Category: पालघर

palghar news

 भुवन शाळेच्या खेळाडूंवर ग्रामस्थांकडून भेटवस्तूंचा वर्षाव…

भुवन शाळेच्या खेळाडूंवर ग्रामस्थांकडून भेटवस्तूंचा वर्षाव… प्रजासत्ताकदीनी पोलीस निरिक्षक दादासो एडके यांच्या हस्ते शाळेच्या खेळाडूंचा गौरव! राजीव चंदने मुरबाड : जिल्हा स्तरावर लंगडी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्या बद्दल जि. प. भुवन शाळेच्या खेळाडूंचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे. आज ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून या सर्व विद्यार्थ्यांवर ग्रामस्थांकडून व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुरबाड कडून विशेष भेटवस्तू,ड्रेस, शैक्षणिक साहित्य, गौरवचिन्ह देऊन विशेष कौतुक करण्यात आले. हा कौतुक सोहळा मुरबाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक दादासाहेब एडके, प्रसिद्ध समाजसेवक व दानशूर व्यक्तिमत्व मेहबूबभाई पैठणकर, गटशिक्षणाधिकारी मधुकर घोरड, रघुनाथ बांगर यांच्या शुभहस्ते पार पडला. प्रथमच जिल्हा परिषद भुवन शाळेच्या खेळाडूंना जिल्हा स्तरावर प्रथम बक्षीस भेटल्यामुळे सर्व ग्रामस्थांना व शिक्षकांना अत्यानंद झाला आहे.विजेत्या संघाचे ढोलताश्याच्या गजरात मिरवणूक काढून ग्रामस्थांनी स्वागतही करण्यात आले. आज प्रजासत्ताक दीनाचे औचित्य साधून सर्व ग्रामस्थांनी या खेळाडूंचे गोड कौतुक करत, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत शैक्षणिक साहित्याची भेट दिली आहे.तसेच यामध्ये महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतिनेही दप्तर, वह्या, ट्रॉफी देऊन या मुलींना प्रोत्साहन देण्यात आले. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून पोलीस निरिक्षक दादासाहेब एडके, यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे, दररोज होणारे अपघात या विषयी मार्गदर्शन करून शाळेचे शिक्षक व खेळाडूंना पुढील भावी शैक्षणिक वाटचालीस  शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी पोलीस निरिक्षक दादासो एडके, गटशिक्षणाधिकारी मधुकर घोरड, समाजसेवक मेहबूबभाई पैठणकर,  सरपंच भुमिका बांगर,उपसरपंच सुनिल बांगर, माजी सरपंच रघुनाथ बांगर,दर्शना बांगर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप बांगर,ग्रामसेविका सौ. सिंघासने, रिपाईचे दिनेश उघडे, अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे अण्णा साळवे, लोकक्रांतीचे नरेश मोरे, रमेश देसले, जितेंद्र पंडित,सुधाकर शेळके, पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष शंकर करडे, तालुका अध्यक्ष दिलीप पवार, सचिव संजय बोरगे, संतोष राऊत,मिडियासेलचे चेतन पोतदार, राजिव चंदने,शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जखमी कासवावर उपचार करून सोडले समुद्रात

