Category: रायगड

raigad news and updates

 माथेरान घाटात ईनोव्हाकारला अपघात

 चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात प्रवाशी सुखरूप.   माथेरान : सगळीकडे थर्टीफस्टची धामधूम सुरू असताना नेरळ माथेरान घाटात पर्यटकाच्या वाहनाला भीषण अपघात घडला.सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी दैवबलवत्तर म्हणून यातील सर्व प्रवाशी सुखरूप बचावले आहेत.चालकाचे वाहनावरील ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असणाऱ्या सुरक्षा कठड्यावरून आदळून खालच्या रस्त्यावर येवून आपटली.यामध्ये कारचे मोठे नुकसान झाले. कार रस्त्यातच मध्ये असल्याने येणाऱ्या वाहनांना काही काळ अडथळा निर्माण झाला होता. पुणे नंबर पासिंग असलेली एम एच 12 बी बी 3333 क्रमांकाची ईनोवा कार मधील पर्यटक हे माथेरान फिरून परतीच्या प्रवासाला नेरळ दिशेने निघाले होते.कारचालक माथेरान घाट उतरत असताना कड्यावरचा गणपतीकडे जाणाऱ्या रेल्वे ट्रक रस्त्याच्या 134 या क्रमांकावर वळणावर कार चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार रस्ता सोडून सुरक्षा कठडा असणारा कठडा चढून खालच्या वळणा वरील रस्त्यात आदळली.यामध्ये कारचे नुकसान झाले होते,परतू कार मधील पर्यटक सुखरूप होते.दैवबलवत्तर म्हणून यावेळी समोरून कुठलेही वाहन आले नव्हते तर खोल दरी देखील बाजूला नसल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.दरम्यान वाहनातील पर्यटक घाबरून दुसऱ्या वाहनात बसून कार तिथेच सोडण्यात आल्याची माहिती समोर आली. दरम्यान पर्यटकांच्या बाबत कुठलीही माहिती मिळू शकलेली नसून या बाबत नेरळ पोलीस ठाण्यात देखील कुठली तक्रार देण्यात आली नसल्याची माहिती यावेळी नेरळ पोलीस ठाण्याचे पोलिस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी दिली आहे. एकूणच थर्टीफर्स्टची धामधूम सुरू असताना माथेरान फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या वाहनाला सायंकाळच्या सुमारास हा अपघात घडला.

 नववर्षात एफएसआयसोबत तितकाच टीडीआरही घ्यावा लागणा;

