Category: रायगड

raigad news and updates

राहुल गांधीना संविधान पोरखेळ वाटतं का?

ऍड. प्रकाश बिनेदार यांचा सवाल पनवेल : काँग्रेसचे राहुल गांधी तुम्हाला संविधान म्हणजे पोरखेळ वाटला का?, असा सवाल भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस तसेच मागासवर्गीय समाजाचे नेते ऍड. प्रकाश बिनेदार यांनी केला आहे.  नागपूरमधील सभेतील संविधानाच्या पुस्तकाचा एक व्हिडीओ शेअर झाला आहे.  यात हे पुस्तक कोरेच असल्याचे दिसले. त्यामुळे संविधानाच्या कोऱ्या प्रती वाटल्याची टीका त्यांच्यावर करण्यात येत आहे. ऍड. प्रकाश बिनेदार यांनी म्हंटले आहे कि, “राहुल गांधी तुम्ही लोकसभा निवडणुकीपासून हातात संविधान घेऊन संविधान वाचवा म्हणून जो काही कांगावा करत आहात, त्यातला खोटेपणा जनतेच्या कधीच लक्षात…

सुकापूर ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत चाहूशेठ पोपेटा यांची भाजपमध्ये घरवापसी

राज भंडारी पनवेल : विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपली असताना १८८ पनवेल विधानसभा निवडणुकीत भाजपचे मागील ३ वेळा आमदार राहिलेले प्रशांत ठाकूर चौथ्यांदा या निवडणुकीत शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील यांच्यासोबत लढत आहेत. त्यातच ऐन निवडणुकीच्या तोंडावर इतर पक्षांतील पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात घेवून आपली ताकद वाढविण्याचा प्रत्येक पक्ष तयारी करीत असतानाच पनवेल तालुक्यातील सुकापूर ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत पोपेटा यांनी भारतीय जनता पक्षात घरवापसी केली. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचाराचा झंजावात सुरु आहे. त्यांच्या विजयाची चिन्ह दिसत असतांना पोपेटा यांचा झालेला प्रवेश महत्वाचा आहे. मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याहस्ते त्यांचा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे भाजप आमदार महेश बालदी, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, किशोर सुरते, राजेश पाटील, महेश पाटील, ज्ञानेश्वर पाटील यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. भाजपचेच पूर्वी असलेले चंद्रकांत पोपेटा सक्रिय कार्यकर्ते आहेत. त्यांनी शेकाप सोडून पुन्हा भाजप प्रवेश केल्याने सुकापूर विभागात प्रशांत ठाकूर यांच्या विजयाला उपयोग होऊ शकेल असे चित्र सध्यातरी दिसत आहे.

प्रितम म्हाञे यांचा जलवा, तरूणाई एकवटली

 राज भंडारी पनवेल :सिडकोच्या माध्यमातून उरण वेगाने विकसित होत असताना योग्य प्रशिक्षणाअभावी तरूणाच्या हाताला काम मिळत नसल्याने भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. या तरूणाचे भविष्य उद्थ्वस्त होवू नये यासाठी प्रितम म्हाञे यानी जे एम म्हाञे ट्रस्टच्या माध्यमातून युवकाना प्रशिक्षीत करण्याचे काम हाती घेतले आहे. गेल्या काही महिन्याच्या परिश्रमानंतर येथून प्रशिक्षण घेतलेल्या 44 तरूण तरूणीना विमानतळात नोकऱ्या मिळाल्याने तरूणाईत आशादायी वातावरण निर्माण होवून सारी तरूणाई त्यांच्या मागे एकवटली असल्याचे चिञ पहायला मिळत आहे. उरण विधानसभा निवडणूक प्रचारासाठी प्रितम म्हात्रे यांनी उरण तालुक्याचा दौरा केला. त्याप्रसंगी तरूणाईने एकच जल्तोष करून त्याच्या या अभूतपुर्व कार्याची पोच पावती दिली. यावेळी पक्षाचे जेष्ठ नेते जे एम म्हाञे, नारायणशेठ घरत, पांडूमामा घरत, अनिल ढवळे, रमाकांत घरत, जितेंद्र घरत, सचीन ताडफळे, माधव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी तरूणाईला मार्गदर्शन करताना सचीन ताडफळे म्हणाले की आज युवकाना दिशा देण्यासाठी तरूणाईला रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या युवा नेतृत्वाची गरज आहे. आपले दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवार रिटायरमेटला आले असून त्याना मतदारानी पेन्शनवर पाठवून प्रितम म्हाञे याना आपले प्रतिनिधीत्व करण्यासाठी विधानसभेत पाठवावे. अनिल ढवळे यानी निष्क्रीय विरोधकाचा समाचार घेताना स्थानिक आगरी, कोळी, कराडी याना अस्मिता दाखविण्याचे आवाहन केले. तसेच भुमी पुञाचा अवमान करण्याचे काम येथील आमदारानी केले असून त्याचा त्याना जबाब त्याना द्यावा लागेल.असे सागितले.

