Category: पालघर

palghar news

नारायण राणेंच्या रूपाने आम्हाला दमदार नेतृत्व लाभले — मुख्यमंत्री फडणवीस

वाढदिवस सोहोळा थाटामाटात संपन्न कणकवली (प्रतिनिधी)- माझ्या संसदीय कामकाजाची सुरुवात राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली हे मी माझं भाग्य समजतो. विधानसभेत विरोधी पक्ष नेता म्हणून राणे यांनी केलेली भाषणे ऐकण्याची, बघण्याची संधी मला प्राप्त झाली. अर्थसंकल्पावरील त्यांची भाषणे तर नक्कीच अभ्यासू होती. तरी यापुढेही त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करत राहावे अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार नारायण राणे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.   माजी मुख्यमंत्री, भाजपाचे खासदार नारायण राणे यांचा ७४ वा वाढदिवस सोहोळा qqq अतिशय थाटामाटात आणि दिमाखात पार पडला.  राज्यातील महनीय व्यक्तींच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नारायण राणे आणि त्यांच्या पत्नी नीलम राणे यांचा सत्कार करण्यात आला. या सोहळ्याला उद्योग मंत्री उदय सामंत, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार  प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, दीपक केसरकर महायुतीतील घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी कार्यकर्ते राज्याच्या विविध भागातून आलेले त्यांचे मित्र, चाहते या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना राणे  अतिशय भाऊक  झाले होते.’आपण पद मिळवण्यासाठी कधी काम केले नाही, मेहनत आणि निर्धार यामुळेच आपण समाजकारणात आणि राजकारणात यशाच्या शिखरावर पोहोचलो’ असे उदगार त्यांनी सत्काराला उत्तर देतांना काढले शिवसेनाप्रमुख कै.बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादामुळेच आपण हे यश मिळवू  शकलो असे म्हणत त्यांनी ठाकरे यांच्या प्रति आपले ऋण व्यक्त केले. राणीसाहेबांच्या हृदयातच कोकण आहे आणि म्हणूनच त्यांनी कोकणच्या  विकासाला दिशा देण्याचे  काम केले  अशा शब्दात फडणवीस यांनी राणे यांचे कौतुक केले. विधिमंडळातील त्यांच्या कामकाजाचा गौरव करताना फडणवीस म्हणाले, अर्थसंकल्पावर ज्यावेळी राणेसाहेब भाषण करायचे त्यावेळी कोणीतरी अर्थतज्ञ बोलतोय असा  भास व्हायचा अशा शब्दात त्यांनी राणे यांचे कौतुक केले. ‘त्यांचा दरारा आपण विधानसभेत बघितला आहे एवढेच नव्हे तर विरोधी पक्षनेता म्हणून ते सरकारला पळता भुई थोडी करायचे हेही आपण पाहिले आहे. एक दिलदार, शिस्तप्रिय व्यक्तिमत्व. कामात गुणवत्ता या गुणांसोबतच हजारो लोकांचे जीवनमान त्यांनी बदलून टाकले असे गौरवपूर्ण उदगारही त्यांनी यावेळी काढले.  त्यांचे दोन्ही पुत्र नितेश आणि निलेश हे त्यांचा वारसा समर्थपणे चालवतील असा विश्वास  फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनीही राणे यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला. विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी केलेली भाषणे वाचा आणि अभ्यासा, असा सल्ला नव्या आमदारांना देत गडकरी म्हणाले,संसदीय इतिहासातला एक आदर्श विरोधी पक्ष नेता म्हणून राणे यांचा उल्लेख करावा लागेल अशा शब्दात गडकरी यांनी राणे यांचा  गौरव केला. सत्ताधाऱ्यांना कैचीत पकडण्याची शैली हे राणे यांच्या कडूनच  शिकावे  असा मोलाचा सल्लाही गडकरी यांनी  नव्या आमदारांना दिला. वाढदिवसाची भेट…! राणे हे शब्दाचे पक्के आहेत, तसा मी सुद्धा आहे असे म्हणत येत्या  मे महिन्यापूर्वी मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण होईल तसेच रत्नागिरी- कोल्हापूर हा  मार्गही पूर्ण होईल असे गडकरी यांनी जाहीर करत राणे यांना वाढदिवसाची भेट दिली. गेली अनेक वर्ष रखडलेल्या या महामार्गामुळे मी एवढी बदनामी सहन केली आहे की आता उदघाटन  करायला मी येणार नाही. मात्र काम पूर्ण होणार आहे असे त्यांनी जाहीर केले.  ‘कोकणातील कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम दादांनी केले. भाजपात प्रवेश केल्यानंतर कोकणात भाजपाचे बळ वाढले असे उदगार  भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काढले. रायगड जिल्ह्यात ‘राणे पॅटर्न’ राबवण्यासाठी राणेसाहेबांनी मला टिप्स द्याव्यात अशा शब्दात तटकरे यांनी आपल्या भावना व्यक्त करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ००००००००