 अंबरनाथ नगरपालिकेचा टीडीआरला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय   अंबरनाथः बांधकाम परवानगी घेताना मुळ चटईक्षेत्र निर्देशांक अर्थात एफएसआय, प्रिमीयम एफएसआय आणि त्यावर अनुज्ञेय असलेला सहायक चटईक्षेत्र निर्देशांक अर्थात अँसिलरी एफएसआय वापरला जातो. अशावेळी हस्तांतरणीय विकास हक्क अर्थात टीडीआरची मागणी केली जात नाही. त्यामुळे शहरात टीडीआरच्या माध्यमातून संपादित होणाऱ्या जमिनींची प्रकरणी कमी झाली असून त्याचा विकास योजनेच्या अंमलबजावणीवर परिणाम होतो आहे, अशी बाब अंबरनाथ नगरपालिकेच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे टीडीआर निर्मिती थंडावली असून त्याचसाठी अंबरनाथ नगरपालिकेने आता नव्या वर्षातील बांधकाम परवानग्यांसाठी एफएसआयसह तितकाच समान टीडीआर घेण्याचे सक्तीचे केले आहे. याबाबतचा आदेश नुकताच पालिका प्रशासनाने जाहीर केला. एकत्रिकृत विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावलीचा बांधकाम क्षेत्राला मोठा फायदा झाला. यात अनेक मुद्द्यांवर सुतुत्रता आली. या नियमावलीनुसार रहिवासी बांधकाम परवानगी प्रकरणामध्ये कमाल बांधकाम क्षमतेच्या मयदित, वापरलेला बेसिक एफएसआय, प्रिमियम एफएसआय आणि टिडीआर या सर्वांवर ६० टक्के अँसिलरी एफएसआय घेण्याची तरतूद आहे. मात्र बऱ्याचशा बांधकाम परवानगी प्रकरणात मुळ एफएसआय आणि प्रिमियम एफएसआय तसेच त्यावर अनुज्ञेय असलेला अँसिलरी एफएसआय वापरुन बांधकाम परवानगी प्रकरणे सादर केली जातात. अशा प्रकरणात टीडीआर वापरुन अतिरिक्त एफएसआय मागितला जात नाही. त्यामुळे नगरपरिषद हद्दीतील टीडीआरचे महत्व कमी झाले असून या माध्यमातून संपादित होणाऱ्या जमिनींची प्रकरणे कमी झाल्याची बाब अंबरनाथ नगरपालिकेच्या निदर्शान आली आहे. त्यामुळे शहराच्या विकास योजनेच्या अंमलबजावणीवर फरक पडतो आहे. विकास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आरक्षणाखालील, विकास योजना रस्त्याखालील जमिनी टीडीआरच्या माध्यमातून संपादित करणे आवश्यक आहे. अंबरनाथ शहरात १९८ आरक्षणे आहेत. त्यातील अवघे चार टक्के आरक्षणे पालिकेच्या ताब्यात आली आहेत. विकास योजना रस्त्याखालील जमिनीच्या मालकांनी स्वतः पुढाकार घेऊन टीडीआरच्या मोबदल्यात या जमिनी नगरपालिकेला हस्तांतरीत करणे गरजेचे आहे. त्यामुळे या टीडीआरच्या निर्मितीला आणि वापराला प्रोत्साहन देण्यासाठी त्याच्या वापराची सक्ती करण्याचा निर्णय अंबरनाथ नगरपालिकेने घेतला आहे. त्यामुळे १ जानेवारीपासून सादर केल्या जाणाऱ्या सर्व बांधकाम परवानगी प्रकरणात एसएसआय आणि टीडीआर समान प्रमाणात वापरावा लागणार आहे. याबाबतचा आदेश नुकताच अंबरनाथ पालिका प्रशासनाने जाहीर केला आहे. उत्पन्न घटणार, पण आरक्षणांच्या विकासाला मदत सध्या प्रचलित एफएसआय वापरामुळे पालिका प्रशासनाला थेट उत्पन्न मिळते. मात्र त्याचवेळी टीडीआरचे महत्व कमी झाल्याने पालिकेला आरक्षण विकासासाठी जागा मिळत नाही. टीडीआर खासगी व्यक्तीकडून मिळेल. त्यामुळे पालिकेचे काही अंशी नुकसान होईल. पण आरक्षित भुखंडांवरचा विकास आणि त्यासाठी टीडीआर निर्मिती महत्वाची असल्याचे पालिकेच्या वतीने सांगितले जाते आहे. बांधकाम व्यावसासियांकाचे आस्ते कदम अंबरनाथ नगरपालिकेने एफएसआय आणि टीडीआर समान प्रमाणात वापण्याची सक्ती केली असली तरी त्यावर अद्याप बांधकाम व्यावसायिकांनी प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे अंबरनाथ नगरपालिकेचा हा निर्णय बांधकाम व्यावसायिक कसा घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. अंबरनाथ शहरात सुर्योदय सोसायटीत मोठ्या प्रमाणावर पुनर्विकास सुरू आहे. शहरात विविध भागात अनेक गृहप्रकल्प सुरू आहेत. त्याचवेळी आलेल्या या निर्णयामुळे अनेक चर्चाही रंगल्या आहेत. मात्र हा निर्णय एकत्रिकृत विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावलीच्या आधारेच घेतला असून मुंबई महानगर प्रदेशातील अनेक पालिकांनी वर्षभरापूर्वीच असा आदेश जाहीर केल्याची माहिती पालिकेच नगररचनाकार विवेक गौतम यांनी दिली आहे. 00000

 ‘मस्साजोग सरपंच हत्येच्या तपासाला गती मिळावी!’

