Category: रायगड

raigad news and updates

मणिपूरमधल्या ६ जणांच्या हत्येने देश हादरला

मणिपूर : मणिपूरच्या जिरीबाम जिल्ह्यात एकाच कुटुंबातील सहा निष्पाप जणांच्या हत्येने संपूर्ण देश हादरला आहे. त्यातील तिघांच्या शवविच्छेदन अहवालात समोर आलेली माहिती इतकी भयावह आहे की ती ऐकून अनेकाचा थरकाप उडाला…

महाराष्ट्राची घोडदौड; दोन्ही संघांचा बाद फेरीत प्रवेश

 कुमार व मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा अलिगड : महाराष्ट्राच्या मुला-मुलींच्या संघाने 43व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत प्रभावी कामगिरी करत बाद फेरीत प्रवेश केला आहे. बाद फेरीत महाराष्ट्राच्या मुली छत्तीसगडबरोबर तर मुले कोल्हापूरबरोबर लढतील. अलिगड (उत्तरप्रदेश) येथील महाराणी अहिल्याबाई होळकर स्पोर्टस स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत शेवटच्या साखळी सामन्यात भरतसिंग वसावेने (2.10 मि. 4 गुण) व आशिश गौतम (2.40, 1.40 मिनिटे व 4 गुण) यांच्या अष्टपैलू खेळीमुळे महाराष्ट्राच्या मुलांनी पुद्देचरीवर 39-24 असा एक डाव राखून 15 गुणांनी दणदणीत विजय मिळविला. जितेंद्र वसावे व सोत्या वळवी यांनी आपल्या धारदार आक्रमणात प्रत्येकी 8 गडी बाद करीत त्यांना साथ दिली. पुद्देचरीकडून स्टेफनन 6 गडी बाद केले. महाराष्ट्राच्या मुलींच्या शेवटच्या साखळी सामन्यात यजमान उत्तरप्रदेशचा 28-5 असा एक डाव 23 गुणांनी धुव्वा उडविला. स्नेहा लामकाने (3.40 मिनिटे नाबाद संरक्षण), प्रतीक्षा बिराजदार (3.10 मि. व 6 गुण) हे त्यांच्या विजयाचे शिल्पकार ठरले. उत्तरप्रदेशच्या मानसीने (1.30 मिनिटे व 2 गुण) अष्टपैलू खेळी करीत लढत दिली. बाद फेरीचे सामने: मुलींचे: महाराष्ट्र विरुद्ध छत्तीसगड मुलांचे: महाराष्ट्र विरुद्ध कोल्हापूर कोल्हापूर व विदर्भ संघांचा सुध्दा बाद फेरीत प्रवेश कोल्हापूरच्या मुले व मुली आणि विदर्भच्या मुले व मुलींच्या संघानेही बाद फेरी गाठली आहे. मुलीमध्ये कोल्हापूर विरुद्ध विदर्भ आणि मुलांमध्ये कोल्हापूर विरुद्ध महाराष्ट्र आणि विदर्भ विरुद्ध ओडीसा असे बाद फेरीचे सामने होतील.

मुंबईवर २६ नोव्हंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आपल्या प्राणांची आहुती देणार्‍या पोलीस आणि सैन्यातील वीरांना पोलीस आयुक्तालय येथील हुतात्मा स्मारकावर पुष्पांजली अर्पण करून त्यांच्या शौर्याला अभिवादन करताना भाजपा नेते…

ठाणे जिल्हा गारेगार!

 बदलापुरात सर्वात कमी तापमानाची नोंद   बदलापूरः गेल्या काही दिवसांपासून निरभ्र आकाश आणि रात्री तापमानात होत असलेली घट यामुळे ठाणे जिल्हा गारेगार झाला आहे. दिवसा येणारी कोरडी हवा आणि आर्द्रता…

 कोल्हापूरच्या मुले व मुली संघाची विजयी सलामी

 कुमार व मुली राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा   अलिगड, दि.२६ नोव्हेंबर – अलिगड (उत्तर प्रदेश) येथील महाराणी अहिल्यादेवी होळकर क्रीडांगणावर सुरू असलेल्या ४३व्या कुमार व मुली राष्ट्रीय अजिंक्य स्पर्धेत मंगळवारी…

खरेदी विक्री संघात धान्य देण्यासाठी, शेतकऱ्यांचा उघड्या मैदानात मुक्काम.