जखमी कासवावर उपचार करून सोडले समुद्रात धवल लक्ष्मी हे स्थानिक नावही दिले कासवाने केला १८४७ किलोमीटरचा प्रवास योगेश चांदेकर पालघरः अरबी समुद्रालगत डहाणू येथे वन विभागांतर्गत सागरी कासव संक्रमण उपचार केंद्र आहे. या केंद्रात समुद्रात जखमी झालेल्या कासवांवर उपचार केले जातात. गेल्या काही महिन्यांपूर्वी दक्षिण मध्य समुद्रात वावरणारे कासव डहाणूनजीक आढळले. हे कासव जखमी असल्याने त्याच्यावर उपचार करण्यात आले. त्याला फिजिओथेरपी देण्यात आली. समुद्रात ते पोहण्यास सक्षम आहे, की नाही याचा विचार करून नंतर ते समुद्रात सोडण्यात आले. धवल लक्ष्मी हे कासव दक्षिण मध्य समुद्रात पोहोचले आहे. डहाणू येथील सागरी कासव संक्रमण केंद्र कासवांवरील उपचारासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी ओलिव्ह रीडले, ग्रीन सी, लॉगर हेड, हॉक्सबीन यासारख्या कासवाच्या प्रजाती आढळतात. असंख्य समुद्र कासवांना जीवदान देण्याचे कार्य डहाणूच्या समुद्रालगत असलेल्या कासव संक्रमण उपचार केंद्रात केले जातात. फिजिओथेरपीने उपचार दहा ऑगस्ट रोजी ओलिव्ह रीले जातीचे कासव जखमी अवस्थेत आढळले होते. अशक्त व जखमी अवस्थेत कासव पाहिल्यानंतर तेथील मच्छीमारांनी वनविभागाला कळवले. वनविभागाच्या ‘रेस्क्यू टीम’ने या जखमी कासवाला सागरी कासव उपचार केंद्रात दाखल केले. कासवावर फिजिओथेरपी तसेच अन्य औषधोपचार करण्यात आले. स्टमक ट्यूबच्या मदतीने त्याला खाद्य देण्यात आले. जखमांवर योग्य ते उपचार आणि योग्य काळजी घेतली गेली. २९.६ किलो वजनाचे हे कासव महाराष्ट्रात प्रथमच आढळले. ते पोहण्यास सक्षम झाल्यानंतर त्याला पुन्हा समुद्रात सोडण्यात आले. अशा प्रकारचा हा प्रयोगही महाराष्ट्रात पहिलाच होता. सॅटेलाईट टॅगच्या मदतीने लक्ष या कासवाचा समुद्रातील प्रवास कसा असेल, यावर देखरेख ठेवण्यासाठी संशोधकांनी भारतीय वन्य जीवन संस्थेच्या मदतीने सॅटेलाईट टॅग बसवला. मादी जातीच्या या कासवाचे नाव धवललक्ष्मी असे ठेवण्यात आले. धवल कंसारा यांचे  ४ फेब्रुवारी २०२३ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यानंतर त्यांची आठवण म्हणून तसेच डहाणूला असलेल्या महालक्ष्मी देवीमुळे या कासवाचे नाव धवल लक्ष्मी असे ठेवण्यात आले. वीस नोव्हेंबरला हे कासव समुद्रात सोडण्यात आले. धवल कंसारा यांनीच ‘ॲनिमल सेविंग ग्रुप’ स्थापन केला होता. त्यामुळे त्याचेच नाव या कासवाला देण्यात आले. आता ते समुद्रात सोडण्यात आले असून, त्याची अचूक दिशा सॅटेलाईटमधून कळते. सध्या ते डहाणूपासून १८४७ किलोमीटर अंतरावर दक्षिण मध्य समुदात आहे. कासवावर बसवलेले सॅटेलाईटची कालावधी एक वर्ष इतके आहे. त्यातील यंत्रणा ही कासव पाण्याच्या पृष्ठभागाबाहेर पडल्यास कासवाची अचूक दिशा दाखवते. मासेमारांच्या जाळ्यात अडकून जखमी डॉ. दिनेश व्हिनेरकर व डॉ.जानवी जाधव, टीटीसीमधील प्राणी रक्षक रेमंड डिसोझा व प्रतिक वाहुरवाघ आणि ‘वाईल्ड लाईफ कन्झरवेशन’ आणि ॲनिमल वेलफिअर असोसिएशन’ चे सर्व सदस्य एरिक ताडवाला, पूर्वेश तांडेल, मानद वन्यजीव रक्षक हार्दिक सोनी व संपूर्ण वन अधिकाऱ्यांनी या कासवावर उपचार करून लक्ष ठेवले. सागरी कासव हे मुळात समुद्रात असलेल्या गाळ स्वच्छ करण्याचे काम करतात. अनेकदा ते मच्छीमारांच्या मासे पकडण्याच्या जाळ्यात पडतात. अशावेळी त्यांची सुटका जाळ्यातून होत नाही. त्यांना अंतर्बाह्य जखमा होऊ शकतात. बरेच मच्छीमार ही वेगवेगळी जाळी वापरत असतात. त्याला घोस्ट नेटजाळी’ म्हणतात. श्वास घेता न आल्याने त्याला जखमा होतात. त्याला ‘ल्फोटिंग सिंड्रोम’ असे म्हणतात. त्याच्या पोटात बऱ्याचदा प्लास्टिक दिसते. धवल प्राणीप्रेमी धवल लक्ष्मी नावामागे एक खूप मोठे कारण आहे, ज्या सागरी बचावासाठी व सागरी कासव केंद्र उभारणी करण्यामागे त्याने पहिले पाऊल उचलले. वन्यजीव रक्षक धवल कंसारा म्हणून नामांकित असा एक वन्यजीव प्रेमी होता. तो आज जगात नाही. त्यांच्या आठवणी टिकून राहाव्यात, म्हणून धवल असे व लक्ष्मी म्हणजे डहाणूमध्ये सुप्रसिद्ध असलेली महालक्ष्मी मंदिर आहे. त्याला अनुसरून धवल लक्ष्मी असे नाव त्या कासवाला देण्यात आले.

