Category: रायगड

raigad news and updates

अप्पर  पोलीस अधीक्षक रावलेंना केंद्रीय गृहमंत्रालयाचा पुरस्कार

सिंधूदुर्गनगरी : सिंधुदुर्गचे अप्पर पोलीस अधिक्षक कृषिकेश रावले यांना केंद्रीय गृहमंत्रालयाचा ‘ दक्षता पुरस्कार ‘ मिळाला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने स्पेशल ऑपरेशन ,इन्व्हेस्टिगेशन (तपास ),तसंच फॉरेन्सिक सायन्स, इंटेलिजन्स या चार…

माथेरानमध्ये अवैध धंदे तेजीत

माथेरान : पर्यटनस्थळ माथेरान मध्ये मागील काही वर्षांपासून अवैध धंदे तेजीत दिसत आहेत. याबाबत कुणाच्याही तक्रारी येत नसल्याने मटका आणि ऑनलाइन रेसेस खेळण्यासाठी युवा वर्गाची झुंबड पडत आहे. यामध्ये नियमितपणे…

निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे कार्यवाही करा – सतीश कुमार एस.

अशोक गायकवाड रायगड :निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश निवडणूक निरीक्षक सतीश कुमार एस यांनी दिले. महाड विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कामकाजाचा आढावा त्यांनी घेतला. निवडणूक निरीक्षक सतीश कुमार एस. यांनी घेतला १९४ – महाड विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कामकाजाचा शनिवार,(दि.२ नोव्हेंबर २०२४) रोजी आढावा घेतला. स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणी केंद्राची पाहणी करून भारत निवडणूक आयोगाच्या सूचना प्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. सतिश कुमार यांनी निवडणुकीचे नोंदणी कार्यालय, स्ट्रॉग रूम, एम.सी.सी, कंट्रोल रूम, साहित्य विभाग, सी.सी.टी.व्ही, आचारसंहिता कक्ष, कंट्रोल रूमची पाहणी केली. आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत निर्देशही त्यांनी दिले. निवडणूक आयोगाच्या निर्देशांप्रमाणे स्ट्राँग रूमच्या सुरक्षेतेबाबत पोलीस पथकास सूचना दिल्या.तसेच मतमोजणी केंद्रास भेट देऊन आवश्यकतेनुसार सर्व बाबींची पूर्तता करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. सर्व यंत्रणांनी सतर्क राहून काम करणे गरजेचे आहे. विशेषतः विविध पथकांनी अत्यंत बारकाईने अधिक दक्षतापूर्वक कामकाज करावे असेही त्यांनी सांगितले. निवडणूक अनुषंगाने त्यांनी विविध कक्षास भेट देऊन पाहणी केली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे, नायब तहसीलदार भाबड आणि विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

माथेरानची मिनीट्रेन आज धावणार

माथेरान : सर्वानाच प्रतीक्षा असणारी नेरळ माथेरान दरम्यान धावणारी माथेरानची महाराणी अर्थातच मिनिट्रेन ५ नोव्हेंबर पासून रुळावर येणार असल्याचे माथेरान रेल्वे स्टेशन मधून सांगण्यात आले आहे. त्यामुळे पर्यटकांना प्रतीक्षा असणारी ही सेवा उशिरा का होईना पण  उपलब्ध होणार असल्याने पर्यटकांसह स्थानिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे. दरवर्षी पावसाळ्यात चार महिने घाटरस्त्यात अतिवृष्टीमुळे दरडी कोसळण्याची भीती असते याच कारणास्तव ही सेवा बंद करण्यात येते त्यानंतर १५ ऑक्टोबर रोजी ही सेवा नेहमीच पूर्वपदावर येते परंतु यावेळी बोग्यांची आसनव्यवस्था लक्षात घेऊन ५ नोव्हेंबर पासून ही गाडी रुळावर येणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. सद्यस्थितीत चार महिने घाटातील काही तांत्रिक बाबी तसेच रुळांची दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर करण्यात येत असून या चार महिन्यात अनेकदा मालवाहू ट्रेन नियमितपणे नेरळ वरून माथेरान स्टेशन पर्यंत ये जा करत होती. मिनिट्रेन ही खऱ्या अर्थाने माथेरान करांची जीवनवाहिनी आहे.यामुळेच इथे पर्यटक येत असतात. परंतु रेल्वे प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे या नेरळ माथेरान मिनिट्रेनला विलंब लागला आहे.त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. १ तारखेला मिनिट्रेन सुरू होणार असे समजले होते यासाठी आम्ही सहकुटुंब इथे आलो आहोत पण इथे अद्याप ही ट्रेन सुरू झालेली नाही.त्यामुळे मुलांच्या आनंदावर विरजण पडले…

