Category: पालघर

palghar news

डोंबिवलीत नवापाडा येथे बेकायदा इमारतीत भूमाफियाकडून सव्वा दोन लाखाची पाणी चोरी

डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील सुभाष रस्त्यावरील ह प्रभाग हद्दीत मारूती मंदिरा जवळ एका भूमाफियाने सात माळ्याची शिवनाथ कृपा नावाने बेकायदा इमारत चार वर्षापूर्वी उभारली. या इमारतीत निवास आणि पहिल्या माळ्यावर…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या…

५१० पटसंख्या असलेल्या कन्या शाळेत पिण्याचे पाणी, स्वच्छता गृहाची समस्या सुटणार केव्हा ?

राजीव चंदने     मुरबाड : शहरातील ऐतिहासिक प्राथमिक जि.प. मुलींची शाळा, अर्थात कन्या शाळा म्हणुन ओळख असलेल्या शाळेत ५१० विद्यार्थी शिक्षण घेत असताना त्या शाळेत गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याचे…

डोंबिवली ‘एमआयडीसी’त बेकायदा बांधकामांचा सुळसुळाट

डोंबिवली : बेकायदा बांधकामांचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवलीत महाराष्ट्र औद्याोगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) क्षेत्रही सुटलेले नाही. फेज दोनमधील औद्याोगिक तसेच अन्य सेवासुविधांसाठी आरक्षित असलेल्या ८९ एकर (३६.११ हेक्टर) जमिनी…

भावी लाडकी बहीण शिक्षणासाठी जीव मुठीत घेऊन ओलांडतेय नदी

जव्हार : जव्हार व विक्रमगड तालुक्यांच्या हद्दीवर असलेल्या जिल्हा परिषद शाळा तलवाडा महालपाडा येथे विद्यार्थी व गावपाड्यातील नागरिकांना जाण्यासाठी पावसाळ्यात रस्ता नाही. परिणामी त्यांना नदीवरील कच्च्या लाकडी पुलावरून जीव धोक्यात…

ठाणे जिल्ह्याचे प्रतिपंढरपूर असलेले शहाड बिर्ला विठ्ठल मंदीर भक्तांनी दुमदुमले

उल्हासनगर :ठाणे जिल्ह्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेले शहाड बिर्ला विठ्ठल मंदिरात विठ्ठल भक्तांनी एकच गर्दी केली होती. सकाळी कल्याणचे उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर यांनी सहपत्नी मंदिराची पूजा केल्यानंतर विठ्ठल भक्तांना…

उल्हासनगर महापालिकेत अभय योजना आणि लोकअदालतीचे आयोजन

उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिकेत २२ जुलै ते २६ जुलै रोजी मालमत्ता कर वरील शंभर टक्के दंड माफ करण्यासाठी अभय योजना तसेच  २७ जुलै रोजी राष्ट्रीय लोकअदालत आयोजन करण्यात आले असून जास्तीत…