रुग्णवाहिका एकाच जाग्यावर दीड तास बंद , रुग्णाच्या जीविताशी खेळ

रुग्णवाहिका एकाच जाग्यावर दीड तास बंद , रुग्णाच्या जीविताशी खेळ पालघर विभागात १०८ रुग्णवाहिन्यांबाबत गंभीर तक्रारी योगेश चांदेकर पालघरः राज्यातील आपत्कालीन आरोग्यसेवेचा कणा मानल्या जाणाऱ्या १०८ रुग्णवाहिका सेवांची अवस्था सध्या अत्यंत वाईट आहे. जिल्ह्यात सध्या १०८ च्या २९ रुग्णवाहिका कार्यरत असल्याचे सांगितले जात असले तरी त्या रुग्णवाहिकांची स्थिती अतीशय दयनीय आहे त्यामुळे अनेक रुग्णवाहिका तांत्रिक बिघाडामुळे मध्येच बंद पडतात. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत डहाणू तालुक्यातील वरोर येथे अशीच एक रुग्णवाहिका क्रमांक MH१४ CL.०६८४ रस्त्यात दीड तास बंद पडली होती; परंतु पर्यायी व्यवस्था वेळेत न केल्याने रुग्णाचे हाल झाले. राज्यात ग्रामीण तसेच दुर्गम भागात आणि महामार्गावर रुग्णाला तातडीने उपचार मिळावेत, यासाठी राज्य सरकारने १०८ सेवा सुरू केली. ग्रामीण व दुर्गम भागामध्ये ही सेवा हीच जीवनरेषा मानली जाते; परंतु गेल्या अनेक वर्षापासून १०८ रुग्णसेवेबाबत अतिशय गंभीर स्वरूपाच्या तक्रारी येत आहेत. तांत्रिक बिघाडामुळे या रुग्णवाहिका कुठेही बंद पडतात. काही वाहनांची देखभाल वेळेवर न झाल्याने त्या बंद अवस्थेत आहेत, तर काही वापरण्यास अयोग्य ठरत आहेत. त्यामुळे रुग्णांना तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध होत नाहीत. जिल्ह्याच्या ठिकाणी रक्त आणि ऑक्सिजन का नाही? पालघर हे जिल्ह्याचे ठिकाण असून या ठिकाणी सर्व आरोग्य सुविधा उपलब्ध व्हायला हव्यात. राज्य आणि केंद्र सरकार आदिवासी विभागातील रुग्णसेवेसाठी हजारो कोटी रुपये खर्च केल्याचा दावा करीत असले, तरी प्रत्यक्षात मात्र आदिवासी विभागातील रुग्णसेवेकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. गेल्या आठवड्यातच याबाबत उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले होते, तर भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनी विधान परिषदेत पालघर जिल्ह्यातील रुग्णसेवेचा पंचनामा केला होता. या पार्श्वभूमीवर आज पालघर येथे अनुसया मंगल्या भोईर यांना तातडीने रक्ताची तसेच ऑक्सिजनची गरज होती; परंतु पालघर येथे या सुविधा उपलब्ध होऊ न शकल्याने या महिलेला डहाणू येथे पाठवण्यात आले. जिल्ह्याच्या ठिकाणी रक्त आणि ऑक्सिजन का उपलब्ध होऊ शकला नाही, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत असून, जिल्ह्याच्या ठिकाणाहून तालुक्याच्या ठिकाणी रुग्णालयाला रेफर करण्याचा अजब प्रकार पालघरमध्ये झाला. रुग्णवाहिकेसोबत डॉक्टरही नाही रक्त आणि ऑक्सिजन पालघरला उपलब्ध न झाल्याने १०८ रुग्णसेवेच्या रुग्णवाहिकेतून या वयोवृद्ध महिलेला डहाणूला पाठवण्यात आले; परंतु पालघरपासून काही अंतरावर गेल्यानंतर मध्येच ही रुग्णवाहिका बंद पडली. ती सुरू करण्याचा प्रयत्न करूनही त्यात अपयश आले. पर्यायी रुग्णवाहिकेची मागणी करूनही ती दीड तासापर्यंत उपलब्ध होऊ शकली नव्हती. रक्त आणि