Category: पालघर

palghar news

कचऱ्याच्या ट्रकच्या धडकेत लहानग्याने गमावला पाय,

उल्हासनगरातील घटना, नागरिकांत संतापाचे वातावरण   उल्हासनगर: उल्हासनगर महापालिकेचा कचरा वाहून नेणाऱ्या एक ट्रकने चीरडल्याने एका सात वर्षीय मुलाला आपला पाय गमवावा लागला आहे. उल्हासनगरच्या कॅम्प पाच भागात गायकवाडपाडा येथे…

उल्हासनगर शिवसेना उबाठा शहरप्रमुख पदी कुलविंदरसिंग बैंस

उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नियुक्ती     उल्हासनगर : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.त्यात उल्हासनगर पश्चिम…

 उल्हासनगरात गरजूंच्या मोफत कायदेशीर सल्ल्यासाठी 23 वकिलांचे पॅनल

 स्वराज्य संघटनेचा पुढाकार   उल्हासनगर : सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे ॲड.जय गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित करणाऱ्या स्वराज्य संघटनेची स्थापना केली असून मागच्या महिन्यात सप्तखंजेरी निर्माते, राष्ट्रीय…

 डहाणूचा मनस्वी इंटरप्राईजेस संघ संदीप भुरभुरे चषकाचा मानकरी

‘परिवर्तन ग्रुप’च्या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद   योगेश चांदेकर पालघरः मोडगाव येथील ‘परिवर्तन ग्रुप’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आदिवासी क्रिकेटच्या महासंग्रामात ६४ संघांनी भाग घेतला. आदर्श सरपंच स्वर्गीय संदीप भुरभुरे स्मृती चषकाचा मानकरी डहाणू तालुक्यातील चिखले येथील मनस्वी एंटरप्राइजेस संघ ठरला. या संघाला मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. ‘परिवर्तन ग्रुप’ दरवर्षी संदीप भुरभुरे स्मृती चषक स्पर्धा भरवत असतो. गेली २४ वर्षे हा उपक्रम अखंड चालू असून पुढचे वर्ष हे या उपक्रमाचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. या स्पर्धेचे सर्व नियोजन ‘परिवर्तन ग्रुप’चे अध्यक्ष ॲड. काशिनाथ चौधरी हे करत असतात. दोन राज्ये एका केंद्रशासित प्रदेशातील संघ सहभागी दादरा नगर हवेली, गुजरात, नंदुरबार, रायगड, मुंबई, मालाड, ठाणे, भिवंडी, नाशिक, जव्हार, वाडा, शहापूर, पालघर, वसई, बोईसर, डहाणू, तलासरी आदी ठिकाणचे संघ या स्पर्धेत भाग घेत असतात. दरवर्षी ही स्पर्धा नीटनेटक्या नियोजनाने चर्चेत असते. या वर्षी या स्पर्धेत महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यातील तसेच दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातील मिळून ६४ संघ स्पर्धेत सहभागी झाले होते. दादरा नगर हवेली, गुजरातच्या संघालाहा पारितोषिक आदिवासी क्रिकेटचा महासंग्राम २०२४ आदर्श सरपंच स्वर्गीय संदीप भुरभुरे स्मृती चषक डहाणूच्या मनस्वी इंटरप्राईजेस चिखले या संघाने मिळवला, तर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक दादरा नगर हवेलीतील प्रिन्स खानवेल या संघाने मिळवला. तिसरा क्रमांक वसईच्या बेनापट्टी संघांनी मिळवला, तर चौथा क्रमांक गुजरातच्या खेडगाव नवसारी येथील संघाने मिळवला. या स्पर्धेत मनस्वी स्पोर्टस् चिखले डहाणू येथील संघ मालिकावीर ठरला. या मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण स्पर्धेचे पारितोषिक वितरण डहाणू मतदारसंघाचे आमदार विनोद निकोले, विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुनील भुसारा, पालघरचे माजी आमदार श्रीनिवास वनगा, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पंकज कोरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, ‘परिवर्तन ग्रुप’चे अध्यक्ष ॲड. काशिनाथ चौधरी, डहाणू पंचायत समिती सभापती  आणि ‘परिवर्तन ग्रुप’चे कार्याध्यक्ष प्रवीण गवळी, उपसभापती पिंटू गहला आदींच्या उपस्थितीत करण्यात आले. भुरभुरे यांचे मोठे योगदान गेल्या २४ वर्षांपासून आदिवासी क्रिकेटचा महासंग्राम सुरू असतो. सुरुवातीच्या काळात संदीप भुरभुरे यांचा या स्पर्धेच्या नियोजनात मोठा सहभाग होता. त्यांचे प्रोत्साहन होते. मैदानापासूनच्या सर्वच गोष्टी ते हाताळत असत; परंतु कोरोनाच्या काळात त्यांचे पाच मे २०२१ रोजी निधन झाले. ॲड. काशिनाथ चौधरी यांनी त्यांच्याच नावाने पुढे स्पर्धा चालू ठेवत या चषकाला संदीप भुरभुरे स्मृती चषक असे नाव दिले. आता त्याच नावाने ही स्पर्धा होत असून या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी दोन राज्ये आणि  आणि केंद्रशासित प्रदेशातील संघ सहभागी होत असतात. हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य आहे. ०००००