जल,जंगल,जमीनसाठी आदिवासीर रस्त्यावर

जल,जंगल,जमीनसाठी आदिवासीर रस्त्यावर पालघर : जल,जंगल आणि जमीनीसाठी आदिवासी आता रस्त्यावर उतरली आहे. पालघर जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या जमिनी संदर्भातील प्रश्न तसेच रोजगार हमी, प्रलंबित वन हक्क दावे, स्मार्ट मीटर संदर्भातील समस्या, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, रेशन, शिक्षण, आरोग्य, रोजगार व पेसा अंतर्गत नोकर भरती सारखे प्रश्न सुटले नाही तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाने पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर आणलेला लॉंग मार्च रुपी आंदोलन अनिश्चित काळापर्यंत सुरू ठेवण्याची असा इशारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे यांनी दिला. पालघर जिल्ह्यात राबवण्यात येणाऱ्या वाढवण व मुरबे बंदर, सागरी विमानतळ, चौथी मुंबई सारख्या प्रकल्पांमुळे अदानी व मूठभर धनाड्यांचा लाभ होणार असून हजारो शेतकरी मच्छिमार व आदिवासी कुटुंब देशोधडीला लागतील असे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय नेते डॉ. अशोक ढवळे यांनी पालघर येथे केले. चारोटी (डहाणू) येथून काल (सोमवारी) दुपारी सुरू झालेला लॉंग मार्च मोर्चा आज सायंकाळी उशिरा आले पालघर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दाखल झाला. या मोर्चामध्ये ३५ हजार पेक्षा अधिक नागरिकांचा उस्फूर्त सहभाग लाभला होता. सन २०१८ मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने नाशिक – मुंबई दरम्यान काढलेल्या लॉंग मार्च प्रसंगी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किसान सभा सोबत केलेल्या मागण्यांबाबत करारनामा केला होता. मात्र त्यामधील समाविष्ट बहुतांश मागण्यांची अंमलबजावण झाली नसल्याने कम्युनिस्ट पक्षाने वेळोवेळी लढे दिले, मोर्चे व आंदोलनाचे ठिकठिकाणी आयोजन केले होते. मात्र या आंदोलनाची दखल न घेतली गेल्याने पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर लॉंग मार्च चे आयोजन केल्याची माहिती देण्यात आली.

भ्रष्ट्राचाराची जिल्हा परिषदेने घेतली दखल

बित्तंबातमी इम्पॅक्ट : पालघर पोषण आहार भ्रष्ट्राचाराची जिल्हा परिषदेने घेतली दखल स्लग- शिक्षकासह विस्तार अधिकाऱ्यांना नोटीस ० तात्काळ अहवाल सादर करण्याचे गटशिक्षण अधिकाऱ्याला आदेश० शाळेत पोषण आहाराएवेजी थेट तांदाळाचे केले होते वाटप…

शालेय राज्यस्तरीय बेसबॉल स्पर्धेत पुणे विभागाच्या मुलांचा तर नाशिक विभागाच्या मुलींचा विजय अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांची प्रमुख उपस्थिती

