Category: रायगड

raigad news and updates

डॉ. ज्ञानोबा बानापुरे यांचे मार्गदर्शनाखाली सावित्री नदीपात्रामध्ये बोट चालविण्याचे प्रात्यक्षिक

अशोक गायकवाड     रायगड : उपविभागीय अधिकारी महाड डॉ. ज्ञानोबा बानापुरे यांचे मार्गदर्शनाखाली शुक्रवार, (दि.२८) सावित्री नदीपात्रामध्ये बोट चालविण्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. संभाव्य पूरपरिस्थितीचा सामना करण्याचे दृष्टीने शुक्रवारी महाड…

मतदारांनी मतदार यादीत नाव नोंदवावे – जिल्हाधिकारी किशन जावळे*

अशोक गायकवाड     रायगड : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात दि. २५ जुन ते २० ऑगस्ट २०२४ या कालावधीत द्वितीय संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार असून जिल्हयातील अधिकाधिक पात्र…

जलजीवन मिशन योजनेंतर्गत कर्जत तालुक्याची नळ पाणीपुरवठा आढावा बैठक संपन्न

माथेरान : कर्जत तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेणेबाबत आमदार श्री. महेंद्र सदाशिव थोरवे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २९ जून २०२४ रोजी बाळासाहेब भवन, जनसंपर्क कार्यालय, कर्जत येथे…

राज्य शासनाने माथेरानला पर्यायी व्यवस्था निर्माण करावी ! स्थानिकांची मागणी

माथेरान : दिवसेंदिवस पर्यटकांची पाऊले माथेरान या रमणीय पर्यटनस्थळांकडे आगेकूच करत असताना पर्यटकांची मात्र सद्यस्थितीत नेरळ ते माथेरान दरम्यानच्या एकमेव मार्गामुळे ऐन सुट्ट्यांच्या हंगामात त्रेधातिरपीट उडत असते. अपुऱ्या पार्किंग व्यवस्थेमुळे…

पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेसाठी अर्ज सादर करा – सुनील जाधव*

अशोक गायकवाड   रायगड : महानगर पालिका व जिल्हास्तरावरील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश मिळालेल्या परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता १२ वी नंतरचे उच्च शिक्षण घेण्यासाठी पंडित दिनदयाळ…

कुमार महाराष्ट्र केसरी पैलवान सुरजची आत्महत्या

 कुस्ती जगतावर शोककळा सांगली : कुमार महाराष्ट्र केसरी पैलवान सुरज निकमने त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केलीय. त्याच्या आत्महत्येमुळे कुस्ती जगतावर शोककळा पसरली आहे. त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.…

जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी घेतली शपथ

माथेरान : माथेरान पोलीस ठाणे हद्दीत जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनाच्या अनुषंगाने प्राचार्य शांताराम यशवंत गव्हाणकर विद्या मंदिर, माथेरान या ठिकाणी अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त कार्यशाळा आयोजित करून उपस्थित विद्यार्थी यांना सपोनी श्री.अनिल सोनोने यांनी मार्गदर्शन  केले. तसेच यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी अमली पदार्थ विरोधी शपथ घेतली. सध्या विद्यार्थ्यांमध्ये वाढत असलेले अमली पदार्थ विषयी उत्सुकता व त्यातून वाढत चाललेली व्यसनाधीनता हे प्रकार वाढत आहेत त्यातूनच अनेक गैरप्रकार वाढत आहेत,नुकतेच पुणे ह्या सुसंस्कृत शहरामध्ये अमली पदार्थांनमुळे वाढलेली अपघातांची व गुन्ह्याची संख्या पाहता शालेय विद्यार्थ्यांना अशा व्यासनाविषयी जागरूकता दाखवून त्यापासून परावृत्त करणे गरजेचे असल्याने हा कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांना अमली पदार्थांचे सेवन करण्यापासून  जनजागृती करण्यासाठी या वेळी आव्हाहन करतानाच अश्या समाज कंटकान पासून सावध राहण्याचे सांगण्यात आले. यावेळी सहा. फौजदार सी के पाटील, गोपनीय अंमलदार दामोदर खतेले हे उपस्थित होते. सदर वेळी साधारण 70 विद्यार्थी उपस्थित होते व त्यांनी अंमली पदार्थ विरोधात शपथ घेतली.

