Category: रायगड

raigad news and updates

‘आपला माणूस’ निवडून दिलात तो ‘आपला माणूस’ म्हणून यापुढेही कधीच समाजकारणाचा वसा सोडणार नाही – सुनिल तटकरे

रोहा : राजकीय संक्रमण काळात ‘आपला माणूस’ निवडून दिलात तो ‘आपला माणूस’ म्हणून यापुढेही  कधीच समाजकारणाचा वसा सोडणार नाही असा शब्द राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनिल तटकरे यांनी रोहा येथील आभार सभेत दिला. रोहेकरांचे ऋण व्यक्त करण्याचा हा आजचा दिवस आहे. समर्पित भावनेने या भागासाठी त्याग केला आहे. महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून ज्यापध्दतीने झपाटल्यासारखे काम केले त्यामुळे रोहेकरांनी मताधिक्य दिले त्यामुळे आयुष्य असेपर्यंत हे ऋण मी कधी विसरु शकत नाही अशा शब्दात सुनिल तटकरे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. या तालुक्याने माझ्या पाठीमागे मोठी शक्ती उभी केली आहे. निवडणूकीत परस्परांच्या विरोधात राजकीय लढाई लढत असताना पूर्वग्रहदूषित काही काम माझ्या हातून घडले नाही हेही आवर्जून सुनिल तटकरे यांनी सांगितले. देशात ज्या काही कमी जागा आल्या त्याला कारण संविधान बदलाबाबत होणारा अपप्रचार होता. अल्पसंख्याक समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण करण्यात आली. निवडणुकीत मत मागण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे परंतु ज्यावेळी जातीचे राजकारण पवारसाहेबांच्या उपस्थित इथे झाले याचे मनस्वी दु:ख झाले. गेली ४० वर्ष राजकारणात कार्यरत असताना सर्वधर्मसमभाव विचार घेऊन काम करताना कुठेही कुठल्या समाजाला दुरावा निर्माण करण्याचे काम झाले नाही असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले. या निवडणुकीत शेकाप हा किंगमेकर आहे असे चित्र निर्माण करण्यात आले होते. एक्झिट पोलमध्येही आम्ही मागे आहे असे दाखवण्यात आले मात्र रोहेकर आणि जिल्हयातील जनतेने हे किंगमेकर नाहीत हे मला विजयी करुन दाखवून दिले असेही सुनिल तटकरे यावेळी म्हणाले. या रायगड जिल्ह्यातील महायुतीच्या सहाच्या सहा जागा निवडून आणायच्या आहेत आणि  त्या स्पष्टपणे मिळवू असा आत्मविश्वास सुनिल तटकरे यांनी यावेळी व्यक्त केला. पत्नीचा उल्लेख करणे आज आवश्यक आहे कारण ती यावेळी जी काही माझ्यासाठी फिरली… मी तिला माऊली घरात आमच्यासाठी करते आणि इकडे पण का? मात्र तिने तिची जिद्द सोडली नाही आणि ती फिरली.. तिचे कौतुक करावे तितके कमीच आहे असेही आवर्जून सुनिल तटकरे यांनी सांगितले ५० खाटांचे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल अदानी समूहासोबत चर्चा करुन १५ दिवसात काम सुरू होईल आणि वर्षभरात कार्यान्वित होईल आणि दुसरं सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलही सुरू करण्याचा माझा मानस आहे असा पक्का शब्द सुनिल तटकरे यांनी रोहेकरांना दिला. सर्वात उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा रोहयात उभा राहणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारकही पूर्ण होणार आहे अशी माहितीही सुनिल तटकरे यांनी यावेळी दिली. ४० वर्ष जी काही अविरत मेहनत घेतली त्याचे फळ रायगड जिल्ह्याने मला अभूतपूर्व यश मिळवून दिले आहे. इथल्या सुजाण आणि सुज्ञ नागरिकांनी मला साथ दिली आहे त्याबद्दल सुनिल तटकरे यांनी त्यांचे आभार मानले. या मतदारसंघात जातीपातीचे राजकारण सुरू असताना विकासाच्या मुद्यावर इथल्या जनतेने निवडणूक ताब्यात घेत हक्काचा प्रतिनिधी निवडून दिला आहे. राज्य सरकारचे सहकार्य मिळणार आहेच शिवाय केंद्राचेही  आपला खासदार असल्याने निर्विवाद सहकार्य मिळणार आहे असा विश्वास बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी रोहेकरांना दिला. तटकरेसाहेब हे आपल्या घरातलीच व्यक्ती समजून तुम्ही मतदारसंघात उतरलात आणि आपण घेतलेल्या परिश्रमाला जनतेने प्रतिसाद चांगला दिला. महायुतीचा खासदार निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले त्याबद्दल अदितीताई तटकरे यांनी श्रीवर्धन मतदारसंघातील जनतेचे आभार मानले. रायगड लोकसभा मतदारसंघात प्रचंड मताधिक्याने विजयी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आभार दौरा दिनांक १४ जूनपासून सुरू केला असून दुसर्‍या दिवशी रोहा येथे महायुतीच्यावतीने जंगी स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार अनिकेत तटकरे यांनी केले. या आभार सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख मनोज शिंदे, भाजप तालुकाध्यक्ष अमित घाग, नितीन तेंडुलकर, माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, कुणबी समाज नेते सुनिल मगर, कुणबी समाजाचे अध्यक्ष रामचंद्र सकपाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विनोद पाशिलकर, नेत्या दिपिका चिपळूणकर आणि महायुतीचे नेते आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