शालेय राज्यस्तरीय बेसबॉल स्पर्धेत पुणे विभागाच्या मुलांचा तर नाशिक विभागाच्या मुलींचा विजय अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांची प्रमुख उपस्थिती अशोक गायकवाड पालघर :सफाळे येथे आयोजित शालेय राज्यस्तरीय १९ वर्षांखालील…

आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

आदिवासी विद्यार्थ्यांची सुरक्षा राम भरोसे शासकीय आश्रमशाळेत रूपांतर करण्याची मागणी राजीव चंदने मुरबाड : तालुक्यातील अनुदानीत आदिवासी आश्रमशाळेतील एका दहावी इयत्तेत शिकणार्‍या  विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडलीआहे.…

३८वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा

धिर्ती अहिरवालला जलतरणात सुवर्णपदक हलदवानी : पालघरच्या धीर्ती अहिरवाल हिने ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील जलतरणच्या २०० मिटर बटरफ्लाय प्रकारात महाराष्ट्राला सुवर्णपदक जिंकून देण्याचा पराक्रम केला. धिर्तिने २ मिनिटे २३.८० सेकंद वेळेसह सुवर्ण पदकावर मोहोर उमटवली. कर्नाटकची सुहासिनी घोष व आसामची अस्था चौधरी यांना अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक मिळाले. रीलेमध्ये रौप्य व कांस्य! जलतरणातील महिलांच्या ४ बाय २०० मिटर फ्री स्टाईल प्रकारात महाराष्ट्राला रौप्य पदक मिळाले, तर पुरुषांच्या ४ बाय २०० मिटर फ्री स्टाईल प्रकारात महाराष्ट्राला कांस्यपदक मिळाले. महिला गटात अन्वी देशवाल, सान्वी देशवाल, धिर्ति अहिरवाल व अदिती हेगडे या चौकडीने ९ मिनिटे ९.३७ सेकंद वेळेसह रूपेरी यशाला मिठी मारली. कर्नाटक संघाने सुवर्णपदक पटकाविले, तमिळनाडूला कांस्यपदक मिळाले. पुरुष गटात शुभम धायगुडे, ओम साटम, ऋषी भगत व ऋषभ दास या चौघांनी ७ मिनिटे ५५.६२ सेकंद वेळेसह कांस्यपदकाची कमाई केली.  कर्नाटक व गुजरात संघाने अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक पटकाविले.

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त, मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त  संजय श्रीपतराव काटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य ग्रंथदिंडी आणि ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन

विविध शेती उपयोगी योजनांचा लाभ घेऊन कुटूंबाचे आर्थिक उत्पन्न वाढवावे – गोविंद बोडके