माथेरानमध्ये स्वच्छ पाणी व तलाव स्वच्छतेसाठी उपोषण

माथेरान : माथेरानमधील श्री राम मंदिर समोर निसर्ग पॉइंट स्टॉल वेल्फेअर असोसिएशनच्या माध्यमातून येथील शार्लोट लेकच्या स्वच्छतेसाठी बेमुदत उपोषण सुरू केले असून, गेले १० वर्ष पेक्षा अधिक काळ होऊन ही माथेरान मधील पिण्याचा पाण्याचा लेक साफ केला गेला नसून त्यामुळे येथे पावसाळ्यातील दिवसांमध्ये रोगराई वाढत आहे तर अशुद्ध पाण्याचा पुरवठा ही होत असल्याच्या निषेधार्थ हे उपोषण सुरू आहे. निसर्ग पॉइंट स्टॉल वेल्फेअर असोसिएन ने माथेरान नगरपालिकेला अगोदर निवेदन देऊन हा तलाव पावसाळ्यामध्ये स्वछ करावा अशी मागणी केली होती व जून 25 पर्यंत स्वच्छ न झाल्यास आमरण उपोषण केले जाईल असा इशारा दिला होता परंतु ह्या कालावधी मध्ये काम सुरू न झाल्याने आजपासून संघटनेचे अध्यक्ष श्री.संतोष कदम हे आमरण उपोषणास बसले आहेत. शार्लेट हा माथेरान नगरपालिकेच्या मालकीचा असून अमृत 2 या कार्यक्रमांतर्गत माथेरान नगर परिषदेकडून माथेरान शार्लेट तलाव सुशोभी करण्याकरता 4:99.82 लक्ष इतके अंदाजपत्रक सादर करण्यात आले होते,अधीक्षक अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ पनवेल कार्यालयाकडून त्यास 6/2/2023 रोजी तांत्रिक मान्यता देण्यात आली होती सदर अंदाज पत्रक तलावातील गाळ काढण्याचे व वाहतूक करून टाकने तसेच सदर तलावातील गेट व ब्रिज बाजूची दुरुस्तीकरितांची तरतूद होती त्यास प्रशासकीय मंजुरी मिळाली होती. त्याचप्रमाणे माथेरान नगर परिषदेस राज्य शासनाने राज्यसरोवर संवर्धन योजनेअंतर्गत माथेरान येथील शार्लेट तलावास पर्यावरण दृष्ट्या संवर्धन व संरक्षण करण्यासाठी 7/ 3/ 2007 रोजीच्या शासन निर्णय नुसार362:65लक्ष इतक्या मंजूर निधीतील राज्य हिशापोटी रुपये 326:38लक्ष इतक्या रकमेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती मंजूर रकमेपैकी 200 लक्ष इतका निधी आतापर्यंत वितरीत केला असून माथेरान नगर परिषदेच्या 2/3/ 2023 रोजीच्या पत्रानुसार उर्वरित कामे करण्यासाठी 100 लक्ष इतका निधी नगर परिषदेस उपलब्ध करून दिला असल्याने 27/03/2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार दिसून येत आले आहे.परंतु ह्या निधीचा वापर लेक च्या स्वच्छते व सुशोभीकरणासाठी न होता इतरत्र वापरला गेला का की ह्यामध्ये काहीतरी मोठा घोटाळा झाला आहे असे उपोषण ठिकाणी चर्चा सुरू होती. निसर्ग पॉइंट स्टॉल वेल्फेअर असोसिएन ने वारंवार तलाव स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या शासनविरोधात दंड थोपटले असून ,माथेरान येणाऱ्या पर्यटकांना व स्थानिकांना गडूळ अस्वच्छ पाणी पुरवठा होत असल्याने हा तलाव तातडीने स्वच्छ व्हावा ह्याकरता उपोषणाचे हत्यार उपसले असून त्यास माथेरान मधील सर्वच स्तरातून पाठिंबा मिळत आहे. यावेळी संघटनेचे योगेश शिंदे,अविनाश गोरे,सीमा कदम,जगदीश कदम,विजय सावंत व अन्य सदस्य उपस्थित होते. 000000

