Category: पालघर

palghar news

Photo-2  जेष्ठ नागरिक संघटनेच्या अध्यक्षपदी रेहमान शेख यांची निवड माथेरान : माथेरान जेष्ठ नागरिक संस्थेची विशेष सभा करसनदास मुळशी  वाचनालय येथे उत्साहात पार पडली संस्थेच्या अध्यक्षपदी  रहेमान शेख अध्यक्ष पदी सर्वानुमते निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष पदावरअरविंद रांजणे ,सचिव म्हणून अनंत शेलार , खजिनदार रजनी कदम , सहसचिव प्रकाश सुतार (पिके) व  अशोक पवार यांची सह खजिनदार पदी सर्वानुमते निवड करण्यात आली. जेष्ठ नागरिक संघटनेला त्यांच्या काही बैठका अथवा विचारविनिमय करण्यासाठी नगरपरिषदेच्या माध्यमातून नगरपरिषदेच्या वाचनालयातील एक खोली वापरण्याकरिता दिलेली आहे तिथे वेळेनुसार सर्व जेष्ठ नागरिक एकत्रित येऊन आपल्या प्रश्नांची उकल करत असतात.

जेष्ठ नागरिक संघटनेच्या अध्यक्षपदी रेहमान शेख यांची निवड माथेरान : माथेरान जेष्ठ नागरिक संस्थेची विशेष सभा करसनदास मुळशी  वाचनालय येथे उत्साहात पार पडली संस्थेच्या अध्यक्षपदी  रहेमान शेख अध्यक्ष पदी सर्वानुमते निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष पदावरअरविंद रांजणे ,सचिव म्हणून अनंत शेलार , खजिनदार रजनी कदम , सहसचिव प्रकाश सुतार (पिके) व  अशोक पवार यांची सह खजिनदार पदी सर्वानुमते निवड करण्यात आली. जेष्ठ नागरिक संघटनेला त्यांच्या काही बैठका अथवा विचारविनिमय करण्यासाठी नगरपरिषदेच्या माध्यमातून नगरपरिषदेच्या वाचनालयातील एक खोली वापरण्याकरिता दिलेली आहे तिथे वेळेनुसार सर्व जेष्ठ नागरिक एकत्रित येऊन आपल्या प्रश्नांची उकल करत असतात.

 जेष्ठ नागरिक संघटनेच्या अध्यक्षपदी रेहमान शेख यांची निवड

माथेरान : माथेरान जेष्ठ नागरिक संस्थेची विशेष सभा करसनदास मुळशी  वाचनालय येथे उत्साहात पार पडली संस्थेच्या अध्यक्षपदी  रहेमान शेख अध्यक्ष पदी सर्वानुमते निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष पदावरअरविंद रांजणे ,सचिव म्हणून अनंत शेलार , खजिनदार रजनी कदम , सहसचिव प्रकाश सुतार (पिके) व  अशोक पवार यांची सह खजिनदार पदी सर्वानुमते निवड करण्यात आली. जेष्ठ नागरिक संघटनेला त्यांच्या काही बैठका अथवा विचारविनिमय करण्यासाठी नगरपरिषदेच्या माध्यमातून नगरपरिषदेच्या वाचनालयातील एक खोली वापरण्याकरिता दिलेली आहे तिथे वेळेनुसार सर्व जेष्ठ नागरिक एकत्रित येऊन आपल्या प्रश्नांची उकल करत असतात.

