Category: रायगड

raigad news and updates

महेश बालदी यांनी आगरी समाजाची माफी मागावी

अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेची मागणी पनवेल : अनेक विधानांतून महेश बालदी यांनी आगरी समाजाचा घोर अपमान केला आहे. याबद्दल बालदी यांनी समाजाची जाहीर माफी मागावी. समाजाबद्दलचे असे अनुद्गार यापुढे आम्ही कदापि खपवून घेणार नसल्याचा इशारा अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेने पत्राद्वारे महेश बालदी याना दिला आहे. यापूर्वी अखिल आगरी समाज परिषद यांनी देखील महेश बालदी यांनी आगरी समाजाची माफी मागावी अशी मागणी केली होती. अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेने पत्राद्वारे आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटले आहे की, काही लोकांच्या आशिर्वादाने सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर आतापर्यंत आगरी समाजाबद्दल जी विधाने केलीत, त्यांतून आगरी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. ज्या आगरी समाजाने तुम्हाला डोक्यावर घेतले, त्यानांच कमी लेखण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न तुम्ही वारंवार केला आहात. “ही काही आगरी समाजाच्या संघटनेची निवडणूक नाही.” या विधानातून तुमचा समाजाला एकप्रकारे कस्पटासमान लेखण्याचा इरादा दिसून आला आहे. अशा प्रकारे सभ्यतेच्या साऱ्या मर्यादा महेश बालदी यांच्याकडून तोडल्या गेल्या आहेत. याचा समस्त आगरी समाज जाहीर निषेध करीत आहे. बालदी यांच्याकडून ही गोष्ट पहिल्यांदाच अनवधानाने घडलेली आहे, असेही म्हणता येणार नाही. बालदी हे आगरी समाजाला तुच्छतेच्या भावनेने पहात असल्याचेच त्यांच्या देहबोलीतून आतापर्यंत दिसून आले आहे. यापूर्वी महेश बालदी यांनी माझी जात बघायला, तुम्ही मला मत देणार आहात की मुलगी” अशी वायफळ बडबड करुन येथील माता-भगिनींचा अपमान केला आहे. आमच्या आयाबहिणी काही रस्त्यावर पडलेल्या नाहीत. हे आपण ध्यानात घ्यावे. असा सूचक इशारा अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेने दिला आहे. एकीकडे स्थानिक भूमिपुत्र नवी मुंबई विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी करीत आहे. त्यासाठी त्यांनी अनेक आंदोलने देखील केली, आणि दुसरीकडे मात्र  या विमानतळाचा उल्लेख जाणीवपूर्वक “आदाणी विमानतळ” असा करुन बालदी यांनी स्थानिकांच्या, प्रकल्पग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. अशा प्रकारे अनेक विधानांतून महेश बालदी यांनी आगरी समाजाचा घोर अपमान केला आहे. याबद्दल बालदी यांनी समाजाची जाहीर माफी मागावी. समाजाबद्दलचे असे अनुद्गार यापुढे आम्ही कदापि खपवून घेणार नसल्याचे अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेने मागणी केली आहे. 00000

