Category: रायगड

raigad news and updates

 ‘माझी वसुंधरा’ अभियानात रायगडचा डंका,

 खालापूर तालुक्यातील ३ ग्रामपंचायतींना पुरस्कार – डॉ. भरत बास्टेवाड अशोक गायकवाड   अलिबाग : राज्य शासनाच्या माझी वसुंधरा ४.० अभियानात रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्याने उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. अभियानांतर्गत खालापूर…

 जागतिक तायक्वांदो ज्युनियर चॅम्पियनशिपसाठी भारताचा ज्युनियर संघ जाहीर

 संतोष बस्नेत प्रशिक्षकपदी नियुक्त; प्रिशा शेट्टीची भारतीय संघात निवड   छत्रपती संभाजीनगर : जागतिक तायक्वांदो ज्युनियर चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी भारतीय तायक्वांदो संघाच्या प्रशिक्षकपदी छत्रपती संभाजीनगरच्या संतोष बस्नेत यांची नियुक्ती करण्यात आली…

 राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये साडेतेरा हजार प्रकरणे निकाली

२५ कोटी ५८ लक्ष ६७ हजारांची तडजोड रक्कम वसूल – न्यायाधीश अमोल शिंदे अशोक गायकवाड रायगड : दाखलपूर्व आणि प्रलंबित खटल्यांचा जलद निपटारा व्हावा आणि प्रलंबित खटले सामोपचाराने मिटावेत या…

माथेरान येथे वाहतुकीच्या घोड्यासाठी विशेष कार्यमोहिम

डॉ. सचिन देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली माथेरान येथे वाहतुकीच्या घोड्यासाठी विशेष कार्यमोहिम माथेरान : माथेरान येथे शुक्रवारी पशुवैद्यकीय दवाखाना माथेरान, पशुसंवर्धन विभाग-रायगड तसेच पिपल फॉर इथिकल ट्रीटमेंट ऑफ अनिमल्स- इंडिया व…

२ ऑक्टोबर स्वच्छ दिवस मोहिमेत नागरिकांनी सहभागी व्हावे-डॉ. भरत बास्टेवाड

अशोक गायकवाड   अलिबाग : केंद्र सरकारच्या निर्देशानुसार रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून १ व २ ऑक्टोंबर रोजी जिल्ह्यात स्वच्छता ही सेवा २०२४ अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यानुसार १ ऑक्टोंबर रोजी ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असून, २ ऑक्टोंबर रोजी स्वच्छ दिवस साजरा करण्यात येणार आहे. या मोहिमेत सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड तसेच पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले यांनी केले आहे. १ ऑक्टोंबर रोजी देशभर श्रमदान मोहीम राबविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यात ग्रामपंचायत हद्दीतील अस्वच्छता असणाऱ्या ठिकाणांची सामुहिक श्रमदानातून स्वच्छता करणे, तसेच नागरिकांना सामुहिक स्वच्छता प्रतिज्ञा देण्यात येणार आहे. शाळा व महाविद्यालयांमध्ये एकाच वेळी परिसर स्वच्छता स्वच्छता विषयक स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल. तसेच २ आक्टोंबर रोजी लोकसहभागातून स्वच्छ दिवस साजरा करण्यात येईल. त्यानुसार स्वच्छता हि सेवा अभियानात उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था, कंपन्या, व्यक्ती तसेच सफाई मित्रांचा सत्कार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच ग्रामसभेमध्ये ओ.डी.एफ प्लस मॉडेल व्हीलेजाचा ग्रामसभेचा ठराव घेण्यात येईल. स्वच्छ माझे अंगण अभियान मधील निकषपात्र कुटुंबाना सरपंच व ग्रामसेवक यांचे स्वाक्षरीचे प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात येणार असून, सार्वजनिक शौचालय, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प यांचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादीचं बुद्रुक अन् खुर्द झालंय…