ऑक्सिजनची तातडीची गरज असतानाही या महिलेला उपचारासाठी तसेच थांबून राहावे लागले. विशेष म्हणजे तातडीच्या आणि गुंतागुंतीच्या वेळी अशा रुग्णवाहिकेसोबत डॉक्टर देणे आवश्यक असतानाही या रुग्ण महिलेसोबत डॉक्टर दिलेला नव्हता. त्यामुळे पालघरचा आरोग्य विभाग किती निष्क्रिय आहे आणि किती बेपर्वाईने काम करतो हे यातून दिसून आले. आरोग्य विभागाकडून हेळसांड रुग्णवाहिका चालकाने पर्यायी रुग्णसेवेसाठी प्रयत्न केला; परंतु त्यालाही फारसा प्रतिसाद मिळाला नाही. पालघर जिल्ह्यातील आरोग्यव्यस्थेची स्थिती अधिकच चिंताजनक झाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालय आदीमध्ये डॉक्टरांची कमतरता असते. वेळेवर ‘ऑन कॉल’ डॉक्टर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे एका गर्भवती महिलेला उपचारासाठी कसे दोन-तीन तास फिरावे लागले आणि शेवटी खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागला, हे गेल्याच महिन्यात उघडकीस आले होते. त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सकांनी या प्रकरणी चौकशी करून त्याचा अहवाल आरोग्य उपसंचालकाकडे पाठवला असला, तरी अद्याप त्यावर कार्यवाही झाली नसताना आता पुन्हा रुग्णसेवेच्या हेळसांडीचा प्रकार उघडकीस आला आहे. मुले, महिला, वयोवृद्धांना फटका आदिवासी, दुर्गम भागामध्ये रुग्णसेवा तातडीने पोहोचणे आवश्यक आहे; परंतु अशाच भागामध्ये रुग्णवाहिका वेळेत पोहोचत नसल्याने गंभीर रुग्णांना जीव गमावा लागण्याच्या घटना वारंवार घडल्या आहेत. विशेषतः गर्भवती महिला, वृद्ध नागरिक आणि लहान मुलांना या परिस्थितीचा सर्वाधिक फटका बसला आहे. स्थानिक नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या असल्या, तरी त्यावर अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही. आरोग्य विभागाने तातडीने रुग्णवाहिकाची दुरुस्ती, आरोग्य विभागात पुरेसे मनुष्यबळ आणि आरोग्य केंद्राची उभारणी करण्याची आवश्यकता आहे. आ. वाघ यांनी विधान परिषदेत उपस्थित केलेल्या पालघर जिल्ह्यातील  डहाणू व अन्य ठिकाणच्या आरोग्य संदर्भातील तक्रारीची आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी गांभीर्याने दखल घेतली असल्याचे सांगितले असले, तरी प्रत्यक्षात मात्र अजून आरोग्य विभाग पुरेसा हललेला दिसत नाही, हे आजच्या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. १०८ रुग्णवाहिका बंद पडल्यामुळे महिलेला एक ते दीड तास उपचारा अभावी ताटकळत रहावे लागले ही बाब गंभीर आहे याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल. रुग्णवाहिकेमधील महिलेवर योग्य उपचार करावे याबाबत डहाणू उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी यांना सूचना केल्या आहेत. १०८ रुग्णवाहिकेच्या दयनीय अवस्थेबाबत वारंवार तक्रारी प्राप्त होत आहेत वरीष्ठ कार्यालयाला अनेकदा अहवालही पाठवले आहेत डॉ.रामदास मराड, जिल्हाशल्य चिकित्सक पालघर

हिंदू ह्रदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी निमित्त महिला मेळावा