अशोक गायकवाड पालघर : विविध शेती उपयोगी योजनांचा लाभ घ्यावा व कुटूंबाचे आर्थिक उत्पन्न वाढवावे असे आवाहन जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी शेतकऱ्यांना केले आहे. विविध योजनेचा लाभ देण्याकरीता प्राथमिक टप्यांत जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या नेतृत्वात व रोहयो विभागाच्या उपजिल्हाधिकारी विजया जाधव यांच्या उपस्थितीत मे. टाटा मोटार्स (सीआरएस) यांच्यासोबत सांमज्यस्य करार १४ फेब्रुवारी २०२४ रोजी करण्यात आला, त्यानुसार पालघर जिल्हयात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत टाटा मोटर्स (सीआरएस) यांनी कृषी विभागाच्या अभिसरणातून १ एकर लाभार्थी यांना एकत्रित (आंबा ५० रोपे व काजू ५० रोपे व १०० बांबू रोपे वाटप करण्यात आले आहेत. सदर लाभार्थ्यांना टाटा मोटार्स मार्फत प्रशिक्षण देण्यात आले असून त्याबाबत योग्य पद्धतीने लागवड व संगोपन करण्याचे नियोजन केल आहे.आजपर्यंत मग्रारोहयो अंतर्गत टाटा मोटार्स व कृषी विभागामार्फत १ हजार ४१० हेक्टर वर एकूण ३ हजार ६९२ लाभार्थी यांना लाभ देण्यात आले असून सदर लाभार्थ्यांना कृषी विभागामार्फत मनरेगा मधून १०० टक्के अनुदान पुढील ३ वर्ष देण्यात येणार आहे. तसेच नियोजित कार्यक्रमामधुन मग्रारोहयो अंतर्गत १ हजार ८२८ हेक्टरवर ४ हजार ५५४ लाभार्थ्यांना फळबाग लाभ देण्यात आला आहे. पालघर जिल्हयात एकत्रित ३ हजार २३८ हेक्टर वर एकूण ८ हजार २४६ लाभार्थ्यांना विक्रमी फळबाग योजनेचा लाभ देण्यात आला आहे, सदर योजने अंतर्गत सर्व लाभार्थ्याना पूढील ३ वर्ष १०० टक्के अनुदान देण्यात येऊन शेतकऱ्यांना फळबाग लागवडीतून उत्पन्न वाढ होऊन आर्थिक स्थैर्य लाभण्यास मदत होईल. राज्यातील महत्त्वाकांक्षी सी एम बांबू मिशन प्रकल्पामध्येही पालघर जिल्हयातील शेतकऱ्यांना उच्च प्रजातीचे बांबू रोपे सलग व बांधावर लागवडीकरीता उपलब्ध करून देण्यात आली असून या माध्यमातून शेतकऱ्यांना पुढील ४ वर्षात व्यावसायिक बांबूचे उत्पादन सुरु होण्यास मदत होईल. जिल्हयात आजतागायत १हजार ४९५ हेक्टरवर ५ हजार २८२ लाभार्थ्यांना लाभ मिळाला असून यापुढेही लाभार्थ्यांना लाभ देण्याची कार्यवाही प्रगतीपथावर आहे. मनरेगा केवळ मागेल त्याला अकुशल काम व त्यातून दैनंदिन मजूरी मिळविणे असे जुने स्वरुप राहिले नसून मनरेगातील वैयक्तिक लाभाच्या कामांचा लाभ घेऊन कुटूंब लखपती होऊ शकते व त्यायोगे सर्वांगिण समृध्द होऊ शकते. जिल्हयातील सर्व शेतकऱ्यांनी मगांराग्रारोहयो विभागामार्फत फळबाग, बांबू लागवड, बरोबरीने विविध शेती उपयोगी योजनांचा लाभ घ्यावा व कुटूंबाचे आर्थिक उत्पन्न वाढवावे असे आवाहन जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

