Category: रायगड

raigad news and updates

माथेरान पालिकेच्या सभांचे थेट प्रक्षेपण नागरिकांसाठी व्हावे भास्कर शिंदे यांची मागणी

माथेरान पालिकेच्या सभांचे थेट प्रक्षेपण नागरिकांसाठी व्हावे भास्कर शिंदे यांची मागणी मुकुंद रांजाणे माथेरान : राज्यातील विविध ठिकाणी असणाऱ्या नगरपालिका क्षेत्रात ज्यावेळी विविध विषयांवर महत्वपूर्ण निर्णय अथवा विकासकामे होण्यासाठी सभा आयोजित करण्यात येते त्याबाबत इत्यंभूत माहिती गावातील जनतेला माहीत व्हावी यासाठी  होणाऱ्या सभांचे थेट प्रक्षेपण द्वारे दाखविण्यात येत असते त्याच धर्तीवर माथेरानमध्ये सुध्दा नगरपरिषदेच्या सभागृहात होणाऱ्या सभांचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात यावे अशी मागणी येथील उद्योजक भास्कर शिंदे यांनी केली आहे. अनेकदा काही महत्वपूर्ण कामे परस्पर एखाद्या मर्जीतील ठेकेदाराला सुपूर्द केली जातात आणि त्यामागे खुप काही गौडबंगाल दडलेले असते. त्यामुळे होणारी विकासकामे नियोजनशून्य होऊन निधीचा अपव्यय होत असतो. ज्यावेळी सभांचे आयोजन करण्यात येते त्यावेळी चालू सभेत लोकनियुक्त सदस्य अधिकाऱ्यांचे लांगुलचालन तर करीत नाही ना किंवा एखाद्या अधिकाऱ्यांच्या दबावाखाली कोणता सदस्य नाही ना याची शहानिशा होण्यासाठी जर का सभागृहात होणाऱ्या सभांचे चित्रण प्रदर्शित केल्यास जनतेचा सुध्दा आत्मविश्वास वाढेल की ज्यांना आपण अमूल्य मत देऊन ज्यांना कार्यक्षम सदस्य समजून सभागृहात पाठवले आहे.ती मंडळी नक्कीच या गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील आहेत का ? सकारात्मक कामांना पाठबळ देत आहेत की नाही हे मतदारांना पाहणे सुध्दा आवश्यक आहे त्यामुळेच आपले मत वाया गेलेले नसून सार्थकी लागले आहे. अशा भावना निश्चितपणे त्यांना पहावयास मिळू शकतात.निवडून दिलेले लोकप्रतिनिधी खरोखरच आत्मीयतेने कामे करतात की नाही याचे ज्ञान आणि माहिती प्रत्येक घटका पर्यंत जाणे गरजेचे आहे. त्यासाठी आगामी काळात होणाऱ्या प्रत्येक सभांचे थेट प्रक्षेपण करण्यात यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे परंतु सत्ताधारी गट काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.प्रशासकीय राजवटीत कार्यालय आहे की नाही असे चित्र निर्माण झाले होते. कोणत्याही कर्मचाऱ्यांवर बंधन नसल्याप्रमाणे सर्व कारभार सुरू होता. जो तो आपल्या सोयीनुसार कार्यालयात हजर राहत होता.दिवसभरात बहुतेक कर्मचारी हे जेमतेम दोन ते तीन तास काम करताना दिसत होते.तर काही इमानेइतबारे कर्तव्य पार पाडत होते.निदान यापुढे तरी सत्ताधारी गटाचा संपूर्ण कार्यालयावर अंकुश राहील का असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. कोट काही वर्षांपूर्वीच पालीकेच्या सर्व सभा लाईव्ह केल्या जाव्यात अशी मागणी मी स्वतः तत्कालिन बहुमत असणाऱ्या सत्ताधारी गटाकडे केली होती.नगरपरिषदेच्या सर्व सभा लाईव्ह झाल्या पाहिजेत आजही या मागणीवर आम्ही ठाम आहोत.आपले लोकप्रतिनिधीं काय काम करतात,प्रभागाचे,गावाचा हिताचे निर्णय कसे घेतात हे पाहण्याची संधी लाईव्ह सभेमुळे मतदार नागरिकांना भेटू शकते. भास्कर शिंदे—उद्योजक माथेरान

