Category: रायगड

raigad news and updates

मुंबईत २१ जूनला डाक अदालतीचे आयोजन

तक्रार ७ जून २०२४ पर्यंत पोहचेल अशा रितीने पाठवावी-सुनिल थळकर अशोक गायकवाड रायगड : मुख्य पोस्ट मास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई येथे २१ जून रोजी डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले असून ७ जून २०२४ पर्यंत पोहचेल अशा रितीने पाठवावी, असे आवाहन अधीक्षक डाकघर रायगड विभाग सुनिल थळकर यांनी केले आहे. मुख्य पोस्ट मास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल, अनेएक्स बिल्डिंग, जीपीओ कॉम्प्लेक्स, चौथा माळा, मुंबई यांच्या कार्यालया‌द्वारे दि.२१ जून २०२४ रोजी, दुपारी ३.०० वाजता १२७ वी डाक अदालत आयोजीत करण्यात आली आहे. इछुक ग्राहकांनी आपली तक्रार २ प्रतीत असिस्टंट डायरेक्टर पोस्टल सर्विसेस (पीजी) अँड सेक्रेटरी, डाक अदालत ०/० मुख्य पोस्ट मास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल, अनेएक्स बिल्डिंग, जीपीओ कॉम्प्लेक्स चौथा माळा, मुंबई ४००००१ यांच्याकडे दि.०७ जून २०२४ पर्यंत पोहचेल अशा रितीने पाठवावी, यामध्ये महाराष्ट्र सर्कल विभागातील डाक सेवेसंबंधीत तक्रार/ समस्या ज्याचे निवारण ६ आठवडा कालावधीत झालेले नाही, अशा टपाल, स्पीडपोस्ट, काऊंटर सेवा, बचत बँक, मनीऑर्डर संबधित तक्रारी विचारात घेतल्या जातील.तक्रारीत सविस्तर माहिती जसे दिनांक, ज्या अधिकाऱ्याकडे मूळ तक्रार दाखल केली त्या अधिकाऱ्याचे नाव व हु‌द्दा इ. असणे आवश्यक आहे., असे आवाहन अधीक्षक डाकघर रायगड विभाग सुनिल थळकर यांनी केले आहे.

सुएसो माध्यमिक विद्यालयाचा दहावी परिक्षेचा निकाल ८६.३६ टक्के

ॲड. प्रसाद पाटील यांनी केले अभिनंदन अशोक गायकवाड अलिबाग :सु.ए.सो माध्यमिक विद्यालय, कुरुळ माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल ८६.३६ टक्के लागला आहे. स्थानिक शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ॲड. प्रसाद पाटील यांनी अभिनंदन केले आहे. सु ए सो माध्यमिक विद्यालय, कुरुळ माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल ८६.३६ टक्के लागला आहे. कुमारी शबा रिजवाना रजिउल्ला सिद्दीकी हिने ८४.८० टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. कुमारी अपूर्वा धनश्री माधव गोसावी हिला ७८.४० टक्के गुण मिळून द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. तर प्रणय भारवी भरत कांबळे याने ७८.२० टक्के मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. स्थानिक शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ॲड. प्रसाद पाटील , शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता पाटील यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. व ज्यांना यश मिळाले नाही त्या विद्यार्थ्यांनी निराश न होता पुन्हा प्रयत्न करावा असे आवाहन केले आहे. सर्व पालक, ग्रामस्थ, शाळेचे हितचिंतक यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

पर्यावरण संरक्षणासाठी सायकल रॅली

खारघर : संतुलित आणि सुरक्षित पर्यावरणासाठी केंद्र शासनाच्या शीघ्र कृती दलाच्या वतीने ५ मे ते ६ जूनदरम्यान ‘माय लाईफ’ अभियान राबवले जाणार आहे. या अभियानाचे औचित्य साधून खारघरमधील १०२ शीघ्र…

निवी या स्वप्नातील गावाला जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली भेट*

रायगड जिल्ह्यामधील ७०० गावे स्वप्नातील करणार – जिल्हाधिकारी किशन जावळे अशोक गायकवाड रायगड : रायगड जिल्ह्यामधील ७०० गावे स्वप्नातील करण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले तसेच निवी गावच्या विकासात शासन…

कर्जत तालुक्यातील नुकसानग्रस्तांना आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनचा मदतीचा हात

माथेरान : नुकताच अवकाळी पावसामुळे कर्जत तालुक्यातील आदिवासी वस्त्यांमध्ये अनेक ठिकाणी नुकसान झालेले आहे. त्यातच वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे पत्रे उडून गेले होते. याची माहिती मिळताच कर्जत खालापूर मतदार संघाचे…

