Category: रायगड

raigad news and updates

महाराष्ट्रास सुवर्णचा दुहेरी मुकुट

३४वी किशोर व किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धा : साताराचा प्रसाद बळीप व सांगलीची वेदिका तामखडे सर्वोत्कृष्ट खेळाडू   झारखंड : पुष्पुर येथील अलबर्ट एक्का स्टेडियमवर सुरू असलेल्या ३४व्या…

छत्रपती संभाजीराजेंनी मला मारण्यासाठी मारेकरी पाठवले

ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप   नागपूर : ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि मराठा आंदोलक यांच्यात पुण्यात वाद झाल्याची घटना घडली आहे. पुण्यातील कात्रज-कोंढवा रस्त्यावर ही घटना घडली. लक्ष्मण…

पुण्यात साकरलीय ऐतिहासिक शिवसृष्टी

भोपाळ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील अनेक घटनांचे साक्षीदार असणाऱ्या पुणे शहरात भव्य दिव्य अशी शिवसृष्टी साकारली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते या २१ एकरवर ऐतिहासिक शिवसृष्टीचे…

‘भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार’

लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची घोषणा   परळी: महिलांच्या सक्षमीकरणासाठी व आत्मसन्मानासाठी महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद पडू देणार नाही. पुढील पाच वर्ष ही चालू राहील…तसेच भाऊबीजेची…

 छुप्या पद्धतीने डिझेल विक्रीवर कारवाई होणार का?

खालापूर तालुक्यात भोलेनाथ धाब्यासह रुचिरा बियर शॉपीजवळील धंदा तेजीत राज भंडारी   रायगड : इंधनाचे दिवसेंदिवस भाव वाढत असल्याने अनेक वाहन चालक पर्यायी इंधनाचा वापर करत आहेत. खालापूर तालुक्यातील भोलेनाथ ढाब्यासह रुचिरा बियर शॉपीजवळ देखिल अशा पर्यायी आणि स्वस्त इंधनाची विक्री बेकायदेशिरपणे होत आहे. खालापूर तहसील कार्यालयातील पुरवठा  विभागाकडून कोणत्याही कारवाईचा बडगा उचलला जात नसल्यामुळे बेकायदेशीर डिझेल विक्री करणाऱ्यांचे चांगलेच फावले आहे. यामध्ये पोलीस प्रशासन असो किंवा मग तहसील विभागाचे पुरवठा अधिकारी कारवाई करण्यासाठी मागे का ? असा सवाल उठवला जात आहे. सामान्य डिझेलच्या किमतीत आणि बायो डिझेलच्या किमतीतील तफावत अशा पद्धतीने व्यवसाय तेजीत आणत आहेत. डिझेल पंप चालकांना त्यामागे कर स्वरूपात शासनाला महसूल द्यावा लागतो, मात्र बायो डिझेल विक्री करणारे मोकाट रस्त्यांवर या डिझेलची विक्री करीत आहेत. राज्यात बायो डीझेल विक्रीवर प्रतिबंध असतानाही अनेक ठिकाणी बायो डिझेलची विक्री जोर धरत आहे. अशातच गेली अनेक वर्षे खालापूर तालुक्यात या डिझेलच्या विक्रीने उच्छाद मांडला आहे. चौक फाटा ते खालापूर या रस्त्यावर भोलेनाथ धाब्यासह रुचिरा बियर शॉपीजवळच्या मागील बाजूस लाखो लिटर बायो डिझेलची दिवसभर साठवणूक करून रात्रीच्या अंधारात विक्री करण्याचा प्रकार सुरू आहे. तसेच काही ठिकाणी टँकरमधून ऑईल चोरी देखील केली जात आहे. याठिकाणी पोलिसांची गस्त असते, मात्र रात्रीच्या सुमारास मोठमोठे कंटेनर या धाब्याच्या मागे का जात असावे किंवा मग टँकर या बियर शॉपीच्या मागे का जात असावे ? हे त्यांना दिसत नसावे का ? तसेच तहसील कार्यालयाच्या पुरवठा अधिकाऱ्यांचे त्यांच्या परिसरात लक्ष नाही का ? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने समोर येत आहेत. अशाच प्रकारे बेकायदेशिरपणे बायोडिझलची आणि ऑईलची खरेदी – विक्री करणाऱ्या खालापूर तालुक्यातील तस्करांना अभय दिले जात आहे. डिझेल विक्रीचा तसेच ऑईल विक्रीचा कोणताही परवाना नसतानाही बेकायदेशिर साठवणूक आणि विक्री केली जात असून यामध्ये कायदेशीर कारवाईची गरज समोर आली आहे. प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी अनेक अवैध कामांची माहिती पोलिसांसह तहसील विभागाला देण्यात येते, मात्र अनेक वर्षे हा धंदा तेजीत चालत असूनही येथील लोकप्रतिनिधींचे लक्ष या बेकायदेशीर कामांकडे जाऊ शकले नाही की मग लक्ष दिले जात नाही, असा संभ्रम होत असताना आता तरी पोलीस प्रशासन आणि तहसील विभाग कारवाई करणार का ? याकडे लक्ष लागून राहिले आहे. 0000

‘आदर्श शिक्षकाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कल्पना पाटील’

माथेरान : ज्या शाळेत शिक्षण घेतले त्याच शाळेत शिक्षक आणि त्यानंतर तिथेच मुख्याध्यापिका म्हणून सेवानिवृत्त होणे, इथल्या विद्यार्थ्यांना घडवत असताना गावविषयी सहानुभूती आणि सर्वांच्या सहकार्याने गावात एक वेगळाच ठसा उमटवला…

राज्य मानांकन कॅरम स्पर्धा सागर वाघमारे, समृद्धी घाडीगावकर उपांत्य फेरीत

सिंधुदुर्ग : डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन व भारतीय जनता पार्टी क्रीडा प्रकोष्ठ यांच्या संयुक्त विद्यमाने महालक्षमी हॉल, कुडाळ, सिंधुदुर्ग येथे सुरु असलेल्या पालक मंत्री राज्य मानांकन कॅरम स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या उप…

 महाराष्ट्राच्या किशोर, किशोरी संघाचा उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

३४वी राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धा सिमडेगा, झारखंड, : पुष्पुर येथील अलबर्ट एक्का स्टेडियमवर सुरू असलेल्या ३४व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या किशोर व किशोरी संघाने उपउपांत्यपूर्व फेरीत…

नेपाळमध्ये महापुरात ६० जणांचा मृत्यू

नेपाळ : नेपाळमध्ये सततच्या मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे ६० जणांचा मृत्यू झाला आहे. नेपाळ पोलिसांचे प्रवक्ते बिश्वो अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापैकी ३४ मृत्यू काठमांडू खोऱ्यात झाले आहेत. २२६ घरे पूर्णपणे पाण्यात बुडाली…

गद्दारांना ५० खोके आणि बहिणींना फक्त १५००- ठाकरे 

नागपूर:  “गद्दारांना 50 खोके आणि आम्हाला 1500 रुपये असं महिला सांगतात. 2014  ला मोदी यांचा आम्ही प्रचार करतो होतो. 15 लाख देणार होते. त्याचे 1500 का झाले?” असा ख़डा सवाल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. नागपूर येथे शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं उद्धव…