Category: रायगड

raigad news and updates

 बदलापूरची बदनामी केल्यानंतर फडणवीसांकडून बंदूक घेऊन फोटो

सुप्रिया सुळे यांचे फडणवीसांवर टीकास्त्र, सुभाष पवार यांच्या प्रचारासाठी बदलापूरात सभा   बदलापूर : राज्याचे गृह मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात बदलापूर शहराची बदनामी झाली. मात्र, एवढी गलिच्छ घटना घडल्यानंतरही फडणवीस बदलापूरकडे फिरकले नाहीत. उलट बंदूक घेऊन बदलापूर असे बोर्ड लावले गेले, अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज फडणवीसांवर टीकास्त्र सोडले. बदनामी झालेल्या बदलापूर शहराला आगामी सहा महिन्यांत पुन्हा नावलौकिक मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू या, असे आवाहनही खासदार सुळे यांनी केले. मुरबाड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष गोटीराम पवार यांची बदलापूरमधील कात्रप येथे भव्य जाहीर सभा झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. या वेळी खासदार बाळ्यामामा म्हात्रे, खासदार निलेश लंके, लोकनेते गोटीरामभाऊ पवार, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या ज्योती ठाकरे, ज्येष्ठ रिपब्लिकन नेते श्याम गायकवाड,  महेश तपासे, विद्या वेखंडे यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, आप, आरपीआय सेक्युलर पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीलाच बदलापूर येथील महिला व नागरिकांचे सुप्रिया सुळे यांनी आभार मानले. बदलापूरच्या लेकीबाबत झालेले चुकीचे वर्तन हे बदलापूरकरांनी उत्स्फूर्त आंदोलन केल्यामुळेच जगाला समजले. या आंदोलनामुळे ही घटना समजली. अन्यथा या भयंकर प्रकाराची जगाला माहिती मिळाली नसती, असे नमूद करीत सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री व गृह मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. बदलापूर शहरात पिण्याचे पाणी, वाहतूक कोंडी, अपुरी लोकल सेवा आदी अनेक समस्या आहेत. त्या सोडविण्यासाठी प्रयत्न झालेले नाहीत. बुलेट ट्रेनवर कोट्यवधी रुपये खर्च होत असताना, बदलापूरकर गर्दीत प्रवास करीत आहेत. बुलेट ट्रेनऐवजी बदलापूर ते चर्चगेटपर्यत ट्रेन लिंक करायला हवी. स्वच्छ स्वच्छतागृहे उभारायला हवीत, असे भाषणात म्हटल्यावर नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात त्याला पसंती दिली. नगरहून मुंबईला येताना माळशेज घाटात खड्डे लागल्यानंतर आम्हाला मुरबाड मतदारसंघ सुरू झाल्याचे समजते. गेल्या २० वर्षांत या भागाचा विकास झाला नाही. काचेच्या पुलाची १० वर्षांपासून घोषणा केली जात आहे, ही काय भानगड आहे. केवळ निवडणूक आली की दिशाभूल करण्याचा उद्योग केला जात आहे, अशी टीका खासदार निलेश लंके यांनी केली. बदलापूरकरांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याचे बाळ्यामामा म्हात्रे यांनी सांगितले. महिला लोकलसह  रेल्वे प्रश्नांसाठी आपण पाठपुरावा करणार आहोत, असे आश्वासन म्हात्रे यांनी दिले. बदलापूर शहरात २० वर्षांत महाविकास आघाडीची प्रथमच भव्य सभा झाली. आतापर्यंत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून, मुरबाड मतदारसंघात परिवर्तन अटळ आहे. मुरबाडला गेल्यानंतर बदलापूरमध्ये विकास केला, तर बदलापूरला आल्यावर मुरबाडमध्ये विकास केल्याचे सांगितले जाते. लोकल प्रवाशांचे हाल सुरु असून, महिला लोकलची आवश्यकता आहे. पाणीपुरवठ्याचे हेतूपुरस्सर नियोजन झाले नसून, बगलबच्च्यांचे टँकर सुरू झाले आहेत. २० वर्षांपासून प्रत्येक निवडणुकीत बदलापूरच्या सुसज्ज हॉस्पिटलचे आश्वासन दिले जाते, याकडे सुभाष पवार यांनी लक्ष वेधले. चौकट टोपी घालून श्रेयासाठी धाव वडोदरा एक्सप्रेस हा केंद्र सरकारचा प्रकल्प असून, या महामार्गाचे श्रेय घेण्यासाठी ते टोपी घालून धावले.पण रेल्वे हा विषय माझा नाही, असे म्हणतात. एखादे काम झाले की ते मी केले, तर रखडलेली कामे दाखविली की ते माझे काम नाही, अशी त्यांच्या कामाची स्टाईल आहे, असा टोला सुभाष पवार यांनी कोणाचेही नाव न घेता मारला. 00000