योगेश चांदेकर पालघर- डहाणू तालुक्यातील चिंचणी येथील पांचाळ समाज सभागृहात महिला मेळाव्याचे आयोजित करण्यात आले होते. यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विशेष महिलांचा सन्मान यावेळी करण्यात आला.  महिला ही अबला नसून ती माता लक्ष्मी, सरस्वती, जगदंबा, दुर्गा, चंडिका, रणचंडी चे रूप आहे.  महिला सक्षमीकरण महिलांचा सन्मान, समान हक्क, त्यांचा अधिकार आहे. आई , बहीण, सून, मैत्रीण, पत्नी, अशा विविध भूमिका ती निभावत असते, आणि आपल्या कुटुंबाला तसेच समाजाला आधार देत असते, असे प्रतिपादन आमदार राजेंद्र गावित यांनी केले. या महिला मेळाव्याला शिवसेना जिल्हाप्रमुख कुंदन संखे, राज्यमंत्री मनीषा ताई निमकर, वैदही वाढाण, सहसंपर्क प्रमुख केदार काळे, तालुका प्रमुख रवी चौधरी, संजय चौधरी, शिवसेना युवा प्रमुख साइराज पाटील, पालघर शहर प्रमुख राहुल घरत, शहर महिला संघटिका दीपा पमाळे, भारती सावे, नीलम म्हात्रे, सर्व शिवसेना पदाधिकारी, युवा सेने पदाधिकारी, आदी मान्यवर उपस्थित होते.

जव्हार येथे उत्साहात “मन की बात” कार्यक्रमाचे आयोजन

जव्हार येथे उत्साहात “मन की बात” कार्यक्रमाचे आयोजन योगेश चांदेकर पालघर- देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १३२ व्या मन की बात कार्यक्रमाचे आज जव्हार येथे उत्साहपूर्ण वातावरणात सामूहिक श्रवण करण्यात आले. या कार्यक्रमास भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस  माधवी  नाईक, जिल्हाअध्यक्ष भरत राजपूत, पालघर लोकसभेचे खासदार डॉ. हेमंत सवरा, भाजपचे ज्येष्ठ नेते  बाबाजी काठोले, विक्रमगड विधानसभा मतदार संघाचे आमदार हरिश्चंद्र भोये तसेच प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संवादातून देशाच्या प्रगतीचा वेग, सामान्य नागरिकांच्या प्रेरणादायी कथा आणि राष्ट्रनिर्मितीची नवी दिशा यांचा सखोल आढावा घेण्याची संधी मिळाली. प्रत्येक वेळेसारखेच, या कार्यक्रमातून सकारात्मक ऊर्जा आणि देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना उपस्थित नागरिकांकडून करण्यात आली.