२९ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत विशेष लोकअदालत सप्ताहाचे आयोजन – अमोल शिंदे

अशोक गायकवाड   रायगड : सर्वोच्च न्यायालयाद्वारे विधी सेवा प्राधिकरणने सहकार्य घेत २९ जुलै ते ३ ऑगस्ट या काळात विशेष लोक अदालत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे याचा नागरिकांनी लाभ…

राज्य उत्पादन शुल्कच्या छाप्यात १ कोटी रूपयांचा गांजा जप्त

अशोक गायकवाड रायगड : आर. आर. कोले, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, रायगड-अलिबाग यांच्या मार्गदर्शनाखाली, गांजा या अंमली पदार्थाची वाहतुक होणार आहे अशी माहिती मिळाल्यामुळे राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने तळोजे, नवी मुंबई येथे पाळत ठेवून १२ जून २०२४ रोजी सांयकाळी छापा टाकून कारवाई केली.आरोपींच्या ताब्यातून एकुण १ कोटी १३ लाख ९० हजार रुपये किमतीचा गांजा, वाहन व मोबाईल असा मुद्देमाल जप्त करून गुन्हयाच्या पुढील तपासासाठी अटक करण्यात आली आहे. आरोपीविरूध्द एनडीपीएस कायदा १९८५ अन्वये. कलम ८ (क), २० (ब) (II), २९ तसेच भा. द. स. कलम ३२८ अन्वये त्यांच्या विरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला. पनवेल मुंब्रा हायवेच्या डाव्या बाजुस स्टार वेल्डींग वर्कसच्या समोर, तळोजे पाचनंद, से. नं. ४०, तळोजे, नवी मुंबई येथे गांजा या अंमली पदार्थाचा मोठासाठा वाहतुक होणार आहे अशी कार्यालयास माहिती मिळाली. निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांच्या भरारी पथक क्रमांक २, पनवेल यांनी मिळालेल्या माहितीनुसार पाळत ठेवून १२ जून २०२४ रोजी सांयकाळी छापा टाकला. यावेळी एक महिन्द्रा कंपनीची एक्सयूव्ही ५०० गाडीमध्ये दोन आरोपी आरिफ जाकीर शेख वय २५ वर्षे रा. रूम नं. १२, तळ मजला, ब्लॉक नं. ए ७८, कोकरी आगर जवळ म्हाडा चाळ सायन कोळीवाडा मुंबई व परवेझ बाबुअली शेख वय २९ वर्षे रा. रूम नं. १३, तळ मजला, ब्लॉक नं. ए ७८ कोकनी आगर जवळ म्हाडा चाळ सायन कोळीवाडा मुंबई यांच्या ताबे कब्जात पांढऱ्या रंगाच्या नायलॉन गोण्यामध्ये ४१४ किलो अं. १ कोटी रूपयांपेक्षा जास्त किमंतीचा गांजाचा साठा मिळून आला. या गुन्हयामध्ये अंतरराज्यीय टोळी असण्याची दाट शक्यता असून ही कारवाई करताना डॉ. विजय सुर्यवंशी (भा. प्र. से.) आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, प्रसाद सुर्वे संचालक (अ. व. द.) राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई, प्रदिप पवार उप-आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, कोकण विभाग ठाणे, आर. आर. कोले, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, रायगड-अलिबाग यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक आर. डी. पाटणे, निरीक्षक उत्तम आव्हाड, दुय्यम निरीक्षक डी. सी. लाडके, दुय्यम निरीक्षक एन. जी. निकम, दुय्यम निरीक्षक प्रविण माने, तसेच सहा. दु. नि. जी. सी. पालवे, महिला जवान आर. डी. कांबळे, . निशा ठाकुर, जवान ज्ञानेश्वर पोटे, सचिन कदम, हे सहभागी होते. गुन्हयाचा पुढील तपास आर. आर. कोले, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, रायगड-अलिबाग यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक आर. डी. पाटणे हे करत आहेत.