वर्षाऋतु मधील निसर्ग सौंदर्य न्याहाळण्यासाठी पर्यटकांची माथेरानला पसंती

माथेरान : वर्षाऋतुमध्ये मुंबई पासून अगदी जवळ असलेल्या माथेरान सारख्या सुंदर पर्यटनस्थळाची भ्रमंती  म्हणजे पर्यटकांना एक पर्वणीच असते.त्यामुळे पर्यटक आवर्जुन हजेरी लावत असतात.अन्य पर्यटन स्थळांच्या तुलनेत केवळ वाहतुकीची खर्चिक बाब वगळता अगदीच स्वस्त दरात राहण्याची सोय लॉजिगच्या माध्यमातून त्याचप्रमाणे हॉटेलमध्ये होत असते. वर्षाऋतु मध्ये इथल्या नैसर्गिकरित्या साकारणा-या अदभूत निसर्गाच्या चमत्काराची सप्टेंबर महिन्यात खऱ्या अर्थाने अनुभुती पहावयास मिळते. बारा महिन्यांतील पवित्र समजला जाणाऱ्या श्रावण महिन्यात इथे निसर्ग निर्मितीचा अलौकिक आंनद आणि अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी आणि श्रावण तापीच्या कोवळ्या उन्हात पॉईंट्सची सैर करण्यात एक वेगळाच आनंद मिळतो. सप्टेंबर महिन्यात डोंगर रांगात सभोवताली आणि पॉईंट्स परिसरात सोनकीची पिवळी फुले आच्छादलेली असतात त्यामुळे भूमातेच्या गर्भातून सोन्याचा उदय झाला आहे की काय असा भास झाल्याशिवाय राहत नाही. चोहोबाजूंनी गर्द झाडी आणि त्यातून पायी चालत जाण्याची मजा सुध्दा काही औरच असते. पावसाळी हवामानात गर्द धुक्यातून मार्गक्रमण करतांना अगदी समोरचं दृश्य देखील दृष्टीक्षेपात येत नाही.नैसर्गिक सौंदर्य धुक्यात हरवल्यामुळे ही सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील विहंगमय  दृश्ये न्याहाळण्यासाठी पर्यटक विविध पॉईंट्स वर गर्दी करतात.पॉईंट वरील हे दाट धुक्याचे नैसर्गिक आवरण मनाला मोहीत करते.धुके विरळ झाल्यावर क्वचितच इंद्रधनूची कमान धुक्या आड दिसल्यावर मन प्रसन्न होते.शारलोट लेक वरील ओसंडून वाहणाऱ्या पाण्याखाली भिजण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक आतुर झालेले असतात. महत्त्वाचे जवळपास पंधरा पॉईंट्स असून इको पॉईंट, लुईझा पॉईंट, वन ट्री हिल, लिटिल चौक पॉईंट, सनसेट, रामबाग, हनिमून पॉईंट, मलंग पॉईंट असे काही महत्त्वाच्या स्थळांना भेटी दिल्यावर खरोखरच मनाला आलेली ग्लानी दूर होते निसर्गाच्या सानिध्यात वेळ कसा निघून जातो याचे भान रहात नाही. पावसात भिजल्यावर कुठल्या स्टॉल वर गरमागरम भजी चहाचा आस्वाद घेत तर कुठं निखार्यावर भाजलेला गरमागरम मका खाण्याचा मोह सुध्दा आवरता येत नाही. कुणी घोड्यावर तर आबालवृद्ध हातरीक्षाच्या साहाय्याने पॉईंट्स वरील नयनरम्य देखावे पाहण्यासाठी जात आहेत. एकंदरीत पूर्वीचे आणि आताचे वर्तमानातील माथेरान यात जमीन अस्मानाचा फरक प्रकर्षाने जाणवतो.तीन दशकांपूर्वी पावसाळ्यात इथले संपूर्ण व्यवहार बंद असायचे.हॉटेल्सआणि जुन्या बंगल्याना गवताच्या झडी लावून चार महिने या सर्व वास्तू बंदिस्त असायच्या परंतु इथे वर्षाऋतुमध्ये पर्यटकांची रेलचेल वाढू लागल्याने आता हे सुंदर स्थळ बाराही महिने पर्यटकांना सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सज्ज असते. पावसाळ्यात चार महिने माथेरानची मिनिट्रेन बंद असते त्यासाठी (दस्तुरी ) अमन लॉज स्टेशन पासून गावात येण्यासाठी मिनिट्रेनची शटल सेवा उपलब्ध करण्यात आली आहे त्यामुळे इथे शनिवार आणि रविवार त्याचप्रमाणे अन्य सुट्टयांच्या हंगामात यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. राहण्यासाठी लॉजिंग तसेच हॉटेल्स मोठया प्रमाणावर उपलब्ध असल्याने आगाऊ बुकिंग करण्याची सहसा आवश्यकता भासत नाही. अत्यंत स्वस्त दरात या सोयी इथे उपलब्ध आहेत. नेरळ स्टेशन वरून इथे येण्यासाठी चोवीस तास टॅक्सी सेवा उपलब्ध असते माथेरानचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी नाक्यावर उतरल्यावर पाच मिनिटांच्या अंतरावर अमन लॉज रेल्वे स्टेशन पासून माथेरान स्टेशन पर्यंत येण्यासाठी माफक दरात शटल सेवा सुरळीत सुरू आहे.हौशी पर्यटक घोड्यावरून येतात तर नव्याने दाखल झालेल्या पर्यावरण पूरक ई रिक्षा सुध्दा रात्री दहा वाजेपर्यंत सेवेसाठी उपलब्ध असल्याने सर्वाना उत्तम प्रकारे सेवा आणि व्यावसायिकांना रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत.

