Category: पालघर

palghar news

रस्त्याच्या बाजूला धोकादायक खड्ड्यांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात

लवकरात लवकर खड्डे बुजवण्याची शिवसेनेची मागणी     उल्हासनगर :उल्हासनगर शहरातील वर्दळीच्या रस्त्याच्या बाजूला एका ठेकेदाराने नाल्यालगत खड्डे खोदलेले आहे या खड्ड्यांमध्ये मध्ये पावसाचे पाणी साचल्यानंतर ते दिसून येत नाही…

महाविकास आघाडी मधून अंबरनाथ विधानसभेची उमेदवारी काँग्रेस पक्षाने लढावी

उल्हासनगर काँग्रेस कमिटीचा ठरावं     उल्हासनगर : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसचे रोहित साळवे यांना उमेदवारी देण्यात यावी असा ठराव काँग्रेस कमिटीच्या बैठकीमध्ये सर्वानुमते…

कातकरीवाडीत रस्त्यासाठी कपिल पाटील यांची अधिकाऱ्यांबरोबर चर्चा

मुरबाड : धसईनजीकच्या ओजिवले येथील कातकरीवाडीपर्यंत पोचण्यासाठी रस्ता तयार करण्यासंदर्भात कार्यवाही करावी, अशी मागणी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी जिल्हा प्रशासनाकडे आज केली आहे. कातकरीवाडीतील महिलेला प्रसूतीसाठी झोळीतून आणले जात असल्याच्या वृत्ताची तातडीने दखल घेत, माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्याबरोबर संपर्क साधला. तसेच या वाडीपर्यंत जिल्हा नियोजन विकास निधी किंवा जिल्हा परिषदेच्या निधीतून रस्ता तयार करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याची मागणी केली. मुरबाड तालुक्यातील ओजिवली येथील कातकरीवाडीमध्ये ५० हून अधिक नागरिक राहतात. मुख्य गावापासून एक किलोमीटरवर असलेल्या या वाडीपर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे एका गरोदर महिलेला प्रसूतीसाठी बांबूला बांधलेल्या कपड्याच्या झोळीतून रुग्णालयात आणले असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी तातडीने दखल घेतली. जिल्हा नियोजन समिती वा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कातकरीवाडीमध्ये जाण्यासाठी डांबरी रस्त्याला मंजुरी द्यावी, या संदर्भात तातडीने जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने प्रस्ताव तयार करावा, अशी विनंती कपिल पाटील यांनी केली. 000000

मुरबाडच्या कातकरीवाडीत रस्त्यासाठी कपिल पाटील यांची अधिकाऱ्यांबरोबर चर्चा

राजीव चंदने   मुरबाड: तालुक्यातील धसई नजीकच्या ओजिवले गाव येथील कातकरीवाडीपर्यंत पोचण्यासाठी रस्ता तयार करण्यासंदर्भात कार्यवाही करावी, अशी मागणी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. कातकरीवाडीतील…

डोंबिवलीकरांची आरोग्यदायी मैत्रीची ‘धाव’

