Category: पालघर

palghar news

 प्रकल्पांमुळे पालघर मधील रस्त्यांची दुरवस्था

प्रकल्पांमुळे पालघर मधील रस्त्यांची दुरवस्था आमदार राजेंद्र गावित यांनी घेतला आढावा गुरुवारी प्रस्तावासह उपस्थित राहण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना योगेश चांदेकर पालघरः पालघर विधानसभा मतदारसंघातील पालघर व डहाणू या दोन तालुक्यात विरार-…

 टेंभरे (बु.) ग्रामपंचायतीच्या पहिल्या महिला उपसरपंचपदी सुनंदाताई गायकवाड विराजमान

टेंभरे (बु.) ग्रामपंचायतीच्या पहिल्या महिला उपसरपंचपदी सुनंदाताई गायकवाड विराजमान मुरबाड : तालुक्यातील प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या तंटामुक्ती तथा हागणदारी मुक्त ग्राम सन्मानित टेंभरे (बु.) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुनंदाताई कैलास गायकवाड यांची बिनविरोध…

खरेदी विक्री संघाच्या ताब्यात असलेली रास्तभाव धान्य दुकाने विधवा महिला व दिव्यांग व्यक्तींना देण्याची मागणी…

खरेदी विक्री संघाच्या ताब्यात असलेली रास्तभाव धान्य दुकाने विधवा महिला व दिव्यांग व्यक्तींना देण्याची मागणी… राजीव चंदने मुरबाड :  मुरबाड तालुका खरेदी विक्री संघाच्या अखत्यारीत मुरबाड शहर व तालुक्यात एकूण…

आयकरच्या धाडी पडताच कॉन्फिडेंट ग्रुपचे चेअरमन सी. जे. रॉय यांची आत्महत्या

बंगळुरू : आयकरच्या धाडी पडताच भारतातील प्रसिध्द उद्योगपती कॉन्फिडेंट ग्रुपचे चेअरमन रॉय चिरियानंदन जोसेफ ऊर्फ सी. जे. रॉय यांनी त्या आयकर अधिकाऱ्यांसमोरच डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्यामुळे उद्योगजगतात शोककळा पसरली आहे.…

टेंभरे (बु.) ग्रामपंचायतीच्या पहिल्या महिला उपसरपंचपदी सुनंदाताई गायकवाड विराजमान

टेंभरे (बु.) ग्रामपंचायतीच्या पहिल्या महिला उपसरपंचपदी सुनंदाताई गायकवाड विराजमान राजीव चंदने मुरबाड: तालुक्यातील प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या तंटामुक्ती तथा हागणदारी मुक्त ग्राम सन्मानित टेंभरे (बु.) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुनंदाताई कैलास गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गावाच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला उपसरपंच होण्याचा मान त्यांनी पटकावला आहे. ग्रामपंचायतीच्या ज्येष्ठ सदस्या असलेल्या सुनंदाताई गायकवाड यांच्या निवडीमुळे गावातील अनेक प्रलंबित विकासकामे जलद मार्गी लागतील, असा विश्वास सरपंच सुहास केंबारी यांनी व्यक्त केला. त्यांच्या निवडीबद्दल गावात सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत असून विशेषतः महिला वर्गात उत्साहाचे वातावरण आहे. या निवडीप्रसंगी माजी सरपंच दिलीप केंबारी, शरद केंबारी, माजी उपसरपंच सुरेश जाधव, अभय केंबारी, धनाजी टोहके, ग्रामपंचायत सदस्य संजय केंबारी, नंदा केंबारी, शुभांगी पवार, मंगला खुटारे, तसेच राजेश केंबारी, दामोदर जाधव, भगवान जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामसेविका ज्योती पवार, अंगणवाडी सेविका मोनिका केंबारी तसेच गावातील महिलांनी सुनंदाताई गायकवाड यांचे विशेष अभिनंदन केले. प्रथमच महिला उपसरपंचपदाचा मान मिळाल्याने गावातील महिलांमध्ये आत्मविश्वास व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्टोन क्रेशरच्या प्रदुषणातुन शेत जमीनीची आणि नागरिकांची सुटका करण्यासाठी ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे.