शहापूर मराठा समाज मंडळाची मागणी   शहापूर : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृन हत्येच्या घटनेला महिना होत आला असून अजूनही आरोपी मोकाट फिरत आहेत. हत्येचा तपास जलद गतीने व्हावा अन्यथा आंदोलन छेडले जाईल असा इशारा  शहापूर तालुका मराठा समाज मंडळाने शहापूर तहसीलदार यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे दिला आहे.बिड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृन हत्येच्या घटनेला महिना होत आला असून मुख्य आरोपी अजूनही मोकाट आहेत. हत्या कटाच्या मुख्य सूत्रधारावर एका बड्या राजकीय व्यक्तीचा वरदहस्त असून तपास प्रक्रियेतही हस्तक्षेप असल्याने त्यास अटक होत नसल्याने मराठा समाजाच्या सरकारप्रती भावना तीव्र आहेत. या गुन्ह्याचा जलद गतीने तपास व्हावा,तसेच योग्य तपास होणेसाठी एस.आय.टी. स्थापन करावी किंवा निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करून कटात सहभागी असलेल्या सर्व आरोपींना कडक शासन करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. तपास कामात सातत्याने दिरंगाई होत असेल तर महाराष्ट्र सरकारला मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा शहापूर तालुका मराठा समाज मंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.आज (दि. 31)सकाळी मराठा समाज मंडळाच्या शिष्टमंडळाचे अध्यक्ष विजय देशमुख, मिलिंद देशमुख, रवींद्र चौधरी, सचिन चौधरी व पदाधिकाऱ्यांनी शहापूरचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांची भेट घेऊन हे निवेदन सुपूर्द केले. 00000

ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

आमदार महेंद्र दळवी व जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या उपस्थितीत डॉ. नितीन अंबाडेकर व डॉ.पुरुषोत्तम मडवी यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने यांचे केले कौतुक अशोक गायकवाड रायगड : आरोग्य विभागाचे संचालक डॉ.नितीन अंबाडेकर, नर्सिंग विभागाचे उपसंचालक डॉ.पुरुषोत्तम मडवी यांनी सदिच्छा भेट दिली. शिबिरामध्ये दिल्या जाणाऱ्या सुविधाबाबत माहिती घेतली आणि या उपक्रमाबद्दल जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने व त्यांच्या टीमचे विशेष कौतुक केले. तसेच या शिबीराकरिता सेंट्रल टीबी डिव्हिजनल टीम यांनी भेट दिली.आमदार महेंद्र दळवी यांच्या शुभहस्ते व जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य तपासणी शिबिराची २८ डिसेंबरला सांगता कार्यक्रम संपन्न झाला. या शिबिरामध्ये जिल्ह्यातील १७४ ज्येष्ठ महिला तर २९० पुरुष असे एकूण ४६४ नागरिकांनी सहभागी होऊन आरोग्य तपासणी करून घेतली. ज्येष्ठ नागरिकांमध्ये आढळून येणारे उच्च रक्तदाब, मधुमेह, पक्षाघात तसेच हृदयरोग-गरजेनुसार 2D ECHO, X…

जेबीएसपी’ वार्षिक सर्वसाधारण सभेत आमदार प्रशांत ठाकूर यांचा जाहीर सत्कार

अशोक गायकवाड पनवेल : जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेची ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच झाली.या सभेत संस्थेच्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या सभेमध्ये संस्थेच्या वितविध शाळांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल तसेच विविधि स्पर्धां तसेच परीक्षांमध्ये उज्ज्वल यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. खांदाकॉलनीमधील सीकेटी महाविद्यालयात झालेल्या या सभेला जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय.टी.देशमुख, कृष्णा ठाकूर, सचिव एस.टी. गडदे, संचालक संजय भगत, वर्षा ठाकूर, वसंत पाटील, जगदीश घरत, हरीशचंद्र पाटील, अमोघ ठाकूर यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.