10 हजार नागरिक होणार सहभागी     डोंबिवली, : डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार आणि डोंबिवली रनर ग्रुप यांच्या वतीने डोंबिवलीकरांसाठी आरोग्य आणि मैत्री दिनाची सांगड घालत 4 ऑगस्टला कल्याण डोंबिवलीमधील सर्वात मोठ्या ‘डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन 2024’ चे  आयोजन करण्यात आले आहे. चालणे, धावणे किंवा पळणे आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. धकाधकीच्या शहरी वातावरणात आपल्या शरीराला व्यायाम अत्यावश्यक आहेच असं आरोग्यविज्ञान सांगते आणि त्यासाठी चालणे, धावणे किंवा पळणे यापेक्षा उत्तम काहीच नाही आणि हाच मूलमंत्र रुजवण्यासाठी हा पुढाकार घेतला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. मंत्री चव्हाण यांच्या माध्यमातून डोंबिवली करांसाठी आरोग्यदायी मैत्रीची धाव म्हणजेच ‘डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन 2024’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेची माहिती देण्यासाठी डोंबिवलीत बुधवारी मंत्री चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. ही स्पर्धा 21 किमी, 10 किमी, 5 किमी आणि 1.6 किमीचा फन रन अशा टप्प्यांत होणार आहे. 1.6 किमीचा फन रन हे या कार्यक्रमाचं आकर्षण असणार आहे. यात 6 वर्षांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांचा सहभाग असेल. कल्याण डोंबिवली रनर ग्रुप 500 मॅरॅथॉनर्स असलेली संस्था गेली 9 वर्ष डोंबिवली कल्याण मध्ये धावण्याची संस्कृती रुजावी आणि वाढीस लागावी यासाठी प्रेरणादायी कार्य करत आहे. डोंबिवली हे संस्कृतीक शहर तर आहेच पण या शहरातील जास्तीत जास्त नागरिकांना तंदुरुस्त बनविण्यासाठी असे उपक्रम आवश्यक आहे. ज्यामुळे डोंबिवली हे फिटनेस उपक्रमांचे केंद्र बनेल याची आम्ही आशा बाळगून आहोत, असे चव्हाण यांनी यावेळी सांगितले. स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या प्रत्येकाला ई प्रमाणपत्र आणि सहभाग पदक मिळणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. 5 किमी ही धाव अशा उत्साही लोकांसाठी आहे ज्यांनी नुकताच धावण्याचा प्रवास सुरू केला आहे आणि त्यांना भविष्यात 10 आणि 21 हजार मी सारख्या शर्यतींमध्ये दीर्घकाळापर्यंत प्रगती करायची आहे. त्या सर्वांना शर्यत पूर्ण झाल्यावर पदक आणि ई-प्रमाणपत्र मिळतील. फन रन धाव 1 मैल ची धावरनिंग इव्हेंटचा आनंद घेण्यासाठी आणि अनुभव घेण्यासाठी कुटुंब आणि मित्रांसह ही रन मजेदार रन असेल आणि पूर्ण झाल्यानंतर त्यांना सहभाग ई-सर्टिफिकेट मिळेल. 10 आणि 21 हजार मी या दोन श्रेणी कालबध्द शर्यती आयोजित केल्या आहेत. भारतातील सर्व प्रमुख धावण्याच्या इव्हेंटसाठी पात्रता म्हणून प्रमाणित केल्या जातील. अंतर पूर्ण करणाऱ्या सर्व नोंदणीकृत सहभागींना स्पर्धा पूर्णत्वाचे ई-प्रमाणपत्र आणि पदक मिळणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. ०००

डोंबिवलीतील नवापाडा भागातील बेकायदा इमारतीवर हातोडा

 ह प्रभागातील १० इमारतींवर कारवाईची तक्रारदारांची मागणी     डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील नवापाडा भागातील शेवंता हाईट्स या बेकायदा इमारतीवर पालिकेच्या ह प्रभागाच्या तोडकाम पथकाने मंगळवारी कारवाई केली. सहा वर्षापूर्वी ही बेकायदा इमारत भूमाफियांनी उभारली होती. ही इमारत पालिकेच्या ह प्रभाग साहाय्यक आयुक्तांनी अनधिकृत घोषित केली होती. ही बेकायदा इमारत मयत शेवंताबाई जोशी यांच्या नावाने होती. शेवंताबाई यांचे वारस विजय दत्तू जोशी, वंदना प्रकाश जोशी, अरूण दत्तू जोशी आणि विकासक प्रमोद अरूण देसाई, राहुल अरूण मैद यांनी कल्याण डोंबिवली पालिकेच्या बांधकाम परवानग्या न घेता ही बेकायदा इमारत उभारली होती. या इमारती विषयी पालिकेत अनेक तक्रारी आल्या होत्या. यापूर्वीच्या साहाय्यक आयुक्तांनी ही बेकायदा इमारत अनधिकृत घोषित केली होती, पण या इमारतीवर तत्कालीन साहाय्यक आयुक्तांनी कारवाई केली नव्हती. विद्यमान साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी मंगळवारी विष्णुनगर पोलीस ठाण्याचा बंदोबस्त घेऊन ही बेकायदा इमारत भुईसपाट करण्याची कारवाई सुरू केली. या इमारतीचे पहिले खांब, भिंती तोडण्यात आल्या. नंतर पोकलेन लावून ही इमारत भुर्ईसपाट केली जाईल, असे ह प्रभाग साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी सांगितले.ही इमारत पुन्हा बेकायदा पध्दतीने उभारण्याचा प्रयत्न भूमाफियांनी केला तर त्यांच्या एमआरटीपीचे गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा सावंत यांनी दिला. ह प्रभागातील बेकायदा बांधकामे ह प्रभागातील बेकायदा म्हणून घोषित केलेल्या जुन्या डोंबिवलीतील प्रकाश गोठे, शंकर ठाकूर यांची फशी हाईट्स, गटार तोडून उभारलेली बेकायदा इमारत, उमेशनगर जवळील राहुलनगर मधील सुदाम रेसिडेन्सी, रमाकांत आर्केड, कोपर येथील सखारामनगर काॅम्पलेक्स जवळील रस्त्यात उभारलेली बेकायदा इमारत, कोपरमध्ये बीएमपी गृहसंकुल भागात उभारलेली बेकायदा इमारत, ठाकुरवाडीतील शाळेच्या आरक्षणावरील शिवलिला इमारत, गरीबाचापाडा श्रीधर म्हात्रे चौकातील क्रीडांगण आरक्षणावरील वसंत हेरिटज इमारत, चरू बामा म्हात्रे शाळेच्या पाठीमागील भागातील बेकायदा इमारतीचा पाया, कोपर रेल्वे स्थानकाजवळील शैलेश पाटील यांचा कोंबड्याचा खुराडा, खंडोबा मंदिराजवळील बेकायदा इमारत. तसेच, देवीचापाडा खाडी किनारी सुरू असलेल्या बेकायदा चाळी जमीनदोस्त करण्याची कारवाई ह प्रभागाच्या साहाय्यक आयुक्तांनी सुरू करावी, अशी मागणी तक्रारदारांकडून केली जात आहे. 00000