ट्रेकिंगला येणाऱ्या पर्यटकांना अनुभव नसल्याने अपघातांमध्ये वाढ

माथेरान : पावसाळा म्हणजे तरुणाईला साद घालणारा निसर्ग, अनेक जण पावसाळा सुरू होण्याची वाट पाहत असाल व पावसाला सुरुवात होताच वेगवेगळ्या ठिकाणी पावसाचा आनंद घेण्याकरता कोणतीही माहिती न घेता थेट पोहोचत असतात परंतु या हौशी पर्यटकांना माहिती अभावी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते पहिल्याच पावसामध्ये अशा अनेक अपघाती घटना घडल्याने हा प्रश्न आता खंबीर स्वरूप धारण करीत असल्याचे समोर येत आहे त्यामुळे पावसाळी पर्यटनाचा भेद करत असाल तर त्या ठिकाणचे सर्व माहिती उपलब्ध असणे गरजेचे आहे व त्याकरिता माथेरान मध्ये माथेरान पोलिसांनी एक मोहीम सुरू केली असून केव्हाही कुठे माथेरान परिसरात गरज असल्यास पोलीस खाते तत्पर असणार असल्याचे येथील एपीआय अनिल सोनोने यांनी सांगितले. माथेरान  हे मुंबई पुणे ठाणे कल्याण नाशिक यासारख्या मेट्रो सिटी पासून अगदी जवळचे पर्वतीय पर्यटन स्थळ आहे माथेरानच्या पर्वत रांगांची अनेक पर्यटकांना नेहमीच भुरळ पडलेली आहे, त्यामुळे तरुणाई पाऊस सुरू होण्या अगोदरच माथेरानला येणाऱ्या पर्वतीय पर्वतरांगांमधून ट्रेकिंग द्वारे येण्याचे बेत आखत असतात, व पावसाला सुरुवात होताच माथेरानच्या डोंगररांगा या हौशी ट्रेकर्सने फुलून गेलेल्या दिसतात परंतु या परिसराचे योग्य माहिती नसल्याने अनेकांना अडचणींना सामोरे जावे लागत असते त्यामुळे माथेरानला येण्याअगोदर येथील पर्वतीय रस्ते व त्याच्या सुरक्षिततेची योग्य माहिती असणे गरजेचे आहे. माथेरान करिता येणारे सुरक्षित ट्रेकिंगचे रस्ते पनवेल येथून माथेरान करिता धोधानी पर्यंत बस सेवा उपलब्ध आहे व तिथून पुढे माथेरान करिता दोन पायवाटा आहेत त्यातील मंकी पॉइंट येथून येणारी वाट ही पावसाळ्यात अती धोकादायक आहे,त्यामुळे हौशी गिर्यारोहकांनी ही वाट न पकडता येतील सनसेट पॉईंट येथे येणारी कमी धोकादायक वाटेने आल्यास अधिक सोपे जाते , येथील खालापूर तालुक्यातील चौक येथून ही माथेरान करिता दोन रस्ते येतात त्यातील एक थेट वन ट्री हिल पॉइंट येथे येतो तर दुसरा रामबाग पॉइंट येथे येतो . नेरळ येथून पेब किल्ला फिरून माथेरान हा ही एक मार्ग सध्या पर्यटकांचे आवडते ठिकाण ठरत आहे . भिवपुरी येथून येथील गारबट पॉइंट हा ही एक अतिशय अवघड ट्रेक उपलब्ध आहे परंतु जे हौशी पर्यटक आहेत त्यांनी हा टाळलेलाच बरा, अशा अनेक वाटा पावसाळी पर्यटनासाठी हौशी गिर्यारोहक शोधत असतात पण रस्त्यांची संपूर्ण माहिती नसल्याने अनेकांना अपघातास सामोरे जावे लागते त्यात प्रामुख्याने अनेक जण निसरड्या वाटेने जाण्यासाठी लागणारे साहित्य बरोबर नेत नसल्याचे निदर्शनास येत आहे तर काही स्वतःबरोबर प्राथमिक उपचाराचे साहित्य बरोबर ठेवत नाही तर निसरड्या वाटेवरून चालण्यासाठी लागणारे ट्रेकिंग शूज ही न वापरता अशा ठिकाणी गेल्यानंतर अपघातास आमंत्रण देत असतात सर्वात महत्त्वाचे आपण ज्या ठिकाणी जातोय त्या ठिकाणची भौगोलिक माहिती काही आपत्कालीन परिस्थिती तर आवश्यक ते टेलीफोन नंबर त्या ठिकाणी मोबाईल साठी नेटवर्क आहे का की आपण दुसऱ्यांची संपर्क साधू शकतो अशी माहिती न घेताच अनेक जण या ट्रिप टाकत असतात व अपघातास आमंत्रण देतात त्यामुळेच माथेरानला येण्यापूर्वी या सर्व गोष्टीचा विचार करून ट्रिप आखावी येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी माथेरान मध्ये  आपत्कालीन स्थिती उद्भाविल्यास खालील नंबर बरोबर संपर्क करावा.

