Category: रायगड

raigad news and updates

पारगाव येथील वादग्रस्त बांधकामावर सिडकोचा हातोडा

पनवेल – विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता संपण्यापूर्वीचा मुहूर्त साधत सिडको महामंडळाने नवी मुंबई पोलीसांच्या सहकार्याने पनवेल तालुक्यातील पारगाव येथील टेकडीवर सिडको महामंडळाकडून विना परवानगी घेता बांधलेले बांधकाम गुरुवारी पहाटेपासून जमिनदोस्त करण्याची…

रायगडमध्ये दोन टक्के मतदान वाढले

अलिबागमध्ये सर्वाधिक 77. 15 टक्के मतदान  पनवेलमध्ये मतदान करण्यात महिला आघाडीवर अलिबागः रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांमध्ये 20 नोव्हेबर रोजी झालेल्या मतदानात 69.04 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क् बजावला. 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणूकीच्या तुलनेत 2024 मध्ये 2 टक्क्यांनी मतदान वाढले आहे. 2024 साली झालेल्या लोकसभेच्या निवडणूकीपेक्षा 10 टक्के मतदान वाढले आहे. पनवेल मतदारसंघात सर्वात कमी 58.70 टक्के तर सर्वात जास्त अलिबाग मतदारसंघात 77.15 टक्के मतदान झाले आहे. पनवेल मतदारसंघात मतदान करण्यात पुरूषांपेक्षा महिलांची टक्केवारी जास्त आहे. पनवेल मतदारसंघात 59.28 टक्के पुरूषांनी तर 59.19 टक्के महिला मतदारांनी मतदान केले, अशी माहिती रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी गुरूवरी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे व उपनिवडणूक अधिकारी नितीन वाघमारे उपस्थित होते. रायगड जिल्ह्यात पनवेल, उरण, कर्जत, पेण, अलिबाग, श्रीवर्धन, महाड हे सात विधानसभा मतदरसंघ आहेत. या सात मतदारसंघांमध्ये 20 नोव्हेबर रोजी  मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. जिल्ह्यात 24 लाख 88 हजार 788 मतदार आहेत. त्यापैकी 17 लाख 16 हजार 403 मतदारांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला. 69.80 टक्के पुरूष मतदारांनी मतदान केले. 68. 12 टक्के महिला   मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.  पनवेल मतदारसंघांत मतदान करण्यात  पुरूषांपेक्षा महिलांचे प्रमाण जास्त आहे. 58.28 टक्के पुरूष तर 59.19 टक्के महिलांनी मतदान केले. पनवेल मतदारसंघात सर्वात कमी 58.70 टक्के मतदान झाले. कर्जतमध्ये 74.29, परणमध्ये 76.80, पेणमध्ये 73.02 , अलिबागमध्ये 77.15, श्रीवर्धनमध्ये 61.37 तर…

बीडमध्ये अपक्ष उमेदवाराच मतदान केंद्रातच मृत्यू

बीड : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या दिवशी बीडमधील अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. मतदान केंद्रावरच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या अचानक निधनाने बीडमध्ये शोककळा पसरली आहे. बीड विधानसभा…

सोलापुरात शेवटच्या क्षणी काँग्रेसकडून ठाकरेंना दगा

सोलापुर – विधानसभेच्या निवडणूकीत शेवटच्या दिवशी सोलापूर, रामटेक मतदारसंघात ठाकरेंनी दिलेल्या उमेदवाराऐवजी काँग्रेसकडून अपक्ष उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणी काँग्रेसनं घेतलेल्या यू टर्नमुळे ठाकरेंना दगाफटका बसला आहे. रामटेक मतदारसंघात महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांनी विशाल बरबटे…

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यकारी अध्यक्षपदी न्या. भूषण गवई यांची नियुक्ती

सिंधुदुर्ग : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली च्या (एन.एल.एस.ए.) कार्यकारी अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ही नेमणूक केली असून…

अल्पवयीन तरुणांच्या अपघाती मृत्यूमुळे माथेरानमध्ये शोककळा

माथेरान : माथेरान मधून सहा अल्पवयीन युवक साजगाव यात्रेसाठी खोपोली येथे गेले होते. यात्रेवरून परत येत असताना महड जवळ उभ्या असलेल्या टेम्पोला यातील एका स्कुटीने जोरदार धडक दिली. यामध्ये माथेरान…

अनिल देशमुख रक्तबंबाळ गाडीवरील दगडफेकीत गंभीर जखमी

नागपूर : महाराष्ट्रातील विधानसभेच्या प्रचाराच्या आजच्या शेवटच्या दिवशी अखेर हिंसेचे गालबोट लागलेच. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक झाली असून त्यांच्या डोक्याला जबर मार लागला आहे. अनिल देशमुख हे या हल्ल्यात…

नवीन पनवेलमधून आमदार प्रशांत ठाकूर यांना मताधिक्य देणार-संदीप पाटील

पनवेल : पनवेलचा विकास करणारे आमदार प्रशांत ठाकूर यांना नवीन पनवेल मधून मताधिक्य देवून बहुमताने निवडून आणणार असा ठाम विश्वास भाजपचे पनवेल शहर उपाध्यक्ष व माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी व्यक्त केला. नवीन पनवेल येथे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.सेक्टर १८ मधील सिडको विनायक  मंदिरातील श्री गणेशाचे दर्शन घेवून प्रचाराला सुरूवात केली.  यावेळी माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी बोलताना सांगितले कि, पनवेलच्या विकासासाठी आमदार प्रशांत ठाकूर विजयी होणे गरजेचे आहे. तसेच महायुती सरकारने जनतेसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवून त्यांचा लाभ सर्वसामान्य माणसाला मिळवून दिला आहे. लाडकी बहीण योजना राबवून महिला सक्षमीकरणाचे काम केले आहे आत्ता या योजनेचे पैसे वाढविण्यात येणार आहेत. त्यामुळे गतीमान पद्धतीने काम करणारे महायुतीचे सरकार राज्यात पुन्हा सत्तेत आणा असेही त्यांनी यावेळी सांगितले. पनवेल विधानसभा मतदार संघाचा विकास करणारे कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रचारात जोरदार आघाडीत घेतली आहे. महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे संपुर्ण मतदार संघ पिंजून काढत आमदार प्रशांत ठाकूर यांना प्रचंड मतांनी विजयी करण्यासाठी जोरदार प्रचार करत आहेत. यावेळी माजी नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ, जगदीश घरत, माजी उपनगराध्यक्ष सुभाष भुजबळ, माजी नगरसेवक तेजस कांडपिळे, विभागीय अध्यक्ष विजय म्हात्रे, जितेंद्र वाघमारे, अॅड. चंद्रकांत मढवी,  गंगाधर भगत, महेश तांडेल, मयूर कदम, गिरीश खरिवले, पप्पू साळवी, अमोल भगत, पप्पू वाघमारे,  आदी उपस्थित होते. 00000

८ दिवसात सरकार बदला,  नशिब बदलतो- उद्धव ठाकरे

 मालेगाव : शेतकऱ्यांना परत एकदा मी कर्जमुक्त करुन दाखवणार म्हणजे दाखवणारचं असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं. तसेच सोयाबीनला हमी भाव देणार आहे. त्यामुळं आठ दिवसांनी तुम्ही सरकार बदलून दाखवा, मी…

पावसात भिजलो की निकाल चांगला लागतो- शरद पवार

इचलकरंजी : महाराष्ट्रामध्ये अनेकवेळा मी बोलायला उभा राहिलो की पावसाची सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो अशी मिश्कील टिप्पणी करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी भर…