला ही जागा भाजपला सोडण्याची नामुष्की आली आहे. मात्र, उमेदवारीवरून अजुनही खल मिटलेला नाही. उमेदवारी वरून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मनधरणीसाठी नेत्यांना वारंवार बैठका घ्याव्या लागतं आहेत. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे सुरं जुळलेले नाही. त्यासाठी नेत्यांची दमछाक झाली आहे. मागील निवडणुकीत पालघर लोकसभेतुन शिवसेनेचे राजेंद्र गावीत निवडुन आले होते. यावेळी ही जागा भाजप ला मिळावी म्हणून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आग्रहाची मागणी लावुन धरली. अखेर, मोठा खल आणि वाटाघाटी करून शिवसेनेला पालघर ची जागा भाजप ला सोडण्याची नामुष्की आली. मात्र, उमेदवारी वरून अजुनही युती चे घोडे आडले आहे. एकीकडे राज्यात युती आणि आघाडीचे उमेदवार निश्चितीचा तिढा अंतिम टप्प्यात आला आहे. परंतु पालघर च्या उ मेदवारी चा तिढा अजुनही सुटलेला नाही. भाजप पालघर जिल्हाध्यक्ष भरत रजपूत यांनी पालघर ची जागा भाजप ला मिळावी तसेच खासदार राजेंद्र गावीतांच्या उमेदवारी ला प्रखर विरोध करत आपली बाजु माध्यमांकडे जाहीरपणे मांडली आहे. त्यामुळे महायुतीतील वाद उफाळून आला. दुसरीकडे वसई- विरारमधील भाजप पदाधिकार्यांनी देखील राजेंद्र गावीतांच्या उमेदवारी ला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे युतीतील वाद चव्हाट्यावर आला आहे. हा वाद शमविण्यासाठी युतीच्या नेत्यांना ठिक ठिकाणी बैठका घ्याव्या लागल्या आहेत. त्यानंतर मनोर येथे भाजप नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यासह युतीच्या प्रमुख नेत्यांना मनोमिलन बैठक घ्यावी लागली आहे. मात्र, या बैठकीतही भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजेंद्र गावीत यांच्या उमेदवारी विरोधात सुरं आळवला आहे. अखेर, नेत्यांना कार्यकर्त्याची मनधरणी करण्यात अपयशच आले आहे. काही दिवसांवर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत येउ न ठेपली आहे. मात्र, युतीचा उमेदवारीचा तिढा कायम असल्याने, महायुतीच्या नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हट्टहास करून पालघर ची जागा शिवसेनेकडून मिळवली. त्यानंतर शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावीत यांनाच पुन्हा नव्याने भाजप कडून उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू झाल्या. त्यासाठी गावीतांनी देखील भाजपच्या वरिष्ठांकडे धावाधाव केली आहे. ही बाब लक्षात आल्याने भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा गावीतांच्या उ मेदवारी ला अधिकच विरोध वाढला आहे. अखेर, मनोरच्या बैठकीत युतीच्या नेत्यांना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मनधरणीसाठी ” पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच उ मेदवार समजून, एक दिलाने कामाला लागण्याचे केविलवाणे आवाहन करावे लागले आहे. मात्र, तरीही गावीतांच्या उमेदवारी ला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा विरोधच राहिला आहे.

सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशीही दुय्यम निबंधक कार्यालये सुरू

विरार : मार्चअखेरीस येणाऱ्या गुड फ्रायडे (ता. २९) पासून रविवार (ता. ३१)पर्यंत सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशीही पालघर जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक व सह दुय्यम निबंधक कार्यालये दस्त नोंदणीसाठी सुरू ठेवण्याचा निर्णय…