पर्यटनासाठी येणाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी कार्यवाही करा-किशन जावळे

अशोक गायकवाड     रायगड : जिल्ह्यातील गड किल्ले, समुद्रकिनारे, धबधबे यासह विविध ठिकाणी पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असून त्यांच्या सुरक्षिततेसाठी उपाय केले जाणे गरजेचे आहेत. तहसील व उपविभागीय स्तरावरील अधिकाऱ्यांनी यासाठी गाव पातळीवरील यंत्रणेच्या माध्यमातून कार्यवाही करावी असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अंतर्गत आढावा बैठकी प्रसंगी ते बोलत होते. बैठकीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, विविध शासकीय प्रमुख अधिकारी उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे ऑनलाइन बैठकीत सहभागी झाले होते.जिल्हाधिकारी जावळे म्हणाले, मान्सून पर्यटन आणि पावसाळा या पार्श्वभूमीवर दुर्घटनांच्या होऊ नये यासाठी प्रत्येक ग्राम पंचायत स्तरावर सरपंच , उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी आदींच्या सहभागाने गाव पातळीवर समिती स्थापन करण्यात यावी. या समितीद्वारे सदर गावाच्या परिसर हद्दीतील पर्यटन स्थळ, तलाव, धबधबे , समुद्रकिनारे अशा जागांवर जीवित हानी टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात. उपविभागीय अधिकाऱ्यांसह तहसीलदार , गटविकास अधिकारी , पोलीस अधिकारी यांनी नागरिकांना विविध माध्यमातून सतर्क करावे असे सुचित केले.;यावेळी पोलीस अधीक्षक घार्गे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बस्टेवाड यांनी महत्त्वाच्या सूचना केल्या. मोरबे धरणाची सुरक्षा व्यवस्था, काशीद समुद्रकिनारा येथे पर्यटक सुरक्षेसाठी वॉच टॉवर उभारणे, विविध धबधबे गड-किल्ले आदीं ठिकाणी संबंधित विभागांच्या वतीने उपाययोजना करणेबाबत चर्चा करण्यात आली. याप्रसंगी उपस्थित उपविभागीय अधिकारी मंगेश चव्हाण, सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता रूपाली पाटील , कार्यकारी अभियंता महेश नामदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अंबादास देवमाने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनीषा विखे , जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी बैठकीत सहभागी होत विविध माहिती दिली. मान्सून पर्यटनाच्या अनुषंगाने विविध तलाव, धबधब्याच्या ठिकाणी मोठयाप्रमाणात पर्यटक येत असतात . या व मागील वर्षी काही ठिकाणी अपघात होवून पर्यटकांच्या मृत्यु होण्याच्या दुघटना घटना घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रबळगडाच्या धर्तीवर इरशाळगड, पेब किल्ला, माणिक गड (रसायनी), कोथळी गड(पेठ गड), सागरगड व इतर पर्यटकांच्या गर्दी होणाऱ्या वन विभागाच्या हद्दीमधील गड-किल्ल्यावर स्थानिक तरुणांना गाईडचे प्रशिक्षण देणे. पर्यटकांना स्थानिक गार्डड सोबत नेणे बंधनकारक करावे. पर्यटकांना गड-किल्ले, धबधबा, धरणे , पाणी प्रकल्प समुद्र किनारी व इतर धोकादायक ठिकाणी सेल्फी घेण्यास प्रतिबंध करणे बाबत चर्चा करून सूचना देण्यात आल्या. 0000