 व्यापाऱ्यांचे धान्याला प्राधान्य दिल्याने गदारोळ   राजीव चंदने मुरबाड : शासनाने शेतकऱ्यांचे धान्य खरेदी विक्री संघा मार्फत हमी भावाने खरेदी होत असल्याने त्याचा टोकन घेण्यासाठी आपला नंबर लागेल की नाही…

तेलंगणा सरकारने अदानींची १०० कोटींची देणगी नाकारली

तेलंगणा : उद्योगपती गौतम अदानी यांनी देऊ केलेली १०० कोटी रुपयांची देणगी तेलंगणा सरकारने नाकारली आहे. गौतम अदानी यांच्या विरोधात अमेरिकेमध्ये फसवणुकीचा खटला दाखल करण्यात आला आहे. एका कंपनीला कंत्राट मिळवून देण्यासाठी लाच दिल्याचा आरोप गौतम अदानी यांच्यावर करण्यात…

 एकनाथ शिंदेकडून आमदार महेंद्र थोरवे यांचा सत्कार

दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल माथेरान:‘महेंद्र हा आमचा वाघ आहे. निवडणूक काळात अनेक संकटे आली पण  तो मुळीच घाबरला नाही. मी कर्जतकराना धन्यवाद देतो की तुम्ही शिवसेना पक्षाला साथ दिली आणि तुमचा महेंद्र आत्ता दुपटीने विकास करेल हा विश्वास आहे’, असे गौरवोद्गार एकनाथ शिंदे यांनी महेंद्र थोरवे यांच्याबद्दल काढले. नुकताच विधानसभा निवडणूका पार पडल्या असून महायुतीच्या उमेदवारांना घवघवीत यश मिळाले आहे. याच पार्श्वभूमीवर कर्जत खालापूर मतदार संघातील उमेदवार महेंद्र थोरवे यांनी अटीतटीच्या लढतीत विजय संपादन केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेऊन आशीर्वाद घेतले.खऱ्या अर्थाने कर्जत खालापूर मतदार संघातील जवळपास २९०० कोटी रुपयांची विकास कामे आमदार महेंद्र थोरवे यांनी मुख्यमंत्र्यांच्या सहकार्यामुळे तडीस नेली आहेत. त्यामुळे आगामी काळात सुध्दा या मतदार संघातील जी काही प्रलंबित कामे आहेत ती पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने मार्गी लागणार आहेत. ह्या मतदार संघात अत्यंत चुरस पहावयास मिळाली आहे परंतु केवळ अडीच वर्षाच्या कार्यकाळात आमदार महेंद्र थोरवे यांनी झपाटून कामे केल्यामुळेच ह्या मतदार संघाचा कायापालट होत आहे. महेंद्र थोरवे यांचा मुख्यमंत्र्यांकडुन छोटेखानी सत्कार होताना हा समस्त मतदार संघातील कार्यकर्त्यांचा सन्मान आहे असे आमदार महेंद्र थोरवे यांनी स्पष्ट केले.यावेळी महाडचे आमदार भरतशेठ गोगावले,शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे आदी उपस्थित होते.

 महाराष्ट्राच्या दोन्ही संघाची विजयी सलामी

 कुमार व मुली राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा अलिगड : महाराष्ट्राच्या दोन्ही संघाने ४३ व्या कुमार व मुली राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेची विजयी सलामी दिली. अलिगड (उत्तर प्रदेश) येथील महाराणी अहिल्याबाई होळकर स्पोर्टस स्टेडियमवर सोमवारी सुरू झालेल्या या  राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत कुमार व मुली गटांमध्ये प्रत्येकी ३० संघाने सहभाग घेतला आहे. सलामीच्या सामन्यात महाराष्ट्र मुलांच्या संघाने विदर्भावर ३७-२६ असा ११ गुण आणि ५ मिनिटे राखून दणदणीत विजय मिळविला.  मुलींच्या गटात महाराष्ट्राने मध्यप्रदेशवर ४०-१२ असा १ डाव आणि २८ गुणांनी धुव्वा उडविला. मुलांच्या सामन्यात महाराष्ट्र संघाकडून विलास वळवीने २.४० मी. व १.३० मी. संरक्षण आणि आक्रमणामध्ये ४ गुण मिळवले. भरतसिंग वसावेने १.३० मिनिट संरक्षण करताना आक्रमणामध्ये २ गुणांची कमाई केली. कृष्णा बनसोडेने २.५९ मी. संरक्षण केले. आशिष गौतमने नाबाद २.१० आणि १.२० संरक्षण करताना आपल्या धारदार आक्रमणात ८ गुण टिपले. विदर्भ संघाकडून मोहित नेवरेने १.०० मी. संरक्षण केले. शैलेश कोरेटीने १.०० मी. संरक्षण करताना आक्रमणात ६ गुण मिळवले. मुलींच्या सामन्यात प्रतीक्षा बिराजदारने ३.३० मी. संरक्षण करून आक्रमणात २ गुण मिळवले. अश्विनी शिंदे हिनेही ३.३० मी. संरक्षण करून ४ गुणांची कमाई केली.  सुषमा चौधरीने ३.२० मी. संरक्षण करून आक्रमणामध्ये ४ गडी बाद केले.  प्रणाली काळेने नाबाद १.१० मी. संरक्षण करून आक्रमणामध्ये १० गुणांची कमाई केली. तन्वी भोसलेने २.४० मी. वेळ नोंदवली.मध्यप्रदेश संघाकडून अक्षरा मालिनी आणि लक्ष्मीने प्रत्येकी एक मिनिटे वेळ नोंदवली. मुलांच्या अन्य सामन्यात तामिळनाडूने चंदीगड वर एक डाव आणि  ३४ गुणांनी विजय संपादन केला. आंध्र प्रदेशने मध्य भारतचा १६ गुणांनी पराभव केला. दिल्ली संघाने हिमाचल प्रदेशवर एक डाव आणि २१ गुणांनी मात केली. मुलींच्या गटात ओडिसाने मध्य भारतचा १ डाव २२ गुण राखून पराभव केला. राजस्थाने आंध्रप्रदेशवर एक डाव आणि १६ गुणांनी विजय संपादन केला.

