Category: रायगड

raigad news and updates

उल्हासनगरचे शासकीय रुग्णालय पुन्हा अंधारात

 अतिदक्षता विभाग सोडून उर्वरित रुग्णालयात वीज नाही   उल्हासनगर: उल्हासनगर येथील शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात शुक्रवारी सहा ते सात तास अंधारात होते. वीज नसल्यामुळे रुग्ण त्रस्त झाले होते. शुक्रवारी महावितरणाकडून स्थानिक परिसरात देखभाल दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यामुळे वीजपुरवठा बंद होता. तर रुग्णालयातील पर्यायी वीज व्यवस्थाही त्याचवेळी देखभाल दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आली होती. एकाच दिवशी दोन्ही यंत्रणा बंद असल्याने रुग्णांचे मात्र हाल झाले. यादरम्यान अनेक शस्त्रक्रियाही रखडल्या होत्या. यापूर्वीही रुग्णालय अंधारात गेल्याचे प्रकार झाले होते. त्यामुळे प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त होतो आहे. शुक्रवारी उल्हासनगरमध्ये महावितरणकडून देखभाल दुरुस्तीसाठी वीज पुरवठा खंडित केला जातो. या काळात रुग्णालयात जनरेटरच्या माध्यमातून वीजपुरवठा सुरू राहतो. मात्र शुक्रवारी काळात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाकडून रुग्णालयातील इलेक्ट्रिक पॅनल बदलण्याचे काम हाती घेण्यात आले होते. त्यामुळे जनरेटर देखील बंद ठेवण्यात आले होते. परिणामी संपूर्ण रुग्णालयाचा वीज पुरवठा १२ वाजल्यापासून खंडित झाला होता. सायंकाळी सहा वाजेपर्यंत हा वीज पुरवठा सुरळीत झाला नव्हता. त्यामुळे संपूर्ण रुग्णालयात अंधार पसरला होता. वार्डातले दिवे, पंखे बंद असल्यामुळे रुग्ण त्रस्त झाले होते. सुदैवाने अतिदक्षता विभागात पर्यायी व्यवस्था असल्याने यंत्रणा सुरू होती मात्र या काळात रुग्णालयात होणाऱ्या शस्त्रक्रिया आणि प्रसूती बंद ठेवण्यात आल्याची माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोहर बनसोडे यांनी दिली. एखादी तातडीची शस्त्रक्रिया करायची असल्यास आम्ही रुग्णाला उल्हासनगरमधीलच दुसऱ्या शासकीय रुग्णालयात घेऊन जातो आणि तिथे शस्त्रक्रिया करतो, अशी माहिती डॉ. बनसोडे यांनी दिली. अत्यंत महत्त्वाचे रुग्णालय उल्हासनगरचे मध्यवर्ती शासकीय रुग्णालय तीन ते चार तालुक्यांसाठी महत्त्वाचे आहे. अंबरनाथ, मुरबाड, कल्याण आणि उल्हासनगर तालुक्यातील ग्रामीण भागातील रुग्णांसाठी हे रुग्णालय महत्त्वाचे आहे. आधीच खाटा नसल्याने येथे रुग्णांना खाली झोपवून उपचार घ्यावे लागत असल्याचे यापूर्वीच समोर आले होते. त्यात आता या प्रकारामुळे रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. यापूर्वीही वीज पुरवठा बंद गेल्या वर्षी मे महिन्यात अशाच प्रकारे उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयातील वीजपुरवठा ठप्प झाला होता. त्याचा रुग्णालयातील रुग्णांना मोठा फटका बसला होता. ऐन उन्हाळ्यात तापमान वाढलेले असताना वीजपुरवठा खंडित झाल्याने रुग्णांची लाही लाही झाली होती. त्याचवेळी अनेक विभाग बंद झाले होते. शुक्रवारी अशाच प्रकारे शासकीय यंत्रणांमधील समन्वयाच्या अभावामुळे रुग्णांचे हाल झाले. रुग्णालय प्रशासन याबाबत नियोजन केल्याचे सांगत वेळ मारून नेत असले तरी रुग्णांचे मात्र या काळात हाल झाले. 900000

शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

माथेरान : लहान मुले ही देवघरची फुले आहेत आणि जेव्हा त्यांना एखादी वस्तू किंवा साहित्य असो अथवा खाऊ असो हे त्यांना अचानकपणे प्राप्त झाल्यास त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळं स्मितहास्य निर्माण…

२८ व २९ डिसेंबरला नागपुरात ‘अक्षरक्रांती’ आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सव

नागपूर : अक्षरक्रांती फाऊंडेशन व कला गौरव संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले शिक्षण संस्था सभागृह, रेशिमबाग, नागपूर येथे २८ व २९ डिसेंबरला ‘पहिले अक्षरक्रांती आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सव’ संपन्न होत…

केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी-खासदार सुनिल तटकरे

अशोक गायकवाड रायगड : केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध महत्वाकांक्षी योजना असून या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश खासदार सुनिल तटकरे यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व…

उघड्यावर शौचास करणाऱ्याना आता एक हजार रु दंड;-रेशन सह शासकीय योजना होणार बंद;

