Category: रायगड

raigad news and updates

डहाणूतील अतिक्रमणांवरील कारवाईविरोधात विनोद निकोले रस्त्यावर

 पूर्वसूचना, नोटिसा न देता कारवाई डहाणूच्या मुख्याधिकारी आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात संताप योगेश चांदेकर पालघरः रस्त्याच्या रूंदीकरणात येणारी अतिक्रमणे हटवल्याच्या विरोधात विनोद निकोले रस्त्यावर उतरले असून, नुकसान भरपाई आणि पुनर्वसन झाल्याशिवाय डहाणूतील रस्त्याचे रुंदीकरण होऊ न देण्याचा इशारा विनोद निकोले यांनी दिला आहे. डहाणूतील दुकाने, व्यापारी संकुलातील गाळे आणि झोपडपट्ट्या तोडण्याचे कारवाई डहाणू नगरपालिकेने केली असून त्या विरोधात आ. निकोले यांनी आक्रमक पवित्र घेतला आहे. यापूर्वी चर्चा झालेली असताना कोणतीही पूर्वसूचना न देता अतिक्रमणे काढण्यात आल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. दीडशे वर्षांपासून राहणाऱ्यांना केले बेघर विधिमंडळाचे अधिवेशन चालू असताना आमदारांना माहिती न देता ही कारवाई करण्यात आल्याबद्दल आ. निकोले यांनी नाराजी व्यक्त केली. डहाणू शहरातील रस्त्याच्या रुंदीकरणासाठी रस्त्यालगतची दुकाने, टपऱ्या, व्यापारी संकुले तसेच काही पक्की घरेही पाडण्यात आली. त्या संदर्भात कोणालाही नोटिसा किंवा पूर्वसचना देण्यात आली नव्हती, असा आरोप आ. निकोले यांनी केला. डहाणूतील काही लोक शंभर दीडशे वर्षांपासून या घरात राहत आहेत. त्यांच्या नावावर वीजबिले, तसेच घरपट्टी आहेत. असे असताना त्यांना डहाणू नगरपालिकेने कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न पाठवता त्यांची पक्की बांधकामे उद्ध्वस्त केली. मुख्याधिकाऱ्यांची बेपर्वा वृत्ती डहाणू नगरपालिकेने मुख्याधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अतिशय बेपर्वाईने वागले असून याप्रकरणी त्यांनी आमदारांनाही विश्वासात घेतले नाही. आमदाराच्या सूचनांनाही डावलले. हा हक्कभंग आहे. याप्रकरणी आपण मुंबईच्या अधिवेशनात आवाज उठवणार आहोत; शिवाय सर्व गाळेधारक व्यापारी तसेच ज्यांची बांधकामे पाडली, ते नागरिक यांची एक सर्वसमावेशक बैठक घेऊन त्यांच्या पुनर्वसनाचा तसेच त्यांच्या नुकसान भरपाईचा प्रश्न त्यात मांडला जाईल. त्याबाबत नगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची काय भूमिका आहे ती जाणून घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले.यावेळी माकपचे चंद्रकांत घोरखना  चेतन माढा,धनेश आक्रे, तसेच शमी पीरा संजय पाटील आदी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते. संबंधितांवर कारवाईचा आग्रह संबंधितांवर कारवाई करण्याबाबत आपण वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करू, असे सांगून जोपर्यंत पुनर्वसन आणि नुकसान भरपाईबाबत निर्णय होत नाही, तोपर्यंत डहाणूतील रस्त्यांचे रुंदीकरण होऊ देणार नाही, असा इशारा आ. निकोले यांनी दिला. डहाणू आणि तलासरी तालुक्यातील जनता या प्रश्नावर रस्त्यावर उतरून संबंधितांना जाब विचारेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

आरसीएफतर्फे देण्यात आलेल्या शितपेट्यांमुळे महिला मच्छिमारांच्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल घडेल -नितिन हिरडे*

अशोक गायकवाड* अलिबाग : आरसीएफतर्फे मच्छीमार महिलांना शितपेट्या वाटप करण्यात आले. या शीतपेटीमुळे या महिला मच्छिमारांच्या जीवनात एक महत्त्वपूर्ण बदल घडेल आणि ते अधिक आत्मविश्वासी होऊन आपला व्यवसाय आणि कुटुंब…

जिल्ह्यात सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहिम राबवावी- किशन जावळे*

अशोक गायकवाड* रायगड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन २०२५ ला भारत देश क्षयरोग मुक्त करण्याचे ध्येय ठेवलेले आहे जे की शाश्वत विकास ध्येयाच्या अपेक्षित कालावधी पेक्षा ५ वर्ष अगोदर…

