Category: पालघर

palghar news

‘हिंद दि चादर’चा संदेश विद्यार्थ्यांच्या मनात रुजवणे आवश्यक

‘हिंद दि चादर’चा संदेश विद्यार्थ्यांच्या मनात रुजवणे आवश्यक जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांचे प्रतिपादन अशोक गायकवाड पालघर : वाडा तालुक्यातील अंबिस्ते येथील शासकीय आश्रमशाळेत आयोजित विशेष कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ.…

  पोक्सो प्रकरणात आरोपीस अटींसह जामीन

पोक्सो प्रकरणात आरोपीस अटींसह जामीन कल्याण सत्र न्यायालयाचा निर्णय मुरबाड (प्रतिनिधी) : मुरबाड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या पोक्सो प्रकरणातील आरोपी प्रमोद मौळे यास कल्याण सत्र न्यायालय येथील फास्ट ट्रॅक न्यायालयाने अटींसह जामीन मंजूर केला.…

मराठी व्यावसायिकांनो गुजरात काबीज करा

 पालकमंत्री गणेश नाईक यांचा व्यावसायिकांना सल्ला ०  ‘ग्लोबल कोकण महोत्सव’ आणि ‘कोकण सरस’ प्रदर्शनाचे नाईक यांच्या हस्ते उद्‌घाटन योगेश चांदेकर पालघरः मराठी माणूस कुठेही कमी नाही. त्याला प्रोत्साहन दिले तर…

सरळगाव विभाग हायस्कूलमध्ये शिवजयंती जल्लोषात साजरी

सरळगाव विभाग हायस्कूलमध्ये शिवजयंती जल्लोषात साजरी राजीव चंदने मुरबाड :  महाराष्ट्राचे आराध्य दैवत कुळवाडी भूषण जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांची ३९६ वी जयंती मोठ्या रोमहर्षित वातावरणात विद्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक मुरबाडचा भूमिपुत्र शिवळे आंबेळे गावचा जलसाकार निखिल वाघचौडे हे उपस्थित होते त्यांच्या  दोनच राजे इथे गाजले या गीताने वातावरण मंत्रमुग्ध केले गेले. शिवजयंती निमित्त विद्यालयात वक्तृत्व स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, गितगायन स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. इयत्ता ५ वी ते ११ वी पर्यतच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. यावेळी सुरेख असे इशस्तवन व स्वागत गीत इयत्ता ८ वी च्या विद्यार्थिनीनी सादर केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे जेष्ठ प्रा.आर. ए. सुरवसे यांनी स्वीकारले तर सुरेख असे सूत्रसंचालन इयत्ता-८ वी च्या विद्यार्थिनीं सोनल शिंगोळे, हेमलता शिंगोळे, नेहा पष्टे, अनन्या पवार यांनी केले तर कार्यक्रमाची सांगता देवयानी शिंगोळे हिने आभार मानून केले.

 २० वर्षांच्या सेवेनंतर महिला कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ;

२० वर्षांच्या सेवेनंतर महिला कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ; पालघरमध्ये भूमिपुत्र एल्गार संघटनेचा आंदोलनाचा इशारा योगेश चांदेकर जव्हार:दिनांक 11 फेब्रुवारी आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमध्ये गेल्या २० वर्षांपासून धुलाई कर्मचारी म्हणून राबणाऱ्या महिलांना अचानक कामावरून कमी केल्याने पालघर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. शासनाने ‘आऊटसोर्सिंग’ (बाह्य स्त्रोत) धोरण राबवत ६० महिलांना बेरोजगार केल्याच्या विरोधात भूमिपुत्र एल्गार संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला असून, प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला आहे. अल्प मानधनावर केली २० वर्षे सेवा बाधित महिला कर्मचाऱ्यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की, त्यांनी सुरुवातीला केवळ ३० ते ४० रुपये प्रतिदिन इतक्या अत्यल्प मजुरीवर काम सुरू केले होते. आज २० वर्षांनंतर त्यांना ६०० रुपये वेतन मिळत असताना, प्रशासनाने अचानक एकत्रित ठेक्याचे धोरण अवलंबले. यामुळे या स्थानिक भूमिपुत्र महिलांच्या हाताचे काम हिरावले गेले असून त्यांच्यावर उपासमारीची कुऱ्हाड कोसळली आहे. प्रकल्प अधिकाऱ्यांची घेतली भेट या गंभीर अन्यायाविरोधात सर्व महिलांनी भूमिपुत्र एल्गार संघटनेचे सदस्यत्व स्वीकारले आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज जव्हार आदिवासी विकास प्रकल्पाच्या अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांची भेट घेऊन या महिलांची कैफियत मांडली. यावेळी भूमिपुत्र एल्गार संघटनेचे अध्यक्ष प्रमोद पवार, सरचिटणीस नवनाथ भोये, आदिम शक्ती प्रमुख व जिल्हा सरचिटणीस स्वप्नील वाघ, विजय राऊत, स्वप्नील जाधव आणि सर्व कामगार महिला होत्या. भूमिपुत्र एल्गार संघटनेची भूमिका संघटनेचे अध्यक्ष प्रमोद पवार यांनी शासनाच्या या धोरणाचा तीव्र निषेध केला आहे. “स्थानिक महिलांनी आपले आयुष्य या आश्रमशाळांच्या सेवेसाठी वेचले, त्यांना न्याय देण्याऐवजी शासन बाह्य संस्थांना ठेका देऊन स्थानिकांचा रोजगार हिरावत आहे. हा भूमिपुत्रांवर झालेला अन्याय आम्ही सहन करणार नाही,” असे त्यांनी ठणकावून सांगितले.