‘जेबीएसपी’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

पनवेल : जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेची 34 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच झाली.या सभेत संस्थेच्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली…

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर परराज्यातील मद्य तसेच बनावट मद्यविक्री रोखणार – रविकिरण कोले

अशोक गायकवाड रायगड : नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क रायगड-अलिबाग विभागामार्फत उपाययोजनाबाबत रायगड जिल्हयात एकूण ५ कार्यकारी निरीक्षक पथके असून २ भरारी निरीक्षक पथके कार्यरत असून त्यांना रायगड जिल्ह्यातील मद्यविक्री…

ई- रिक्षाच्या संख्येत ताबडतोब वाढ करावी पर्यटकांची मागणी

माथेरान : नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी माथेरानला पसंती दिली आहे.परंतु वाहतुकीच्या गहन समस्यांना सामोरे जात प्रवास करावा लागत असल्यामुळे लवाजम्यासह आलेल्या पर्यटकांची त्रेधातिरपीट उडत आहे. ई रिक्षाची सुविधा उपलब्ध…

तुफानातला दिवा विझला आहे – प्रा. डॉ. विठ्ठल शिंदे

पॅन्थर प्रकाश पगारे यांना भावपूर्ण आदरांजली तुफानातला दिवा विझला आहे – प्रा. डॉ. विठ्ठल शिंदे अशोक गायकवाड कर्जत :दलित पॅन्थर ते रिपब्लिकन चळवळ असा तीस ते पस्तीस वर्षाचा प्रवास असणारे,…

जड-अवजड वाहनांकरिता वाहतूक बंदी-किशन जावळे

अशोक गायकवाड रायगड : राष्ट्रीय महामार्ग कमांक १६६-अ वर धरमतर ब्रिज ते अलिबाग तसेच अलिबाग ते मांडवा जेट्टी व अलिबाग-रेवदंडा-मुरूड या राज्यमार्गावरील जीवनावश्यक वस्तू वगळून जड-अवजड वाहनांकरिता जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी वाहतूक बंदी अधिसूचना जारी केली आहे. रायगड जिल्हा हा पर्यटन जिल्हा असल्याकारणाने ३१ डिसेंबर २०२४ रोजी “थर्टी फस्ट” चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागता करीता प्रचंड प्रमाणात पर्यटक हे मांडवा, किहीम, अलिबाग, आक्षी, नागाव, रेवदंडा, काशिद, मुरूड, दिवेआगर,वर्धन, महाड अशा पर्यटन स्थळी मोठ्या प्रमाणात आपआपली वाहने घेवून येत असतात. सध्या नाताळ निमित्ताने विद्यार्थ्यांना सुट्टी असल्याकारणाने पर्यटक हे रायगड जिल्ह्यामध्ये फिरण्याकरीता वेगवेगळ्या समुद्र किनाऱ्यावरील बीचला भेटी देत असतात. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग तसेच शहरामध्ये पर्यटकांची मोठ्या प्रमाणात रेलचेल असून त्यातच महामार्गावरील जड-अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत आहे. वडखळ-अलिबाग हा रस्ता एकेरी रस्ता आहे. तसेच अलिबाग-रेवस व अलिबाग-रेवदंडा-मुरूड हे रस्ते अरूंद आहेत. पर्यटकांची प्रचंड प्रमाणात येणारी व जाणारी वाहने व त्याच वेळी रोडवरून होणारी डंपर, ट्रक व इतर जड-अवजड वाहनांची वाहतूक कोंडी होण्याची तसेच अपघात होण्याची दाट शक्यता आहे. २८  व २९ डिसेंबर २०२४ रोजी शनिवार व रविवार रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने पर्यटक हे मोठ्या प्रमाणात येणार आहेत. वाहतूक कोंडीमुळे पर्यटक व नागरीकांना मानसिक त्रास सहन करावा लागू नये व सध्या घडत असलेले अपघात पाहता, अपघाताचे प्रमाण कमी होण्याच्या दुष्टीकोनातून उपाययोजना म्हणून तसेच पर्यटक व नागरीकांचा प्रवास सुखरूप व्हावा याकरीता २८ डिसेंबरला सकाळी ६.०० ते दि.२९ डिसेंबर ४.०० वाजेपर्यंत राष्ट्रीय महामार्ग कमांक १६६-अ वर धरमतर ब्रिज ते अलिबाग तसेच अलिबाग ते मांडवा जेट्टी व अलिबाग-रेवदंडा-मुरूड या राज्यमार्गावरील जीवनावश्यक वस्तू वगळून जड-अवजड वाहनांकरिता जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी वाहतूक बंदी अधिसूचना जारी केली आहे. 0000