अशोक गायकवाड खोपोली : सर्व मोठी गटारे, जवळपास ९० हून अधिक लहान- मोठ्या नाल्यांमधील गाळ, माती, कचरा काढून सफाई करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी दिली. अतिवृष्टीमुळे दरवर्षी शहरातील मुख्य गटारे, नाले तुडूंब भरत असल्यामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होत असते. यावर्षी अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी नगर परिषदेमार्फत नालेसफाईच्या कामांना १ एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. सर्व मोठी गटारे, जवळपास ९० हून अधिक लहान- मोठ्या नाल्यांमधील गाळ, माती, कचरा काढून सफाई करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी दिली.नगर परिषदेच्या आरोग्य आणि बांधकाम विभागाच्या माध्यमातून विविध प्रभागातील लहान-मोठी गटारे, नाले यांच्या सफाईचे काम दरवर्षी हाती घेतले जाते. यंदाही भानवज-शास्त्रीनगर येथून येणाऱ्या नाल्यामुळे भाऊ कुंभार चाळ, गुलशन अपार्टमेंट, विणानगर परिसर, शिळफाटा येथील डीसीनगर आदी भागांमध्ये पावसाचे पाणी सखलभागात साचून पूरसदृश्य स्थिती निर्माण होते. या भागात असलेले नाले आणिमोठी गटारे यातील गाळ काडून पाण्याचा निचरा होण्यासाठी काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी ५० कर्मचारी काम करीत आहेत. छोटे नाल्यांच्या सफाईसाठी मनुष्यबळाचा,तर मोठ्या नाल्यांमध्ये जेसीबी, पोकलेन, डंपरचा वापर करून कचरा, गाळ उचलला जाणार आहे. साफसफाईच्या पाहणीनंतर मुख्याधिकारी डॉ. पाटील यांनी आरोग्य विभागाला आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.मोठ्या नाल्यांमध्ये जेसीबी, पोकलेन,डंपरचा वापर करून कचरा, गाळ उचलला जाणार आहे. साफसफाईच्या पाहणीनंतर मुख्याधिकारी डॉ. पाटील यांनी आरोग्य विभागाला आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.