माथेरान घाटात ट्रॅफिक जाम ;

पर्यटकांची मांदियाळी : अनेक पर्यटक माघारी माथेरान : माथेरान करांचा महत्वाचा व्यावसायिक हंगाम असणाऱ्या दिवाळीत मोठया प्रमाणावर पर्यटकांनी गर्दी केली आहे. परंतु स्वतःच्या वाहनाने येणाऱ्या पर्यटकांना घाटातील ट्रॅफिक जाम झाल्याने त्याचप्रमाणे काहींना दस्तुरी नाक्यावर पार्किंगची सोय नसल्याने माघारी जाण्याची वेळ आली आहे. घाटात वाहनांची कोंडी झाल्याने लहान मुलांना घेऊन तासनतास ताटकळत राहावे लागले तर काही पर्यटक आपल्या सामानासह घाटातून चालत दस्तुरी नाक्यावर आल्याने त्यांची खूपच दमछाक झाली होती. प्रशासनाला इथल्या पार्किंग सुविधे बाबतीत पूर्ण कल्पना माहिती असताना सुध्दा दरवेळेस याबाबत काहीही ठोस उपाययोजना केली जात नाही.त्यामुळे इकडे येणाऱ्या नवख्या पर्यटकांना सुध्दा इथल्या एकंदरीत परिस्थितीचा अंदाज येत नाही. नेरळ माथेरान हाच एकमेव मार्ग असल्याने अजून किती त्रास सहन करावा लागणार आहे याबाबतीत शासनाला काहीच सोयरसुतक नाही का असा प्रश्न पर्यटकांमधून उपस्थित केला जात आहे. या वाहतूक कोंडीमुळे अनेक पर्यटकांनी कर्जत तालुक्यातील फार्म हाऊस मध्ये तसेच लोणावळा, खंडाळा इथे जाणे पसंत केले याचा इथल्या पर्यटनावर विपरीत परिणाम होत आहे. आम्ही पहिल्यांदाच याठिकाणी आलो आहोत पण घाटातील वाहतूक कोंडीचे विदारक चित्र पाहून आम्ही इकडे आलो ती घोडचूक केली आहे असेच वाटते. जग फिरलो पण अशी भयानक परिस्थितीइथेच अनुभवायला मिळाली आहे. यासाठी सरकारने इथे काहीतरी पर्यायी व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे. अभिराज सोनटक्के –पर्यटक मुंबई

माथेरान मध्ये दिवाळी पर्यटन हंगाम व विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर पोलिसांचा लॉन्ग मार्च

माथेरान : आज पासून माथेरानच्या पर्यटन हंगामास सुरुवात होत असून येथील कायदा सुव्यवस्था मर्यादित रहावी व आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये येथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता माथेरानमध्ये माथेरानचे एपीआय अनिल…

अलिबाग विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरिक्षक सर्वसाधारण म्हणून रुही खान यांची नियुक्ती

अशोक गायकवाड रायगड :विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ सुरळीत पार पाडणेकामी मा. भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक निरिक्षक यांची नेमणूक केली जाते. १९२ अलिबाग विधानसभा मतदार संघासाठी निवडणूक निरिक्षक सर्व साधारण म्हणून…