माथेरान युनियन बँकेच्या सेवेचा बोजवारा

माथेरान युनियन बँकेच्या सेवेचा बोजवारा मुकुंद रांजाणे माथेरान: माथेरान मध्ये एकमेव राष्ट्रीयकृत युनियन बँक असून नेहमीच या बॅंकेत सेवेचा बोजवारा पहावयास मिळत असून ग्राहकांना कोणत्याही प्रकारची सेवा उपलब्ध होण्यास दिरंगाई आणि वेळ लागत असल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. माथेरान हे पर्यटनक्षेत्र असल्यामुळे मोठया प्रमाणावर पर्यटकांची गर्दी असते सहसा कुणीही रोख रक्कम स्वतःजवळ ठेवत नसल्याने ते याच युनियन बँकेच्या भरवशावर अवलंबून असतात परंतु या बँकेचे एटीएम सुध्दा नेहमीच तांत्रिक कारणास्तव अथवा नेटवर्किंग मुळे बंद असते.याच बँकेची छोटी शाखा एका कुटूंबाकडे देण्यात आली असून त्याठिकाणी सुध्दा अनेकदा सर्व्हर डाऊन असते त्यामुळे काही व्यवहाराची कामे पूर्ण होत नाहीत. येणाऱ्या पर्यटकांना एटीएममधून पैसे उपलब्ध होत नसल्याने त्यांना बाजारात काही वस्तूंची खरेदी करता येत नाही ग्राहकांसह पर्यटक सुध्दा या बँकेच्या अकार्यक्षम सुविधेबाबतीत तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.माथेरान मध्ये अन्य एखादी राष्ट्रीयकृत बँक उपलब्ध व्हावी जेणेकरून ग्राहकांना याचा नाहक त्रास सोसावा लागणार नाही अशी मागणी जोर धरू लागली आहे.

सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सदैव तत्पर- राजेंद्र सावंत

सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सदैव तत्पर- राजेंद्र सावंत अशोक गायकवाड अलिबाग: विधी सेवा समितीच्या माध्यमातून जिल्हा व तालुका स्तरावर विधी सेवा समितीकडून वेळोवेळी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरे घेण्यात येत असतात. विधी सेवा समितीकडून अनेक बाबतीत मोफत कायदेविषयक सेवा पुरविली जाते. विधी सेवा समितीच्या या कार्याची माहिती सर्वांना व्हावी तसेच सर्वांसाठी न्याय ही संकल्पना सर्वत्र पोहोचावी आणि समाजातील सर्व घटकांना तातडीने न्याय मिळावा, यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सदैव तत्पर असल्याचे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व जिल्हा विधी सेवा समितीचे अध्यक्ष राजेंद्र सावंत यांनी शनिवार आरसीएफ हॉल कुरूळ येथील सभागृहात संपन्न झालेल्या विधी सेवा महशिबिर, शासकीय सेवा व योजनांच्या महामेळाव्यात केले. या शिबिरास जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधिक्षक आँचल दलाल, जिल्हा विधी सेवा समितीच्या सचिव तेजस्विनी निराळे, जिल्हा सरकारी वकील ॲड. संतोष पवार, अलिबाग बार असोसएशनचे अध्यक्ष ॲड. प्रसाद पाटील, जिल्ह्यातील न्यायालयांतील न्यायाधिश, शासनाच्या विविध खात्याचे अधिकारी, जिल्हा व जिल्ह्यातील तालुका विधी सेवा समिती मधील वकील वर्ग, अनेक मान्यवर, शासकीय कर्मचारी तसेच बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी मार्गदर्शन करताना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेंद्र सावंत म्हणाले की, या महामेळाव्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे शासनाच्या विविध कल्याणकारी योजना समाजातील वंचित, दुर्बल आणि गरजू घटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणे आणि त्यांना योजनांचा थेट लाभ मिळवून देणे हे आहे. जिल्हा विधी प्राधिकरणामार्फत अनेक योजना राबविल्या जातात. या योजनांची माहिती जिल्ह्यातील सर्व नागरिकांना, विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागातील गरजू जनतेला व्हावी तसेच तळागाळातील विविध समाजातील घटकांपर्यंत पोहचावी आणि कोणताही नागरिक न्यायापासून वंचित राहू नये याकरिता हा महामेळावा आयोजित करण्यात आहे. संविधानाने सर्वांना समान न्यायाची संधी दिली आहे. त्यामुळे हा उपक्रम महत्वाचा असून सर्व घटकातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी सावंत यांनी जिल्हा व तालुका स्तरावर विधी सेवा समितीकडून राबविले जाणारे विविध उपक्रम व सेवांची माहिती उपस्थितांना दिली. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, रायगड मधील माझ्या कारकिर्दीतील हा दुसरा महामेळावा असून अशा महामेळाव्याच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांपर्यंत कायदेविषयक ज्ञान पोहचविणे, दुर्बल घटकांना न्याय मिळवून देणे हा मुख्य उद्देश असल्यामुळे महामेळावा अतिशय महत्वाचा आहे. उच्चशिक्षित व्यक्तींनाही कायद्याचे ज्ञान नसते. त्यामुळे राष्ट्रीय विधी सेवा समितीने भविष्यात शाळेय स्तरावर कायद्याची तोंड ओळख देणारे विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करावेत असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. या महामेळाव्यात शासनाच्या विविध विभागांचे 32 स्टॉल लावण्यात आले असून प्रत्येक विभागांनी आपल्या असलेल्या योजनांची तातडीने, तळमळीने अंमलबजावणी करुन योजनेचा लाभ तळागाळातील दुर्बल घटकांपर्यंत पोहचवावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. हुडबळी नसलेला जिल्हा म्हणून रायगड जिल्ह्याची ओळख आहे. तसेच रायगड जिल्ह्यात पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे. या जिल्ह्यातील प्रत्येक माणूस हा सतत कामकाजामध्ये मग्न असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आत्महत्या प्रमाण शून्य असलेला हा जिल्हा आहे. जिल्ह्यात नवनवीन प्रकल्प येत असून तिसऱ्या मुंबईच्या निर्मितीमुळे भविष्यात रायगड जिल्हा विकासाचा केंद्र बिंदू म्हणून ठरणार आहे.याचवेळी त्यांनी महसूल खात्याकडून राबविल्या जाणाऱ्या विविध महत्त्वकांक्षी योजनांची सखोल माहिती दिली. रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी आपल्या मनोगतात सामान्य प्रशासनाच्या विविध प्रकारच्या कर वसुलीमध्ये लोक अदालतीचा होणारा उपयोग सांगितला. तसेच त्यांच्या प्रशासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना आणि ग्रामीण भागातील बचत गटांचे कार्य तसेच इतर बाबतीत महत्त्वपूर्ण अशी माहिती दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी आपल्या मनोगतात पोलीस विभागांकडून राबविण्यात येणारे कायदे व त्याची अंमलबजावणी याबाबत उपस्थितांना माहिती दिली. तसेच कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या महिलांनी येथील महामेळाव्यात योजनांची मिळणारी माहिती कार्यक्रमास उपस्थित राहू न शकणाऱ्या नागरिकांपर्यंत पोहचवावी, असे सांगितले. अलिबाग बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. प्रसाद पाटील यांनी सांगितले की, जिल्हा प्रशासनातील सर्व विभागांनी एकत्र येऊन नागरिकांच्या दारी शासनाच्या योजना पोहोचवण्याचा हा प्रयत्न असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. तसेच सहकारी वकील संतोष पवार यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने नागरिकांना मोफत कायदेशीर सल्ला, विविध कायदेशीर हक्क, सरकारी योजना तसेच न्यायालयीन प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले. या महामेळाव्यात शासनाच्या विविध खात्यांकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देणारे ३२ स्टॉल लावण्यात आले होते. याच कार्यक्रमात शासनाच्या विविध खात्यांमधील लाभार्थ्यांना धनादेश तसेच वस्तूंचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा विधी सेवा समितीच्या सचिव तेजस्विनी निराळे यांनी सांगितले की, शासनाकडून राबविण्याल्या जाणाऱ्या नाविन्य पूर्ण योजनांची माहिती तळागाळातील घटकांपर्यंत पोहचावी याकरिता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हाधिकारी कार्यालय रायगड-अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा विधी सेवा महाशिबीर आणि शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याकरिता आलेल्या सर्वांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तसेच त्यांनी शासकीय योजना व कायदे विषयक असलेल्या सोयी-सुविधांची माहिती उपस्थितांना दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांनी विविध शासकीय विभागांनी लावलेल्या स्टॉलची पाहणी करुन योजनांची माहिती जाणून घेतली.