वाढवण बंदर ग्रीनफिल्ड महामार्ग प्रकल्प भूसंपादन मोबदला वाटपाला वेग

वाढवण बंदर ग्रीनफिल्ड महामार्ग प्रकल्प भूसंपादन मोबदला वाटपाला वेग जिल्हाधिकारी डॉ.इंदु राणी जाखड यांनी घेतले महत्वाचे निर्णय अशोक गायकवाड पालघर : वाढवण बंदर ग्रीनफिल्ड महामार्ग प्रकल्पासाठी भूसंपादन मोबदला वाटप प्रक्रियेला सुरुवात झाली असून, भूधारकांना मोबदला सुलभ व पारदर्शक पद्धतीने मिळावा यासाठी जिल्हा प्रशासनाने व्यापक कार्यपद्धती आखली आहे. जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या संदर्भातील महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या बैठकीस उपजिल्हाधिकारी महेश सागर, तेजस चव्हाण, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सहव्यवस्थापक संचित मंगला, विविध बँकांचे प्रतिनिधी तसेच पालघर व डहाणू तालुक्यातील अधिकारी सक्षम प्राधिकारी (CALA), बँकांचे अधिकारी, प्रकल्प क्षेत्रीय अधिकारी, मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी उपस्थित होते. मोबदला थेट संबंधित भूधारकांच्या बँक खात्यात RTGS पद्धतीने जमा केला जाणार असून, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे अद्ययावत ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी दिले . भूधारकांनी अद्ययावत ७/१२ उतारा, फेरफार नोंदी सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ज्या प्रकरणांमध्ये वारस नोंदी प्रलंबित आहेत, त्या तातडीने पूर्ण करण्यासाठी ग्राम महसूल अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. यासाठी तलाठी कार्यालये व ग्रामपंचायती येथे विशेष कॅम्प आयोजित करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी सांगितले. नोटीस बजावणीदरम्यान अनुपस्थित असलेल्या भूधारकांपर्यंत पुन्हा संपर्क साधण्याचे, आणि आवश्यकतेनुसार सार्वजनिक ठिकाणी नोटीस प्रसिद्ध करून पंचनामा करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी दिले. मोबदला मिळाल्यानंतर भूधारकांनी घाईघाईने खर्च न करता, तो सुरक्षित पर्यायांमध्ये गुंतवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी केले . नवीन जमीन खरेदी, बँक मुदत ठेवी किंवा पोस्ट ऑफिस बचत योजना यांसारख्या पर्यायांचा वापर करावा. याशिवाय, बँकांनी भूधारकांना नियमित उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन करावे, तसेच मोठ्या रकमेच्या व्यवहारांवर मर्यादा ठेवून कुटुंबीयांची संमती घेण्याची प्रणाली विकसित करावी, असेही निर्देश जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी दिले. मोबदल्याच्या पार्श्वभूमीवर वाढणाऱ्या सायबर गुन्ह्यांचा धोका लक्षात घेता, OTP किंवा बँक तपशील कोणालाही देऊ नयेत, असे स्पष्ट करण्यात आले. बँका व पोलीस विभागाने संयुक्तपणे जनजागृती मोहीम राबवण्याचेही निर्देश देण्यात आले. भूधारकांनी कोणत्याही मध्यस्थ, एजंट किंवा दलालांमार्फत व्यवहार न करता थेट सक्षम प्राधिकाऱ्यांशी किंवा तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ इंदु राणी जाखड यांनी केले.

कोट्यावधी रुपयांची रॉयल्टी गुलदस्त्यात, महसूल विभागाची तिजोरी रिकामीच

कोट्यावधी रुपयांची रॉयल्टी गुलदस्त्यात, महसूल विभागाची तिजोरी रिकामीच राजीव चंदने मुरबाड : तालुक्यातील शेकडो विट भट्टी मालकांना मुरबाड तहसीलदार कार्यालयाकडुन किती राॅयल्टी वसुल केली हे  गेली दोन वर्षांपासून गुलदस्त्यात असल्याने महसुल विभागाची तिजोरी रिकामीच असल्याचे दिसून येत असल्याने महसूल विभागाचे शेतच कुंपण खात असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.. मुरबाड तालुक्यातील शेकडो विट भट्टी मालक हे आक्टोबर नोव्हेंबर मध्ये विट भट्टी चा व्यवसाय सुरू करत असतात .हा व्यवसाय सुरू करण्यासाठी ते प्रथम आपली जागा अकृषिक करतात.तसेच विट उत्पादनासाठी लागणारी माती शासन दरानुसार तहसीलदार कार्यालयाकडे राॅयल्टी भरतात.सालाबादप्रमाणे हे व्यावसायीक तहसीलदार कार्यालयात न चुकता आपली राॅयल्टी भरत असतात.परंतु सन २४-२५ या वर्षात तालुक्यातील शेकडो विट भट्टी मालकांनी  राॅयल्टी भरली नसल्याने तहसीलदार कार्यालयाकडून सुमारे १७५ व्यवसायीकांना  जुलै २०२५ राॅयल्टीची दंडात्मक  नोटीस देण्यात आली.ती कारवाई गुलदस्त्यात असताना चालू वर्षी केवळ १९ व्यवसायीकांना नोटीस पाठवुन कागदी घोडे नाचवत असल्याचा प्रकार केला आहे.  एक प्रकारे त्यांना सवलत देण्यात आल्याने शेकडो विट भट्ट्यांचे माध्यमातून सालाबादप्रमाणे तहसीलदार कार्यालयात जमा होणारे कोट्यवधी रुपये गेले कुठे? हा संतप्त सवाल उपस्थित केला जात असल्याने शासनाला विविध योजना राबविण्यासाठी लागणारा निधी मिळविण्यात  महत्वाचा दुवा असलेला असलेला महसूल विभागच या राॅयल्टी चे माध्यमातून शासनाचे तिजोरीची लुटमार करत असेल तर महसुल विभागाचे शेतच कुंपन खात असल्याचे स्पष्ट होत आहे. विट पिकवण्यासाठी लागणारा दगडी कोळसा दररोज हजारो टन विक्री होत असुन त्याला कोणत्याही प्रकारची राॅयल्टी आकारली जात नाही. सध्या मुरबाड तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते पेव्हर ब्लॉक ने तयार केले जात असल्याने.तालुक्यात ठिकठिकाणी पेव्हर ब्लॉक चे तसेच सिमेंट पोल.व सिमेंट प्लेट तयार करण्यासाठी लागणारी खडी ,व रेती शेकडो ब्रासने वापरली जात असुन या व्यवसायीकांवर देखील राॅयल्टी आकारली जात आहे. मी किरकोळ विटांचे उत्पादन करतो तरी जबरदस्तीने राॅयल्टी घेतली.तिचे चलन भरणा करण्यासाठी तहसीलदार कार्यालयातुन संमती पत्र मिळत नाही. परंतु जे विट भट्टी मालक केवळ शंभर ब्रास राॅयल्टी काढतात आणि सुमारे पंचवीस ते तीस लाख विटांचे उत्पादन घेतात.त्यांना आजपर्यंत तहसीलदार कार्यालयाकडून राॅयल्टी दिली नाही. एक विट भट्टी मालक. याबाबत गौण खनिज दक्षता पथकाने निरिक्षक संजय जाधव व उपविभागीय अधिकारी कल्याण.विश्वास गुजर.यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी बोलण्याचे टाळले.