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निवडणुकीच्या तयारीचा आढावा

अशोक गायकवाड रायगड : जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने नियुक्त निवडणूक निरीक्षक यांनी जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. निवडणूकीची सर्व प्रक्रिया निर्भय,…

 ‘कथोरेंसाठी कदाचित मी महत्त्वाचा नसेन, म्हणून मला आमंत्रण नव्हतं’

आमदार किसन कथोरेंबाबत माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे वक्तव्य   बदलापूरः मी भाजपचा एक लहान कार्यकर्ता आहे. सध्या त्यांच्यासाठी मी महत्वाचा नसेल, म्हणून मला अर्ज भरताना बोलवले गेले नाही, अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली आहे. मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांच्या अर्ज भरण्याच्या दिवशी कपिल पाटील कुठेही दिसले नाही. त्याबाबत विचारले असता पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली. मला आमंत्रण दिले तर नक्कीच प्रचारात उतरेल. पण मला कोण आमंत्रण देईल, असा प्रश्नही कपिल पाटील यांनी उपस्थित केला. गेल्या काही वर्षात पाटील आणि कथोरे यांच्यात विसंवाद होता. आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांना सामोपचाराने वागण्याचा सल्ला दिल्याची माहिती आहे. लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर भाजपचे केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी आमदार किसन कथोरे यांच्यावर थेट आरोप केला होता. पराभवाचे खापर कथोरे यांच्यावर पाटील यांनी फोडल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये विसंवाद वाढला आहे. त्यापूर्वी एकमेकांवर अप्रत्यक्ष टीका करणारे दोन्ही नेते उघडपणे बोलू लागले. पाटील यांनी निष्ठावंतांचा मेळावा घेत कथोरेंना पक्षातच आव्हान निर्माण केले. त्यानंतरही भाजपने कथोरे यांना उमेदवारी दिली. काही दिवसांपूर्वी कथोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजप श्रेष्ठींनी मतभेद दूर करण्याचा सल्ला देत पक्षाचे नुकसान नको असा संदेश दोन्ही नेत्यांना दिल्याची चर्चा आहे. मात्र त्यानंतरही पाटील हे कथोरे यांच्या अर्ज दाखल करण्याच्या प्रसंगी दिसले नाहीत. बुधवारी कपिल पाटील यांनी बदलापुरात आपल्या समर्थकांची बैठक घेतली. याबाबत कपिल पाटील यांनी लोकसत्ताशी संवाद साधला. माझे बदलापुरात कार्यालय असून नियमीतपणे तिथे मी नागरिकांना भेटतो. त्यावेळी समर्थक येत असतात, असे स्पष्टीकरण त्यांनी बैठकीच्या प्रश्नावर बोलताना दिली. कथोरे यांच्या अर्ज दाखल करतेवेळी अनुपस्थित राहण्याबाबत विचारले असता, सध्या मी त्यांच्यासाठी महत्वाचा नसेल. त्यामुळे मला बोलवण्यात आले नाही. बोलवले नाही तर कसे जाणार असेही पाटील म्हणाले. कथोरे यांच्या प्रचारात प्रत्यक्षपणे उतरणार का असा प्रश्न पाटील यांना केला असता, मी महायुतीचा, भाजपचा कार्यकर्ता आहे. मी माझ्या परिने प्रचार करेल. महायुतीचा प्रचार करण्याच्या सूचनाही मी माझ्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. आता ज्यांनी मला आमंत्रण दिले नाही, जे माझा फोटो वापरत नाही, त्यांना माझी गरज नसेल. त्यांच्या प्रचारात कसे जाणार, असेही पाटील यावेळी म्हणाले. प्रचारासाठी आमंत्रण दिले तर प्रचारात उतरणार का असे विचारले असता, माझी गरजच नसेल तर मला आमंत्रण कोण देईल, असे पाटील म्हणाले. मुरबाडमध्ये घेतलेल्या निष्ठावंताच्या मेळाव्याबाबत पाटील यांना विचारले असता, मी मेळावा उघडपणे घेतला  होता, लपुनछपून घेतला नव्हता. त्या मेळाव्याला पाच हजारांहून अधिक लोक आले होते. त्यांनी त्यांची मते मांडली, असेही पाटील यावेळी म्हणाले.