स्टोन क्रेशरच्या प्रदुषणातुन शेत जमीनीची आणि नागरिकांची सुटका करण्यासाठी ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे. राजीव चंदने मुरबाड : मुरबाड माळशेज मार्गावर असलेल्या सायले गावचे हद्दीत सुरू असलेल्या स्टोन क्रेशरच्या प्रदुषणातुन कष्टकरी शेतकऱ्यांच्या सुपीक जमीनी नापिक होणार असून नागरिकांना श्वसनाचा त्रास होऊन जीवनमानावर परिणाम होणार असल्याने या क्रेशरला सायले ग्रामस्थांनी प्रखर विरोध केला असुन जिल्हाधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची परवानगी देऊ नये असा २६ जानेवारी रोजी ग्रामसभेत ठराव घेऊन विरोध दर्शविला असुन जिल्हाधिकारी काय भुमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्टोन क्रेशरच्या कर्कश आवाजामुळे ध्वनी प्रदुषण होतेच शिवाय शालेय विद्यार्थ्यांचे अभ्यासवर विपरीत परिणाम होऊन गुणवत्ता ढासळली जाते.त्यातुन निघणाऱ्या धुरळ्यामुळे  परिसरातील नागरिकांना श्वसनाचा त्रास होऊन गंभीर आजारांना सामोरे जावे लागते तर काही जणांचे बळी देखील जातात.दरम्यान तो धुरळा शेत जमिनीवर बसला तर ती जमीन नागंरता येत नाही.तसेच त्या जमीनीत खरिब किंवा रब्बी पिक घेता येत नाही.मुरबाड तालुक्यातील कोलठण,माल्हेड,पवाळे,म्हाडस, बांधीवली शिरगाव,गोऱ्याचा पाडा,या ठिकाणी असलेल्या शेतकऱ्यांचे जमीनीवर व जीवनमानावर त्याचा परिणाम झालेला दिसुन येत आहे.या प्रकारांची आपल्या गावात पुनरावृत्ती होऊ नये म्हणुन सायले ग्रामस्थांनी प्रजासत्ताक दिनी झालेल्या. ग्रामसभेत बहुमताने ठराव घेऊन या क्रेशरला तिव्र विरोध केला आहे. कोट या स्टोन क्रेशरमुळे गावचे परिसरात प्रदुषण होणार असुन तेथे येणाऱ्या अवजड वाहनांमुळे गावातील नागरिकांना सुरक्षित रस्ते मिळणार नाहित त्यामुळे सर्व ग्रामस्थांनी विरोध करुन तसा ठराव जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे -जागृती पानसरे, सरपंच ग्रामपंचायत सायले कोट या धोकादायक क्रेशरला सर्व ग्रामस्थांनी विरोध केला असल्याचा ठराव ग्रामसभेत घेतला असुन तो जिल्हाधिकारी ठाणे यांना सादर केला आहे. -अशोक बांगर, ग्राम पंचायत अधिकारी.सायले.

रेशनिंग धान्य काळाबाजाराला पूर्णविराम कधी?

रेशनिंग धान्य काळाबाजाराला पूर्णविराम कधी? प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला टोकावडे पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी राजीव चंदने मुरबाड : मुरबाड तालुक्यातील टोकावडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रजासत्ताक दिनी संध्याकाळच्या सुमारास रेशनिंगचे धान्य घेऊन जाणारा ट्रक पोलीसांनी पकडला आहे. त्यामुळे रेशनिंगच्या धान्याच्या काळ्याबाजाराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. प्रजासत्ताक दिनी रात्री पोलिसांच्या गस्तीवेळी एक ट्रक संशयास्पद वाटल्याने त्यांनी ट्रक थांबवून चौकशी केली असता, एम. एच १४ – सि. पी ७3४७ या ट्रकमध्ये रेशनिंग धान्य असल्याचे दिसून आले. ट्रक चालकाकडे बिलाची मागणी केली असता साध्या कागदावरच बिल आढळून आले, धान्य मालकाशी संपर्क साधला असता तेव्हा उडवा उडवीची उत्तरे मिळाली. धान्य व्यापाराकडे धान्य व गव्हाचे परवाना नसल्याचे समजले, तसेच अधिक माहिती घेतली असता ट्रक शहापूर शेनवे येथून जुन्नर कडे काळया बाजारात विक्रीसाठी जात असल्याचे प्रथमदर्शनी समजले. त्यामुळे पोलिसांनी हा ट्रक ताब्यात घेतला आहे. टोकावडे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नाईक यांची सामाजिक कार्यकर्ते दिनेश जाधव यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन माहिती घेतली असता तहसीलदार कार्यालय मुरबाड यांना याबाबत पत्र देऊन कळविले आहे अशी माहिती मिळाली. पुरवठा निरीक्षक यांनी पोलीस ठाण्यात जाऊन पंचनामा केला आहे. त्यामुळे आता पुढे काय कारवाई होते व रेशनिंगचा काळा बाजार आता तरी थांबेल का? असा सवाल करत आदिवासी क्रांति सेनेचे अध्यक्ष दिनेश जाधव यांनी याप्रकरणी सखोल चौकशीची मागणी मा . जिल्हा पुरवठा अधिकारी ठाणे यांच्याकडे करणार असल्याचे आमच्या दै, बित्तंबातमीचे प्रतिनिधी यांच्याशी बोलताना सांगितले.