प्रशासनाच्या निष्क्रियतेची पर्यटकांना शिक्षा

माथेरान : कामाच्या अन दररोजच्या धकाधकीच्या जीवनातून एक दोन दिवस मनाला आलेली ग्लानी दूर करण्यासाठी जवळचे पर्यटनस्थळ म्हणून बहुतांश पर्यटक हे माथेरानला पसंती देतात. परंतु येथील सर्वच संबंधीत  प्रशासकीय अधिकाऱ्यांचे वाहनांच्या पार्किंग व्यवस्थेबाबाबत सुयोग्यपद्धतीने नियोजन नसल्याने दरवेळेस येथील घाटरस्त्यात आणि दस्तुरीच्या वाहनतळावर वाहनांची प्रचंड गर्दी होताना दिसून येत आहे.त्यामुळे खाजगी वाहने पार्किंग अभावी घाटातून माघारी जात आहेत तर अनेकदा त्यांना आपल्या किमंती गाडया घाटातील रस्त्यावर पार्क करून दस्तुरी पर्यंत आपल्या लहान मुलांना आणि सामानाच्या बॅगा घेऊन पायपीट करावी लागत आहे. एकंदरीत इथल्या निष्क्रिय प्रशासनाच्या चुकांची शिक्षा पर्यटकांना सोसावी लागत आहे. दस्तुरी पार्किंग ह्या वनखात्याच्या जागेत मोठया प्रमाणावर अतिक्रमणे झालेली असल्याने त्याठिकाणी वाहने उभी करण्यासाठी जागा उपलब्ध नाही. तर पॅनोरमा पॉईंट्सच्या रस्त्यावर जवळपास पन्नास गाडया पार्क होऊ शकतात परंतु तेथे पोलीस प्रशासन हरकत घेत आहे असे बोलले जात आहे. दस्तुरी येथील एमपी हा प्लॉट अद्यापही नगरपरिषदेच्या ताब्यात आलेला नाही अन्यथा जवळपास दोनशे गाडयाची पार्किंगची सोय सहजपणे होऊ शकते त्याठिकाणी असलेले अतिक्रमण काढण्यास प्रशासन का कमकुवत ठरत आहे हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे.दरवेळी सुट्ट्यांच्या हंगामात माथेरान घाटरस्ता फुल होऊन जातं आहे. येथील प्रतिष्ठित व्यक्तींना देखील याबाबत सर्व कल्पना आहे परंतु शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करण्यास कुणीही पुढाकार घेताना दिसत नाही. माथेरान मधील काही महत्वाकांक्षी राजकीय पक्षांच्या मंडळींनी एकवेळ या गावाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी राजकारण बाजुला ठेऊन सकारात्मक विचार केला तरच इथे पर्यटन क्रांती घडू शकते परंतु श्रेयवादाच्या लढाईत स्थानिकांना भरडले जात आहे.

प्रशासकांकडून ई रिक्षाच्या चार्जिंग स्पॉटची पाहणी

माथेरान : नुकताच हातरीक्षा चालकांच्या हाती पर्यावरण पूरक ई रिक्षाचे स्टेरिंग आल्यामुळे पर्यटकांसह स्थानिक लोक मोठया प्रमाणावर या स्वस्त आणि सुरक्षित प्रवासी सेवेचा लाभ घेत आहेत.सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार सनियंत्रण समितीने सध्या वीस ई रिक्षांना पायलट प्रोजेक्ट म्हणून परवानगी देण्यात आली असून उर्वरीत ७४ नवीन ई रिक्षा लवकरच सध्याचा पायलट प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर हातरीक्षा मालकांना मिळणार आहेत. ई रिक्षांना चार्जिंग करण्यासाठी एकूण तीन ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. यातील दस्तुरी नाक्यावर २,कम्युनिटी हॉल परिसरात ५ आणि नगरपरिषदेच्या आवारात ५ ई रिक्षांना चार्जिंग करण्याची व्यवस्था नगरपरिषदेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. परंतु सद्यस्थितीत वीस ई रिक्षांना चार्जिंग साठी जागा अपुरी पडत असल्याने मुख्य ठिकाण असणाऱ्या कम्युनिटी हॉल परिसरात आणखीन चार्जिंग व्यवस्था करण्यात यावी यासाठी ई रिक्षा संघटनेचे पदाधिकारी यांनी प्रशासक तथा मुख्याधिकारी राहुल इंगळे यांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी विनंती केली. यावेळी अध्यक्ष शकील पटेल, उपाध्यक्ष प्रकाश सुतार, सचिव सुनील शिंदे, चालक रुपेश गायकवाड, किशोर सोनावले, अक्षय वैद्य,सिताराम शिंदे, दीपक डोईफोडे, मारुती कदम, दिलीप कदम, शैलेश भोसले,विजय कदम आदी उपस्थित होते. रिक्षा संघटनेची आवश्यक सूचना लक्षात घेऊन आम्ही नगरपरिषदेच्या अभियंत्यांना याबाबतीत माहिती देऊन पुढील उचित कार्यवाही करण्यात येईल. राहुल इंगळे — प्रशासक तथा मुख्याधिकारी माथेरान नगरपरिषद ०००००