 संभाजीराजेंनी पक्षफुटीवरून उडवली खिल्ली  छत्रपती संभाजीनगर : “भाजपा विद्वान असल्याच्या नादात पक्षांचे विभाजन करत होती, काँग्रेसच काही वेगळंच सुरू होतं. एनसीपी कुणाची , शिवसेना कुणाची  सगळा गोंधळ होता. गाव छोटी मोठी असतात त्याला खुर्द आणि बुद्रुक म्हणतात. तसे एनसीपी, शिवसेनेचे झाले…

राज ठाकरेंचं ‘मिशन विदर्भ’

विदर्भ : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभेसाठी ‘मिशन विदर्भ’ सुरु केले असून त्याचाच एक भाग म्हणून ते येत्या २७ आणि २८ सप्टेंबर रोजी दोन दिवस अमरावती दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी ते विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यातील प्रमुख…

छत्रपतींचा पुतळा उभारणीत कामचुकारपणा

चौकशी समितीच्या अहवालात ठपका राजन चव्हाण सिंधुदुर्ग :  सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीत कामचुराकरपणा झाल्याचा ठपका या पुतळा कोसळल्याप्रकरणी नेमण्यात आलेल्या चौकशसमितीने ठेवलाय. २६ ऑगस्टला छत्रपतींचा हा पुतळा उभारणीनंतर अवघ्या ९ महिन्यात…

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंतरजिल्हा सीमाभागातील नाक्यावर होणार तपासणी – किशन जावळे

अशोक गायकवाड रायगड : आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये रायगड, पुणे, सातारा, रत्नागिरी, सोलापूर जिल्हा प्रशासनाने आंतरजिल्हा सीमा चौक्यांना अधिक मजबुती देण्याचा निर्णय आयोजित आंतर जिल्हा बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी रायगड किशन जावळे, यांनी दिली. आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सीमेलगतच्या जिल्हा क्षेत्रात आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने रायगड, पुणे, सातारा, रत्नागिरी, सोलापूर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला जिल्हाधिकारी रायगड किशन जावळे, पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, रायगड पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, पुणे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, सातारा पोलीस अधिक्षक समीर शेख यांसह राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते. निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. यासाठी कायमस्वरुपी चेकपोस्ट सोबतच सीमेवर तात्पुरत्या चेकपोस्टची स्थापना करणे आवश्यक आहे. सर्व जिल्ह्यानी या कामासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करुन द्यावे असे यावेळी निश्चित करण्यात आले. निवडणुकीवर परिणाम होऊ शकणाऱ्या चलन, मद्य आणि इतर वस्तूंची अवैध वाहतूक रोखण्यासाठी विशेष दक्षता घेण्यासाठी प्रभावी उपाययोजन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही मालाची वाहतूक करण्यासाठी सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या ट्रकच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्यावर कारवाई करण्याचा निर्णय उपस्थित अधिकाऱ्यांनी घेतला. निवडणूक आदर्श आचारसंहितेचे कोणतेही उल्लंघन होणार नाही याची खात्री करण्यासाठी शेजारच्या राज्यातील व शेजारील जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण समन्वयासाठी सहमती दर्शवली. ग्रामीण भागात तसेच सागरी मार्गाने होणाया वाहतुकीची प्रत्येक टप्प्यावर कसून तपासणी करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. सर्व सीमा भागात प्रमुख रस्त्यांसह आतील लहान मार्गावर बारकाईने लक्ष ठेवण्याची आवश्यकता असल्याचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी नमूद केले.सहभागी सर्व जिल्हाधिकारी यांनी लोकसभा निवडणूक आचार संहिता काळात केलेल्या उपाययोजना आणि विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने केलेल्या पूर्व तयारीची माहिती सादर केली. यावेळी सीमाभागातील सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी, पोलीस आणि जिल्हा प्रशासनातील संबंधित अधिकारी उपस्थित होते. 0000

मुख्यमंत्री वयोश्री योजनेस ज्येष्ठांचा उत्तम प्रतिसाद

माथेरान : राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कार्यान्वित होत असताना जेष्ठ नागरिकांना सुध्दा राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री वयोश्री योजनेस सुरुवात करण्यात आली असून त्यास जेष्ठांचा उत्तम प्रतिसाद लाभत…