जप्त केलेल्या मालमत्तांचा उल्हासनगर मनपा करणार लिलाव उल्हासनगर : उल्हासनगर मनपा प्रशासनाने अनेक वेळा अभय योजना राबवून मालमत्ता करात भरघोस सूट देऊनही मोठ्या प्रमाणात मालमत्ता कर थकबाकी आहे. आता यापुढे सक्तीने मालमत्ता कर वसूल केले जाईल अशी आक्रमक भूमिका मनपा प्रशासनाने घेतली आहे. मोठ्या मालमत्ताधारक थकबाकीदारांना नोटीस बजावण्यात आल्या असून असून लवकरच अशा मालमत्तांचा लिलाव मनपा प्रशासन करणार आहे अशी माहिती मनपा आयुक्त अजित शेख यांनी दिले आहे. मालमत्ता कर हा उल्हासनगर मनपाचा महत्त्वाचा उत्पन्नाचा स्तोत्र असून त्यादृष्टीने मालमत्ता कर वसूल करण्यासाठी मनपा प्रशासनाने मालमत्ता कर मध्ये व्याजमाफी करून तब्बल पाच,सहा वेळा अभय योजना राबविली आहे. काही अपवाद वगळता सर्वसामान्य नागरिक मालमत्ता कर वेळोवेळी भरतात मात्र मोठे मालमत्ताधारक मालमत्ता कर भरण्यास टाळाटाळ करीत असतात. शहरात एकूण 1,83,138 मालमत्ता आहेत,त्यातील निवासी – 1,38,920 व वाणिज्य व धर्मादाय संस्थाची संख्या – 44218 आहे एकूण थकबाकीसह मालमत्ता कर 936,99,92,498 रुपये असून केवळ थकबाकी 819,18,98,455 रुपये आहे त्याचप्रमाणे चालू वर्षाचा मालमत्ता कर 117,80,94,043 रुपये एवढा आहे. 1 कोटी पेक्षा जास्त थकबाकीदार 15 असून त्यांच्यावर 73,51,61,025 रुपये एवढी थकबाकी आहे. मोठ्या प्रमाणात थकबाकी असणाऱ्या मालमत्ताधारकांना धारकांना मनपा प्रशासनाने वेळोवेळी नोटीसा बजावल्या आहेत मात्र तरी देखील असे मालमत्ताधारक त्याला जुमानत नाहीत आता अशा मालमत्ता धारकांच्या विरोधात मनपा प्रशासनाने आक्रमक भूमिका घेत कर निर्धारक व संकलन अधिकारी नीलम कदम – बोडारे यांच्या मार्गदर्शनाखाली नोटीसा बजावणे व जप्ती करणे याबाबत कारवाई सुरू केली आहे. उल्हासनगर- 5 च्या नटराज पॅलेसमधील 10 मालमत्ता, महादेव पॅलेसमधील 5 मालमत्ता साई रेसिडेन्सीमधील 1 मालमत्ता, प्रभु आस्था अपार्टमेंटमधील 1 मालमत्ता अशा एकूण 17 मालमत्ता कायद्यानुसार मालमत्ता जप्ती मनपा प्रशासनाने केली आहे अशा मालमत्तांचा येत्या 10 जुलै रोजी उल्हासनगर मनपाच्या सभागृहामध्ये लिलाव होणार असल्याची माहिती आयुक्त अजीज शेख यांनी पत्रकारांना दिली आहे. 0000