प्रशासकांकडून ई रिक्षाच्या चार्जिंग स्पॉटची पाहणी

माथेरान : नुकताच हातरीक्षा चालकांच्या हाती पर्यावरण पूरक ई रिक्षाचे स्टेरिंग आल्यामुळे पर्यटकांसह स्थानिक लोक मोठया प्रमाणावर या स्वस्त आणि सुरक्षित प्रवासी सेवेचा लाभ घेत आहेत.सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार सनियंत्रण समितीने सध्या वीस ई रिक्षांना पायलट प्रोजेक्ट म्हणून परवानगी देण्यात आली असून उर्वरीत ७४ नवीन ई रिक्षा लवकरच सध्याचा पायलट प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर हातरीक्षा मालकांना मिळणार आहेत. ई रिक्षांना चार्जिंग करण्यासाठी एकूण तीन ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. यातील दस्तुरी नाक्यावर २,कम्युनिटी हॉल परिसरात ५ आणि नगरपरिषदेच्या आवारात ५ ई रिक्षांना चार्जिंग करण्याची व्यवस्था नगरपरिषदेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. परंतु सद्यस्थितीत वीस ई रिक्षांना चार्जिंग साठी जागा अपुरी पडत असल्याने मुख्य ठिकाण असणाऱ्या कम्युनिटी हॉल परिसरात आणखीन चार्जिंग व्यवस्था करण्यात यावी यासाठी ई रिक्षा संघटनेचे पदाधिकारी यांनी प्रशासक तथा मुख्याधिकारी राहुल इंगळे यांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी विनंती केली. यावेळी अध्यक्ष शकील पटेल, उपाध्यक्ष प्रकाश सुतार, सचिव सुनील शिंदे, चालक रुपेश गायकवाड, किशोर सोनावले, अक्षय वैद्य,सिताराम शिंदे, दीपक डोईफोडे, मारुती कदम, दिलीप कदम, शैलेश भोसले,विजय कदम आदी उपस्थित होते. रिक्षा संघटनेची आवश्यक सूचना लक्षात घेऊन आम्ही नगरपरिषदेच्या अभियंत्यांना याबाबतीत माहिती देऊन पुढील उचित कार्यवाही करण्यात येईल. राहुल इंगळे — प्रशासक तथा मुख्याधिकारी माथेरान नगरपरिषद ०००००

सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृहात व निवासी शाळेत प्रवेशासाठी अर्ज सादर करा – सुनिल जाधव