जय मल्हार चषक पर्व पहिले जल्लोषात

जय मल्हार चषक पर्व पहिले जल्लोषात मुकुंद रांजणे माथेरान : विविध क्षेत्रात भरारी घेत असताना यावेळी प्रथमच क्रीडा क्षेत्रात उत्तुंग झेप घेत जय मल्हार संघाने १६ ते १८ दरम्यान येथील वीर हुतात्मा भाई कोतवाल क्रीडा संकुलावर भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामने आयोजित केले होते त्यास क्रीडा प्रेमींनी भरभरून प्रतिसाद दिला. या सामन्यात विक्रांत संघाला विजेतेपद प्राप्त झाले असून मुकदर क्रिकेट संघाला उप विजेतेपद मिळाले आहे. प्रथम क्रमांकासाठी नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांच्या कडून रोख रक्कम रुपये ६१००० आणि आकर्षक चषक तसेच उप विजेत्या संघाला नगरसेविका प्रतिभा घावरे यांच्याकडून ३१००० ₹ रोख आणि आकर्षक चषक मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आला.उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, झेल, मॅन ऑफ दि मॅच असे अनेक पारितोषिक खेळाडूंना प्रदान करण्यात आली. सलग तीन दिवस येथील क्रीडा संकुलावर प्रेक्षकांची मोठया प्रमाणावर गर्दी पहावयास मिळाली.विजेत्या विक्रांत संघाचे धनगर समाज अध्यक्ष राकेश कोकळे यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी सर्व संघांना शुभेच्छा दिल्या. या संपूर्ण नियोजनासाठी मंगेश गोरे, रामा आखाडे,सुरेश आखाडे, किरण आखाडे,दत्ता, रवी, तुषार,ओंकार, मनोज, रमेश,संजय तसेच जय मल्हार संघाच्या समस्त पाठीराख्यांनी हा भव्य कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. उत्कृष्ट समालोचन मंगेश मोरे, सागर जोशी, मयुरेश कदम, अनिल नाईकडे यांनी करुन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

साहेबांचा घातच झाला….

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघात हा अपघात नसून घातच असल्याचा दावा दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेऊन रोहीत पवार यांनी आज मीडियासमोर मांडला. साहेबांचा विमान अपघात घडवून आणल्याचा संशय रोहीत…

 रायगड जिल्ह्यात २०२६ साठी तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

रायगड जिल्ह्यात २०२६ साठी तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर अलिबाग : रायगड जिल्ह्यातील महसूल हद्दीतील शासनाच्या सर्व खात्यांमधील कार्यालयांसाठी सन २०२६ या वर्षाकरिता तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. संबंधित अधिसूचना जिल्हाधिकारी किशन…

४ मार्च रोजी जिल्हास्तरीय लोकशाही दिन

४ मार्च रोजी जिल्हास्तरीय लोकशाही दिन अलिबाग : जिल्हास्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन साजरा केला जातो. मात्र मार्च २०२६ महिन्यातील पहिला सोमवार (२ मार्च) हा होळी सणानिमित्त स्थानिक सुट्टीचा…

माथेरान मध्ये एवढ्या महागड्या शौचालयांची आवश्यकता आहे का ?