 राज्य माहिती आयोगाचा जनसेवा शिक्षण संस्थेला दणका

राज्य माहिती आयोगाचा जनसेवा शिक्षण संस्थेला दणका खुलासा करा अन्यथा दंड भरा राजीव चंदने मुरबाड : संस्थेची माहिती टाळण्यासाठी माहिती अधिकारी व अपिलीय अधिकारी पदावर शासकीय कर्मचाऱ्यांची नेमणुक न करता…

माडविहरा-हुंबरण रस्त्यावर श्रमदानातून तात्पुरत्या पुलाची उभारणी

माडविहरा-हुंबरण रस्त्यावर श्रमदानातून तात्पुरत्या पुलाची उभारणी जव्हार: २७ जुलै २०२३ रोजी झालेल्या महापुरात जव्हार तालुक्यातील पिंपळशेत खरोंडा पैकी माडविहरा ते हुंबरण या रस्त्यावरील दोन पूल वाहून गेले. या घटनेला जवळपास…

  बनावट लेबल लावून मद्याची महाराष्ट्रात विक्री

बनावट लेबल लावून मद्याची महाराष्ट्रात विक्री पाच जणांविरुद्ध गुन्हा, एक आरोपी फरार डहाणू उत्पादन शुल्क विभागाची कारवाई योगेश चांदेकर पालघरः पालघर जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या दीव दमण या केंद्रशासित प्रदेशातील सवलतीच्या…

  पालघर पूर्व विभागात रेल्वे तिकीट काउंटर सुरू करा

पालघर पूर्व विभागात रेल्वे तिकीट काउंटर सुरू करा खासदार डॉ. हेमंत सवरा यांची मागणी सामाजिक कार्यकर्त्याच्या मागणीची दखल योगेश चांदेकर पालघरः पालघर शहराचे पश्चिम रेल्वेने दोन विभाग केले असून, पालघर पश्चिम आणि पालघर पूर्व असे ते दोन विभाग आहेत. पालघर पश्चिममध्ये रेल्वेचे तिकीट घर आहे; परंतु पालघर पूर्वेला तिकीट काउंटर नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होते. ही बाब लक्षात घेऊन डॉ. हेमंत सवरा यांनी पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक विवेक कुमार गुप्ता यांना पत्र लिहिले असून पालघर पूर्व भागात रेल्वेचे तिकीट काउंटर सुरू करण्याची मागणी केली आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते शाम बनपट्टे यांनी डॉ. सवरा यांना पत्र देऊन पालघर पूर्व विभागात तिकीट काउंटर नसल्याचे निदर्शनास आणले होते. डॉ. सवरा यांनी लोकसभेत रेल्वेचे विविध प्रश्न मांडून त्याचे निराकरण केले तसेच प्रवाशांच्या गैरसोयी दूर केल्या. याबद्दल बनपट्टे यांनी सवरा यांचे कौतुक करून पूर्व विभागातील रेल्वे प्रवाशांच्या समस्या लक्षात घेऊन तेथे रेल्वे काउंटर सुरू करण्याची मागणी केली होती. पूर्व भागातील प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात सध्या पूर्व विभागात रेल्वेचे तिकीट काउंटर नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी तसेच दिव्यांग प्रवाशांना तिकीट घेण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडून पश्चिम विभागात जावे लागते. ही बाब गैरसोयीची आहे. त्याचबरोबर प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. पालघर शहराचा पूर्व भाग वेगाने विकसित होत असून या भागातून प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पूर्व विभागात स्वतंत्र तिकीट काउंटर असणे किती गरजेचे आहे, हे त्यांनी सवरा यांना दिलेल्या पत्रात नमूद केले होते. सवरा यांनी महाव्यवस्थापकांचे वेधले लक्ष शाम बनपट्टे यांच्या पत्रानुसार डॉ. सवरा यांनी तातडीने या प्रश्नाकडे पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक विवेक कुमार गुप्ता यांचे लक्ष वेधले. पालघर पूर्व विभागात रेल्वेचे तिकीट काउंटर नसल्यामुळे प्रवाशांची किती गैरसोय होते, हे त्यांनी निदर्शनास आणले. पालघर हे वेगाने विकसित होणारे शहर असून पूर्व विभागात मोठ्या प्रमाणात नागरी वसाहती निर्माण होत आहेत. या लोकांना रेल्वे शिवाय अन्य चांगला पर्याय नाही. दररोज रेल्वेने येजा करणाऱ्या प्रवाशांची संख्या येथे मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे पूर्व विभागातील प्रवाशांची गरज लक्षात घेऊन तेथे रेल्वे तिकीट काउंटर तातडीने सुरू करण्याची मागणी खासदार सवरा यांनी केली आहे. आता याबाबत रेल्वेचे महाव्यवस्थापक काय निर्णय घेतात, याकडे पालघर पूर्व विभागातील रेल्वे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