 थात्तू, पत्रावाला, दानोले, परीट, सोनावने,

 राज्य रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा तांबवेकर आणि जमादार यांना सुवर्णपदक     अहिल्यानगर-२४ नोव्हेंबर- सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेने आणि अहमदनगर सायकलिंग क्लब यांच्या सहकार्याने सायकलिंग असोसिएशन ऑफ अहमदनर डिस्ट्रीक्ट आयोजित ५व्या महाराष्ट्र राज्य रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत आंतरराष्ट्रीय खेळाडू सुर्या थात्तू (पुणे), मुस्तफा पत्रावाला (ठाणे), पूजा दानोले (कोल्हापूर), श्रावणी परीट (पुणे), मोक्ष सोनावने (नासीक), दानीश जमादार (नासीक), गायत्री तांबवेकर (पुणे) यांनी आपापल्या वयोटात सुवर्णपदक विजेती कामगिरी केली. अहिल्यानगर येथे आज सुरु झालेल्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत १९९ सायकलपट्टूंनी सहभाग घेतला. चाँदबीबी महाल बायपास मार्गावर विवध नऊ वयोगटात स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेचा उदघाटन समारंभ अहिल्यानगरचे प्रसिद्ध उद्योगपती आणि अहमदनर सायकलिंग क्लबचे सर्वेसर्वा गौरव फिरोदीया यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी सायकलिंग फेडरेशन आफ इडीयाचे उपाध्यक्ष प्रताप जाधव, स्पर्धेचे मुख्य पंच आणि सीएफआयचे निरीक्षक सुदाम रोकडे, मिहीर तिवारी, मुख्य तांत्रिक प्रमुख दिपाली पाटील, शिवछत्रपती  प्रृरितोषीक सन्मानीत मिनाक्षी शिंदे, मिनाक्षी ठाकूर आदी मान्यवर हजर होते. आज झालेल्या सेपर्धांचे निकाल पुढीलप्रमाणे- मेन ईलीट – ३८ किमी  टायम ट्रायल सुवर्णपदक  सुर्या थात्तू (पुणे ०.५०.२९.७९) , रौप्यपदक – चिन्मय केवलरमाणी (पुणे ०.५०.३५.७०), कांस्यपदक – सिध्देश पाटील (कोल्हापूर०.५३.००.५५), मेन अंडर २३ – ३८ किमी टाईम ट्रायल –  सुर्णपदक मुस्तफा पत्रावाला (ठाणे ०.५२.५०.२६), विवाण सप्रू (मुबई ०.५३.२४.८९) कांस्यपदक – विरेंद्र सिंह पाटील (पुणे के पी ०.५३.३४.९८) ईलीट वुमेन –  सुर्णपदक पूजा दानोले (कोल्हापूर ०.४७.१३.२०),रौप्यपदक – प्रणीता सोमण (अहिल्यानगर ४७.५६.०९), कांस्यपदक अपूर्वा गोरे (अहिल्यानगर ४९.५१.२३), सब ज्युनिअर बॉईज- १५ किमी टाईम ट्रायल  सुवर्णपदक  – मोक्ष सोनावने, (नासिक ०.२३.०८.१९), रौप्यपदक राज नारामण करमडे (अहिल्यानगर २३.३०.६१) कांस्यपदक – ओंकार गांधले (पुणे केपी -०.२३.४३.३८. सब ज्यनिअर गर्ल्स – १५ किमी टायम ट्रायल – सुवर्ण पदक – श्रावनी परीट  (पुणे २६.०८.७४), रौप्यपदक – निम शुक्ला (मुंबई २६.४६.०२) कांस्यपदक मानसी महाजन (पुणे ०.२६.५२.५४) युथ बॉइज १० किमी टायम ट्रायल – सुवर्ण दानीश जमादार (सांगली ०.१७.११.३२) रौप्यपदक – संस्कार घोरपडे (पुणे ०.१७.१५.६९) कांस्य पदक अनुज गैड (पुणे ०१७.३९.८०) युथ गर्ल्स – १० किमी  टायम ट्रायल सुवर्णपदक गायत्री तांबवेकर (पुणे ०.१९.१४.८६) रौप्यपदक – राजनंदीणी सोमवंशी (पुणे केपी ०.१९.५१.६३) कांस्यपदक अर्नवी सावंत (सातारा ०.२१.०४.६७) 00000