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पेण येथील खुनाच्या गुन्ह्याचा पोलीसांनी लावला ३ दिवासात छडा ६ आरोपी जेरबंद

अशोक गायकवाड रायगड : रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पेण येथील खुनाच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीसांनी अवघ्या ३ दिवासात छडा लावला आहे आणि ६ आरोपींना जेरबंद करण्यात…

माथेरान नगरपरिषदेच्या पावसाळी पूर्व कामांना गती ; पावसाळी पाण्याच्या निचऱ्याची उत्तम सोय

माथेरान : माथेरान मध्ये पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाण्याचे लोंढे वहात असल्याने काही ठिकाणी मातीची धूप होते.रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या ब्रिटिश कालीन मोऱ्या दरवर्षी मातीच्या भरावाने भरत असतात त्यामुळे पावसाळी पाणी थेट…

अनधिकृत होर्डिंगप्रकरणी पालिका ॲक्‍शन मोडवर

खोपोलीत ३३ जणांना नोटिसा; कारवाईचा खर्च वसूल करणार खोपोली;- मुंबईतील घाटकोपर येथे झालेल्‍या होर्डिंग दुर्घटनेनंतर खोपोली नगरपालिका ॲक्शन मोडवर आली आहे. शहरातील अनधिकृत व असुरक्षित होर्डिंगचे सर्वेक्षण करण्याची मोहीम खोपोली…

आपत्कालीन परिस्थितीत समन्वय महत्त्वाचा-तहसीलदार आयुब तांबोळी

अशोक गायकवाड खालापूर : मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने तहसिलदार तथा अध्यक्ष तालुका आपत्ती व्यवस्थापन समिती खालापूर आयुब तांबोळी यांच्या अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालय खालापूर येथे तालुक्यातील सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालय प्रमुखांची बैठक संपन्न झाली आपत्कालीन परिस्थितीत समन्वय महत्त्वाचा आहे, असे मत-तहसीलदार आयुब तांबोळी यांनी व्यक्त केले. सदर बैठकीस निवासी नायब तहसिलदार खालापूर सुधाकर राठोड, सहा. गटविकास अधिकारी पंचायत समिती खालापूर सी.एस. राजपूत, उपमुख्याधिकारी नगरपरिषद खोपोली गौतम भगळे, अहगिनशमन अधिकारी, म.ओ.वि.म.पाताळगंगा आशिष मोरे, आरोग्य निरीक्षक, ता.आ. कार्यालय खालापूर प्रशांत अंबुर्ले, पोलीस उपनिरीक्षक खोपोली पोलीस ठाणे कर्मराज गावडे, पोलीस निरीक्षक, खालापूर पोलीस ठाणे एम.पी. खोपडे,पोलीस निरीक्षक रसायनी पोलीस ठाणे संजय बांगर,अशोक मोरे, कनिष्ठ अभियंता, मोरबे धरण न.मु.म.पा.,सुदर्शन आगलावे, शा.अभियंता, रा.जि.प.कर्जत, रविंद्र म्हात्रे, वनपाल, वनपरिक्षेत्र खालापूर, दिक्षांत वाघ, म.रा.वि.मर्या., खालापूर, वी.जी. आंब्रस्कर, दुय्यम निबंधक खालापूर, ङिएम. मोरखंडीकर, नगरपंचायत खालापूर, ङिके.भोईर, खालापूर पोलीस ठाणे, आर.एम.भदले, रसायनी पोलीस ठाणे, डी.बी.नाईक, ग्रामीण पाणी पुरवठा रा.जि.प. उपविभाग खालापूर, ए.जी.तेलखडे, एकात्मिक बाल विकास प्रकल्प विभाग खालापूर, श्रीम. शिल्पा दास पवार, शिक्षक विभाग पंचायत समिती खालापूर, संजय पवार, अग्निशमन पाताळगंगा, अजित महारनूर, सां.बां. विभाग खालापूर, एस.बी.मेंगाळ, पाटबंधारे विभाग, कर्जत, गुरुनाथ साठेलकर, अध्यक्ष, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, निलेश कुडले, सदस्य, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, अमोल कदम, सदस्य, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था,महेश भोसले, सदस्य, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था आदी उपस्थित होते. सन २०२४ च्या मान्सूनपुर्व तयारी अंतर्गत तालुक्यातील दरडप्रवण पूरप्रवण, धरणक्षेत्र, तलाव, धबधबे या ठिकाणी करावयाच्या उपाययोजनाबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. सदर बैठकीमध्ये सर्व विभागांनाप्रमुखांना आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करणे, नियंत्रण कक्ष स्थापन करणे, अधिकारी/कर्मचारी यांची मोबाईल नंबरसह अद्यावत माहिती सादर करण्याच्या सूचना देणेत आल्या. तसेच आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने सर्व विभागाला त्यांचे कार्यालयातील नोडल अधिकारी यांची नेमणूक करुन, त्याची माहिती तालुका नियंत्रण कक्षात सादर करणेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच विभागप्रमुखांनी विनापरवानगी मुख्यालय सोडू नये, भ्रमणध्वनी कायम सुरु ठेवण्याच्या व तालुक्यात उद्भवण्यात येणाऱ्या संभाव्य आपत्तीस तात्काळ प्रतिसाद देण्याचे निर्देश दिले. नैसर्गिक आपत्ती सन २०२४-२५ च्या अनुषंगाने तहसिलदार कार्यालय खालापूर येथे २४x७ तास तालुका नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. खालापूर तालुका नियंत्रण कक्ष संपर्क क्रमांक: १) ०२१९२-२७५०४८ २) ८२६२८९७८८८