 राष्ट्र व कार्यापेक्षा जात व धर्म फॅक्टर प्रभावी ठरल्याचे भविष्यासाठी घातक

 कपिल पाटील यांचे मत मुरबाड : लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्र व कार्यापेक्षा जात व धर्म हा फॅक्टर प्रभावी ठरला, हे देशाच्या भविष्यासाठी घातक आहे, असे मत माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांनी काल येथे व्यक्त केले. भिवंडी व शहापूरपाठोपाठ कपिल पाटील यांनी मुरबाड तालुक्यातील शिवळे येथे भाजपासह महायुतीचे कार्यकर्ते व नागरिकांबरोबर गुरुवारी संवाद साधला. या वेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष मधुकर मोहपे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख सुभाष पवार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य उल्हास बांगर, ज्येष्ठ नेते रामभाऊ दळवी, शहापूर विधानसभा प्रमुख अशोक इरनक, भास्कर जाधव आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. लोकसभेच्या निवडणुकीत काही जणांनी जातीच्या नावावर, तर आपण राष्ट्राच्या नावाने मते मागितली. आपण मोदीजींचे कार्य पाहून मतदानाचे आवाहन केले, तर त्यांनी धर्माच्या नावाने मतांची मागणी केली. आपले राष्ट्र व कार्यही चालले नाही. देश व कार्यापेक्षा जात व धर्म हा फॅक्टर चालला, तो देशाच्या भविष्याच्या दृष्टीने घातक आहे, असे मत कपिल पाटील यांनी व्यक्त केले. देशभरात तीन प्रमुख फॅक्टर चालविले गेले. त्यात भाजपाला ४०० हून अधिक जागा मिळाल्यावर, मुस्लिमांना भारत सोडून जावे लागेल, अशी भीती दाखविली गेली. केरळमधून सुरू झालेले अभियान देशभरात पोचविले गेले. केरळ, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश आणि आसाममधून भिवंडीत आलेल्या काही विशिष्ट लोकांनी ९० टक्के मतदान करण्याचे आवाहन केले. देशाच्या विविध भागात हा फॅक्टर चालविला गेला. दलित बांधवांना संविधान बदल आणि आदिवासी बांधवांना आरक्षण रद्द होणार असल्याचे भासविले गेले. या तीन फॅक्टरप्रमाणे भिवंडी मतदारसंघात जातीचा फॅक्टर सुरू होता. त्याचबरोबर भाजपाच्या जवळच्या लोकांनी विरोधी कार्य केले. सर्व फॅक्टर चालूनही आपल्या कार्यकर्त्यांनी नीट काम केले असते, तर नक्कीच पराभव झाला नसता, असा विश्वास कपिल पाटील यांनी व्यक्त केला. मुरबाड विधानसभा क्षेत्रात महायुतीला कमी मतांसाठी कार्यरत असलेल्या नेत्यांना पाणी पाजून मुरबाड विधानसभा मतदारसंघात ३२ हजारांची आघाडी मिळविण्याचे कार्य महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केले. या श्रेष्ठ ताकदीच्या कार्यकर्त्यांनी नाउमेद होऊ नये, असे आवाहनही श्री. कपिल पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले. ०००००

 वर्सोवा पुलाखाली झालेल्या दुर्घटनेची एकनाथ शिंदे यांनी केली पाहणी

लार्सन अँड टुब्रो कंपनीमार्फत दुर्घटनाग्रस्त व्यक्तीच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची मदत, कुटुंबातील एका व्यक्तीला कंपनीत नोकरी -. मुख्यमंत्री अशोक गायकवाड पालघर : सूर्याप्रकल्पाचे पाणी मीरा भाईंदरच्या दिशेने नेण्यासाठी मुंबई महानगर…

महिलेच्या विनयभंग प्रकरणी वसईतील महिला आक्रमक!