 कल्याण-मुरबाड राष्ट्रीय महामार्गाच्या संथ कामावर रिपाइं आक्रमक

आंदोलनाचा इशारा राजीव चंदने     मुरबाड : मुरबाड कल्याण राष्ट्रीय महामार्गाच्या संथरित्या सुरू असलेल्या चौपदरीकरण कामामुळे ऐन पावसाळ्यात निर्माण झालेल्या दयनीय अवस्थेला प्रवाशांसह सामान्य नागरिक देखील हैराण झाले असून याविरोधात रिपाइं सेक्युलर पक्षाने विविध मागण्यांचे पत्र दिले आहे. महामार्ग खोदून ठेऊन दोन्ही बाजूने केवळ गटाराची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असून यामुळे रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विलंबाने प्रवास करावा लागतो. खाजगी चारचाकी – दुचाकी धारकांना रात्री अपरात्री प्रवास करताना पावसात रस्त्यावरील भरावाचा अंदाज न आल्याने अपघाताला सामोरे जावे लागत आहे. आतापर्यंत ज्या अंतरापर्यंत रस्ता उखडून ठेवला आहे, त्या गावापर्यंत रस्ता पूर्ण केल्याशिवाय पुढील रस्ता खोदून ठेवू नये, आज पर्यंत या रस्त्यावर झालेल्या अपघाताची जबाबदारी संबंधीत ठेकेदारानी घेऊन अपघात पीडितांना नुकसान भरपाई द्यावी, मुरबाड तालुक्याच्या हद्दीतील बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या जागेचा मोबदला दिल्या शिवाय काम सुरू करू नये, मुरबाड शहरालगत रस्त्याच्या कडेला बसून व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यवसायीकांना दिवाळी पर्यंत उठवू नये अशा विविध मागण्यांचे निवेदन आंबेडकरी नेते श्यामदादा गायकवाड यांच्या रिपाई सेक्युलर पक्षाच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग ६१ च्या सहाय्यक कार्यकारी अभियंता यांच्या हस्ते देण्यात आले असून याप्रकरणी गांभीर्यपूर्वक निर्णय न घेतल्यास ठाणे जिल्हाध्यक्ष रविंद्र चंदने यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचा ईशारा देण्यात आला आहे. तर प्रवासी व चालक यांच्या व्यथा महामार्ग प्रशासनाच्या दरबारी मांडण्यात आल्याने पुढील कार्यवाहीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 00000

 जलवाहिन्या सांडपाण्याच्या नाल्यातून

 उल्हासनगरवासीयांचे आरोग्य धोक्यात   उल्हासनगर –  शहरवासीयांना मुबलक शुद्ध पाण्याचा पुरवठा होण्यासाठी ३५० कोटींची पाणी वितरण योजना महापालिकेने राबवूनही जलवाहिन्या सांडपाण्याच्या गटारीतून गेल्या आहेत. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. पुन्हा दुसऱ्या टप्प्यातील १२६ कोटीच्या पाणी पुरवठा वितरण योजनेला मुहूर्त मिळाला आहे. उल्हासनगरातील पाणी टंचाईची समस्या निकाली काढण्यासाठी ३५० कोटींची पाणी पुरवठा वितरण योजना काही वर्षांपूर्वी राबविली. या योजने अंतर्गत नवीन जलवाहिन्या टाकणे, प्रत्येक घराला नवीन ब्ल्यू पाईपचे नळजोडणी देणे, पाणी मीटर बसविणे, पाणी वितरणासाठी ११ उंच जलकुंभ व एक भूमिगत जलकुंभ उभारणे, पंपिंग स्टेशन आदींचा समावेश होता. मात्र या योजनेतून काही भाग सुटल्याने, दुसऱ्या टप्प्यातील १२६ कोटींची पाणी पुरवठा वितरण योजनेचे काम सुरू आले. मात्र अवघ्या १३ कि.मी. क्षेत्रफळाच्या शहरात पहिल्या टप्प्याची ३५० कोटींची पाणी पुरवठा वितरण योजना राबवूनही पाणी टंचाई, पाणी गळती, अनियमित पाणी पुरवठा आदी समस्या कायम आहे. कॅम्प नं-३ हिराघाट परिसर, शिरू चौक, सुभाष टेकडी परिसर, गायकवाड पाडा, गोलमैदान येथील राहुलनगर परिसर, शांतीनगर येथील डॉल्फिन हॉटेल परिसर, कॅम्प नं-४ येथील महादेवनगर, संतोषनगर, भीम कॉलनी, मद्रासीपाडा आदी विविध भागात प्रत्येकाच्या घरापर्यंत जलवाहिनी टाकण्यात आल्या नाहीत. त्यामुळे मुख्य जलवाहिनीवरून लांब पाईप टाकून नळजोडणी घेण्यात आल्या आहेत. गटारी, सांडपाण्याच्या नाल्यातून जाणाऱ्या या पाईपलाईनला गळती लागली असून अश्या गळक्या पाईप मधून नागरिकांना प्रदूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. अश्या प्रदूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. कोट्यवधींच्या योजना कोणासाठी नागरिकांना स्वच्छ, नियमित व मुबलक पाणी पुरवठा होण्यासाठी महापालिका केंद्राच्या अमृत योजने खाली कोट्यवधींचा पाणी पुरवठा वितरण योजना राबविते. मात्र त्याचा फायदा नागरिकांना होत नसल्याने, ह्या योजना कोणासाठी राबवितात. असा प्रश्न स्थानिक नागरिकांनी केला आहे.