सुशोभीकरण म्हणजेच विकास असे समजणाऱ्यांना खरा विकास कळलाच नाही – सुधाकर घारे

मतदार माता भगिनी मलाच निवडून देणार; सुधाकर घारेंना विश्वास राज भंडारी पनवेल : कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघात एकूण ९ उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी या मतदार संघात खरी लढत ही तिरंगी होणार असून यामध्ये महायुतीचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे, महाविकास आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार नितीन सावंत आणि राष्ट्रवादी पक्षातून बाहेर पडत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणारे सुधाकर घारे यांच्यात ही काटे की टक्कर होणार आहे. यावेळी अपक्ष लढत असतानाही आपण कसे निवडून येवू शकतो हा विश्वास व्यक्त करताना मतदार आणि कार्यकर्ते यांचे आपल्यावरील प्रेम काय आहे हे २३ तारखेला सर्वांनाच कळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला तसेच विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांनी विकासाचे मुद्दे समोर आणत आपला मोठेपणा गाजविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. सुशोभीकरण म्हणजेच विकास असे समजनाऱ्यांना खरा विकास कळलाच नाही, असे खडे बोल त्यांनी सुनावले. कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात सन २०१४ साली राष्ट्रवादीकडून सुरेश लाड हे आमदार होते. त्यानंतर सन २०१९ साली झालेल्या निवडणुकीत शिवसेना भाजप तत्कालीन युतीचे उमेदवार महेंद्र थोरवे हे पहिल्यांदाच आमदार म्हणून या मतदारसंघाचे नेतृत्व करण्यासाठी सुरेश लाड यांच्यावर मात करून विजयी झाले. मात्र गेल्या पाच वर्षातील कर्जत खालापूर विधानसभा क्षेत्रात झालेला विकास आणि विकासकामे याच्या जोरावर आमदार महेंद्र थोरवे हे आपली दुसरी टर्म लढत आहेत. त्यांच्या या लढतीवर विरोधी पक्ष तसेच अपक्ष उमेदवार यांनी विकास म्हणजे काय हेच आमदारांना कळले नसल्याचा आरोप करीत कर्जत – खालापूर येथील नागरिकांच्या आरोग्याचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे. गेले अनेक वर्षे कर्जत आणि खालापूर तालुक्यातील नागरिकांना पुणे, पनवेल, वाशी, कल्याण, उल्हासनगर किंवा मग ठाणे गाठावे लागत आहे. मात्र इतके वर्षे याठिकाणी आमदारकी भोगणाऱ्यांनी एकही रुग्णालय या मतदार संघात दिले नाही, येथील जनतेचा रोजगाराचा प्रश्नही त्यांनी सोडविला नाही. असे अनेक मुद्दे समोर असल्यामुळे आपण निवडणूक रिंगणात उतरलो असल्याचे अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांनी समोर आणत जनतेच्या विकासाचे वारे म्हणजेच सुधाकर घारे हे समीकरण डोळ्यासमोर ठेवले आहे. सुधाकर घारे यांनी पुढे बोलताना सांगितले की, कर्जत खालापूर विधानसभा क्षेत्रातील जनता ही आपल्याला मानणारी जनता आहे. त्यांच्या प्रत्येक शंकेचे निराकरण करण्यासाठी आम्ही मंडळी कटिबद्ध असतो. रात्री अपरात्री कोणालाही काहीही मदत असुदे आम्ही सर्वच जण त्यावेळी वेळ काळ याचे भान न ठेवता त्यांच्या मदतीसाठी धावत असतो, त्यामुळे या मतदार संघातील जनता ही आताच्या प्रचार दौऱ्यामध्ये आमच्यासोबत मोठ्या संख्येने सामील होत आहे. मला खात्री आहे की, मला येथील जनता या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयी करेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मतदानाच्या दिवशी आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आदेश – किशन जावळे

अशोक गायकवाड रायगड : सर्वाना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी बुधवार २० नोव्हेंबरला मतदानाच्या दिवशी रायगड जिल्ह्यातील ज्या ठिकाणी आठवडा बाजार भरणार आहे, अशा सर्व ठिकाणी बाजार व जत्रा पूर्णवेळ बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रायगड किशन जावळे जारी केला आहे. भारत निवडणूक आयोगाने १५ ऑक्टोबरला विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम घोषित केला आहे. या कार्यक्रमानुसार रायगड जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघामध्ये बुधवार, २० नोव्हेंबरला  मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. अधिनियम, १८६२ चे कलम ५ (ग) मधील तरतुदीनुसार या विधानसभा मतदार संघांच्या मतदार यादीत समाविष्ट असलेल्या प्रत्येक मतदाराला मतदान करता यावे, मतदाराला आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, मतदान सुरळीतपणे पार पडणे याकरिता बुधवार २० नोव्हेंबरला मतदानाच्या दिवशी रायगड जिल्ह्यातील ज्या ठिकाणी आठवडा बाजार भरणार आहे, अशा सर्व ठिकाणी बाजार व जत्रा पूर्णवेळ बंद राहणार आहेत.