भुई धोपटण्याचा प्रकार

काश्मीरमधील 370 वे कलम रद्द करण्यास कुणाचा विरोध असण्याचे काहीच कारण नाही. विधानसभा बरखास्त करून संसदेत हा विषय मंजूर करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे आता काळाची चक्रे…

श्रीवर्धन विधानसभेमध्ये १४ व १५ नोव्हेंबर रोजी होणार दिव्यांग, ज्येष्ठांचे गृहमतदान -महेश पाटील

अशोक गायकवाड रायगड : १९३ श्रीवर्धन विधानसभा मतदार संघामध्ये माणगाव, तळा, रोहा, श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यातील पोस्टल बॅलेटकरिता ८५+ मतदार ४७२ व दिव्यांग मतदार ११६ नी घरुन मतदान करण्याकरिता पोस्टल बॅलेटसाठी…

उरण विधानसभेमध्ये १५ नोव्हेंबर रोजी होणार दिव्यांग,ज्येष्ठांचे गृहमतदान – जनार्दन कासार

अशोक गायकवाड रायगड :१९०-उरण विधानसभा मतदार संघामध्ये पोस्टल बॅलेटकरिता ८५+ मतदार ६८ व दिव्यांग मतदार १६ नी घरुन मतदान करण्याकरिता पोस्टल बॅलेटसाठी १२ ड अर्ज दिले आहेत. त्यानुसार १९०-उरण विधानसभा मतदार…

निवडणूक प्रक्रियेदरम्यान नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी -रुही खान

अशोक गायकवाड रायगड : मतदानाच्या दिवशी मतदारांना केंद्रावर सुरळीत प्रवेश, मार्गदर्शक सूचना, दिशादर्शक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची तैनाती याबाबत त्यांनी माहिती घेतली. निवडणूक प्रक्रियेदरम्यान नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्यात…

श्रीवर्धन विधानसभेमध्ये १४ व १५ नोव्हेंबर रोजी होणार दिव्यांग, ज्येष्ठांचे गृहमतदान -महेश पाटील

अशोक गायकवाड रायगड : १९३-श्रीवर्धन विधानसभा मतदार संघामध्ये माणगाव, तळा, रोहा, श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यातील पोस्टल बॅलेटकरिता ८५+ मतदार ४७२ व दिव्यांग मतदार ११६ नी घरुन मतदान करण्याकरिता पोस्टल बॅलेटसाठी…

विधानसभा मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य – किशन जावळे

अशोक गायकवाड रायगड : विधानसभा निवडणूकीसाठी २० नोव्हेबर २०२४ रोजी मतदान होणार असून मतदान करण्यासाठी, ज्या मतदारांचे मतदार यादीत नाव आहे, अशा मतदारांकरिता भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर…

कर्जत विधानसभेमध्ये १५ व १६ नोव्हेंबर रोजी होणार दिव्यांग,ज्येष्ठांचे गृहमतदान – प्रकाश संकपाळ

अशोक गायकवाड रायगड : १८९-कर्जत विधानसभा मतदार संघामध्ये पोस्टल बॅलेटकरिता ८५+ मतदार १७३ व दिव्यांग १६ नी घरुन मतदान करण्याकरिता पोस्टल बॅलेटसाठी १२ ड अर्ज दिले आहेत. त्यानुसार १८९-कर्जत विधानसभा…

माथेरानमध्ये स्पायरल पार्किंग शिवाय पर्याय नाही !

