मनधरणीसाठी नेत्यांची दमछाक पालघर : लोकसभा निवडणुका जाहीर होउ न वीस दिवसांचा कालावधी लोटला आहे. राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीचे जागा वाटप आणि उ मेदवार निश्चित करण्याच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात आहे. पालघर लोकसभेसाठी आघाडीने शिवसेना उ बाठाचे उ मेदवार घोषीत केले आहे. मात्र, महायुतीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या हट्टामुळे शिवसेनेला ही जागा भाजपला सोडण्याची नामुष्की आली आहे. मात्र, उमेदवारीवरून अजुनही खल मिटलेला नाही. उमेदवारी वरून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मनधरणीसाठी नेत्यांना वारंवार बैठका घ्याव्या लागतं आहेत. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे सुरं जुळलेले नाही. त्यासाठी नेत्यांची दमछाक झाली आहे. मागील निवडणुकीत पालघर लोकसभेतुन शिवसेनेचे राजेंद्र गावीत निवडुन आले होते. यावेळी ही जागा भाजप ला मिळावी म्हणून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आग्रहाची मागणी लावुन धरली. अखेर, मोठा खल आणि वाटाघाटी करून शिवसेनेला पालघर ची जागा भाजप ला सोडण्याची नामुष्की आली. मात्र, उमेदवारी वरून अजुनही युती चे घोडे आडले आहे. एकीकडे राज्यात युती आणि आघाडीचे उमेदवार निश्चितीचा तिढा अंतिम टप्प्यात आला आहे. परंतु पालघर च्या उ मेदवारी चा तिढा अजुनही सुटलेला नाही. भाजप पालघर जिल्हाध्यक्ष भरत रजपूत यांनी पालघर ची जागा भाजप ला मिळावी तसेच खासदार राजेंद्र गावीतांच्या उमेदवारी ला प्रखर विरोध करत आपली बाजु माध्यमांकडे जाहीरपणे मांडली आहे. त्यामुळे महायुतीतील वाद उफाळून आला. दुसरीकडे वसई- विरारमधील भाजप पदाधिकार्यांनी देखील राजेंद्र गावीतांच्या उमेदवारी ला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे युतीतील वाद चव्हाट्यावर आला आहे. हा वाद शमविण्यासाठी युतीच्या नेत्यांना ठिक ठिकाणी बैठका घ्याव्या लागल्या आहेत. त्यानंतर मनोर येथे भाजप नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यासह युतीच्या प्रमुख नेत्यांना मनोमिलन बैठक घ्यावी लागली आहे. मात्र, या बैठकीतही भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजेंद्र गावीत यांच्या उमेदवारी विरोधात सुरं आळवला आहे. अखेर, नेत्यांना कार्यकर्त्याची मनधरणी करण्यात अपयशच आले आहे. काही दिवसांवर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत येउ न ठेपली आहे. मात्र, युतीचा उमेदवारीचा तिढा कायम असल्याने, महायुतीच्या नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हट्टहास करून पालघर ची जागा शिवसेनेकडून मिळवली. त्यानंतर शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावीत यांनाच पुन्हा नव्याने भाजप कडून उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू झाल्या. त्यासाठी गावीतांनी देखील भाजपच्या वरिष्ठांकडे धावाधाव केली आहे. ही बाब लक्षात आल्याने भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा गावीतांच्या उ मेदवारी ला अधिकच विरोध वाढला आहे. अखेर, मनोरच्या बैठकीत युतीच्या नेत्यांना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मनधरणीसाठी ” पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच उ मेदवार समजून, एक दिलाने कामाला लागण्याचे केविलवाणे आवाहन करावे लागले आहे. मात्र, तरीही गावीतांच्या उमेदवारी ला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा विरोधच राहिला आहे.