माजी सैनिक डॉ. भाऊराव तायडे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

माजी सैनिक डॉ. भाऊराव तायडे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण पालघर : माजी सैनिक डॉ. भाऊराव पुंडलिक तायडे (रा. पालघर) यांनी मालमत्ता कर माफी व मालमत्ता नोंदीतील त्रुटींच्या विरोधात जिल्हाधिकारी…

 पालघरमधील आदिवासी सुरांचा देश पातळीवर सन्मान

पालघरमधील आदिवासी सुरांचा देश पातळीवर सन्मान भिकल्या धिंडा यांना पद्मश्री जाहीर योगेश चांदेकर पालघरः पालघर जिल्ह्यातील आदिवासी मातीतील सुरांची आज देश पातळीवर दखल घेतली गेली. केंद्रीय गृह मंत्रालयाने जाहीर केलेल्या पद्म पुरस्कारांच्या यादीत पालघर जिल्ह्यातील आदिवासी कलाकार भिकल्या धिंडा यांचे नाव जाहीर झाले आहे. तारपा वाद्याच्या माध्यमातून आदिवासी संस्कृती जगभर पोहोचवणाऱ्या भिकल्या धिंडा यांचा सन्मान झाल्याने संपूर्ण आदिवासी समाजालाच हा आपला सन्मान वाटत आहे. केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर केलेल्या पद्म पुरस्कारामध्ये पालघर जिल्ह्याचे नाव सुवर्णाक्षरांनी नोंदले गेले आहे. ९२ वर्षीय भिकल्या धिंडा यांच्या वाद्यातून निर्माण होणारे स्वर हे केवळ संगीत नसून, वारली आदिवासी संस्कृतीची ओळख नाळ आणि आत्मा आहेत. चार पिढ्या धिंडा कुटुंबांने तारपा वाजण्याची परंपरा कायम ठेवली आहे. ऐंशी वर्षे तारपा वाजनात भिकल्या धिंडा यांना वयाच्या दहाव्या वर्षापासून तारपा वाजवण्याचा छंद लागला. त्यांच्या घरात तारपा वाजवणारी ही चौथी पिढी आहे, असे ते सांगतात. गुराढोरा सोबतच रानावनात भटकताना तारपा वाजवण्याचा छंद मला लागला. तो छंद आदिवासी संस्कृती जोपासण्यासाठी मी आजही जपतो, केवळ मीच तारपा वाजवून थांबत नाही, तर अनेक तरुणांनाही तारपा वाद्य वाजवायला शिकवले आहे. आजच्या मोबाईलच्या युगात तरुण आपल्या संस्कृतीकडे लक्ष देत नाहीत, हे खरे असले, तरी मी मात्र तरुणांना आदिवासी संस्कृतीचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करतोय, असे ते विनयाने सांगतात. दहा फूट लांबीचा तारपा वाजवणे हे वैशिष्टय भिकल्या धिंडा हे पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील वाळवंडा गावचे रहिवासी आहेत. ते वारली आदिवासी संस्कृतीचे खंदे पुरस्कर्ते आहेत. त्यांच्या घरात अठरा विश्व दारिद्र्य असले, तरी त्यांनी आपली संस्कृती प्राणपणाने जोपासली आहे. दीडशे वर्षाची तारपा वादाची परंपरा जपत पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी केले आहे. साधारणपणे तारपा हे वाद्य बांबू आणि सुक्या भोपळ्यापासून बनवले जाते; मात्र भिकल्या धिंडा यांची याबाबतही एक विशेष ओळख आहे. ते दहा फूट लांबीचा अवाढव्य तारपा अत्यंत सहजतेने वाजवतात .इतक्या मोठ्या तारपासाठी लागणारी फुफ्फुसाची ताकद, श्वासावरचे नियंत्रण आणि कलेवरील त्यांचे प्रभुत्व पाहून सर्वच जण थक्क होतात. हातात काठी आणि सोबतीला तारपा वाद्य घेऊन भिकल्या धिंडा हे वयाच्या दहाव्या वर्षापासून तास न तास सराव करायचे. सुमारे ऐंशी वर्ष ते तारपा वाजवत असून त्यांची सुरावरील पकड आजही तितकीच घट्ट आहे. शरीर थकले, तरी उत्साह कायम तारपा हेच आपले दैवत आहे, असे ते मोठ्या अभिमानाने सांगतात. आदिवासी संस्कृतीमध्ये तारपा नृत्याला आणि वाद्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आत्तापर्यंत त्यांना शेकडो स्थानिक आणि राज्यस्तरीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे; मात्र पद्मश्री हा या सर्व सन्मानात मोठा सन्मान असून आता ही कला केवळ आपल्या पुरती मर्यादित न ठेवता पुढच्या पिढीने ती जपली पाहिजे असे भावनिक आवाहन पद्मश्री सन्मान जाहीर झाल्यानंतर त्यांनी केले. वयोमानानुसार शरीर थकले असले, तरी तारपा फुंकताना त्यांच्यात येणारा उत्साह आजही थक्क करणारा आहे. यंदाच्या पद्म पुरस्कारात आपले नाव आल्याचे त्यांना दिल्लीवरून कळवले, तेव्हा त्यांना हा आदिवासी संस्कृतीचा सन्मान आहे आपण निमित्त मात्र आहोत अशी विनयाची भावना ते व्यक्त करतात. कुटुंबात २२ माणसे आहेत. आठ गुंठे जमीन आहे. दुसरा व्यवसाय नाही. नोकरी नाही, तरी त्यांची जगण्याची धडपड अजून थांबलेली नाही. त्याबाबत ते कुणालाही दोष देत नाहीत. लहानशा झोपडीत आजही ते राहतात. पुरस्कारातून बांधले घर महाराष्ट्र सरकारने तसेच केंद्र सरकारने दिलेल्या पुरस्काराच्या काही रकमेतून त्यांनी हे घर बांधले आहे. त्यांना आत्तापर्यंत शेकडो पुरस्कार मिळाले असले, तरी एकतारा गुरुकुल तर्फे देण्यात आलेली तारपा शिरोमणी पदवी, सांस्कृतिक सेनानी सन्मान, राष्ट्रीय संगीत नृत्य आणि नाटक अकादमीकडून दिला गेलेला संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्कार, पालघर भूषण पुरस्कार, पालघर जिल्हा परिषदेचे ब्रँड पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. पद्मश्री पुरस्काराने या सन्मानांचाच आणखी सन्मान झाला आहे. कोट ‘आदिवासी कलेची केंद्र सरकारने दखल घेतली. पद्मश्री जाहीर झाला. कलेनेच मला मोठे केले. माझी जागतिक पातळीवर दखल घेतली गेली. ही कला, संस्कृती टिकली पाहिजे. भिकल्या धिंडा, पद्मश्री सन्मान प्राप्त कलाकार

