Category: पालघर

palghar news

मोखाड्यातील १७ गावपाडे दरडीच्या सावटाखाली

मोखाडा, ता. २८ : तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण आणि दरी डोंगरात वसलेल्या मोखाडा तालुक्यात १७ गावपाडे डोंगराच्या पायथ्याशी व माथ्यावर…

 मुरबाड कल्याण वाहतुक बंद- अनेक गावचा संपर्क तुटला

 सततधार पावसामुळे रस्ते आणि पुल पाण्याखाली राजीव चंदने       मुरबाड : गेले दोन तीन दिवस सततधार कोसळणाऱ्या वरुण राज्यामुळे मुरबाड कल्याण मार्गावरील किशोर, या गावाजवळ पाणी साचल्याने मुरबाड…

उल्हासनगर महापालिकेकडुन ‘सफाई अपनाओ बिमारी भगाओ’ अभियान

उल्हासनगर : ‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ या अभियांना अंतर्गत डपिंग ग्राउंड परिसरात मान्सूनमध्ये होणाऱ्या आजाराला आळा घालण्यासाठी उल्हासनगर महापालिकेच्या वतीने आयुक्त डॉ अझीझ शेख यांच्या आदेशानुसार शंकर मंदिर पाण्याच्या टाकीजवळ…

 डोंबिवलीत देवीचापाडा येथील बेकायदा चाळी पुराच्या पाण्याच्या विळख्यात,

 खाडी किनारा बुजवून उभ्या केल्या होत्या चाळी   डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेत देवीचापाडा, कुंभारखाणपाडा, गणेशनगर भागात गेल्या पंधरा वर्षाच्या कालावधीत उल्हास नदीचा खाडी किनाऱ्यावर मातीचे भराव टाकून, या भागातील खारफुटी…

 डोंबिवलीतील फडके रोडला झाडाच्या फांद्यांचा अडथळा

वाहतूक कोंडी, वीज पुरवठा खंडित     डोंबिवली: येथील फडके रोडवरील कुळकर्णी ब्रदर्स आणि अंबिका हॉटेल लगतच्या रेन ट्री या जुनाट झाडाच्या फांद्या मुसळधार पावसाने वाकून मोठ्या वाहनांना अडथळा ठरू लागल्या. या फांद्या या भागातील महावितरणच्या जिवंत वीज वाहिन्यांवर कोसळण्याची शक्यता होती. त्यामुळे पालिकेच्या अग्निशमन जवानांनी बुधवारी सकाळी या झाडाच्या वाहनांना अडथळा ठरणाऱ्या फांद्या, वीज वाहिन्यांना स्पर्श करणाऱ्या फांद्या तोडून टाकल्या. दोन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. पावसाच्या सततच्या माऱ्याने डोंबिवली पूर्वेतील फडके रोडवरील कुळकर्णी ब्रदर्स आणि अंबिका टेल व हॉटेल लगत असलेले एका रेन ट्रीच्या जुनाट झाडाच्या फांद्या रस्त्यावर वाकल्या होत्या. या फांद्या केडीएमटी बस, कंपन्यांच्या बसना अडथळा येत होत्या. या फांद्या अचानक रस्त्यावर पडल्यावर तर पादचाऱ्यांना धोका आणि रिक्षेवर पडल्यावर रिक्षेचे नुकसान होण्याची शक्यता होती. या भागातील व्यापाऱ्यांनी याबाबतची माहिती पालिकेच्या अग्निशमन जवानांना दिली. जवानांनी एक तासाच्या कालावधीत या झाडाच्या धोकादायक असलेल्या फांंद्या तोडून टाकल्या. तोपर्यंत फडके रस्त्याने रेल्वे स्थानकाकडे येणारी वाहने खोळंबून राहिली होती. या रस्त्यावर वाहन कोंडी झाली होती. या कामासाठी या भागातील वीज पुरवठा काम पूर्ण होईपर्यंत खंडित करण्यात आला होता. फडके रस्त्यावर सकाळच्या वेळेत कोंडी झाल्याने अनेक प्रवाशांनी मदन ठाकरे चौक भागात उतरून पायी नेहरू रस्त्याने रेल्वे स्थानकाकडे जाणे पसंंत केले. बुधवारी सकाळी वर्दळीच्या वेळेत हा प्रकार सुरू होता. डोंबिवली, कल्याण परिसरात अनेक जुनाट झाडे वर्दळीच्या रस्त्यांंवर आहेत. या झाडांबाबत पालिकेने नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून निर्णय घेण्याची मागणी जागरूक नागरिकांकडून केली जात आहे. 00000

डोंबिवलीत नवापाडा येथे बेकायदा इमारतीत भूमाफियाकडून सव्वा दोन लाखाची पाणी चोरी

डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील सुभाष रस्त्यावरील ह प्रभाग हद्दीत मारूती मंदिरा जवळ एका भूमाफियाने सात माळ्याची शिवनाथ कृपा नावाने बेकायदा इमारत चार वर्षापूर्वी उभारली. या इमारतीत निवास आणि पहिल्या माळ्यावर…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या…

५१० पटसंख्या असलेल्या कन्या शाळेत पिण्याचे पाणी, स्वच्छता गृहाची समस्या सुटणार केव्हा ?

राजीव चंदने     मुरबाड : शहरातील ऐतिहासिक प्राथमिक जि.प. मुलींची शाळा, अर्थात कन्या शाळा म्हणुन ओळख असलेल्या शाळेत ५१० विद्यार्थी शिक्षण घेत असताना त्या शाळेत गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याचे…

डोंबिवली ‘एमआयडीसी’त बेकायदा बांधकामांचा सुळसुळाट

डोंबिवली : बेकायदा बांधकामांचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवलीत महाराष्ट्र औद्याोगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) क्षेत्रही सुटलेले नाही. फेज दोनमधील औद्याोगिक तसेच अन्य सेवासुविधांसाठी आरक्षित असलेल्या ८९ एकर (३६.११ हेक्टर) जमिनी…

भावी लाडकी बहीण शिक्षणासाठी जीव मुठीत घेऊन ओलांडतेय नदी

जव्हार : जव्हार व विक्रमगड तालुक्यांच्या हद्दीवर असलेल्या जिल्हा परिषद शाळा तलवाडा महालपाडा येथे विद्यार्थी व गावपाड्यातील नागरिकांना जाण्यासाठी पावसाळ्यात रस्ता नाही. परिणामी त्यांना नदीवरील कच्च्या लाकडी पुलावरून जीव धोक्यात…