उमेदवारांनी निवडणूक खर्चाशी सबंधित कागदपत्रे तपासणीकरिता सादर करावीत- प्रकाश सकपाळ

अशोक गायकवाड रायगड : विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये १८९-कर्जत विधानसभा मतदारसंघात एकूण ०९ अधिकृत उमेदवार असून अंतिम झालेल्या उमेदवारांनी खर्च नोंदवही, निवडणूक खर्चासाठी उघडलेली स्वतंत्र बँक खाते पासबुक, निवडणूक खर्चाची प्रमाणके व उपप्रमाणके, रोख रक्कम तपशील इत्यादी व निवडणूक खर्चाशी सबंधित इतर अनुषंगिक कागदपत्रे/दस्तावेज खालीदिलेल्या तारखांना निवडणूक खर्च निरीक्षक यांच्यासमोर तपासणीकरिता सादर करावीत, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश संकपाळ यांनी केले आहे. या खर्चाच्या नोंदवहीमध्ये नोंदविलेल्या लेख्यांची तपासणी, निवडणूक खर्चावर देखरेख सूचनांचा सारसंग्रह २०२४ मधील भाग-क (एक) मध्ये दिलेल्या निर्देशानुसार प्रचार कालावधीत किमान तीन वेळा होणे आवश्यक आहे. त्यानुसार मा.भारत निवडणूक आयोग यांच्याकडून नियुक्त करण्यात आलेले निवडणूक खर्च निरीक्षक, १८९-कर्जत विधानसभा रमेश कुमार हे उमेदवारांच्या खर्च नोंदवह्यांची तपासणी पुढील नमूद वेळापत्रकानुसार करणार आहेत. मा.निवडणूक खर्च निरीक्षक, १८९-कर्जत विधानसभा यांच्यामार्फत उमेदवारांच्या खर्च नोंदवह्यांची तपासणी वेळापत्रक पुढीलप्रमाणे :- प्रथम, १० नोव्हेंबर  वेळ दुपारी ३.०० ते सायंकाळी ६.३०, द्वितीय, दि.१४ नोव्हेंबर २०२४ वेळ दुपारी ३.०० ते सायंकाळी ६.३०, तृतीय, दि.१८ नोव्हेंबर २०२४ वेळ दुपारी ३.०० ते सायंकाळी ६.३०, स्थळ:- प्रशासकीय भवन, पोलीस ग्राऊंडच्या शेजारी कर्जत, ता.कर्जत सदर तपासणीवेळी उमेदवाराने आपले खर्च रजिस्टर नोंदवही विहित पद्धतीने सादर न केल्यास त्यांच्यावर लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ च्या कलम ७७ व भारतीय दंडसंहितेच्या कलम १७१-१ अन्वये पुढील कार्यवाही प्रस्तावित केली जाईल याची नोंद घ्यावी. ०००००

माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या प्रचार दौऱ्याला नागरिक, महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राज भंडारी पनवेल : महविकास आघडीचे लाडके उमेदवार मा. आमदार बाळाराम पाटील यांच्या सूचनेनुसार त्यांचा पनवेल शहर (प्रभाग क्रमांक १४,१८,१९) प्रचार दौरा दिनांक ६ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता.या…

