Category: पालघर

palghar news

कल्याण नगर मार्गावरील शहाड पूलाला भगदाड;

कल्याणकडे येणाऱ्या मार्गिकेवरील वाहतूक बंद, प्रवाशांच्या त्रासात भर     उल्हासनगरः कल्याण शहराला कल्याण तालुक्यासह, मुरबाड, अहमदनगर जिल्ह्याला जोडण्यासाठी महत्वाच्या असलेल्या कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील शहाड पुलाला कल्याणकडे जाणाऱ्या मार्गिकेवर…

 उल्हासनगरात उभा राहतोय महाराष्ट्रातील दुसरा पशु दाहिणीचा प्रकल्प Slug – लहान-मोठ्या पशूंची क्षणात होणार राख

 लहान-मोठ्या पशूंची क्षणात होणार राख     उल्हासनगर – दोन वर्षांपूर्वी ड्रेनेजची साफसफाई करणाऱ्या रोबोटला गणतंत्र दिनाच्या चित्र रथावर स्थान मिळाल्याने महानगरपालिकेचे नाव राज्य पातळीवर गाजले होते. आता महाराष्ट्रातील दुसरा…

 बोगद्यातील पाण्याने प्रवासी त्रस्त

निळजे ते लोढा संकुल दरम्यानच्या   डोंबिवली : कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील निळजे गाव हद्दीत रेल्वे प्रशासनाने निळजे ते लोढा गृहसंकुल दरम्यान एक बोगदा नागरिकांना येण्या जाण्यासाठी बांधून दिला आहे. या बोगद्यात पाऊस सुरू झाल्यापासून पाणी तुंबत आहे. मुसळधार पाऊस असला की या बोगद्यात कंबरभर पाणी असते. त्यामुळे निळजे गावातील ग्रामस्थ, विद्यार्थी, महिलांचे हाल होत आहेत. निळजे गावातील ग्रामस्थांचे बहुतांशी व्यवहार लोढा गृहसंकुल भागात आहेत. या गावातील बहुतांशी मुले लोढा गृहसंकुल परिसरातील शाळांमध्ये, खासगी शिकवणीसाठी, तसेच रहिवासी बाजारपेठेसाठी याच भागात जातात. मध्य रेल्वेने निळजे गावाजवळील लोढा गृहसंकुलकडे जाणारे रेल्वे फाटक दोन महिन्यापूर्वी बंद केले. हे फाटक बंद करण्यापूर्वी फाटक भागात भुयारी मार्ग बांधून देण्याची मागणी निळजे ग्रामस्थांनी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे केली होती. अधिकाऱ्यांनी ती मागणी मान्य केली होती. परंतु, एक दिवस रेल्वेने निळजे गावाजवळील रेल्वे फाटक ग्रामस्थांच्या भुयारी मार्गाची पूर्तता न करता रेल्वेने बंद केले. निळजे गावातून रेल्वे फाटकातून गेले की लोढा हेवन गृहसंकुल कमी अंतरावर होते. त्यामुळे ग्रामस्थ याच मार्गाला सर्वाधिक प्राधान्य देत होते. रेल्वे फाटक बंद केल्याने ग्रामस्थांना सोयीचे होणार नाही अशा पध्दतीने रेल्वेने एका बोगदा बांधला आहे. हा बोगदा सखल आणि खोलगट भागात आहे. या बोगद्यातून निळजे ग्रामस्थांना लोढा हेवन भागात जाता येते. या बोगद्यात पाऊस सुरू झाल्यापासून पाणी तुंबते. हे पाणी जाण्यासाठी या भागात गटार किंवा अन्य कोणतीही सोय नाही. त्यामुळे बोगद्यात पाणी तुंबून राहते. या बोगद्यातून प्रवाशांची वर्दळ असते. त्याच बरोबर मोटारी, लहान मालवाहू वाहने याच बोगद्यातून धावतात. त्यामुळे बोगद्यात पाऊस नसला की चिखल होतो. आणि पाऊस सुरू असला की बोगद्यात पाणी तुंबते. मुसळधार पावसात कंबरभर पाणी साचते. त्यामुळे ग्रामस्थांना या भागातून जाणे मुश्किल होते. मुलांना लोढा हेवन भागातील शाळेत सोडण्यासाठी जाणाऱ्या महिला, मुलांचे या बोगद्यातील पाणी तुंबण्याचा सर्वाधिक त्रास होतो. ग्रामस्थांना विश्वासात न घेता घाईघाईने हा बोगदा बांधला आहे, अशा तक्रारी ग्रामस्थांनी केल्या. गावापासून दूर अंतरावर हा बोगदा आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळेत या बोगद्यातून येणे धोकादायक आहे. रात्रीच्या वेळेत निळजे ग्रामस्थांची, नोकरदाररांची मोठी अडचण होते. निळजे गावातून बाहेर पडण्यासाठी रेल्वे फाटक हा एक मधला मार्ग होता. तोच रेल्वेने बंद केल्याने ग्रामस्थांचे खूल हाल सुरू आहेत. ग्रामस्थांना पाणी तुंबलेल्या बोगद्यातून सध्या प्रवास करावा लागतो. 00000