माथेरान मध्ये एवढ्या महागड्या शौचालयांची आवश्यकता आहे का ? मुकुंद रांजणे माथेरान : प्रशासकीय राजवटीत माथेरान मध्ये जवळपास दहा शौचालये आणण्यात आली आहेत. स्त्री आणि पुरुषांच्या करिता वेगवेगळ्या स्वरूपात असणाऱ्या या शौचालयांची किंमत अडतीस लाख रुपये प्रति असून एवढ्या महागड्या शौचालयांची खरोखरच या दुर्गम भागातील पर्यटनस्थळावर आहे का? असा प्रश्न स्थानिकांमधून उपस्थित केला जात आहे. यातील एक शौचालय नगरपरिषदेच्या आवारात याठिकाणी अगोदरच दोन शौचालय असताना देखील नाहक एवढी महागडी शौचालय खासकरून अधिकारी आणि कर्मचारी वर्गासाठी बसविण्यात आले आहे. तर काही शौचालये अद्यापही नगरपरिषदेच्या आवारात धूळ खात पडून आहेत. माथेरान मध्ये आजमितीला खर्चिक पर्यटकांचा भरणा होत नाही. पर्यटन कशाप्रकारे वाढेल इथे पर्यटन वाढीसाठी वाहतूक व्यवस्था त्याचप्रमाणे सुस्थितीत रस्ते असावेत, पाणी, वीज सुविधा उत्तम प्रकारे उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. परंतु प्रशासकीय राजवटीत माथेरान पुढील काही वर्षे पिछाडीवर गेल्याचे बोलले जात आहे. नगरपरिषदेच्या तिजोरीत खळखळाट असून कामगारांना त्याचप्रमाणे लहानसहान कामे करणा-या  ठेकेदाराला वेळेवर पगार,बिले  मिळत नसल्याच्या तक्रारी येत असतात. एखादया निकृष्ट कामांबाबत केलेल्या कामांची बिले किती अदा केली आहेत याबाबत कुणी माहितीच्या अधिकारात माहिती मागविल्यास मोगम उत्तरे देऊन कामात चालढकल सुरू असते.मोठया कामातील ठेकेदाराला शुल्लक रक्कमेसाठी अभय दिले जात असून पाठिशी घातले जात आहे. आजवर इथल्या विकास कामांबाबत सकारात्मक कामे न होता सुध्दा लाखो,करोडो रुपयांची बिले अदा करण्यात आलेली आहेत यामागे कुणाचा  वरदहस्त आहे. प्रशासकीय राजवटीत मोठया प्रमाणावर अनाठायी खर्च आणि भ्रष्टाचार झाल्याचे नागरिक बोलत आहेत.एकंदरीत माथेरान नगरपरिषदेच्या अनागोंदी  कारभार बाबतीत संबंधित अधिकारी, कर्मचारी यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई बरोबरच दोषी असणाऱ्या या  मंडळींना सेवेतून बडतर्फ करावे अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे.

आंगणेवाडी जत्रोत्सवातील ‘सेफ हाऊस हॉस्पिटल’ ठरले जीवनदायी…!

  आरोग्य यंत्रणेचा नाविन्यपूर्ण उपक्रम…! मालवण: आंगणेवाडी येथील भराडी देवीच्या जत्रोत्सवानिमित्त जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेने भाविकांच्या सेवेसाठी सज्ज ठेवलेले ‘सेफ हाऊस हॉस्पिटल ‘ हे खऱ्या अर्थाने जीवनदायी ठरले आहे. जिल्हा रुग्णालय,…

हेरिटेज वास्तूंची डागडुजी परवानगीविना होत असल्याने शिवराष्ट्र पॅनेलचे गटनेते सिताराम कुंभार संतप्त

हेरिटेज वास्तूंची डागडुजी परवानगीविना होत असल्याने शिवराष्ट्र पॅनेलचे गटनेते सिताराम कुंभार संतप्त मुकुंद रांजाणे माथेरान : माथेरान मध्ये असणाऱ्या हेरिटेज वास्तूंच्या डागडुजी किंवा नूतनीकरण करावयाचे असल्यास हेरिटेज कमिटीच्या परवानगी शिवाय…