नायगाव-टिवरी जमीन घोटाळ्याचा मास्टरमाइंड कोण ?

नायगाव-टिवरी जमीन घोटाळ्याचा मास्टरमाइंड कोण ? आमदार विलास तरे यांचा विधानसभेत थेट सवाल  मूळ जमीन मालकांना न्याय मिळणार; सीआयडी चौकशीचे गृहराज्यमंत्र्यांचे आश्वासन योगेश चांदेकर पालघर– वसई तालुक्यातील नायगाव मौजे टिवरी येथे…

नायगाव-टिवरी जमीन घोटाळ्याचा मास्टरमाइंड कोण ?

आमदार विलास तरे यांचा विधानसभेत थेट सवाल ० मूळ जमीन मालकांना न्याय मिळणार; सीआयडी चौकशीचे गृहराज्यमंत्र्यांचे आश्वासन योगेश चांदेकर पालघर– वसई तालुक्यातील नायगाव मौजे टिवरी येथे उघडकीस आलेल्या तब्बल १०००…

शासनाचे ऑनलाइन व्यवहारामुळे, सुरक्षित असणारी तिजोरी उघड्यावर

शासनाचे ऑनलाइन व्यवहारामुळे, सुरक्षित असणारी तिजोरी उघड्यावर राजीव चंदने मुरबाड :सध्याचे संगणकीय युगात शासनाची सर्व देवाण घेवाण हि ऑनलाईन पद्धतीने होत असल्याने एकेकाळी प्रत्येक कार्यालयात. सुरक्षित असणाऱ्या तिजोरीची देखभाल करण्यासाठी कार्यालयात चौकीदाराचे पद असायचे.परंतु मुरबाड तालुक्यातील सामाजिक वनीकरण विभागाची तीच तिजोरी आज उघड्यावर पडलेली दिसुन येत असल्याने तिची विल्हेवाट लावणार कशी हा सर्वसामान्य नागरिकाला प्रश्न पडला आहे. शासनाचे प्रत्येक कार्यालयाला येणाऱ्या  अनुदानाची  रोख रक्कम बॅकेत न ठेवता ती लोखंडी आणि अवजड तिजोरीत ठेवली जात असे.तिच्या चाव्या या मुख्य लेखाधिकारी यांच्याकडे असायच्या. कार्यालयाला जेव्हा एखादी वस्तु रोखीने खर्च करायची असेल किंवा एखाद्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन करायचे असेल तेव्हा कार्यालय प्रमुखांचे सहमतीने पाहिजे तेवढीच रक्कम काढली जात असे.आणि खर्च रक्कम व तिजोरीत शिल्लक रक्कम याचे रजिस्टर ठेवले जायचे , विशेष म्हणजे दसरा दिवाळी तसेच इतर सणांच्या वेळी या तिजोरीची मनोभावे पूजा देखील केली जात असे.सायंकाळी कार्यालय बंद झाल्यावर लेखाधिकारी हे काळजीपूर्वक ती तिजोरी बंद करून ती इतर कोणी बनावट चावीने खोलुन त्यातील रोख रक्कम गायब करु नये, यासाठी त्या तिजोरीला कागदी सील लावुन त्यावर तो स्वतःची सही करत असे.आणि दुसऱ्या दिवशी कार्यालयात आल्यावर पहिल्यांदा तो त्या तिजोरीची पाहणी करत असे.एवढी सुरक्षितता आणि खबरदारी घेतली जात होती.परंतु आज संगणकीय युगात शासनाचे सर्व व्यवहार हे ऑनलाईन पद्धतीने होत असल्याने या लोखंडी तिजोऱ्या कालबाह्य झालेल्या दिसत आहेत तर काही अडगळीच्या ठिकाणी पडलेल्या आढळून येत असुन सामाजिक वनीकरण विभागाने ती आता उघड्यावर फेकलेली दिसत आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रातील पथकाचे डॉ. ठरले गोरगरीबांसाठी देवदूत