तहसीलदर कार्यालयात केलं शृंगार त्याग आंदोलन वसई तालुक्यातील वासळई येथे तीन दिवसापूर्वी तलाठी कार्यालयात महिलेवर  विनयभंग करण्याचा प्रयत्न तलाठ्याने केल्याच्या घटनेचे आता तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळतात. याप्रकरणी आज वसईतील महिलांनी वसई तहसीलदार कार्यालयावर मोठा मोर्चा काढला होता. यावेळी त्यांनी अनोख्या पद्धतीने शृंगार त्याग आंदोलन केले. यावेळी त्या तलाठ्यावर कठोर कारवाईची मागणी करत शासनाला शृंगार भेट देण्यात आला. यावेळीराज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासाठीचे निवेदन तहसीलदारांकडे देण्यात आले. या घटनेची नोंद घेत जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी सदर तलाठ्याला निलंबित केल्याचे आदेश तहसीलदारांना दिले आहेत. फेरफार करण्यासाठी गेलेल्या एका महिलेचा वासळई-सजेतील तलाठ्याने विनयभंग केल्याची घटना घडली असून, या तलाठी विशाल करे याला वसई पोलीसांनी गुन्हा दाखल करून अटक केली होती. मात्र त्याची जमीनावर लगेच सुटका झाली. या प्रकरणी प्रारंभापासून वसई पोलीस आरोपीस पाठीशी घालत असल्याचा आरोप केला जात आहे. या घटनेचा निषेध आणि संबंधित तलाठ्याच्या निलंबनाच्या मागणीसाठी वसईतील महिला संघटना, विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, तसेंच सामान्य वसईकरांतर्फे वसई तहसीलदार कार्यालयावर जाहीर मोर्चा काढण्यात आला. तलाठ्यावर कठोर कारवाई करण्याची आणि त्याच्या निलंबनाची मागणी यावेळी तहसीलदार अविनाश कोष्टी यांच्याकडे महिला तर्फे करण्यात आली. तसेच राज्याचे गृहमंत्री आणि महसूलमंत्र्यांना याबाबतचे निवेदन आणि शृंगार तहसीलदार यांना देण्यात आला. त्यानंतर महिलांनी आपला मोर्चा वसई पोलीस ठाण्यावर नेला होता. त्यांनाही विनयभंग केलेल्या तलाठ्याला तातडीने जमीन कसा मिळाला अशी विचारणा केली. तर पोलिसांच्या वतीने आता तलाठ्याच्या जामीन रद्द करण्या बाबत न्यायालयात बाजू मांडणार असल्याचे आश्वासन महिलांना दिले आहे. तहसीलदार कार्यालयावर आंदोलन सुरु असतानाच जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी सदर तलाठ्याला निलंबित केल्याचा फॅक्स आल्याचे सांगण्यात आले. आजच्या मोर्च्यात वसईतील सर्वच पक्षातील महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. यामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य डॉमनिका डाबरे, माजी नगरसेविका किरण चेंदवणकर ,वेरोनिका रिबेलो , सिता जाधव, रश्मी राव, साधना डिक्रूज, वेरोनिका डाबरे, मिलिंद खानोलकर,ऍड. सुमित डोंगरे यांच्या सह मोठ्या प्रमाणत महिला सहभागी झाल्या होत्या.

विरार पूर्व उपविभागात 10 कोटींची वीज चोरी

विरार : महावितरणच्या विरार पूर्व उपविभागात मागील एक वर्षात तब्बल 10 कोटी रुपयांची वीज चोरी पकडण्यात आली आहे. या प्रकरणी दोषी आढळलेले चार लाइनमन निलंबित करण्यात आले आहेत. यातील बहुतांश…

पावसात वीज यंत्रणेपासून सतर्क राहण्याचे महावितरणचे आवाहन

पालघर : वादळी व संततधार पाऊस किंवा अतिवृष्टी, पूर परिस्थिती, झाडे व फांद्या कोसळल्याने तुटलेल्या वीजतारा, विजेची उपकरणे किंवा यंत्रणेमधील शॉर्टसर्कीट आदींमुळे वीज अपघाताची शक्यता असते. या पार्श्वभूमिवर नागरिकांनी सार्वजनिक…