अपंगत्वावर मात करत ,तो बनला कुटुंबाचा आधार..

राजीव चंदने     मुरबाड : बांधकाम मेस्त्री चे काम करत असताना परांची वरुन पडल्याने एका पायाने अपंगत्व आलेल्या रमेश यल्लप्पा याला चालताना दोन कुबड्यांचा आधार घ्यावा लागतो त्याने खचुन न जाता किंवा रस्त्यावर भीक न मागता आपल्या कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी मुरबाड शहरात रस्त्यावर पडलेले भंगार कचरा वेचुन तो आपल्या परिवाराचा आधार बनला असल्याने त्याचे जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत आहे. रशियाने धाडधकट असलेला रमेश यल्लप्पा हा मुळचा कर्नाटकचा वयाचे विस पंचवीस वर्षाने तो मुंबईत आला .तेथे कोणत्याही प्रकारचे उदरनिर्वाहाचे साधन नसल्याने तो बांधकाम कामगार बनला त्यावेळी त्याला मिळणारे पन्नास साठ रुपये रोजंदारी वर आपला उदरनिर्वाह करु लागला.परिणामी वेठबिगारी करत असताना  तो मेस्त्री झाला.मेस्री कामातून मिळणाऱ्या अधिक कमाई ने त्याने गावाकडील मुली बरोबर लग्न केले.आणि तिनं आपत्यांची आपल्या कुटुंबात भर पडली.पत्नीची मिळणारी साथ यामुळे कमाईत भर पडली असल्याने तो बांधकामांचा कंत्राटदार बनला.त्यामुळे तीन मुलांचे शिक्षण व परिवाराची जबाबदारी चांगल्याप्रकारे सांभाळत होता.हि जबाबदारी पार पाडत असताना परांचीवर जोखमीचे काम करत असताना तो खाली पडला आणि त्या अपघातात त्याला एक पाय गमवावा लागला.त्याला चालताना दोन कुबड्यांचा आधार घ्यावा लागतो.त्यामुळे त्याचा रोजगार हिरावला गेला असला तो खचला नाही.त्याने पाठीवर प्लास्टिक ची गोणी बांधत दोन कुबड्या घेऊन बाहेर पडत आहे व रस्त्यावर पडलेली प्लास्टिक ची रिकामी बाटली, पिशवी, पुठ्ठे व इतर भंगार कचरा वेचुन दररोज शंभर ते दोनशे रुपये कमवुन आपल्या परिवाराचा आधार बनला आहे. कोट मी तरुण वयापासुन काबाडकष्ट करत आलो आहे कर्नाटक मधुन मुंबईत आल्यावर मी उपाशी पोटी दिवस काढले.परंतु कोणाकडे भीक मागितली नाही.त्यामुळे मला जरी अपंगत्व आले असले तरी कोणाकडे भीक मागण्यापेक्षा अंगमेहनत करून मी जीवन जगत आहे.- रमेश यल्लप्पा.मुरबाड. ०००००