ठाणे जिल्ह्यातही नामसाधर्म्याची खेळी;

चार मतदारसंघात मुख्य उमेदवारांच्या नावांशी साम्य असलेले उमेदवार रिंगणात   अंबरनाथः प्रमुख उमेदवारांच्या नावाशी साधर्म्य असलेले उमेदवार उभे करून त्यातून संभ्रम निर्माण करत मतांची फाटाफुट करण्याची खेळी गेल्या काही वर्षात सातत्याने केली जाते आहे. तसाच काहीसा प्रकार विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने बेलापूर, कल्याण पूर्व, अंबरनाथ आणि मुरबाड विधानसभा मतदारसंघात झाल्याचे दिसून आले आहे. बेलापूरमध्ये संदिप नाईक, मंदा म्हात्रे, मुरबाड विधानसभेत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार सुभाष पवार यांच्या आणि अंबरनाथ विधानसभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजेश वानखेडे यांच्या नावाशी साधर्म्य असलेले उमेदवार रिंगणात आहेत. कल्याण पूर्वेत महेश गायकवाड या नावाचेही दोन उमेदवार रिंगणात आहेत. नामसाध्यर्म असलेले उमेदवार उभे करून एखाद्या उमेदवाराला पाडण्याचा प्रकार यापूर्वीच्या अनेक निवडणुकांमध्ये झाला आहे. मतांची विभागणी झाल्याने उमेदवार पराभूत झाल्याचेही प्रकार यापूर्वी समोर आले आहेत. मात्र ही खेळी सातत्याने केली जात असल्याने यापूर्वीच्या अनेक निवडणुकांमधून दिसून आली आहे. यंदाच्या निवडणुकीतही ठाणे जिल्ह्यात चार मतदारसंघात नावात साम्य असलेले उमेदवार दिसून आले आहेत. विशेष म्हणजे चारही मतदारसंघात चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. यात भाजपाला रामराम ठोकत उमेदवारीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षात गेलेल संदिप गणेश नाईक यांच्या नावाशी साधर्म्य असलेले संदिप प्रकाश नाईक बेलापूरमध्ये अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. तर भाजपच्या अधिकृत उमेदवार मंदा विजय म्हात्रे यांच्या नावाशी साम्य असलेल्या मंदा संजय म्हात्रे या अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. त्यामुळे एकमेकांच्या विरोधात नामसाधर्म्य असलेले उमेदवार उभे करून मतांची विभागणी करण्याची ही रणनिती असल्याची चर्चा रंगली आहे. दुसरीकडे मुरबाड विधानसभा मतदारसंघात सध्या चुरशीची लढत आहे. येथे विद्यमान आमदार किसन कथोरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सुभाष पवार यांचे आव्हान आहे. कथोरे यांना स्वपक्षियांशीही लढण्याची वेळ सध्या आली आहे. भाजप आणि महायुतीतील नाराजांचा सामना त्यांना करावा लागणार आहे. मात्र सुभाष गोटीराम पवार यांच्या नावाशी साम्य असलेले सुभाष शांताराम पवार यांनीही अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. त्यामुळे पवार यांच्या मतांना विभागण्याची ही खेळी चर्चेचा विषय बनली आहे. तर शेजारच्या अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून रिंगणात असलेले राजेश देवेंद्र वानखेडे यांच्या नावाशी साम्य असलेले राजेश अभिमन्यू वानखेडे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. राजेश वानखेडे हे अंबरनाथचे विद्यमान आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्याविरूद्ध रिंगणात उतरले आहेत. २०१४ च्या निवडणुकीत वानखेडे अवघ्या काही मतांनी पराभूत झाले होते. त्यामुळे नावात साम्य असलेले अपक्ष उमेदवार उभे करून वानखेडेंची मते विभागण्याची ही खेळी असल्याचे बोलले जाते. 00000