 नवरस या अभिनव व अर्थपूर्ण ‘थीम’ला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 एस. टी. कदम विद्यालयाचे आगळेवेगळे स्नेहसंमेलन   योगेश चांदेकर पालघरः प्रत्येक शाळेत दरवर्षी स्नेहसंमेलन वेगवेगळ्या उपक्रमांनी आणि कार्यक्रमांनी साजरे केले जात असते; परंतु एखादी विशिष्ट ‘थीम’ निवडून त्यावर कार्यक्रम सादर करण्याचे आव्हान कुणीच स्वीकारत नाही, असे आव्हान स्वीकारून पालघरच्या एस. टी. कदम विद्यालयाने नवरसाच्या ‘थीम’वर एक अभिनव उपक्रम राबवून पालक आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवली.  नवरस या अभिनव व अर्थपूर्ण ‘थीम’वर या शाळेचे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. या अभिनव ‘थीम’ची चर्चा आता पालघरमध्येच नव्हे, तर सर्वत्र होत आहे. नृत्य, नाट्य आणि संगीतातून सादरीकरण तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी नवरस ही ‘थीम’ घेऊन त्यावर विविध नृत्य, नाट्य आणि संगीत कार्यक्रम सादर केले. आनंद, दुःख, करुणा, रौद्र, वीर, भयानक, शृंगार, विभक्त आणि शांत या नऊ रसांची प्रभावी व व भावनिक प्रस्तुती विद्यार्थ्यांनी रंगमंचावर सादर केली. तिला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. मुलीचा जीवन प्रवास उलगडला ‘थीम’मधून नवरस या ‘थीम’चा मुख्य भाग एका मुलीच्या जीवन प्रवासावर आधारित होता. तिच्या आनंदी बालपणानंतर ती कठीण प्रसंगावर कशी मात करते, समाजातील सकारात्मक व्यक्तींच्या सहाय्याने ती कशी उभारी घेते, हे या वेळी नृत्य नाट्य आणि संगीताच्या माध्यमातून सादर करण्यात आले. मोनोॲक्ट आणि नुत्यांद्वारे या भावनांना प्रभावीपणे सादर करून तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांची दाद मिळवली. विद्यार्थ्यांचा सन्मान या कार्यक्रमाची सुरुवात जीवन विकास संस्थेचे कार्याध्यक्ष वागेश कदम यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. मुख्याध्यापक कमल कचोलिया यांनी शाळेच्या वार्षिक प्रगती अहवालाचे वाचन केले. या वेळी विद्यार्थ्यांचा व पालकांचा प्रशस्तीपत्र आणि ट्रॉफी देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी प्रभावी भाषेत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कदम परिवार आवर्जून उपस्थित या वेळी संस्थेचे कार्यवाह रवींद्र कदम, कोषाध्यक्ष प्रणव कदम, व्यवस्थापक कोमल कदम, भावी मुख्याध्यापक प्रदीप पाणीग्रही, उपमुख्याध्यापक नेहा पाटील, मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापक संगीता गायकवाड, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल पालकांनी सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले. पालक आणि उपस्थितांची मनापासून मिळालेली दाद ही या शाळेसाठी एक अभिमानाची आणि चिरस्थायी बाब ठरली. 000000

ब्राह्मण समाज पुरोगामी विचाराचा आमदार स्नेहा दुबे-पंडित यांचे कौतुकोद्‌गार

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे पालघर जिल्ह्याचे स्नेहसंमेलन   योगेश चांदेकर पालघरः ब्राह्मण समाज हा पुरोगामी विचाराचा आहे. त्याने समाजाला दिशा दिली. सतीबंदीसारखे अनेक पुरोगामी कायदे करण्यात या समाजाचा मोठा वाटा…

 आजदे पाड्यातील गळक्या जलवाहिनीमुळे रस्त्यावर चिखल नागरिक त्रस्त

 शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल   डोंबिवली : येथील एमआयडीसीतील आजदे पाडा भागात बालाजी मंदिर परिसरातील एका रस्त्यावरील जलवाहिनी काही महिन्यांपासून फुटली आहे. या जलवाहिनीतील पाणी सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावरून वाहून जाते. या…

सरत्या वर्षोचे थकीत मालमत्ता कर भरणा केला नाही तर कारवाईला सामोरे जा

उल्हासनगर : सरत्या वर्षाच्या  अगोदर मालमत्ता थकीत कर भरणा करा अन्यथा कारवाई सामोरे जावे लागेल असा इशारा महापालिका प्रशासनाने थकबाकीदाराना दिली आहे.  उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील मोठ्या थकबाकीदारांविरुध्द मालमत्ता कर विभागामार्फत कर वसुली…

जव्हारमधील शिक्षकांच्या प्रतिनियुक्तीची चौकशी

पालघर : जव्हारचे प्रभारी गटशिक्षण अधिकारी यांनी नियम डावलून समायोजन प्रक्रिया विभागून राबविली तसेच काही मर्जीतील शिक्षकांना प्रतिनियुक्ती केली, अशा प्रकारचे आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणात चौकशी करून अहवाल…

आमदार स्नेहा दुबे-पंडित यांची विधानसभेत छाप

पहिल्याच भाषणात काव्याचा आधार घेत सरकारचे केले कौतुक मतदारसंघातील विविध प्रश्नांची मांडणी योगेश चांदेकर पालघरः वसई विधानसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित आमदार स्नेहा दुबे-पंडित यांनी आपल्या पहिल्याच भाषणात त्यांच्या अभ्यासूपणाची चुणूक सभागृहाला…