उल्हासनगर महापालिका अतिरिक्त आयुक्तांकडून स्वच्छततेचा आढावा

उल्हासनगर : महापालिका अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी सोमवारी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसह स्वच्छतेचा आढावा घेतला. यावेळी प्रभाग क्रं-१९ मधील ४ कर्मचारी गैरहजर आढळल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस देऊन खुलासा मागितला आहे. लेंगरेकर यांच्या आढाव्याने सफाई कामगारांसह विभागाच्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. उल्हासनगर महापालिका आरोग्य विभागातील स्वच्छता कामगार कामाच्या ठिकाणी गैरहजर तर काही सफाई कर्मचाऱ्यांच्या बदल्यात खाजगी बदली माणसे काम करीत असल्याच्या तक्रारी या अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्याकडे आल्या होत्या. तक्रारींचे निवारण करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसह सोमवारी काही प्रभागात स्वच्छता आढावा घेतला. यावेळी प्रभाग क्रं-१९ (ब) मध्ये काम करणारे तब्बल ४ सफाई कामगार गैरहजर होते. याबाबत आरोग्य विभागाचे उपायुक्त सुभाष जाधव व अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी स्वच्छता निरीक्षक व मुकादम तसेच संबधित कर्मचाऱ्यास नोटीसा देऊन खुलासा मागितला. अतिरिक्त आयुक्त लेंगरेकर यांच्या स्वच्छता आढाव्याने सफाई कामगार व आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. महापालिका सफाई कामगार हे मुकादम, स्वच्छता निरीक्षक आदी अधिकाऱ्यांना हाताशी धरून, त्याच्या बदल्यात खाजगी कामगार बदली देत असल्याच्या तक्रारीत वाढ झाली होती. यापूर्वी बदली कामगार ठेवण्याचा भांडाफोड होऊन, काही कामगारांना महापालिकेने बडतर्फ केले. बदली कामगार ठेवून वर्षानुवर्षे गैरहजर राहणाऱ्या सफाई कामगारांसह संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे. लेंगरेकर यांच्या स्वच्छता आढाव्याने बदली कामगारांचे भिंग फुटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

कल्याण परिमंडलाच्या मुख्य अभियंतापदी श्री. चंद्रमणि मिश्रा

पालघर : महावितरणच्या कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून श्री. चंद्रमणि मिश्रा यांनी पदोन्नतीवर सोमवारी (दि. २४) कार्यभार स्वीकारला. याआधीचे मुख्य अभियंता श्री. धनंजय औंढेकर यांची मुंबईतील बांद्रा येथील मुख्य कार्यालयात…

योग दररोज करा, निरोगी रहा-गोविंद बोडके

पालघर : आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी शुभेच्छा देऊन योग एक दिवस न करता दररोज करा व निरोगी रहा असा संदेश जिल्ह्यातील नागरिकांना दिला. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत शुक्रवारी, लायन्स क्लब ऑफ पालघरच्या सभागृहात योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी बोडके बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, उपजिल्हाधिकारी (सा. प्र) संजीव जाधवर, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी तसेच शालेय विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते. विद्यार्थ्यांना योग्य वेळेत योग्य धडे दिले तर ते कोणतीही गोष्ट चांगल्या पद्धतीने करतात त्यांचा आत्मविश्वास वाढतो यामुळे त्यांना प्रेरणा मिळते नेमकी ही बाब लक्षात घेता आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित साधत जिल्ह्यातील साधारण अडीच ते तीन हजार पेक्षा अधिक शाळांमधील जवळपास ३० हजार विद्यार्थ्यांनी योग दिना मध्ये उत्साहात सहभाग घेतला . असे जिल्हाधिकारी बोडके यांनी सांगितले. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पालघर, इनरव्हील क्लब ऑफ पालघर व प्रजापती ब्रह्मकुमारी यांच्या संयुक्त विद्यमाने पालघर येथील लायन्स क्लब सभागृहात योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यामधील शाळा,महाविद्यालय विविध कंपन्या व विविध संघटनांमार्फत योग प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त प्रत्येक ठिकाणी योगाची प्रात्यक्षिके पाहायला मिळाली योगाची प्रात्यक्षिके उत्तम प्रकारे शालेय विद्यार्थी करतील आणि त्यांच्या पालकांना सुद्धा योगासनाचे धडे देतील हा या मागच्या उद्देश होता.