अशोक गायकवाड रायगड :वसतिगृहात रहाणाऱ्या मुलामुलींकरिता इ.८ वी पासून पुढे मांग, भंगी, कातकरी व माडिया गोंड या जातीमधील मुला-मुलींकरिता इ.५ वी पासून निर्वाह भत्ता देण्यात येतो. निवासी शाळेतील मुलांकरिता इ.६ वी पासून इ.१० वी पर्यत शाळा आहे. विहित नमुन्यातील अर्ज वसतिगृहात वरील पत्यावर विनामूल्य उपलब्ध आहेत. अधिक माहितीकरिता सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, रायगड-अलिबाग, कच्छिभवन, नमिनाथ जैन मंदिर, सेंटमेरी स्कूलसमोर, श्रीबाग रोड, अलिबाग येथे अथवा संबधित गृहपालांशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सुनिल जाधव यांनी केले आहे. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण रायगड यांच्या अधिनस्त अनु.जाती करीता सध्या ७ शासकीय वसतिगृहे व एक निवासी शाळा पुढीलप्रमाणे कार्यरत आहेत. रायगड जिल्ह्यांतर्गत कार्यरत वसतीगृहाचे नाव, ठिकाण व पूर्ण पत्ता – मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, महाड गोकुळ विहार, चवदार तळे ता. महाड, रिक्त जागा- अनु, जाती २५, अनु सूचित जमाती २, भटक्या विमुक्त जमाती ४, आर्थिकदृष्टया मागास २, विशेष मागासवर्गीय ०, अपंग २, अनाथ १, एकूण रिक्त जागा ३५. रायगड जिल्ह्यांतर्गत कार्यरत वसतिगृहाचे नाव, ठिकाण व पूर्ण पत्ता – मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, महाड, जि. रायगड तालुका पोलिस स्टेशनजवळ, नवेनगर,, रिक्त जागा- अनु, जाती २९, अनु सूचित जमाती ३, भटक्या विमुक्त जमाती ३, आर्थिकदृष्टया मागास १, विशेष मागासवर्गीय ०, अपंग २, अनाथ २, एकूण रिक्त जागा ४०.रायगड जिल्ह्यांतर्गत कार्यरत वसतिगृहाचे नाव, ठिकाण व पूर्ण पत्ता – मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागास मुर्लीचे शासकीय वसतिगृह पाली-सुधागड, यांचे कार्यालय मधली आळी, राम मंदीर रोड, पाली-सुधागड, रिक्त जागा- अनु, जाती ५८, अनु सूचित जमाती २, भटक्या विमुक्त जमाती -१, आर्थिकदृष्टया मागास २, विशेष मागासवर्गीय २, अपंग २, अनाथ ०, एकूण रिक्त जागा ६६. रायगड जिल्ह्यांतर्गत कार्यरत वसतिगृहाचे नाव, ठिकाण व पूर्ण पत्ता – मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, पनवेल, सेक्टर १०, प्लॉट नंबर २१ ग्रीनपार्क सोसायटी समोर, रिक्त जागा- अनु, जाती १२, अनु सूचित जमाती ०, भटक्या विमुक्त जमाती ०, आर्थिकदृष्टया मागास ०, विशेष मागासवर्गीय ०, अपंग २, अनाथ १, एकूण रिक्त जागा १५. रायगड जिल्ह्यांतर्गत कार्यरत वसतिगृहाचे नाव, ठिकाण व पूर्ण पत्ता – मागासवर्गीय मुलांचे शासकिय वसतिगृह, अलिबाग, गणेशमंदीर शेजारी, विजय नगर, वरसोली-अलिबाग, रिक्त जागा- अनु, जाती ५३, अनु सूचित जमाती १, भटक्या विमुक्त जमाती १, आर्थिकदृष्टया मागास २, विशेष मागासवर्गीय ०, अपंग २, अनाथ २, एकूण रिक्त जागा ६१. रायगड जिल्ह्यांतर्गत कार्यरत वसतिगृहाचे नाव, ठिकाण व पूर्ण पत्ता – मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागास मुलीचे शासकीय वसतिगृह अलिबाग, गोंधळपाडा- अलिबाग, रिक्त जागा- अनु, जाती ६१, अनु सूचित जमाती ०, भटक्या विमुक्त जमाती -१, आर्थिकदृष्टया मागास ४, विशेष मागासवर्गीय १, अपंग २, अनाथ २, एकूण रिक्त जागा ६९. रायगड जिल्ह्यांतर्गत कार्यरत वसतिगृहाचे नाव, ठिकाण व पूर्ण पत्ता – मागासवर्गीय मुलांचे शासकिय वसतिगृह बोरघर-हवेली, तालुका क्रीडा संकुलाजवळ, बोरघर-हवेली, ता. तळा, रिक्त जागा- अनु, जाती ६७, अनु सूचित जमाती २, भटक्या विमुक्त जमाती ३, आर्थिकदृष्टया मागास २, विशेष मागासवर्गीय २, अपंग २, अनाथ २, एकूण रिक्त जागा ८०. रायगड जिल्ह्यांतर्गत कार्यरत वसतिगृहाचे नाव, ठिकाण व पूर्ण पत्ता – अनुसूचित जाती/नवबौध्द मुलांकरिता शासकिय निवासी शाळा, जावळी, ता. माणगांव, रिक्त जागा- अनु, जाती ११९, अनु सूचित जमाती ०, भटक्या विमुक्त जमाती ०, आर्थिकदृष्टया मागास ०, विशेष मागासवर्गीय १, अपंग ५, अनाथ ०, एकूण रिक्त जागा १२५. वसतिगृह प्रवेशाकरीता आरक्षणाचा तपशिल- अनु.जाती ८० टक्के, अनु.जमाती ३ टक्के, विमुक्त जाती, भटक्या जमाती ५ टक्के, विशेष मागास प्रवर्ग ०२ टक्के, आर्थिकदृष्टया मागास ५ टक्के, अनाथ ३ टक्के, निवासी शाळ प्रवेशाकरीता आरक्षणाचा तपशिल- अनु.जाती ८० टक्के, अनु.जमाती १० टक्के, विमुक्त जाती, भटक्या जमाती ५ टक्के, विशेष मागास प्रवर्ग २ टक्के, अपंग २ टक्के. वसतिगृह/निवासी शाळेची वैशिष्टये-मोफत निवास व भोजन व्यवस्था, शैक्षणिक अभ्यासक्रमानुसार लागणारी वह्या, पुस्तके, शैक्षणिक व महाविद्यालयीन प्रवेशितांकरिता लेखन साहित्याकरिता रु. ४ हजार, शैक्षणिक साहित्य खरेदी भत्ता,. दैनंदिन व वैयक्तिक खर्चाकरिता दरमहा रु.६००, निर्वाहभत्ता जिल्हापातळीवर रु.५००, निर्वाहभत्ता तालुका पातळीवर, शालेय/महा. शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना गणवेशाचे दोन संचाकरिता गणवेष भत्ताप्रोजेक्ट रिपोर्ट/शै. सहल भत्ता, अॅप्रन भत्ता इ. आवश्यक कागदपत्र- प्रवेशपात्र विद्यार्थ्याच्या पालकांचे सर्व मार्गानी मिळून वार्षिक उत्पन्न अनु. जाती, व जमाती विद्यार्थ्यांकरिता रु.२ लाख ५० हजारचे आत व विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागास प्रवर्ग, आर्थिकदृष्टया मागास, अनाथ व अपंग घटकातील विद्यार्थ्यांकरिता रु.१ लाख ५० हजारचे आंत असावे, अर्जासोबत तहसिलदार यांचे सहीचा सन २०२३-२४ मधील उत्पन्नाचा दाखला, जातीचे मुलकी अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, मागील इयत्ता पास झाल्याचे गुणपत्रक, बँक खात्याची झेरॉक्स, आधार कार्ड झेरॉक्स जोडणे आवश्यक आहे. 000000