  वाढवण बंदर विकासात स्थानिकांना कामे देणार

वाढवण बंदर विकासात स्थानिकांना कामे देणार भारतीय जनता पक्षाच्या निवेदनानंतर ‘आयटीडी सिमेंटेशन कंपनी’ची ग्वाही जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत चर्चा योगेश चांदेकर पालघरः डहाणू तालुक्यातील वाढवण येथील बंदर विकासाचे काम ‘आयटीडी सिमेंटेशन कंपनी’ने घेतले असून या कंपनीने स्थानिकांना रोजगार द्यावा, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, विक्रमगडचे आमदार हरिश्चंद्र भोये आदींनी सुमारे चारशे कार्यकर्त्यांसह कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कंपनीच्या वतीने स्थानिकांना रोजगार देण्याचे मान्य करण्यात आले. दरम्यान, पालकमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही या विषयावर चर्चा करण्यात आली. वाणगाव येथील ‘आयटीडी सिमेंटेशन’ या कंपनीने वाढवण बंदर विकासाचे काम हाती घेतले आहे. ‘एल अँड टी कंपनी’ची ही उपकंपनी आहे. या कंपनीत स्थानिकांना रोजगार देण्याऐवजी बाहेरच्या लोकांना रोजगार दिला जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे राजपूत, भोये यांच्यासह भाजपच्या सुमारे चारशे कार्यकर्त्यांनी तेथे धडक दिली. या वेळी तेथे उपस्थित असलेल्या दहा-पंधरा कर्मचाऱ्यांनी मद्यपानाच्या नशेत सुमारे चारशे कार्यकर्त्यांना रोखून धरले. निवेदन देता येणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे भोये, राजपूत यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी कंपनीच्या कार्यालयात प्रवेश केला व निवेदन दिले. स्थानिक भूमिपुत्रांना डावलले या निवेदनात प्रामुख्याने स्थानिकांच्या रोजगाराच्या तसेच कामासंबंधीच्या मागण्या करण्यात आल्या आहेत. भारतीय जनता पक्ष प्रणित ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की डहाणू तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणावर विकास प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेले कुशल व अकुशल कामगार वाहतूक व्यवस्था तसेच यंत्रसामग्रीसाठी स्थानिक भूमिपुत्रांना डावलले जाते. अन्य राज्यातील कंत्राटदार, कामगार व वाहनधारकांना प्राधान्य दिले जात आहे, ही बाब अत्यंत गंभीर असून त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या रोजगाराच्या हक्कावर गदा येत आहे. या प्रकल्पासाठी लागणारे सर्व कुशल व अकुशल कामगार फक्त डहाणू तालुक्यातील असावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. कार्यालयीन कर्मचारी स्थानिक हवेत कामगारांना देण्यात येणारी मजुरी भत्ते व इतर सुविधा कामगार कायद्यानुसार देण्यात याव्यात, कार्यालयीन कामासाठी लागणारे कर्मचारी त्यात कारकून पर्यवेक्षक आदी पदांवर स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे, साईट इंजिनिअर, मॅनेजर, सुरक्षा रक्षक आदी पदावर बाहेरील व्यक्ती नेमण्याऐवजी स्थानिक उमेदवारांची नियुक्ती करण्यात यावी, कार्यालयीन कर्मचारी वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी वाहने भाडेतत्त्वावर घेताना डहाणू तालुक्यातील स्थानिक वाहनधारकांकडूनच घेण्यात यावीत आदी मागण्याही करण्यात आल्या आहेत. पुरवठा कंत्राटी स्थानिकांना द्या प्रकल्पासाठी लागणारी जड वाहने व इतर यंत्रसामग्री; त्यात जेसीबी, हायवा पोकलेन, ट्रॅक्टर आणि टँकर व अन्य वाहने स्थानिकांकडून घेण्यात यावीत. खडी, रेती, डांबर व इतर साहित्याच्या वाहतूक व खणन कामासाठी लागणारी यंत्रसामग्री व पुरवठा कंत्राटे स्थानिकांना देण्यात यावी, अशा मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार…