Category: रायगड

raigad news and updates

महाविद्यालयीन शिष्यवृत्तीकरिता निवडलेल्या विद्यार्थ्यांना फेरअर्ज सादर करण्याची संधी – सुनिल जाधव

अशोक गायकवाड   रायगड : Revert back झालेला अर्ज देखील विहीत वेळेत म्हणजेच दि.३० जून २०२४ पूर्वी विद्यार्थ्याने त्याच्या लॉगीनमधून महाविद्यालयीन शिष्यवृत्ती अर्ज ऑनलाईन फेरसादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज…

सुधाकर घारेंच्या गावभेट दौऱ्यामुळे राष्ट्रवादीत प्रक्षप्रवेशाचा ओघ वाढला

कर्जत : २३ जून रोजी कर्जत येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयात पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. सुधाकर घारेंच्या नेतृत्वात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष दिवसेंदिवस अधिक बळकट होत चालला आहे. गेल्या अनेक…

पदवीधर शिक्षक मतदारसंघाच्या मतदानाकरिता पर्यायी कागदपत्रे ग्राह्य-अमोल यादव

अशोक गायकवाड नवी मुंबई : कोकण विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणूक दि. २६ जून, २०२४ रोजी होणार आहे. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर मतदारकर्त्यानी त्यांची ओळख पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करु शकत नाही अशा मतदारांनी त्यांची ओळख पटवून देण्यासाठी निवडणूक आयोगाने निर्धारीत केलेल्या ओळखपत्रांपैकी कोणतेही ओळखपत्र मतदान केंद्रावर सादर करता येईल, अशी माहिती उपआयुक्त (सा.प्र.)कोकण विभाग तथा सह. निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे. विधानपरिषदेची द्विवार्षिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूकीकरिता मतदान करतांना मतदान केंद्रावर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र सादर करु शकत नाहीत, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्र व्यतिरिक्त खालील नमूद पर्यायी कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याबाबत आयोगाने आदेश दिले आहेत. आधारकार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, भारतीय पारपत्र (पासपोर्ट), राज्य/केंद्र सरकारद्वारे त्यांच्या कर्मचाऱ्यांना जारी केलेले सेवा ओळखपत्र उपक्रम, स्थानिक संस्था किंवा इतर खाजगी औद्योगिक घरे, खासदार/आमदार/एमएलसी यांना अधिकृत ओळखपत्रे जारी केली जातात. ज्या शैक्षणिक संस्थांनी दिलेले सेवा ओळखपत्र संबंधित शिक्षक/पदवीधर मतदार संघात काम केले जाऊ शकते. विद्यापीठाने जारी केलेले पदवी/डिप्लोमाचे प्रमाणपत्र, मूळ स्वरूपात, सक्षम अधिकाऱ्याने जारी केलेले शारीरिक अपंगत्वाचे प्रमाणपत्र, वर युनिक डिसॅबिलिटी आयडी कार्ड अशी कागदपत्रे पर्यायी कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येतील. दिनांक २६ जून,२०२४ रोजी सकाळी ७.०० ते सायंकाळी ६.०० या कालावधीत होणाऱ्या मतदानाच्या दिवशी पदवीधर/शिक्षक मतदारांनी मोठया संख्येने मतदान करावे, असे आवाहन उपआयुक्त (सा.प्र.)कोकण विभाग तथा सह. निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

‘बायकांना पुढे करून जमिनी लाटल्या; धक्काबुक्कीसह शिवीगाळ करताना जिभाच घसरल्या’

माहेरवाशीण असलेल्या निता विचारेंनी मंत्रालय सचिवालयाची धमकी देवून सावंतांना मारहाणीसाठी केले प्रोत्साहित   राज भंडारी   रायगड : म्हसळा तालुक्यातील गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संदेरी येथील विचारे कुटुंबियांच्या चुलतीच्या नावे असलेल्या जमिनीचे मूळ वारसदार असलेल्या रामचंद्र किसन विचारे व अन्य चार भाऊ असे वारस असून त्यांच्या मालकीच्या या जागेत रमेश व संदीप सावंत यांच्या वडिलांना ४०० स्क्वेअर फूट जागा घर बांधून राहण्यासाठी सन १९६२ साली तोंडी व्यवहाराने देण्यात आली होती. याबाबत आता रामचंद्र विचारे आणि बंधूंची कोणत्याही प्रकारची हरकत नव्हती. मात्र कालांतराने रमेश व संदीप सावंत यांचे वडील श्रीधर सावंत यांनी सदर घराभोवती पुढील बाजूस पडवी तसेच मागील बाजूस एक पडवी बांधून अतिक्रमण करून जागा लाटली. त्यानंतर त्यांची मुले यावरच न थांबता ग्रामपंचायतीने बांधकामास मज्जाव घातलेला असताना देखील त्यांनी आता तर घराच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेवरही बेकायदेशीर कब्जा मिळविण्याचा प्रयत्न करून चक्क पाच फूट उंचीची संरक्षक भिंतच उभारली. त्यानंतर रामचंद्र किसन विचारे यांनी या प्रकाराला विरोध केला असता सावंत कुटुंबातील संदीप श्रीधर सावंत, स्नेहा संदीप सावंत आणि निता यशवंत विचारे यांनी ६८ वर्षीय रामचंद्र किसन विचारे यांना धक्काबुक्की करीत आपल्या जिभेवरील ताबा सोडत अर्वाच्च शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली. यातच माहेरवाशीण असलेल्या निता यशवंत विचारे यांनी तर कहर केला, स्नेहा सावंत यांना अंगावर धावून जाण्यासाठी प्रोत्साहन करताना त्यांनी जिभेवरील ताबा सोडत “मी मंत्रालयात सचिवालयात कामाला आहे, तुझे कोण काहीही करू शकणार नाही. मी सर्व बघून घेईन” असे बोलून खतपाणी घातले. अखेर विचारे बंधूंनी पोलीसात दाद मागितल्यानंतर गोरेगाव पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली. तसेच सदर प्रकारावर येथील लोकप्रतिनिधी यांनी हस्तक्षेप करून रविवारी (दि.२३ जून) रोजी यावर मार्ग काढण्यासाठी बैठक लावली. मात्र सदर बैठकीला सावंत कुटुंबीयांनी पुन्हा जैसे थे भूमिका घेत आपला गोंधळ घालण्यास सुरुवात करून सदरची बैठक धुडकारून लावली. यावेळी उपस्थितांनी त्यांना न्यायालयीन दणका देण्याची गरज असल्याचे सुचाविल्यामुळे रामचंद्र विचारे यांच्यासह पाचही बंधूंनी आता न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत रामचंद्र किसन विचारे यांनी बोलताना सांगितले की, गेली अडीच वर्षे सदर प्रकार सुरू आहे. आम्ही सर्व भाऊ हे नोकरीनिमित्त मुबई परिसरात राहतो. अडीच वर्षांपूर्वी आम्ही आमच्या जागेत लावलेली झाडे तसेच इतर पूर्वजांच्या काळातील दोन आंब्याची झाडे व एक नारळाचे झाड रमेश आणि संदीप सावंत यांनी कोणाचीही परवानगी न घेता तोडले व ते चोरुन विक्री केले. याबाबत पोलीसात तक्रार दिली असता पोलिसांनी तक्रार घेण्यास विरोध करताना आपले वारस दाखले दाखवा असे सांगितले. त्यानुसार सदर वारस दाखल्यांचे काम सुरू होते. साधारण दीड महिन्यापूर्वी आम्हाला वारस दाखले मिळाले. पुन्हा आम्ही पोलीस ठाण्यात गेल्यानंतर तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक यांची बदली झाली असल्यामुळे नव्याने आलेले सुर्वे या सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी आपली तक्रार घेता येणार नाही असे उत्तर दिले. या प्रकारामुळे संदीप आणि रमेश सावंत यांची हिम्मत अधिकच फोफावली. त्यानंतर त्यांनी आमच्या मोकळ्या जागेवर त्यांचीच जागा असल्याचे भासविण्यासाठी गेल्यावर्षी एका बाजूला संरक्षक भिंत बांधली. यावेळी ग्रामपंचायतीमध्ये तशी तक्रार दिल्यानंतर ग्रामपंचायतीने हे काम थांबविले आणि विना परवानगी आपण बांधकाम करू शकत नसल्याची त्यांना नोटीस दिली. मात्र मुजोरीचा कळस गाठलेल्या सावंत बंधूंनी मात्र प्रशासनाला केराची टोपली दाखवून दुसऱ्या बाजूला याच आठवड्यात दुसरी संरक्षक भिंत बांधून संपूर्ण जागा आपलीच असल्याचे भासवित बळकावण्याचा प्रयत्न केला आहे. सदर संरक्षक भिंतीचे बांधकाम सुरू असल्याची माहिती मिळताच पाचही विचारे बंधू हे दिनांक ९ जून रोजी याठिकाणी आले. यातील मोठे बंधू रामचंद्र किसन विचारे यांनी त्यांना बांधकाम करताना अडविले असता रमेश श्रीधर सावंत, स्नेहा संदीप सावंत, ऋतुजा रमेश सावंत आणि माहेरवाशीण असलेली निता यशवंत विचारे हे याठिकाणी येवून ६८ वर्षीय वृद्ध असलेल्या रामचंद्र किसन विचारे यांना धक्काबुक्की करून परत अडवाल तर जिवंत राहणार नाही अशी धमकी देण्यास सुरुवात करू लागले. हे सर्व होत असताना याचा आवाज बाजूलाच असलेल्या विचारे बंधूंच्या कानावर गेल्यानंतर हे सर्व बाहेर आले. यावेळी माहेरवाशीण असलेली निता विचारे ही स्नेहा संदीप सावंत हिला पुढे करून “तू मार त्याला, मी मंत्रालय सचिवालयात कामाला आहे, तुझे कोणीही काहीही करू शकणार नाही. मी बघते सर्व” असे बोलून मारहाणीसाठी प्रोत्साहित करीत असल्याचे सर्व बंधूंनी पाहिल्यानंतर त्यांनी तत्काळ गोरेगाव पोलीस ठाण्यात जावून याबाबत तक्रार नोंदविण्याचा प्रयत्न केला. याबाबतचे सर्व चित्रफीत पोलिसांना दाखविल्यानंतर देखील पोलिसांनी सदर बाब ही सिव्हील मॅटर असल्याचे सांगून तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. सरळ आणि साधेपणाने वागणाऱ्या विचारे कुटुंबाला न्याय तरी कोण देणार अशी स्थिती उद्भवली आहे. सावंत कुटुंबाच्या पाठीमागे कोणाचे हात दडले आहेत ? ते का प्रशासनाला जुमानत नाहीत ? पोलिसांचे देखील ते का ऐकत नाहीत ? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत. यापूर्वी देखील अशीच एक चॅप्टर केस २०२२ मध्ये दाखल करण्यात आली होती. यामध्ये संदीप श्रीधर सावंत, रमेश श्रीधर सावंत, स्नेहा संदीप सावंत, ऋतुजा रमेश सावंत, निता यशवंत विचारे आणि प्रसाद महादेव विचारे यांचा समावेश होता. त्या चॅप्टर केसनुसार एक वर्षे सावंत कुटुंब शांत राहिले आणि चॅप्टर केसची मुदत संपताच त्यांनी आपले रंग दाखविण्यास सुरुवात केली. दिनांक ९ जून रोजी घडलेल्या प्रकारानंतर पोलिसांनी तक्रार घेतली नसल्यामुळे रामचंद्र किसन सावंत यांनी गोरेगाव पोलिसांसह संदेरी ग्रामपंचायत, पोलीस अधीक्षक कार्यालय अलिबाग, गृहमंत्रालयाच्या सचिवांना तसेच प्रिंट व इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांना एक पत्र तयार करून पाहिली प्रत गोरेगाव पोलिसांना शनिवार दिनांक २२ जून रोजी दिली. यावेळी सदर तक्रार अर्ज पोलिसांनी वाचल्यानंतर तत्काळ त्यांनी संदीप सावंत, स्नेहा सावंत, ऋतुजा सावंत आणि निता विचारे यांच्या विरोधात भा. दं. वि. कलाम ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये अदखलपात्र गुन्हा दाखल करून घेतला. दरम्यान परिसरातील लोकप्रतिनिधी यांनी विचारे कुटुंब आणि सावंत कुटुंबांची बैठक लावण्याचे प्रयत्न केले. रविवारी (२३ जून) रोजी सदरची बैठक देखील पार पडली. या बैठकीला काही राजकीय पदाधिकारी तसेच पोलीस कर्मचारी देखील ग्रामस्थांसह उपस्थित होते. सुरुवातीला बैठकीमध्ये चर्चा सुरळीतपणे सुरू झाली मात्र काही वेळाने रमेश सावंत आणि अनेक गुन्हे दाखल असलेला प्रसाद विचारे यांनी याठिकाणी येऊन सभा उधळून लावण्याचा प्रयत्न केला. प्रतिष्ठित लोकप्रतिनिधी असलेल्या मध्यस्थांनी दिलेला पर्याय हा सावंत बंधूंनी धुडकावला. यामध्ये प्रमुख भूमिका बजावणारे प्रसाद विचारे याचे काम हे बिघडविण्याचे काम असल्याचे ग्रामस्थांमधून नेहमीच बोलले जात असते त्याची प्रचिती देखील या बैठकीमध्ये ग्रामस्थांना अनुभवण्यास मिळाली. मुळातच सावंत कुटुंबाची ही जागा नसताना देखील कामानिमित्त आपण बाहेर राहत असल्यामुळे त्यातील अर्धी जागा देऊन मार्ग काढण्यासाठी विचारे कुटुंबांनी एक पाऊल मागे घेतले होते. मात्र जागा बळजबरी करून लाटण्याचा घाट घालणाऱ्या सावंत बंधूंना हे मान्य नसल्यामुळे अखेर विचारे बंधूंनी आपण न्यायालयीन लढाई लढून सत्याचा विजय होईल असा आशावाद व्यक्त केला आहे. 00000

दोन दिवस माथेरानला पर्यटकांची तोबा गर्दी

माथेरान : चौथ्या शनिवारी सुट्ट्यांमुळे पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी तोबा गर्दी केली होती. सलग दोन दिवस घाटात नेहमीप्रमाणे प्रशासनाच्या निष्क्रिय व्यवस्थेमुळे आणि कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण…

निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांच्या उपस्थितीत  १० वा आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रम संपन्न

रायगड : निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांच्या उपस्थितीत शुक्रवारी,(दि.२१) जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, आणि नेहरु युवा केंद्र व प्रिझम सामाजिक संस्था यांच्या संयुक्त…

माथेरानमध्ये नव्या एटीएममुळे पर्यटकांना दिलासा

माथेरान : माथेरान मध्ये आज माथेरान नागरी सहकारी पतसंस्था यांच्या माध्यमातून 85 व्या वर्धापन दिनानिमित्त येथील स्थानिक व पर्यटकांना एक वेगळी भेट देताना स्वतःचे एटीएम सुरू केले आहे यामुळे पर्यटकांना…

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी अर्ज करावेत – सुनिल जाधव

अशोक गायकवाड रायगड : पात्र असूनही शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यास इतर मागासवर्ग विमुक्त व भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागाने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरु केली असून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी अर्ज करावेत, असे आवाहन सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग सुनिल जाधव यांनी केले आहे. बारावी उत्तीर्ण केलेल्या व विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण तसेच व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी मदत होणार आहे. इयत्ता बारावी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या परंतु शैक्षणिक संस्थेच्या वसतिगृहामध्ये मोफत प्रवेश घेतलेल्या परंतु शैक्षणिक संस्थेच्या वसतिगृहामध्ये मोफत प्रवेश न मिळालेल्या इतर मागासवर्ग व विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी भोजनभत्ता, निवासभत्ता व निर्वाहभत्ता उपलब्ध करुन दिला जात आहे. गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक आर्थिक सहाय्य देण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. ओबीसी, एसबीसी, व्हीजे, एनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळतो. मोठया शहरातील भोजनभत्ता ३२ हजार, निवास भत्ता २० हजार, उदरनिर्वाह भत्ता ८ हजार मिळतो तर जिल्हा पातळीवर भोजन भत्ता २५ हजार निवास भत्ता १२ हजार उदरनिर्वाह ६ हजार रुपये मदत दिली जाते. पात्र विद्यार्थ्यांना काय मिळणार :- ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना वार्षिक ६० हजार रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाते. पात्र विद्यार्थ्यांना भोजनभत्ता, गृहनिर्माण भत्ता, राहणीमान भत्ता अशा विविध स्तरावरील भत्ते दिले जातात. या माध्यमातून अनेक गरजू विद्यार्थ्यांना लाभ मिळत असून उच्च शिक्षणासाठी मदत होत असते. या लागणारी कागदपत्रे :-विद्यार्थी ओबीसी, व्ही.जे.एन.टी., एसबीसी, प्रवर्गातील असावा, अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु असणे आवश्यक आहे, अभ्यासक्रमाशी संबंधित शैक्षणिक कागदपत्रे असावीत. अर्ज सादर करण्याकरीताचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे :- उच्च शिक्षणाचे द्वितीय, तृतीय व चतुर्थ वर्ष-अर्ज स्विकारण्याची तारीख २० जून २०२४, अर्ज स्विकारण्याचा शेवटचा दिनांक-१५ जुलै २०२५, निवड यादी जाहीर करण्याचा दिनांक ०१ ऑगस्ट २०२४. उच्च शिक्षणाचे प्रथम वर्ष- अर्ज स्विकारण्याची तारीख ०५ ऑगस्ट २०२४, अर्ज स्विकारण्याचा शेवटचा दिनांक-२० ऑगस्ट २०२४,, निवड यादी जाहीर करण्याचा दिनांक ०२ सप्टेंबर २०२४. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या लाभासाठी सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, रायगड, कच्छिभवन, नमिनाथ जैन मंदिरा जवळ, श्रीबाग रोड, अलिबाग, जि.रायगड या कार्यालयात अर्ज कसा करावा व कोठे करावा या संबंधी माहिती दिली जाईल.

मतपत्रिकाद्वारे मतदान होणार असून कोकण पदवीधर मतदारांनी मतदानाची पद्धत समजून घेणे गरजेचे – किशन जावळे

  अशोक गायकवाड रायगड : कोकण विधान परिषद पदवीधर मतदान संघ निवडणूक प्रक्रिया सुरू असून या निवडणुकीत मतपत्रिका द्वारे मतदान होणार आहे. मतदारांनी या मतदानाची पद्धत समजून घेणे गरजेचे आहे, या…

विशाळगडाचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करु – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रायगड : सध्या विशाळगड प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे, पण योग्य वेळ येताच विशाळगडाचा करेक्ट कार्यक्रम केला जाणार आहे. शिवभक्तांच्या भावनांची दखल घेतली जाणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगडावर केलेल्या भाषणात दिले. दुर्गे दुर्गेश्वर रायगडावर 351 वा…