नर्सिंग हे मानवतेची सेवा करणारे व्रत

गावित यांचे गौरवोद्गार जी. एन. एम नर्सिंग विद्यार्थ्यांचा शपथविधी सोहळा योगेश चांदेकर पालघरः नर्सिंग हा व्यवसाय नसून मानवतेची सेवा करण्याचे हे व्रत आहे. जगभरातच सध्या नर्सिंग स्टाफचा तुटवडा असून पालघर येथील ‘देव मोगरा फाउंडेशन ट्रस्ट’ संचलित ‘सूर्या इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग सायन्स’च्या विद्यार्थ्यांना भारताबरोबरच परदेशातही उत्तम व गुणवत्तापूर्ण सेवा देण्याची संधी आहे. ते पालघरचे नाव जगभरात उंचावतील, असा विश्वास आमदार राजेंद्र गावित यांनी व्यक्त केला. ‘देव मोगरा फाउंडेशन ट्रस्ट’च्या व ‘सूर्या इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग सायन्स’च्या प्रथम वर्षाच्या जी.एन. एम. नर्सिंग विद्यार्थ्यांच्या शपथविधी सोहळ्यात गावित प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या वेळी बोईसरचे आमदार विलास तरे, पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष चौधरी, माजी नगराध्यक्ष उज्वला काळे, शिवसेनेचे प्रवक्ते केदार काळे, संस्थेचे अध्यक्ष शांताराम वळवी, सचिव जतिन संखे, उपाध्यक्ष रूपाली गावित, सदस्य रोहित गावित आदी उपस्थित होते. प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना गावित यांनी फ्लॉरेन्स नाइंटिगेल यांच्या परिचारिका सेवेच्या व्रताचा पाया तसेच मुंबईतील काशीबाई गणपत या पहिल्या परिचारिकेने आरोग्य सेवेतील दिलेल्या योगदानाचा उल्लेख केला. पालघर जिल्ह्यात गेल्या पंधरा वर्षात पाच हजार एक्केचाळीस मुलाचे मृत्यू कुपोषण आणि पुरेशा उपचाराअभावी झाले. त्याला केवळ आरोग्य विभाग जबाबदार नसून प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांचा आणि तंत्रज्ञनाचा अभाव हे कारण असल्याचे त्यांनी सांगितले. माता, बाल मृत्यूचे प्रमाण नाशिक जिल्ह्यातील कळवण, नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ, अमरावती परिसरातील चिखलदरा तसेच गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातही पालघर जिल्ह्यासारखीच स्थिती आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना दोष देऊन चालणार नाही. त्यांची चूक आहे, तिथे बोलले पाहिजे, त्याचबरोबर त्यांना आवश्यक त्या सुविधा दिल्या पाहिजेत, ही लोकप्रतिनिधी म्हणून आमची जबाबदारी आहे, असे त्यांनी सांगितले. प्रशिक्षण घेतलेले पुरेसे कर्मचारी मिळत नाही, ही शासनाची अडचण आहे, असे गावित म्हणाले. दक्षिणेतील परिचारिका जगभर दक्षिण भारतातील केरळ, तामिळनाडू या राज्यात परिचारिकांचे प्रमाण मोठे आहे. सेवाभाव हा त्यांच्या वृत्तीत आहे. त्यामुळे आखाती देशात तसेच आपल्या देशातही विविध ठिकाणच्या रुग्णालयात केरळ आणि तामिळनाडूच्या परिचारिकांचे प्रमाण मोठे आहे, असे निदर्शनास आणून गावित म्हणाले, की  आता आपल्याकडे हे प्रमाण वाढले आहे. अनेक ठिकाणी एकट्या कुटंबात वृद्धांची सेवा करण्यासाठी आता परिचारिकांना मागणी आहे. परिचारिकांची कामगिरी ही केवळ पैशात मोजाली जाणारी नाही, तर त्यापेक्षा खूप महत्त्व आहे. समाजसेवेतील ते एक महत्त्वाचे कार्य आहे. हिरो आणि समाजाची आई! परिचारिका ही रुग्णांसाठी केवळ सिस्टर नसून ती सेवाभावाने काम करणारी आई असते. रुग्णांची काळजी घेण्यासोबतच त्यांना सावरण्यास मदत करीत असते. त्यामुळे पॅरामेडिकल स्टाफ हा खऱ्या अर्थाने समाजाचा ’हिरो’ असतो. समर्पण, मेहनत, कौशल्य हे जर असेल तर कोठेही चांगली नोकरी मिळू शकते. आणि तंत्रज्ञानाच्या बदलाबाबत तुम्ही सातत्याने सतर्क राहा आणि स्वतःला अपडेट करत राहा, असा सल्ला गावित यांनी दिला. पालघर आणि राज्याचे नावही ‘देव मोगरा फाउंडेशन ट्रस्ट’च्या ‘सूर्या इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग’चे विद्यार्थी जगात उज्वल करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भविष्यातही उत्तम संधी या वेळी आमदार तरे म्हणाले, की नर्सिंग हे सेवाभावी क्षेत्र आहे आणि सध्याची परिस्थिती पाहता भविष्यातही नर्सिंग क्षेत्राला उत्तम संधी निर्माण होणार आहेत. नर्सिंग क्षेत्रातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी संवेदनाशील, दक्ष, शिस्तप्रिय व समाजसेवी वृत्तीचे असणे महत्त्वाचे आहे. या वेळी बाळासाहेब पाटील यांनीही फ्लॉरेन्स नाईंटिंगेल यांच्या कार्याचा तसेच मदर तेरेसा यांच्या कार्याचा गौरव करताना परिचारिकांच्या कामाचे महत्त्व अधोरेखित केले. या क्षेत्राला भावी काळातही मोठा वाव आहे असे त्यांनी सांगितले. 00000