जरंडीच्या ग्रामसभेत ठराव   सोयगाव : खबरदार!आता उघड्यावर शौचालय साठी जाऊ तर ग्रामपंचायत देणार एक हजार रु दंड आणि रेशनचे धान्यही बंद करणार असल्याचा महत्वपुर्ण ठराव बुधवारी जरंडी ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत…

मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटन आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते संपन्न*

अशोक गायकवाड रायगड : जिल्हा रुग्णालय अलिबाग यांच्या माध्यमातून राष्ट्रीय असंसर्गजन्य आजार नियंत्रण कार्यक्रम (NCD) च्या राष्ट्रीय वृद्धापकाळ सुश्रुषा कार्यक्रमांर्तगत जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी (महिला व पुरुष) यांच्याकरिता…

ठाणे महानगरपालिकेच्यावतीने ‘वीर बाल दिवसा’च्या निमित्ताने शिखांचे दहावे गुरू, गुरू गोबिंद सिंग यांचे छोटे साहिबजादे, बाबा जोरावर सिंग आणि बाबा फतेह सिंग यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे आणि माहिती…

कझाकिस्तानमध्ये विमान कोसळले

 ४२ प्रवाशांचा मृत्यू० २५ प्रवाशांना वाचवण्यात यश   अझरबैझान : कझाकिस्तानच्या अक्ताऊ या ठिकाणी विमान कोसळून ४२ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. कझाकिस्तानच्या आपत्ती मंत्रालयाने दिलेल्या…

२५ वर्षात स्वस्त वीज, गरीबांना २० लाख घरे !

स्लग- महाराष्ट्राचा रोडमॅप ठरला स्लग- महाराष्ट्राचा रोडमॅप ठरला नागपूर : राज्य सरकारने उर्जा विभागाचा पुढील २५ वर्षांचा रोडमॅप तयार केला आहे. पुढील तीन वर्षात वीजेचे दर कमी करण्यात येतील. पंतप्रधान आवास ग्रामीण प्लस योजनेंतर्गत यंदा राज्यात गरीबांना २० लाख पक्की घरे दिली जातील. तर पुढील पाच वर्षांत सर्वांना पक्की घरे देण्यात येतील अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी प्रेस क्लब येथे झालेल्या मीट द प्रेस कार्यक्रमात केली. देवेंद्र फडणवीस म्हणाले, माझ्यासाठी राजकारण हे सेवेचे माध्यम आहे. नागपूरकरांना अभिमान वाटेल असे काम करण्याचा प्रयत्न आहे. लोककल्याणकारी योजनांचा बोजा अर्थसंकल्पात येतो. मात्र या सर्व गोष्टींचे नियोजन सरकारने केले आहे, तीन वर्षांत उद्योगांसह सर्व श्रेणींचे विजेचे दर स्वस्त व्हावेत, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच दोन दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी गृहनिर्माण योजनांच्या अटी शिथिल करण्याची राज्य सरकारची मागणी मान्य केली आहे. लाभार्थीने १० टक्के निधी जमा करण्याची अटही काढून टाकण्यात आली आहे. त्यामुळे गरिबांना सहज घरे मिळू शकणार आहेत. राज्य सरकार आता २० लाख गरीबांना हक्काची घरे देणार आहे. यासोबतच या घरांमध्ये सोलर रूफ टॉप बसवण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे घरकुलधारकांना मोफत वीजही मिळत राहील. राज्यात सहा नदी जोड प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. हे प्रकल्प मोठे बदल घडवून आणतील आणि ‘जनरेशन प्रोजेक्ट’ ठरतील. विदर्भातील १० लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. ७ जिल्ह्यांना…

ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर – डॉ.अंबादास देवमाने

अशोक गायकवाड रायगड :जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी (महिला व पुरुष) यांच्याकरिता २६ डिसेंबर, २७ डिसेंबर आणि २८ डिसेंबरला जिल्हा सामान्य रुग्णालय रायगड-अलिबाग येथे सकाळी ९.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले असून सर्वानी शिबिराचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक,डॉ.अंबादास देवमाने यांनी केले आहे. या शिबिरामध्ये मेडिसीन विभाग-उच्च रक्तदाब, मधुमेह, पक्षाघात तपासणी व उपचार, हृदयरोग-गरजेनुसार 2D ECHO, X -ray, USG, ECG (stemi), डोळ्यांची तपासणी-डोळ्यांचे आजार व मोतिबिंदू चेकअप, मोफत चष्मे वाटप, स्त्रीरोग तपासणी-महिलांचे आजार, स्तन कर्करोग व गर्भाक्षयमुख कर्करोग तपासणी, नाक,कान, घसा तपासणी व शस्त्रक्रिया, गरजेनुसार एन्डोस्कोपीद्वारे कानाची श्रवण वाटप, ऑर्थोपेडिक-चेकअप, एक्स-रे, फिजिओथेरपि सुविधा, दंत विभाग- मुख आरोग्य तपासणी, दातांचे आजार, कवळी बसवणे, सर्जरी-हर्निया, हायड्रोसिल तपासणी व शस्त्रक्रिया, मानसिक-मानसिक आजार तपासणी, उपचार व तपासणी, आयुष-पंचकर्म, आयुर्वेद उपचार, समुपदेशन, आभाकार्ड-मोफत आभाकार्ड काढून दिले जाईल तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यकतेनुसार रक्ताच्या चाचण्या मोफत केल्या जातील.