स्थानिकांची मागणी माथेरान : वाढत्या पर्यटकांच्या संख्येमुळे नेहमीच गाड्यांना पार्किंग करण्यासाठी जागा अपुऱ्या प्रमाणात होत असल्याने दस्तुरी नाक्यावर वनखात्याच्या जागेत सर्वत्र जंगलांनी व्यापलेल्या या ठिकाणी जवळपास एकहजार गाड्यांची सोय होणेकामी…

दिव्यांग क्रांती संघटना व दिव्यांग उत्कर्ष सामाजिक संस्थेचा प्रशांत ठाकूर यांना पाठिंबा

पनवेल : भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी आणि मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांना दिवसेंदिवस विविध संस्था संघटनांचा वाढता पाठिंबा मिळत असून या विधानसभा निवडणुकीसाठी दिव्यांग क्रांती संघटना व दिव्यांग उत्कर्ष सामाजिक संस्थेने आपला पाठिंबा जाहीर केला आहे. या संदर्भात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे पाठिंबा पत्र सुपूर्द करण्यात आले असून पाठिंबा पत्रात म्हंटले आहे कि, आमच्या संघटनेची झालेल्या सर्वसाधारण बैठकीत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बी. जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाने सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी पनवेल विधानसभा मतदार संघाचे भाजप महायुतीचे आमदार कार्यक्षम तसेच कार्यसम्राट उमेदवार म्हणून बिनशर्त व सक्रीय पाठिंबा जाहीर केलेला आहे. त्यामुळे दिव्यांग क्रांती संघटना व दिव्यांग उत्कर्ष सामाजिक संस्थेचा प्रत्येक दिव्यांग सदस्य, त्यांचे कुटुंबीय, निराधार तसेच इतर सर्व सदस्य, पदाधिकारी वर्ग आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहे. आदरणीय लोकनेते रामशेठ ठाकूर हे अत्यंत दानशूर व उदार तसेच समाजातील गोरगरीब व दिव्यांग तसेच विद्यार्थी व गुणवंत, गरजवंत अशा सर्वांना मदतीचा हात नेहमीच पुढे करणारे लोकनेते आहेत. आणि त्यांचा सामाजिक बांधिलकीचा वारसा त्यांचे चिरंजीव आमदार प्रशांत ठाकूर चालवत आहेत.  सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात प्रदिर्घ अशी यशस्वी व जनहिताची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. राजकारण व समाजकारण यांचा अनुभव घेत व अभ्यास करीत विधानसभा निवडणुकीत आमदार पदावर यशस्वी गरूड झेप घेवून पनवेल मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणारे एक कर्तव्य दक्ष व जनहिताची कामे करण्यात मग्न राहणारा आमदार आम्हाला लाभला हे या मतदारसंघाचे सुदैव आहे. अत्यंत दांडगा जनसंपर्क व सर्वसामान्य जनतेविषयीची सहानुभूती यामुळे आता सन २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत सुध्दा आपण फार मोठ्या मताधिक्याने विजयी होणारच याविषयी आम्हा सर्वांना खात्री आहे. नेतृत्व गुण व समाजसेवी व्यक्ती म्हणून या मतदारसंघातील सुजाण जनता आपणास बहूसंखेने विजयी करणार हे निश्चित असून आमच्या दिव्यांग क्रांती संघटना व दिव्यांग उत्कर्ष सामाजिक संस्थेतर्फे पाठिंबा देत आहोत, असेही या पाठिंबा पत्रात म्हंटले आहे.