पावसाळ्यात नागरिकांना आरोग्याची काळजी घ्यावी – डॉ. भरत बास्टेवाड*

अशोक गायकवाड अलिबाग :जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले असून, पावसाळ्यात नागरिकांना आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रत्येकाने वैयक्तीक स्वच्छतेसह आपल्या परिसरातही स्वच्छता राहिल याची काळजी घ्यावी, पाणी उकळून प्यावे,…

 पावसाच्या पाण्याच्या साठवणीसाठी प्रकल्प;

२.२ लाख घन मीटरपेक्षा जास्त पावसाच्या पाण्याचा होणार पुनर्भरणा रायगड जिल्ह्यातील उपक्रम पनवेल (प्रतिनिधी)  टाटा स्टीलने जागतिक पर्यावरण दिनी रायगड जिल्ह्यातील खोपोलीमध्ये पावसाच्या पाण्याच्या साठवणीच्या नवीन प्रकल्पाचा शुभारंभ केला आणि प्रकल्पाच्या ठिकाणी १५०० पेक्षा जास्त झाडे लावून सस्टेनेबिलिटी महिन्याची सुरुवात साजरी केली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ रायगडचे क्षेत्रीय अधिकारी जयंत हजारे आणि क्षेत्र अधिकारी मीना पवार, खोपोली व होसूरचे कार्यकारी प्लान्ट प्रमुख कपिल मोदी आणि सावरोली गावाचे सरपंच संतोष गणेश बैलमारे हे यावेळी उपस्थित होते. पावसाच्या पाण्याची साठवण करणाऱ्या या नवीन प्रकल्पामुळे प्लान्टची ताज्या पाण्याची आवश्यकता ५० हजार घन मीटरने कमी होईल. या प्रकल्पामध्ये ९ पुनर्भरण खड्ड्यांद्वारे २.२ लाख घन मीटरपेक्षा जास्त पावसाच्या पाण्याचा जलचरामध्ये पुनर्भरणा केला जाण्याची अपेक्षा आहे.सह्याद्री पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेले खोपोली हे रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील एक औद्योगिक शहर आहे. इथे दरवर्षी १८५०-३९१४ मिलीमीटर पाऊस होतो, त्यामुळे महाराष्ट्रातील सुपीक पाणलोट क्षेत्रांमध्ये खोपोलीचा समावेश होतो. टाटा स्टीलमध्ये जून हा सस्टेनेबिलिटी महिना म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असून, यामध्ये कर्मचाऱ्यांसाठी विविध स्पर्धा, जागरूकता सत्रे, वृक्षारोपण मोहीम इत्यादींचा समावेश असणार आहे. 0000