खालापूरमध्ये पाणीटंचाईच्या झळा तीव्र

आदिवासी वस्त्यांची पाण्यासाठी पायपीट खोपोलीः आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार, अशी परिस्थिती सध्या खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने खालापूर तालुक्याला पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. प्रशासनाकडून पाणीटंचाईवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी ते तोकडे पडत आहेत. सध्या खालापूरमध्ये काही वाड्या व सहा-सात दुर्गम गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे तर आणखी आठ गावांना टँकरने पाणीपुरवठ्याचा प्रस्‍ताव आहे. २० हून अधिक वाड्या व गावांमधील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विंधन विहिरींसह अन्य उपाययोजनांवर भर दिला जात असला तरी नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरूच आहे. तापमानाचा पारा वाढल्‍याने विहिरी कोरड्या पडल्या असून धरणांतील पाणीसाठाही कमी झाला आहे. त्यामुळे शहरी भागासह ग्रामीण भागातही टंचाईच्या झळा तीव्र झाल्‍या आहेत. अनेक वाड्यात सद्यःस्थितीत टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे, तर काही ठिकाणी टँकर सुरू करण्याबाबत प्रस्‍ताव प्रशासनाकडे पाठवण्यात आला आहे. या गावांमध्ये सध्या पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्‍न आहे. तालुक्यातील परखंदे वाडी, शिरवली, डोणवत ठाकूरवाडी, वावोशी बौद्धवाडा, दांडवाडी, गोहे, बीड खुर्द, नडोदे, खरीवली, नारंगी, देवकुंड, शिरवली-ढेबेवाडी, चिंचवली-गोहे, बोरगाव-तारवाडी, वरोसे आंबेवाडी या ठिकाणी दरवर्षी पाणीटंचाई भेडसावते. ग्रामस्थांना पिण्याचे पाणी मिळावे, त्‍यांची वणवण थांबावी यासाठी तालुका प्रशासनाने ठोस पावले उचलली आहेत. ही गावे व वाड्यांमध्ये अनेक इंधन विहिरी व पाणी साठवणूक टाक्या पूर्णत्वास आल्या आहेत, तर काही प्रकल्प प्रस्तावित असून दीर्घकालीन उपाययोजनांमुळे या ठिकाणीचा पाणी प्रश्‍न निकाली निघेल, असा विश्‍वास प्रशासनाला आहे. योजनांच्या रखडपट्टीवर मौन खालापूर तालुक्यात तीन मोठी धरणे, अनेक पाझर तलाव व बारा महिने वाहणारी पाताळगंगा नदी आहे. असे असले तरी खालापुरकरांना दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. दरम्यान प्रशासनाकडून उपाययोजना सुरू असल्याचे गटविकास अधिकारी व अन्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे, मात्र योजना का रखडलेल्या या बाबत बोलण्यास कोणीही तयार नाही. खालापूर तालुक्यातून पाताळगंगा नदी वाहते. मोर्बा, कलोते, डोणवत या धरणांबरोबरच आत्करगाव, नढाळ यांच्यासह अनेक पाझर तलाव आहेत. असे असताना अनेक गावे व वाड्यांवर पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असून हंडाभर पाण्यासाठी महिलांना मैलोन् मैलाची पायपीट करावी लागते. प्रशासनाने सर्वच ठिकाणी पाणी योजना राबवल्‍या असल्‍या तरी निम्म्‍याहून अधिक योजनांची कामे रखडली आहेत. बारा महिने वाहणाऱ्या पाताळगंगा नदीच्या पाण्यावर अनेक गावांच्या योजना पूर्ण होऊ शकतात. मात्र नदीतील वाढते प्रदूषण, प्रशासनाची उदासीनतेमुळे पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्‍याचे नागरिकांची तक्रार आहे.