मुरबाड नगरीत भव्य अखंड हरीनाम सप्ताहचे आयोजन

मुरबाड नगरीत भव्य अखंड हरीनाम सप्ताहचे आयोजन राजीव चंदने मुरबाड : गुरूप्रतिपदेच्या पर्वकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पटांगणात  मुरबाड तालुका भागवत वारकरी समाजसेवा मंडळाच्या विद्यमाने भव्य  अखंड हरिनाम सप्ताह सोमवार, २ फेब्रुवारी ते सोमवार, ९ फेब्रुवारी या कालखंडात आयोजित करण्यात आला आहे. इ.स. १९९८ साली गुरुवर्य वैकुंठवासी श्रीराम दादा जोशी यांनी अनुष्ठानपूर्वक सामुदायिक श्रीज्ञानेश्वरी पारायणाची मुहूर्तमेढ मुरबाडच्या मातीत रोवली. यावर्षी पारायण सोहळ्याचे एकोणतीसावे वर्ष आहे. आचार्य अशोकभाई खरे , निलेश जोशी आणि योगी फुलनाथ महाराज यांच्या पावन उपस्थितीत पारायण सोहळ्याचा प्रारंभ होईल.पारायण नेतृत्व श्रीमहंत प्रमोद महाराज जगताप आणि पारायणाचार्य,एकनाथ महाराज कोष्टी करणार आहेत.सदर उत्सवात पुणे येथील वेदमूर्ती शमंदारशास्त्री खळदकर यांची दररोज सायंकाळी चार ते सहा या वेळेत श्रीरामरक्षा या विषयावर प्रवचने होणार आहेत.रोज रात्री आठ ते दहा या वेळेत सर्वश्री विक्रांत महाराज पोंडेकर,जयेश महाराज भाग्यवंत,सुभाष महाराज गेठे,माधवदास महाराज राठी,भगीरथ महाराज काळे,ओंकार महाराज दुडे,आचार्य डॉ.रामकृष्णमहाराज लहवितकर यांची कीर्तने होणार आहेत.दिनांक आठ फेब्रुवारीला भव्य पालखी सोहळा आणि दिव्य असा दीपोत्सव संपन्न होईल. सोमवार दिनांक नऊ रोजी वैष्णवभूषण श्रीमहंत प्रमोद महाराज जगताप यांच्या काल्याच्या कीर्तनाने उत्सवाची सांगता होणार आहे.या महोत्सवात हजारो भाविकांना अन्नदान करण्यात येणार आहे.या  धर्मकार्यात भाविकांनी सर्वतोपरी सहकार्य करावे तसेच सोहळ्यात उपस्थित राहून भक्तिसुखाचा आनंद लुटावा असे आवाहन उपरोक्त मंडळाने केले आहे.