भारतीय जनता पक्षाच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन

माथेरान : माथेरान मध्ये भारतीय जनता पार्टी आणि माधवबाग, खालापूर (मल्टिडिसिप्लिनरी कार्डीयक क्लीनिक अँड हॉस्पिटल ) यांच्या संयुक्त विद्यमाने हृदय रोग, रक्तदाब, व मधुमेह तपासणी शिबीराचे दि.१३ रोजी येथील कम्युनिटी…

प्रशासकांकडून ई रिक्षाच्या चार्जिंग स्पॉटची पाहणी

माथेरान : नुकताच हातरीक्षा चालकांच्या हाती पर्यावरण पूरक ई रिक्षाचे स्टेरिंग आल्यामुळे पर्यटकांसह स्थानिक लोक मोठया प्रमाणावर या स्वस्त आणि सुरक्षित प्रवासी सेवेचा लाभ घेत आहेत.सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार सनियंत्रण समितीने…

ई- केवायसी व बँक खाती आधार संलग्न करा-विकास पाटील

अशोक गायकवाड रायगड : ई- केवायसी व बँक खाती आधार संलग्न करणे यासाठी अनुक्रमे नजीकच्या सामाईक सुविधा केंद्र व इंडिया पोस्ट पेमेंट बँक च्या मार्फत कार्यपूर्तता करावी, असे विकास पाटील,कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी कळविले आहे. प्रधानमंत्री किसान योजनेसाठी नोंदणी करणे, ई-केवायसी करणे, बँक खाती आधार क्रमांकास जोडणे या बाबींची पूर्तता योजनेचा १७ वा हप्ता वितरणापूर्वी स्वत: बँक खाती आधार संलग्न व ई-केवायसी न केलेल्या लाभार्थींनी सदर बाबींची पूर्तता ५ ते १५ जून, २०२४ या कालावधीत या विशेष मोहिमेमध्ये करून घेण्याचे आवाहन शेतकरी बांधवांना करण्यात येत आहे शेतक-यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. या योजने अंतर्गत सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची १८ वर्षाखालील अपत्ये) २००० रुपये प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी रू. ६००० रुपये लाभ अदा करण्यात येते.लागवडीलायक क्षेत्रधारक, बँक खाती आधार संलग्न व योजनेचे ई-केवायसी केलेले शेतकरी कुटुंब पी. एम. किसान योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत. या योजनेच्या लाभासाठी बंधनकारक असलेल्या या तिन्ही बाबींची पूर्तता राज्यातील ९० लाख २० लाभार्थ्यांनी केलेली आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार दिनांक ०५ जून, २०२४ ते १५ जून, २०२४ या कालावधीत या बंधनकारक बाबींची उर्वरित लाभार्थींनी पूर्तता करण्यासाठी गावपातळीवर विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेमध्ये लाभार्थींची स्वयं नोंदणी व ई-केवायसी साठी राज्यातील सर्व सामाईक सुविधा केंद्र तर आधार संलग्न बँक खाती उघडण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक यांनाही सहभागी करण्यात आले आहे. त्यानुसार भूमी अभिलेख नोंदीनुसार नुसार जमिनीचा तपशील अद्ययावत न केलेल्या, बँक खाती आधार संलग्न व ई-केवायसी न केलेल्या लाभार्थींनी सदर बाबींची पूर्तता या विशेष मोहिमेमध्ये करून घ्यावी. यामध्ये भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत नसलेल्या लाभार्थींनी संबंधित तलाठी / तहसील कार्यालयामध्ये संपर्क साधावा. त्याचप्रमाणे ई- केवायसी व बँक खाती आधार संलग्न करणे यासाठी अनुक्रमे नजीकच्या सामाईक सुविधा केंद्र व इंडिया पोस्ट पेमेंट बँक च्या मार्फत कार्यपूर्तता करावी, असे विकास पाटील,कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी कळविले आहे. 00000