प्राथमिक आरोग्य केंद्रातील पथकाचे डॉ. ठरले गोरगरीबांसाठी देवदूत राजीव चंदने मुरबाड : तालुक्यातील अतिदुर्गम भागात आरोग्य देवदूत म्हणून डॉ. वर्षा तंत्रपाळे यांनी स्वतःची आगळीवेगळी ओळख निर्माण केली असल्याचे तेथील काही गरीब आदिवासी आणि जानकरां मधे सध्या चर्चा केली जात आहे. काही महिन्यांपूर्वी मोधलवाडी या आदिवासी वस्तीतील पिंटू विठ्ठल भला वय ५ महिने या बाळाच्या छातीमध्ये  पॉईंझन झाल्याकारणाने त्याला त्याच्या आई वडिलांनी अनेक  हॉस्पिटल मध्ये दाखवून सुद्धा कुठलाही फरक पडला नाही. शेवटी  बाळाला देवाच्या भरवशावर सोडून देतो असे निशब्द वाक्य आई वडीलांनी आपल्या काळजावर दगड ठेवून काढले. आता पुढे जे काही होईल ते आमच्या नशिबाने होईल असे बोलत त्यांनी आपल्या बाळाला घरीच ठेवले, वैद्यकीय मदत पथक धारखिंड येथील डॉ. वर्षा ओंकार तंत्रपाळे यांना सदरील बातमी समजता त्यांनी बाळाचे आई वडील यांना विश्वासात घेऊन त्यांना आधार दिला व बाळाला उपचार करण्यासाठीचे सर्व सुत्रे आपल्या हाती घेऊन बाळाला  हॉस्पिटलला ऍडमिट करण्यासाठी  राहत्या घरी मोधलवाडी येथे रुग्णवाहिका  घेऊन स्वतः गेल्या  तेथे अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका यांच्या मदतीने बाळाला अंबरनाथ येथे छाया हॉस्पिटल  तेथून उल्हासनगर सेंट्रल हॉस्पिटल येथे बालरोग तज्ञांना दाखवण्यासाठी नेले. सेंट्रल हॉस्पिटल येथील बालरोग तज्ञ डॉ.वैशाली पवार आणि डॉ. ऐश्वर्या मोरे यांनी प्राथमिक उपचार देऊन बाळाला पुढे सायन हॉस्पिटल  मुंबई येथे संदर्भित करण्यात आले. तिथे काही महिने ऍडमिट ठेवून घरी पाठवण्यात आले. या सर्व प्रकारांमध्ये उल्हासनगर सेंट्रल हॉस्पिटल येथील आर. बी. एस. के. चे वैद्यकीय अधिकारी डॉ. शालिनी मोहोड यांचे मौल्यवान सहकार्य लाभले, आदिवासी  दुर्गम भागामध्ये वैद्यकीय मदत पथकाचे मानसेवी वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा तंत्रपाळे यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे  आमच्या बाळाचा जीव वाचल्याचे आई वडीलांनी मोठ्या अंतःकरणाने दैनिक बित्तंबातमी शी  बोलताना सांगितले.