विकासासोबत रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी संधी द्या-प्रितम म्हाञे

राज भंडारी पनवेल : पनवेल तालुक्यातील पोसरी, गिरवले, नारपोली सावळा या भागात आ. विवेक पाटील यानी भरीव विकासाची कामे केली असून त्यानंतर माञ आलेल्या लोकप्रतिनीधीचे या भागाकडे दुर्लक्ष झाले. हा विकासाचा गॅप आपल्याला भरून काढून तालुक्याचा रोजगाराचा प्रश्न सोडवायचा आहे त्यासाठी शिट्टीच्या चिन्हासमोरील बटण दाबून आपल्याला संधी द्यावी असे प्रतिपादन उरण विधानसभेचे उमेदवार प्रितम म्हाञे यानी केले. शेकाप उमेदवार प्रितम म्हात्रे यानी कष्टकरीनगर पोसरी, नारपोली, गिरवले, सावळा, देवळोली, कसळखंड, भाताण गावात निवडणूक दौरा केला. त्यावेळी गावागावातून त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. दौऱ्यात त्यांच्यासोबत नारायणशेठ घरत, मनोहर पाटील, जगदिश पवार, सचीन ताडफळे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रितम म्हात्रे म्हणाले की युवकाच्या रोजगाराचा प्रश्न आज गंभीर आहे तो सोडविण्यासाठी आपण प्रशिक्षण सुरू केले असून विमानतळात 44 जणाना नोकऱ्या मिळवून दिल्या आहेत. भविष्यात ही संख्या मोठी असेल हे काम मोठ्या प्रमाणावर करण्यासाठी आपण मला संधी द्यावी. असे आवाहन प्रितम म्हात्रे यांनी केले. यावेळी आपच्या संघटन मंञी डा.शेख यानी प्रितम म्हाञे याना पक्षाचा जाहीर पाठिंबा असल्याचे पञ दिले.

उमेदवारांनी निवडणूक खर्चाशी सबंधित कागदपत्रे तपासणीकरिता सादर करावीत -मुकेश चव्हाण

अशोक गायकवाड रायगड : विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये १९२ अलिबाग विधानसभा मतदारसंघात एकूण १४ अधिकृत उमेदवार असून अंतिम झालेल्या उमेदवारांनी खर्च नोंदवही, निवडणूक खर्चासाठी उघडलेली स्वतंत्र बँक खाते पासबुक, निवडणूक…

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयात चर्मकार समाज खारीचा वाटा उचलणार

 चर्मकार समाजाचे नेते शिवदास कांबळे राज भंडारी पनवेल : सर्व गटई कामगार महायुतीचे उमेदवार व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून विजयात चर्मकार समाज खारीचा वाटा उचलेल, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस आणि चर्मकार समाजाचे नेते शिवदास कांबळे यांनी दिली. शिवदास कांबळे यांच्या पुढाकाराने चर्मकार समाजातील गटई कामगारांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना जाहीर पाठिंबा दिला. त्यावेळी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस  भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आणि लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, कामगारनेते व प्रदेश उपाध्यक्ष महेश जाधव, जगदीश ठाकूर, युवक अध्यक्ष नेरूळकर, भाजपचे शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी नगराध्यक्ष सुनिल मोहोड, माजी नगरसेवक सुनिल नाईक, कारंडे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि गटई कामगार उपस्थित होते. शिवदास कांबळे यांनी पुढे बोलताना सांगितले कि, चर्मकार समाजाच्या उन्नतीसाठी सरकार काम करीत आहे. त्या अनुषंगाने विविध योजना प्रत्येक कामगाराला मिळाली पाहिजे यासाठी आपण कायम प्रयत्नशील राहिलो आहोत. लोकप्रतिनिधी म्हणून आमदार प्रशांत ठाकूर हे सातत्याने लोकांच्या हिताचे काम करीत असतात. त्यामुळे त्यांना सर्व कामगारांचा पाठिंबा, असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले. रोहिदास चर्मकार समाज देशभर पसरलेला असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या समाजाचे कौतुक केले आहे. देशाशी एकरूप असलेला या समाजाचा देशाच्या योगदानात वाटा आहे. ‘सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास’ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मविश्वासाने काम होत आहे. सरकार संविधानाच्या विरोधात आहे असा खोटा प्रचार आणि दिशाभूल करण्याचे काम विरोधक करत असतात. मात्र सर्वप्रथम २६ नोव्हेंबर २०१५ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे संविधान दिन झाला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर घटनेचे शिल्पकार आहेत. त्यांनी दिलेल्या संविधानाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूजा करून लोकशाहीच्या मंदिरात नतमस्तक झाले होते. सोयीनुसार संविधान बदलण्याचे काम काँग्रेस पक्षाने स्वार्थासाठी केले असल्याचेही त्यांनी आपल्या भाषणातून अधोरेखित केले. पीएम आवास, उज्वला गॅस, शौचालय, मातृवंदन योजना, जलजीवन मिशन, लाडकी बहीण योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण, पीएम किसान, शेतकरी सन्मान, पीक विमा, आरोग्य योजना, अशा अनेक लोकहिताच्या योजना राबवल्या आहेत, त्यामुळे लोकांचे काम करणारे हे सरकार पुन्हा येण्यासाठी मला विजयी करा, असे आवाहनही आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.