शिवसेना शहप्रमुखाकडून आमदाराला कुंभकर्णाची उपमा

पाणी, वीज समस्येवरून विद्यमान आमदारांना अप्रत्यक्ष टोला     अंबरनाथः विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांना शहरातील विविध समस्यांवरून स्वपक्षियांच्याच टिकेला तोंड द्यावे लागत असल्याचे चित्र आहे. काही दिवसांपू्र्वी अंबरनाथच्या पाणी प्रश्नावरून आणि आता विजेच्या समस्येवरून अंबरनाथ शिवसेनेचे माजी शहप्रमुख अरविंद वाळेकर यांनी नाव न घेता १५ वर्षांच्या कुंभकर्णाला आम्ही जागा केला अशी आमदार किणीकर यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. त्यामुळे शिवसेनेच्या दोन्ही गटात सारे काही आलबेल नसल्याचे चित्र आहे. अंबरनाथ शहरावर गेल्या काही वर्षात शिवसेनेचे एकहाती वर्चस्व राहिले आहे. येथील नगर पालिका, आमदार आणि खासदारही शिवसेनेचे आहेत. शिवसेनेतील दुफळीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेच वर्चस्व शहरात पहायला मिळाले. मात्र शहरात गेल्या काही वर्षांपासून दोन गट उघडपणे एकमेकांवर कुरघोड्या करत असल्याचे दिसून येते आहे. गेल्या दोन आठवड्यात या कुरघोड्यांचे अनेक अंक पाहायला मिळाले. काही दिवसांपासून अंबरनाथ शहरात पाणी आणि वीजेच्या समस्येने डोके वर काढले होते. त्यावर शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष आणि शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला इशारा दिला होता. त्यानंतर प्राधिकरणाने वीज समस्येमुळे पाणी समस्या वाढल्याचे सांगितल्याने वाळेकरांनी महावितरणाकडे मोर्चा वळवला. त्यानंतर संयुक्त बैठकीनंत खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्यावर काही अंशी दिलासा मिळाला. त्यामुळे याचे श्रेय घेण्यासाठी वाळेकर यांनी शिवसेनेच्या वकीने फलकबाजी केली. त्याच वेळी नगरविकास विभागाने अमृत योजनेतून अंबरनाथसाठी पाणी योजना जाहीर केली. त्याची फलकबाजी आमदार डॉ. किणीकर यांनी केली. शहराच्या पूर्वेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तर एकाच पक्षाच्या या दोन गटाचे बॅनर झळकले होते. दोन्हींवर शिवसेनेच्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांचे फोटो होते. त्यामुळे पक्षातच दुफळी असल्याचे चित्र पुन्हा एकदा दिसून आले. याप्रकरणी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. नेमकी टीका काय ? काही जणांना आपण केल्यानंतर जाग येते. ती येणे गरजेचे आहे. लोकांना जागी करणे शिवसेना शहर शाखेचे काम आहे. कुंभकर्ण सहा महिने झोपायचा. इथे काही लोक पंधरा वर्ष झोपलेले होते. त्यांना शिवसैनिकांनी जागे केले. जाग आलेल्या त्या कुंभकर्णाचे आभार मानतो, अशी टीका वाळेकर यांनी मंगळवारी केली. त्यापूर्वी पाणी प्रश्नावर बोलताना, पाणी वाढवण्यासाठी काही वर्षांपूर्वी चिखलोलीचे पाणी मिळवले. मात्र पाच वर्ष धरणाची उंची वाढवण्याचे काम सुरू आहे. गाळ काढला, खर्च केला मात्र उंची काही वाढली नाही. उंची वाढवणे आणि लोकांना सुविधा देण्यासाठी सुरूवातीला स्वतच्या विचारांची उंची वाढवाली लागेल, असा टोला आमदार डॉ. किणीकर यांना लगावला होता.