उमेदवारांनी निवडणूक खर्चाशी सबंधित कागदपत्रे तपासणीकरिता सादर करावीत -महेश पाटील

अशोक गायकवाड रायगड : लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ कलम ७७ खाली निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला निवडणूक निकालाच्या तीस दिवसांच्या आत उमेदवाराने किंवा त्यांच्या निवडणूक प्रतिनिधीने ठेवलेल्या निवडणूक खर्चाचा (जोडपत्र २६ ) हिशेब मा.खर्च निरीक्षकांकडे दाखल करणे बंधनकारक असून उमेदवारांनी निवडणूक खर्चाशी सबंधित इतर अनुषंगिक कागदपत्रे/दस्तावेज खालीदिलेल्या तारखांना मा.निवडणूक खर्च निरीक्षक यांच्यासमोर तपासणीकरिता सादर करावीत, असे आवाहन श्रीवर्धन निवडणूक निर्णय अधिकारी महेश पाटील यांनी केले आहे. तथापि उमेदवाराला प्रचार मोहिमेदरम्यान किमान तीन वेळा पदनिर्देशित खर्च निरीक्षक किंवा इतर कोणत्याही निवडणूक प्राधिकाऱ्यास तपासणीसाठी विविध केलेल्या नोंदवह्या सादर कराव्या लागतील. निवडणूक प्रक्रियेदरम्यान प्रत्येक तपासणीनंतर उमेदवारांची दैनंदिन निवडणूक खाते, नोंदवही तपासणीच्या दिनांकापर्यंत स्कॅन करण्यात येईल.भारत निवडणूक आयोग यांच्याकडून नियुक्त करण्यात आलेले निवडणूक खर्च निरीक्षक, १९३-श्रीवर्धन विधानसभा सतीश कुमार एस हे उमेदवारांच्या खर्च नोंदवह्यांची तपासणी पुढील नमूद वेळापत्रकानुसार करणार आहेत.निवडणूक खर्च निरीक्षक, १९३-श्रीवर्धन विधानसभा यांच्यामार्फत उमेदवारांच्या खर्च नोंदवह्यांची तपासणी वेळापत्रक पुढीलप्रमाणे :- पहिली तपासणी, ९ नोव्हेंबर , दुसरी तपासणी १२ नोव्हेंबर,  तिसरी १७ नोव्हेंबर स्थळ:- श्रीवर्धन मध्यवर्ती प्रशासकीय भवन, ता.श्रीवर्धन निवडणुक खर्चाच्या उमेदवारांच्या दैनंदिन निवडणूक खाते नोंदवही (भाग १ २ ३) पहिली तपासणी ९ नोव्हेंबर  रोजी मा.खर्च निरीक्षक, १९३-श्रीवर्धन यांच्याकडून होणार असल्याने ७ नोव्हेंबर २०२४ पर्यंतचा सर्व हिशेब उमेदवार खर्च नोंदवहीमध्ये नोंदवून स्वतः उमेदवार किंवा आपण नेमणूक केलेल्या निवडणुक प्रतिनिधी यांना ८ नोव्हेंबर २०२४ रोजी निवडणुक खर्चाची नोंदवही घेऊन उमेदवार दैनंदिनी खर्च पथकाकडे छाननी तपासणी करीता श्रीवर्धन मध्यवर्ती प्रशासकिय भवन येथे पाठविण्यात यावे. जेणेकरुन सदर नोंदवह्यामध्ये काही दुरुस्त्या असल्यास त्याचे वेळीच निराकारण करता येईल.

निवडणूक प्रक्रिया मुक्त, निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी सहकार्य करा – रुही खान

अशोक गायकवाड अलिबाग : निवडणूक प्रक्रिया निर्भय आणि मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन अलिबाग विधानसभा मतदारसंघाच्या सामान्य निवडणूक निरीक्षक (भा.प्र.से) रुही खान यांनी…

माथेरानची मिनिट्रेन आली रुळावर

माथेरान : अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असणारी माथेरानची महाराणी ( मिनिट्रेन ) आज माथेरान स्थानकात दाखल झाली. एकूण १११ प्रवाशांना घेऊन नेरळ येथून सकाळी -०८-२५ वा.ट्रेन निघाली ती माथेरान स्थानकात ११-३५…

अलिबाग विधानसभा मतदासंघासाठी रुही खान यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती

अशोक गायकवाड रायगड : भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी १९२ अलिबाग या विधानसभा मतदार संघासाठी सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक म्हणून रुही खान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ७६६६३२२३५६ असा आहे. त्या अलिबाग येथील नागरिकांना फाउंटन हेड चोंढी,अलिबाग ता.अलिबाग येथे सकाळी ०९.०० ते ०९.३० या वेळेत भेटतील. तरी नागरिकांनी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकी संदर्भात काही तक्रार असल्यास वरील संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन निवडणूक निरीक्षक यांनी केले आहे.

पनवेल व कर्जत विधानसभा मतदारसंघासाठी दुनी चंद राणा यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती

 अशोक गायकवाड रायगड : भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी १८८-पनवेल व १८९ कर्जत या विधानसभा मतदार संघासाठी सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक म्हणून दुनी चंद राणा यांची नियुक्ती करण्यात…