५ जानेवारीपर्यंत जिल्ह्यात मनाई आदेश-चंद्रकांत सूर्यवशी

अशोक गायकवाड रत्नागिरी : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी २२ डिसेंबर १ वाजल्यापासून ते  ५ जानेवारी पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) प्रमाणे प्रतिबंधात्मक मनाई आदेश अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवशी यांनी दिला आहे. जिल्ह्यात २५ डिसेंबरला नाताळ सण तसेच ३१ डिसेंबर रोजी नववर्ष स्वागत समारंभ साजरे होणार आहेत. त्यानिमित्त जिल्ह्यात समुद्र किनारी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. सद्या राज्यात राजकीय व जातीय तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्याचे पडसाद सणादरम्यान पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.तसेच जिल्ह्यात विविध राजकीय पक्ष, विविध संघटना वेगवेगळ्या घटकांतील नागरिकांकडून त्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतात. जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग मुंबई-गोवा क्र. ६६ चे काम पूर्ण न झाल्याच्या निषेधार्थ आंदोलनात्मक कार्यक्रम करण्यात येतात. अशा वेळी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होते. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आवश्यक असल्याने मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत.शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरता येतील अशी हत्यारे, सोटे, तलवारी, बंदुका, सुरे लाठ्या अगर कोणतीही वस्तू घेवून फिरणे. अंग भाजून टाकणारा कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ घेवून फिरणे. दगड किंवा इतर शस्त्रे, हत्यारे किंवा शस्त्र फेकावयाची साधने बरोबर घेवून फिरणे, गोळा करणे किंवा तयार करणे. सभ्यता अगर निती याविरुध्द अशी किंवा शांतता धोक्यात येईल, अशी भाषणे करणे अगर सोंग आणणे अगर कोणतीही वस्तू किंवा जिन्नस तयार करणे व लोकांमध्ये प्रसार करणे. इसम अगर प्रेते किंवा आकृती यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे. सार्वजनिक रितिनी घोषणा करणे, गाणी गाणे, वाद्य वाजविणे. पाच किंवा पाचपेक्षा जास्त इसमांना विना परवानगी एकत्रित येण्यास मनाई आहे.अंत्ययात्रा, धार्मिक विधी, लग्न सोहळा, सामाजिक सण, शासकीय कार्यक्रम,, शासकीय सेवेत तैनात कर्मचारी, सार्वजनिक करमणुकीची सिनेमागृह, रंगमंच इत्यादी बाबींना प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाहीत.प्रतिबंधात्मक आदेशाच्या काळात कोणलाही मोर्चा, मिरवणुका तसेच सभा निवडणूक प्रचार सभेचे आयोजन करावयाचे झाल्यास संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे व अशी परवानगी घेतल्यानंतरच उपरोक्त प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाही.

माथेरानची आकांक्षा शिवाजी शिंदे बि.डी.एस. परिक्षेत उत्तीर्ण !

माथेरान : माथेरान सारख्या दुर्गम भागात तीन ते चार किलोमीटर अंतरावर शाळेत जाऊन शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील महाविद्यालयात शिक्षण घेणे ही खर्चिक बाब आहे. येथील सेंट झेव्हीयर या इंग्रजी…

कारागृहातून बाहेर पडल्यावर उद्योजकता विकास प्रशिक्षणाचा बंद्याना फायदा – किशन जावळे

अशोक गायकवाड रायगड : उद्योजकता विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून बंद्यांना चांगले वायरमन निर्माण होण्याची संधी मिळणार आहे. या उपक्रमातून रोजगार खुले करता येणार आहे. कारागृहातून बाहेर पडल्यावर समाजात वावरत असताना या…

रोटरी क्लब ऑफ ठाणे हिरानंदानी लिजेंड्सच्या वतीने

आदिवासी मुलांसाठी `प्रोजेक्ट नवरंग’ उपक्रम शहापूर तालुक्यातील ग्रामिण भागातील हजारांहून अधिक आदिवासी मुलांना मदतीचा हाथ ठाणे – ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील अतीदुर्गम भागातील दहावीच्या आदिवासी विद्यार्थ्यांना मदतीचा हाथ मिळावा या…

सिंधुदुर्ग येथील अघोरी कृत्य करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी

आमदार सुनील शिंदे यांची मागणी केतन खेडेकर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील हिर्लॉक आंबेडकरवाडी येथील एका घरात नरबळी सारख्या अघोरी आणि घृणास्पद कृत्याच्या तयारीत असलेल्या ५ व्यक्तींना दि. १८ डिसेंबर, २०२४…

माथेरानच्या मातीचे परीक्षण करण्याची गरज : स्थानिकांची मागणी

माथेरान :मागील काही वर्षांपासून माथेरान मध्ये हृदयरोग, अस्थमा, कॅन्सर, अर्धांगवायू अशा आजारांचा सामना करत आजही अनेकांना या व्याधींवर औषधोपचार घेण्यासाठी आर्थिक बाबतीत संघर्ष करावा लागत आहे. प्रदूषण मुक्त अशी खासकरून…

कृत्रिम बुद्धिमत्तेपासून दूर राहण्याऐवजी तंत्रज्ञान समजून घ्या-ब्रिजेश सिंह

अशोक गायकवाड नागपूर : माध्यमात कार्यरत असलेल्या प्रत्येक व्यक्तिला अधिक माहिती सक्षम होण्याचा मार्ग कृत्रिम बुद्धिमत्तेने म्हणजेच ‘एआय’ ने उपलब्ध करून दिला आहे. आपल्या मातृभाषेतून मिळणा-या ज्ञानाला ज्या मर्यादा होत्या,…