पूर्वपिठिका २०२४ निवडणूक काळात अत्यंत मार्गदर्शक – किशन जावळे

अशोक गायकवाड रायगड : प्रसिध्दी माध्यम कक्ष निर्मित रायगड अलिबाग पूर्वपिठिका-२०२४ निवडणूक काळात निवडणूक अधिकारी, कर्मचारी तसेच पत्रकारांसाठी अत्यंत मार्गदर्शक असल्याचे मत जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी व्यक्त केले. निवडणूक काळात ही…

शरद पवारांनी महाराष्ट्राला काय दिले ?- अमित शाह

सांगली : शरद पवार स्वताला शेतकऱ्यांचे मसीहा मानतात पण मोदींनी शेतकऱ्यांना ६००० रुपये देण्याचं काम केलं. शरद पवार यांनी दहा वर्षे सत्तेत होते तेव्हा महाराष्ट्रासाठी काय दिले हे सांगावं, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री…

पूर्वपिठिका-२०२४ निवडणूक काळात अत्यंत मार्गदर्शक – किशन जावळे

रायगड : अशोक गायकवाड* प्रसिध्दी माध्यम कक्ष निर्मित रायगड-अलिबाग पूर्वपिठिका-२०२४ निवडणूक काळात निवडणूक अधिकारी, कर्मचारी तसेच पत्रकारांसाठी अत्यंत मार्गदर्शक असल्याचे मत जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी व्यक्त केले. निवडणूक काळात ही पुस्तिका तयार केल्याबद्दल प्रसिध्दी माध्यम कक्षाचे कौतुक केले.* यावेळी निवडणूक निरीक्षक संतोष कुमार राय, दुनीचंद राणा, सतीश कुमार एस, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, नवी मुंबई पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर, राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक रविकिरण कोले यांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मच्छिमार बांधवांनी मतदानाचा हक्क बजावावा – किशन जावळे

अशोक गायकवाड रायगड :बुधवार, दि.२० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ०७.०० ते सायंकाळी ०६.०० वाजेपर्यंत विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चे मतदान संपन्न होणार असून रायगड जिल्ह्यातील मच्छिमार सहकारी संस्थेच्या सर्व सभासदांनी, नौका मालकांनी, नौकेच्या तांडेल, नौकेचे खलाशी, ओली व सुकी मासळी विक्री करणाऱ्या महिला-भगिनी, जाळे विणणारे मच्छिमार, हाताने मासे पकडणारे मच्छिमार, गावातील सर्व मत्स्य संवर्धक व जलाशयात मासेमारी करणारे सर्व मच्छिमारांनी मतदानाचा पवित्र हक्क बजवावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी किशन जावळे यांनी केले. जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी अपर जिल्हाधिकारी सुनिल थोरवे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, नितीन वाघवारे, सहायक आयुक्त, मस्त्यव्यवसाय संजय पाटील, तहसीलदार सा.प्र. डॉ. शीतल रसाळ आदि उपस्थित होते.जिल्हाधिकारी जावळे म्हणाले की, रायगड जिल्ह्याला १२२ किलोमिटरची सागरी किनारपट्टी लाभलेली आहे. त्याचप्रमाणे रायगड जिल्हा हा चांगल्या पर्जन्यमानाचा जिल्हा असल्यामुळे येथे गोड्या पाण्याची तळी, तलाव, जलाशय इत्यादी अस्तित्वात आहेत. मतदानाच्या दिवशी मतदान करुनच नौका मासेमारीसाठी समुद्रात नेण्यात यावी, त्याचप्रमाणे सागरी मासेमारी सफरीचे नियोजन करावे. मच्छिमारी हा रायगड जिल्ह्याचा प्रमुख व्यवसाय असून जिल्ह्यात ४ हजार ५०० नौका आहेत. यामुळे २५ हजारपेक्षा जास्त लोकांना थेट रोजगार मिळत आहे. गावातील सागरी मासेमारीसाठी गेलेल्या नौका मतदानाच्या दिवशी बंदरात आणाव्यात जेणेकरुन त्यावरील तांडेल, खलाशी इत्यादींना मतदान करता येईल. मतदानाची टक्केवारी वाढावी तसेच लोकशाही बळकट व्हावी, याकरिता सर्वांनी मतदानाचा हक्क बजावुन लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी व्हावे. 0000