मुरबाडच्या तारांगण शाळेत उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा

राजीव चंदने     मुरबाड : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व्हेसर्वा तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त काल मुरबाडच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मुरबाड तालुक्यातील तारांगण मतिमंद मुलांच्या निवासी कार्यशाळेत केक कापून तसेच मुलांना फळे व मिष्ठांन्नाचे वाटप करून वाढदिवस साजरा केला. मुलांशी हितगुज करत, संवाद साधत सामाजिक जाणिवेतून हा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी पक्षाचे मुरबाड तालुका संपर्क प्रमुख संतोष जाधव, विधानसभा क्षेत्र संघटक भरत गायकर,  तालुका समन्वयक विनायक ढमणे, शहर प्रमुख संदीप बहाडकर, तालुका सचिव नरेंद्र (भाऊ) यशवंतराव, सहसंपर्क प्रमुख नरेश देसले, युवसेनेचे विधानसभा प्रमुख निलेश चौधरी, युवासेना सचिव मिलिंद घरत आदी प्रमुख पदाधिकारी यांच्यासमवेत कायकर्ते उपस्थित होते. 00000

महसूल सप्ताहामध्ये नागरिकांनी आपली प्रलंबित कामे पूर्ण करून घ्यावीत – रवींद्र चव्हाण

अशोक गायकवाड     पालघर : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’, ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’, ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’, ‘मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना’ व इतर महत्त्वाच्या योजना राज्य शासनाच्या महत्त्वकांक्षी योजना…

जुन्या पेन्शनसाठी दंडवत आंदोलन

पालघर : राज्यातील सरकारी-निमसरकारी अधिकारी, शिक्षक व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना तत्काळ लागू करा, या मागणीसाठी पालघर जिल्ह्यातील हजारो कर्मचाऱ्यांनी काल भरपावसात जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ रस्त्यावर दंडवत आंदोलन केले. ‘एकच मिशन-जुनी…

मोखाड्यातील १७ गावपाडे दरडीच्या सावटाखाली

मोखाडा, ता. २८ : तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण आणि दरी डोंगरात वसलेल्या मोखाडा तालुक्यात १७ गावपाडे डोंगराच्या पायथ्याशी व माथ्यावर…

 मुरबाड कल्याण वाहतुक बंद- अनेक गावचा संपर्क तुटला

 सततधार पावसामुळे रस्ते आणि पुल पाण्याखाली राजीव चंदने       मुरबाड : गेले दोन तीन दिवस सततधार कोसळणाऱ्या वरुण राज्यामुळे मुरबाड कल्याण मार्गावरील किशोर, या गावाजवळ पाणी साचल्याने मुरबाड…

उल्हासनगर महापालिकेकडुन ‘सफाई अपनाओ बिमारी भगाओ’ अभियान

उल्हासनगर : ‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ या अभियांना अंतर्गत डपिंग ग्राउंड परिसरात मान्सूनमध्ये होणाऱ्या आजाराला आळा घालण्यासाठी उल्हासनगर महापालिकेच्या वतीने आयुक्त डॉ अझीझ शेख यांच्या आदेशानुसार शंकर मंदिर पाण्याच्या टाकीजवळ…

 डोंबिवलीत देवीचापाडा येथील बेकायदा चाळी पुराच्या पाण्याच्या विळख्यात,

 खाडी किनारा बुजवून उभ्या केल्या होत्या चाळी   डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेत देवीचापाडा, कुंभारखाणपाडा, गणेशनगर भागात गेल्या पंधरा वर्षाच्या कालावधीत उल्हास नदीचा खाडी किनाऱ्यावर मातीचे भराव टाकून, या भागातील खारफुटी…